बहुरंगी बुद्धिमत्ता -श्रृती पानसे | Bahurangi Buddhimatta by Dr Shruti Panse

आपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक

 शोधून काढा आपली हुशारी...
बहुरंगी बुद्धिमत्ता

श्रृती पानसे 

मराठी पुस्‍तक परिचय

 Bahurangi Buddhimatta by Dr Shruti Panse

 

मुलांचा मेंदू नक्की कसं काम करतो हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. मुलं कशी शिकतात? मुलं हुशार असतात म्हणजे नक्की काय? त्यांच्या बुद्धिमत्ता कशा शोधायच्या? मेंदूला पूरक आणि मेंदू घातक अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? असे विषय यामध्ये आहेत. या विषयावर प्रकाश टाकणारी दोन पुस्तकं आहेत- डोक्यात डोकवा आणि बहुरंगी बुद्धिमत्ता. 
Brain based learning आणि Multiple Intelligence या तत्त्वांचा विचार करून ही पुस्तकं लिहिली आहेत.पालक म्‍हणून स्वतः ला घडवताना या दोन पुस्तकांचा तुम्हाला उपयोग होईल.
- डॉ. श्रृती पानसे (लेखिका)


 प्रतिमा स्‍त्रोतः www.chikupiku.com

बहुरंगी बुद्धिमत्ता या पुस्‍तकात लेखिकेने हावर्ड गार्डनर यांच्‍या सिद्धांतावर आधारित बुद्धिमत्‍तेचे विविध आयाम, रंग, पैलू असतात असे सांगितले आहे.  आपण सर्व मानवांना भिन्‍न भिन्‍न बुद्धिची देनगी असते असे सांगितले आहे. 

अर्थातच बहुविध बुद्धी, बहुपैलू, बहुआयामी, प्रतिभा ज्‍याद्वारे आपण नैसर्गिकरित्‍या काहीही शिकण्‍याची, काहीही करण्‍याची बुद्धी ज्‍याद्वारे आपण शिकलेल्‍या गोष्‍टी लवकरात लवकर आत्‍मसात करू शकतो.  

आपल्‍या बुद्धिनुसार आपल्‍याला काम मिळाले तर ते मनापासून, उत्‍तमरितीने, कौशल्‍याने आपण इतरांपेक्षा सरस करू शकतो.  आपण नेमक्‍या कोणत्‍या बुद्धिचे धनी आहोत हे कळण्‍यासाठी ही पुस्‍तक नक्‍कीच वाचकांना मदत करेल.

आज प्रत्येकाला आपले मूल खेळात, कलेत अव्वल असावे असे वाटते. त्याचबरोबर त्याने 90-95% मार्क मिळवावेत अशीही अपेक्षा असते. याचा मुलांवर ताण येतो. मुलांच्या मेंदूमध्ये नैसर्गिकरीत्या कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, त्यासाठी त्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत हे या पुस्तकातून जाणून घेता येईल. या पुस्तकाच्या निमित्ताने मुलांबरोबरच पालकांनाही स्वतःच्या बुद्धीमत्तेत डोकावता येईल.   

आपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक आहे
 
एखादा व्‍यक्‍ती, खेळाडू, शिक्षक, विद्यार्थी, बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी, बहुरूपी, असा चहुअंगी असतो त्‍याचे कारण त्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये सर्वच्‍या सर्व बुद्धीमत्‍ताची नैसर्गिकच देनगी असू शकते असे हावर्ड गार्डनर म्‍हटले होते.  ज्‍यांनी या बहुविध बुद्धिमत्‍तेचा सिद्धांत मांडला होता.  प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने, शिक्षकांनी आणि पालकांनी आवर्जुन वाचावी व आत्‍मनिरिक्षण, आत्‍मपरिक्षण करावे अशी ही पुस्‍तक आहे, व त्‍यानुसार अनुसरन केल्‍यास नक्‍कीच  त्‍यांना भविष्‍यात फायदा होईल अशी आशा आहे.
 

 

👉इतर संबंधितः

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive