इमोशनल हायजॅक -Emotional Hijack-मनोज अंबिके पुस्तक परिचय मराठी
इमोशनल हायजॅक
मनोज अंबिके
पुस्तक परिचय मराठी
Emotional Hijack
Manoj Ambike
Book Review In Marathi
विमान
हायजॅक झाल्याच्या घटना क्वचितच घडतात परंतु आपल्यापैकी प्रत्येक जण मात्र
रोज इमोशनली हायजॅक होत असतो, तेही अनेक वेळा. विशेष म्हणजे जो इमोशनल
हायजॅक होतो त्याला कळतही नाही की तो इमोशनली हायजॅक झालाय.
अशा वेळेस आपण
जे निर्णय घेतो, प्रतिक्रिया देतो, संवाद साधतो तो आपला नसून भावनेने
आपल्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे, इमोशनली हायजॅकपोटी झालेला असतो.
हे
पुस्तक सांगतं...
* इमोशनल हायजॅक होणं म्हणजे काय?* आपण हायजॅक का होतो* इमोशन्सवर कसा कंट्रोल मिळवायचा?* भावनेचे प्रकार* भावना हायजॅक असताना किंवा नसताना कसा प्रतिसाद द्यायचा, कशा प्रतिक्रिया द्यायच्या?* भावनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यायचा?* इमोशनल इन्टेलिजन्स कसा वाढवाल?
अप्रतिम पुस्तक आहे खूप सोप्या भाषेत अनुवाद केला आहे आपण कधी emotional hijack होतो आणि कसे आपण याला फेस करू शकतो, कसे सामोरे जाऊ शकतो हे सर्व समजावून सांगितलेलं आहे.
खरच खूप छान पुस्तक आहे आणि आताच्या
घडीला आवर्जून वाचण्या योग्य असे पुस्तक आहे. प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे कारण भावना ह्या प्रत्येक व्यक्तीला असतातच.
या धकाधकीच्या जीवनात काम कसं करायचे हे पुस्तक सांगतं.
#व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापन
आत्मविकास व आत्मव्यवस्थापन किंवा स्वयं व्यवस्थापनासाठी योग्य वेळी अतिशय उत्तम आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपण आपले मानसिक संतुलन राखून सुखी-समाधानी जीवन जगू शकतो. कारण सध्याच्या या कोरोनाच्या वातावरणात ब-याच जणांचे घरुन काम चालू आहे.
अचानक उद्बभलेली ही परिस्थिती अनेकांसमोर अनेक समस्या घेवून आली आहे. आर्थिक, मानसिक, भावनिक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींंनीही चिडचिड, वाद होत आहेत. कितीतरी जवळच्या, शेजारच्या, ओळखीतल्या लोकांच्या अचानक जाण्याने लोक इमोशनली हायजॅक होत आहेतच.
लेखकांच्या पुस्तकरूपी या मोलाच्या मार्गदर्शनातून सर्वांनाच मानसिक फायदा होईल. अशी आशा आहे. कारण मन चंगा तो कटोरीमें गंगा...
लेखकांच्या शब्दांत समजून घ्या..
इतर संबंधितः
- इमोश्नल इंटेलिजन्स
- भावनिक बुद्धिमत्ता
- मल्टीपल इंटेलिजन्स
- बहुविध बुद्धिमत्ता
- मन, भावना, विचार, जाणिव, संवेदना, सहानुभूती, कल्पना म्हणजे काय?
- देहबोली-बॉडीलॅंग्वेज- जाणून घ्या आपल्या शरीराची भाषा
- प्रवाही अवस्था प्राप्त करण्यासाठी स्वतःला जाणून घ्या- तुमचे व्यक्तीमत्व प्रकार
- सवयी- दैनंदिन सवयींचा सापळा
- दृष्टीकोन - जगाकडे आपण कसे पाहतो व का?
- चालढकलपणा, दिरंगाईपणा, Procrastination%टाळं-टाळ करणे कसे टाळावे?
Labels#अनुवाद, #परिचय, #मन की बात, #शैक्षणिक, #bookshorts
टिप्पण्या