माईंडसेट -मराठी पुस्‍तक परिचय- Mindset: Changing The Way You think To Fulfil Your Potential (Marathi)



यश प्राप्‍तीकरीता योग्‍य मानसिकतेची आवश्‍यकता आहे. केवळ आपल्‍या क्षमता आणि प्रतिभा यांच्‍यामुळे यश प्राप्‍त होत नाही, तर निश्चित, वाढीच्‍या मनोरचनेनं-मानसिकतेने उद्दिष्‍ट साध्‍य करू शकतो यावर ते यश ठरतं.

 

माईंडसेट

मराठी पुस्‍तक परिचय


 
 

Mindset
Changing The Way You think To Fulfil Your Potential
(Marathi)

Carol S. Dweck (author)
Meena Shete-Sambhu (Translator)

 

पुस्‍तकाविषयीः

केवळ आपल्या क्षमता आणि प्रतिभा यांच्यामुळेच आपल्याला यशप्राप्ती होत नाही, तर निश्चित मनोरचनेनं की वाढीच्या मनोरचनेनं आपली उद्दिष्टं आपण साध्य करू शकतो, यावर ते ठरतं. 

योग्य मनोरचना-माईंडसेट असल्यास आपण आपल्या मुलांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करू शकतो, तसंच आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक अशी दोन्हीही ध्येयं गाठू शकतो. 

सर्व महान पालकांना, शिक्षकांना, सीईओंना आणि खेळाडूंना आधीपासूनच माहिती असलेले गुपित - मेंदूविषयीच्या एका साध्या विचारातून कसे अधिक शिकता येते आणि प्रत्येक क्षेत्रातील महान यशाचा पाया असलेल्या लवचीकतेला कशा प्रकारे वाढवता येते, हे प्रस्तुत पुस्तक उघड करते.

योग्‍य मनोरचना असल्‍यास आपण आपल्‍या पाल्‍यांना त्‍यांचं ध्‍येयं साध्‍य करण्‍यासाठी प्रेरित करू शकतो. या सोबतच आपण आपल्‍या वैयक्तिक व व्‍यावसायिक उद्दिष्‍टं देखिल नक्‍कीच गाठू शकतो. 

 

लेखकांविषयीः

कॅरोल एस. ड्वेक, (पीएच. डी.) या व्यक्तिमत्त्व, सामाजिक मानसशास्त्र आणि विकासात्मक मानसशास्त्र या क्षेत्रांतील जगातील आघाडीच्या संशोधिका आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटीत त्यांनी मानसशास्त्राच्या विल्यम बी. रान्सफोर्ड प्रोफेसर म्हणून काम केलं असून, सध्या त्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत मानसशास्त्राच्या ल्युईस अँड व्हर्जिनिया ईटन प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. 

सेल्फ थिअरिज: देअर रोल इन मोटिव्हेशन, पर्सनॅलिटी अँड डेव्हलपमेंट या त्यांच्या विद्वत्तापूर्ण पुस्तकाला वर्ल्ड एज्युकेशन फेलोशिपकडून बुक ऑफ द ईयरचा सन्मान मिळाला होता.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive