दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल


दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

 


आपण नाटक पाहायला गेलो, तर पुढची सीट मागतो, आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची.  तुमचं जगातलं स्‍थान असंच सापेक्ष असतं.   ते अविचल कधीच नसतं.  साबण बनवायला तेल हा घटक जरूरीचा असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटल विरोधाभास आहे.

जगात दोन प्रकारची माणसं आनंदात असतात.  वेडी माणसं आणि लहान मुलं.! चांगल्‍या कामासाठी ध्‍येयवेडे व्‍हा आणि ध्‍येय साध्‍य झाले की लहान मुलांसारखा त्‍याचा आनंद घ्‍या.   जगण्‍याचा आनंद घ्‍या. 

जीवन खूप सुदंर आहे.  फक्‍त तसं जगायला हवं.  काचेला पारा लावला की, आरसा तयार होतो.  पण, लोकांना आरसा दावला की, त्‍यांचा पारा चढतो  आरसा तोच असतो.  फक्‍त त्‍यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की, आपण दुःखी दिसतो.  तसेच, जीवनही तेच असतं, फक्‍त त्‍यासच्‍याकडे आपला पाहण्‍याचा दृष्टिकोन त्‍याला आनंदी किंवा दुःखी बनवतो.

म्‍हणून दृष्टिकोन महत्‍वाचा आहे.  दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल. 

_________________

*दृष्टिकोन किती महत्वाचा पहा, गणित तर समजून घ्या ..."मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.*

आपण असे मानू या की....

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 असे

मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या....

आपण असे म्हणतो की, आयुष्यात *"कठोर मेहनत/ HARDWORK"* केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण *"HARDWORK* चे गुण पाहु या.  

H+A+R+D+W+O+R+K =

8+1+18+4+23+15+18+11 = *98%* आहेत पण पूर्ण नाहीत.

 

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे *"ज्ञान" किंवा 'Knowledge'.*

याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E =

11+14+15+23+12+5+4+7+5= *96%* हे पहिल्या पेक्षा कमी.

 

काही लोक म्हणतात *"नशिब"/ LUCK* हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = *47%*,"नशिब" तर एकदमच काठावर पास.

 

काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी *"पैसा/MONEY"* सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता "M+O+N+E+Y=किती मार्क्स?

 13+15+14+5+25= *72%,* पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

 

बराच मोठा समुदाय असे मानतो की, *"नेतृत्वगुण/ LEADERSHIP"* करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= *97%*,

 बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

 

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला *१००%* सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो

काही कल्पना करू शकता?...... नाही जमत?

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा "दृष्टिकोन/ATTITUDE"

आता एटिट्यूड"चे आपल्या कोष्टकानुसार गुण तपासू... 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= *100%.*  

पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, *'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन'*. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  *१००%* यशस्वी  होईल आणि आनंदी ही होईल.

  *"दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल"*

_________________

 

A T T I T U D E

What is Attitude and How we Form an Attitude Simple, Easy to understand by Shiv Khera.

You Can Win by Shiv Khera.



  ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 

📗📖 We Can Change our Attitude through Two ways:
1) By Meeting New People
2) By Reading Books 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive