हाऊ टू विन फ्रेंड्स अण्‍ड इन्‍फ्लूएन्‍स पीपल -डेल कार्नेगी- मराठी (How to Win Friends and Influence People by Dale Carnegie-Marathi)

मित्र जोडा आणि प्रभावशाली बना-यंत्रांना सहानुभूती, प्रोत्‍साहन आणि प्रेरणेची गरज नसते, माणूस मात्र शब्‍दांचा भुकेला असतो. तंत्राने फक्‍त यंत्रच जिंकता येतात, माणसं जिंकण्‍यासाठी मंत्रच सापडावा लागतो. –वपू काळे



हे बंध रेशमाचे!

हाऊ टू विन फ्रेंड्स अण्‍ड इन्‍फ्लूएन्‍स पीपल

लेखकः डेल कार्नेगी

मूळ इंग्रजी पुस्‍तक


 How to Win Friends and Influence People

by Dale Carnegie

मराठी अनुवाद

पुस्‍तक परिचय मराठी

How to Win Friends and Influence People Marathi | Book Review  

हाऊ टू विन फ्रेंड्स अण्‍ड इन्‍फ्लूएन्‍स पीपल मराठी |  मित्र जोडा आणि प्रभावशाली बना
पुस्‍तक परिचय

 

"यंत्रांना सहानुभूती, प्रोत्‍साहन आणि प्रेरणेची गरज नसते, माणूस मात्र शब्‍दांचा भुकेला असतो."

"तंत्राने फक्‍त यंत्रच जिंकता येतात, माणसं जिंकण्‍यासाठी मंत्रच सापडावा लागतो." –वपू काळे

 

आई-वडिल, भाऊ-बहिण, मामा-मामी, काका-काकू, आजी-आजोबा अशी नाती आपल्‍याला जन्‍मतःच मिळतात आणि इतर मित्र-दोस्‍त संबंध आपण आपल्‍या सामाजिक व्‍यवहाराद्वारे निर्माण करतो. 

आपण संबंध तोडतो आणि जोडतोदेखिल.  नाते आणि संबंध टिकवण्‍यासाठी सुसंवाद साधून आपण कशाप्रकारे अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण करू शकतो, याचे काही मार्गदर्शक सूत्रं डेल कार्नेगी (Dale Carnegie) यांनी How to Win Friends and Influence People या पुस्‍तकात मांडली आहेत.

१९३६ मध्‍ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्‍तक आजही जगभरात सर्वाधिक वाचले जाणारे पुस्‍तक आहे.  या पुस्‍तकाच्‍या ३-कोटींपेक्षा जास्‍त प्रती विकल्‍या गेल्‍या आहेत.  सामान्‍य मनात रूढ झालेल्‍या गोष्‍टीच वेगळ्या पद्धतीने केल्‍यास त्‍याचे पर्यवसान परस्‍पर संबंध वाढवण्‍यास आणि वृद्धिगंत करण्‍यास होतो, हे लेखकाने अनेक उदाहरणांसह या पुस्‍तकात दाखवून दिले आहे.

 

स्‍वतःच्‍या चुका-वकील इतरांच्‍या चुका-न्‍यायाधिश:

आपली स्‍तुती करणारा आपल्‍याला आवडतो, पण चूक दाखवणारा सहन होत नाही. इतरांच्‍या मात्र सर्व चुका आपल्‍याला अचूक दिसतात.  त्‍यांच्‍या चुकांवर टीका करण्‍याची संधीही आपण सोडत नाही.

स्‍वतःच्‍या चुका
वकील
इतरांच्‍या चुका
न्‍यायाधिश

स्‍वतःला सोडून इतरांनी त्‍यांची जीवनमूल्‍य (Life Values) सांभाळून त्‍यांनी स्‍वतःच वागणं आणि मानसिकता (Attitude) बदलणे गरजेचं असल्‍याचं आपल्‍याला वाटतं.

 

 

आपल्‍याकडूनही चुका होतात, आपल्‍या चुका आपल्‍याला स्‍वीकारता यायला हव्‍या, याच मुद्यावरून लेखक सांगतात की, नेहमीच दुस-याला दोष देण्‍यापेक्षा त्‍यांच्‍यातल्‍या चांगल्‍या गोष्‍टी शोधून प्रोत्‍साहन द्या, त्‍यांनी केलेल्‍या चांगल्‍या कामाची मोकळ्या मनाने स्‍तुती करा.

कुटुंबात, कामाच्‍या ठिकाणी आणि नातेसंबंधात सन्‍मानपूर्वक दखल घेतली जावी, अशी सुप्‍त इच्‍छा प्रत्‍येकाचीच असते.  दुस-यांची जाणीवपूर्वक दखल घेणा-या व्‍यक्‍तींबद्दल सर्वांनाच आदर असतो.

त्‍यामुळे त्‍याचे संबंध वाढतात आणि टिकतातही.  संबंध जोडण्‍यासाठी संवाद हे उत्‍तम माध्‍यम आहे.  संवाद संपला की, वाद सुरू होतो.  पुढे वादातून संबंध बिघडतात आणि मनःस्‍ताप वाढतो.  स्‍वतः कमी बोलून दुस-यांचं  जास्‍त ऐकलं तर समोरच्‍यालाही व्‍यक्‍त होण्‍याची संधी मिळते.  



 

वरील मानचित्र-Mindmap येथून डाऊनलोड करा

लोकांना तुमच्‍याबद्दल ऐकण्‍यापेक्षा स्‍वतःबद्दल बोलण्‍यात स्‍वारस्‍य असतं.  जसं तुमचा एखादा ग्रुप फोटो असल्‍यास तुम्‍ही इतरांपेक्षा स्‍वतः अगोदर कसे दिसतात ते आवर्जून पाहता.

एका सर्वेक्षणानुसार, ५०० फोनवरील संभाषणात ३९९० वेळेस एकच शब्‍द जास्‍त उच्‍चारला गेला तो म्‍हणजे मी’.  दुस-या बाजूने विचार केल्‍यास इतरांच्‍या कृतीचं कारण कदाचित समजू शकेल.

वादातून काहीच निष्‍पन्‍न होत नाही. पद आणि प्रतिष्‍ठेने आपण जरी मोठे असलो तरीही इतरांचे ऐकण्‍यास आणि योग्‍य असल्‍यास समजून घेतल्‍यास आपल्‍याबद्दलचा जिव्‍हाळ्याचा आदर नक्‍कीच दुणावेल. पुस्‍तकात लेखक म्‍हणतात,

‘’तुम्‍ही इतरांना फक्‍त स्‍वतःबद्दल सांगून त्‍यांना दोन वर्षांत मित्र करण्‍यापेक्षा  त्‍यांना अधिक बोलू द्या, दोन महिन्‍यांत ते तुमचे मित्र होतील.’’

परिचितांकडे पाहून केलेलं स्मितहास्‍यदेखील त्‍यांच्‍या परंतु आदर दर्शवतो.  अनेकदा आपण स्मितहास्‍य तर सोडाच आपण एकमेकांकडे पाहणेदेखील टाळतो. आपण इतरांशी जसं वागतो तशाच प्रतिक्रिया आपल्‍यालाही मिळतात.  मनात सर्वात अगोदर विचार निर्माण हेातात, त्‍यानुसार कृती घडते.

आपल्‍याबद्दल कुणाच्‍या मनात वाईट विचार असतील तर त्‍यांच्‍याकडून चांगली कृती कशी घडेल?  नकळत आपणही त्‍याला जबाबदार असतोच.  इतरांकडून अपेक्षा करण्‍यापेक्षा स्‍वतःत बदल करणं योग्‍य नाही का? अनेक गोष्‍टी सहज टाळता येऊ शकतात, दुर्दैवाने त्‍याचा विचार आपण डोळसपणे करत नाही.  आपण उच्‍चपदावर आहोत म्‍हणून आपल्‍याकडून चूक होणार नाही, असे मुळीच नाही.

आपली चूक झाल्‍यास मान्‍य करावी.  इतरांना त्‍यांच्‍या चुकांबद्दल दोष देण्‍यापेक्षा सुधारण्‍याची मदत आणि संधी देऊन आपणच मोठे होतो. 

 

वादातून विरोधक मिळतात, संवादातून मित्र.

चूक दाखवण्‍यापेक्षा एखाद्या व्‍यक्‍तीची बलस्‍थानं ओळखून त्‍याच्‍या क्षमतेला वाव देऊन अपेक्षित परिणाम मिळविता येतील. वादातून विरोधक मिळतात, संवादातून मित्र.  काय हवं ते आपण ठरवायचं.  शत्रू बनवणे सोपं आहे, मित्र बनवायला प्रयत्‍न करावे लागतात.  

वादातून विरोधक मिळतात, संवादातून मित्र.

माणसाला माणसांशी जोडणा-या आपल्‍या हिंदू पुराण आणि संस्‍कृतीचा  उल्‍लेख लेखकाने पुस्‍तकांत प्रकर्षाने केला आहे. माणसात आणि यंत्रात फरक असतो.  यंत्र हाताळताना छोट्याशा पुस्‍तकाच्‍या माहितीच्‍या आधारे मशीन वापरता येऊ शकते.  

प्रत्‍येक माणूस वेगळा असतो.  मार्गदर्शन आणि प्रेरणेशिवाय माणसांकडून अपेक्षित यश कसे मिळेल? कोणत्‍याही क्षेत्रात असतो तरीही यंत्रांपेक्षाजास्‍त संबंध माणसांशी असतो.  माणसांच्‍या आणि यंत्रांच्‍या गरजा भिन्‍न असतात.  

तंत्र-यंत्र-मंत्र
तंत्राने फक्‍त यंत्रच जिंकता येतात
,
माणसं जिंकण्‍यासाठी मंत्रच सापडावा लागतो.
-वपू काळ

यंत्रांना सहानुभूती, प्रोत्‍साहन आणि प्रेरणेची गरज नसते, माणूस मात्र शब्‍दांचा भुकेला असतो. नाती आणि संबंध टिकवण्‍यासाठी संवेदनशील हृदयाची गरज असते.  तोडणं सोपं, पण जोडणं अवघड असतं.  धागा रेशमाचा असला तरीही गाठ कायमची सलतेच.

सहानुभूती- Empathy

प्रोत्‍साहन- Encourage 

प्रेरणा- Inspiration  

 

लेख साभारः निमेष आहेर (रसयात्री, पुण्‍यनगरी) संपर्कः ८८३०२९७१३७

हे बंध रेशमाचे!

हाऊ टू विन फ्रेंड्स अण्‍ड इन्‍फ्लूएन्‍स पीपल

लेखकः डेल कार्नेगी

मूळ इंग्रजी पुस्‍तक 

How to Win Friends and Influence People

by Dale Carnegie

मराठी अनुवाद

पुस्‍तक परिचय मराठी

How to Win Friends and Influence People Marathi | Book Review हाऊ टू विन फ्रेंड्स अण्‍ड इन्‍फ्लूएन्‍स पीपल मराठी | मित्र जोडा आणि प्रभावशाली बना-पुस्‍तक परिचय#How to Win Friends and Influence People in Marathi #How to Win Friends in Marathi # Dale Carnegie Marathi #lokprabhav #book summary in marathi

www.evachnalay.in

 

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाचा. 


जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive