Hyper Focus- Author- Chris Bailey- Part-2 (हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले-भाग-२)

Hyper Focus- Author- Chris Bailey

हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले


       भाग-१   Part- 1                                   भाग-२  Part-2


 

तुमच्या लक्षात आलं असेल वरील आकडे १०० होत नाहीत, अजूनही झालेले नाहीत.

 

                भूतकाळाबद्दल              -        १२%

                वर्तमान काळाबद्दल        -        २८%

                पुढच्या काळाबद्दल         -        ४०%
______________________________________________

                     एकूण वेळ               -         ८०


बाकीचे २०-टक्‍के वेळेत आपला मेंदू काय करत असेल?


 बाकीचे २०
% आपला मेंदू कोरा म्‍हणजेच Blank असतो. तो काहीच विचार करत नाही. 

 

लेखक म्‍हणतातः जेंव्‍हा ते विणकाम (Knitting) स्‍वेटर बनवत असतात तेंव्‍हा त्‍यांचा मेंदू खूपकाही विचार करत असतो.  त्‍यादरम्‍यान त्‍यांना ब-याच नविन कल्‍पना येतात.  विणकाम (Knitting) स्‍वेटर बनवने त्‍यांचा आवडता छंद आहे.  ते विमानामध्‍ये विणकाम करतात, रेल्‍वेगाडीमध्‍ये विणकाम करतात, हॉटेलच्‍या खोलीमध्‍ये विणकाम करतात.  त्‍यांच्‍यासाठी विणकाम करणे (Knitting)-स्‍वेटर बनविने हे एक असे काम आहे ज्‍यामुळे ते (Calm down) शांत होत असतात. (Knitting is a healing process to him).

 

 

यादरम्‍यान ते स्‍वतःसोबत एक (Notepad) डायरी (चोपडी) ठेवत असत.  कारण विणकाम करत असताना त्‍यांच्‍या डोक्‍यामध्‍ये खूपसा-या कल्‍पना येत असतात.  

लेखक म्‍हणतात, तुम्‍हालाही विणकामच करणे गरजेचे नाही. तुमच्‍यासाठी हे काहीतरी दुसरं असू शकतं. 

ते असंही होऊ शकतं की थोडं जास्‍त वेळ अंघोळ करणे किंवा असही होऊ शकतं की तुम्‍ही फक्‍त शतपावली करत असाल, किंवा चालत असू, चालत असताना तुम्‍ही जर फोन वापरात नसाल तर, तुमचा मेंदू तुमची कार्यालयात उद्या ठरलेली मिटींग देखिल पाहू शकाल, त्‍या बैठकीमध्‍ये तुम्‍ही काय बोलणार आहोत हे दृष्‍यदेखील तुमचा मेंदू तुम्‍हाला दाखवू शकतो. 

 

तुमच्‍या मेंदूमध्‍येच ज्‍या कल्‍पना येत आहेत त्‍यांना एकत्रित करू शकेल. अशाप्रकारे तुमचा मेंदू तुम्‍हाला अधिक सर्जनशिल बनून टाकेल.

चालणेच नाही तर असही होऊ शकेल की तुम्‍ही एखाद्या रांगेमध्‍ये कोणाची तरी वाट बघत असाल, असही होऊ शकते की तुम्‍ही मसाज घेत असाल, भांडी किंवा कपडे धूत असाल, घरची साफ-सफाई करत असाल, नखे काढत असाल.

असे कोणतेही काम जे तुम्‍हाला करणे पसंत असेल, आवडत असेल असे काम करत असाल आणि त्‍यादरम्‍यान तुम्‍ही फोनचा वापर करत नसाल तर तुमचा मेंदू बरेच काही करू शकतो.

लेखक म्‍हणतात, तुम्‍ही मसाज घेत आहात असे गृहित धरा.  त्‍यादरम्‍यान तुम्‍हाला तुमच्‍या सोबत एक नोटपॅड-डायरी (चोपडी)  ठेवायला पाहिजे, कारण त्‍यादरम्‍यान येणारे विचार, कल्‍पना तुम्‍ही लिहून ठेवू शकाल ज्‍यावर तुम्‍ही नंतर काम करू शकाल. 

 

विचलित होणे आपल्‍या लक्ष केंद्रीत करण्‍याचा शत्रू नाही.

 

विचलित होणे आपल्‍या लक्ष केंद्रीत करण्‍याचा शत्रू नाही. खरेतर विचलित होणे हा एक Symptom आहे की का आपल्‍याला लक्ष केंद्रीत करायला त्रास होत आहे.  ह्या Symptom मागे एक समस्‍या ही आहे की आपला मेंदू अतिउत्‍तेजीत (Over Stimulated) आहे. 

म्‍हणजेच मेंदूमध्‍ये अत्‍याधिक चंचलपणा माजलेला आहे.   Over Stimulated Brain

 

लेखक म्‍हणतात, यासाठी आपल्‍याला ३-कार्ये केली पाहिजेत:

    दोन आठवड्यांचा आव्‍हान घ्‍या. ह्या अतिउत्‍तेजितपणाला कमी करण्‍याचा.  आणि ते तुम्‍ही तुमच्‍या मोबाईल फोनचा कमी वापर करून करू शकता. त्‍यानंतर तुमच्‍या लक्षात येईल की, तुमचा सतर्कपणा (Attention) मध्‍ये किती वाढ झाली, किती (Ideas) नविन कल्‍पना आल्‍या, किती नविन योजना (Plans) तुम्‍ही बनविल्‍या, तुमचा (Focus) लक्ष केंद्रीतपणा कसा आहे इत्‍यादी. 

 

X    Disconnected from Digital World   

 


.    दुसरी गोष्‍ट अशी की, दररोज संध्‍याकाळी ‘’संबंध तोडण्‍याची’’ एक विधी बनवा (Disconnection Ritual)

जसे- लेखकांचा एक आवडता विधी होता ज्‍यामध्‍ये ते संध्‍याकाळी ०८.०० वाजेपासून ते सकाळी ०८.०० वाजेपर्यंत इंटरनेटशी पुर्णपणे संबंध तोडत होते म्‍हणजेच मोबाईल फोन, इंटरनेट वापरत नव्‍हते.

त्‍यांचा आणि लेखकाच्‍या जोडीदाराचा दर आठवड्याला एक Disconnection Ritual असायचा. ते दोघे दर रविवारी आभासी/डिजीटल जगापासून संबंध तोडत होते आणि ख-या जगाशी संबंध जोडत होते. 


    Connect with Real World 

 


 

३. तिसरी आणि शेवटची गोष्‍ट म्‍हणजे, (Experience boredom daily) दररोज तुम्‍ही थोडेतरी कंटाळवाणेपणाचा अनुभव घ्‍या. 

तुम्‍हाला  दररोज एक तास कंटाळवाणेपणाचा अनुभव घेण्‍याची गरज नाही.  काही मिनिटांसाठी का होत नाही स्‍वतःला थोडे कंटाळा येऊ द्या.

सोफ्यावर, पलंगावर किंवा चटईवर झोपून निवांतपणे हे बघा की तुमचा मेंदू कुठे जातोय.

तुमच्‍या मेंदूला इकडे-तिकडे पळू द्या. तुमच्‍या मेंदूच्‍या Scattered Focus Mode मध्‍ये ब-याचशा चांगल्‍या गोष्‍टी मिळतील.

          

        Mobile         =    Flight Mode & Silent Mode

       Mind            =    Scattered Focus Mode

:

 

लेखक म्‍हणतात, (Attention) सतर्कताच आपले जीवन बनवत असते. जर आपण प्रत्‍येक सेकंदाला (Distracted) विचलित राहू आणि आपला मेंदू अतिउत्‍तेजित (Over stimulated) असेल तर आपण असे जीवन तयार करू जे अतिविचलित आणि थकलेला (Distracted and tired life) असेल. आपल्‍या जवळ स्‍पष्‍ट दिशा नसतील.

 

(Distracted mind will create a distracted and tired life)

 

 

परंतू आपण जेंव्‍हा (Less stimulated) किमान उत्‍तेजित असता, जेंव्‍हा आपण आपला मेंदू शांत करतो, तेंव्‍हा आपणाला फक्‍त अधिक उत्‍पादकताच नाही तर आपण अधिक लक्ष केंद्रित करतो, अधिक सर्जनशिलपणा येतो, ज्‍यामुळे आपण जीवनामध्‍ये पुढे चालू लागतो आणि अधिक चांगले जिवन जगू लागतो.

FOR PART-1  भाग-१ वाचण्‍यासाठी

 

ऑनलाईन पुस्‍तक मागवा (इंग्रजीआवृत्‍ती)

 


टिप्पण्या

  1. खूप चांगल्या प्रकारे आपण या पुस्तकाचा सारांश येथे मांडलेला आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्‍वागत, आणि वाचनासाठीच्‍या या संकेतस्‍थळावर भेट दिल्‍याबद्दल आपले खूप धन्‍यवाद. अमूल्‍य टिप्‍पणीमुळे आमचा उत्‍साह वाढतो.

      आयुष्‍यात बदल घडविण्‍यासाठी आपण स्‍वतःला समजून घेत आहात, स्‍वतःला जाणून घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाचनाला निवडलात याबददल आपले अभिनंदन. आपण स्‍वयंमदत, स्‍वयंविकास करण्‍यासाठीच्‍या मार्गावर आहात यावरून दिसून येते.

      आपल्‍या सवयी, टाळाटाळ करणे टाळा, दृष्‍टीकोन, मेंदू चे नियम असे उत्‍कृष्‍ठ स्‍वयंमदत म्‍हणजेच Self Help पुस्‍तकांचे सारांश वाचा. तुम्‍हाला नक्‍कीच आवडतील.
      ई-वाचनालय वरील इतर लोकप्रिय पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

      हटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive