मनुष्य स्वभाव कसा ओळखावा- द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन -मराठी पुस्तक सारांश भाग-२ | The Laws of Human Nature by Robert Greene | Book Summary in Marathi -Part-2
दुर्लक्षित असलेल्या किंवा ज्यावर जास्त बोलले जात नाही अशा मानवी स्वभावाच्या पैलूंवर प्रकाश टाकणं, आणि ते किती प्रभावी आहे हे समजून घेणं हे या पुस्तकाचं एक उद्दिष्ट आहे.
मानवी स्वभावाचे नियम
द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर
रॉबर्ट ग्रीन
मराठी अनुवाद
पुस्तक सारांश
भाग-2
by Robert Greene
Book Summary in Marathi
सारांश भाग-2
👉💡हे पुस्तक वाचल्यावर मला नक्की काय कळणार आहे?
- या पुस्तकामुळे मला नेमकं काय मिळणार आहे?
- तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या मानवी स्वभावाचे पैलू जाणून घेऊ शकता.
- कोणाला अधिक चांगले निर्णय घ्यावेसे वाटणार नाही?
- तुम्ही घेत असलेल्या निर्णयांवर प्रभाव टाकणारे घटक आणि त्यामागच्या आपल्या प्रेरणा अधिक चांगलं समजून घेणं हे यासाठी महत्वाचं आहे.
- दुर्लक्षित असलेल्या किंवा ज्यावर जास्त बोलले जात नाही अशा मानवी स्वभावाच्या पैलूंवर प्रकाश टाकणं, आणि ते किती प्रभावी आहे हे समजून घेणं हे या पुस्तकाचं एक उद्दिष्ट आहे.
आपल्याला
असूया वाटते, हेवा वाटतो, आत्मकेंद्री आहोत आणि समूह वृत्तीनुसार वागतो हे
आपण बहुतेकवेळा मान्य करत नाही. परंतु आपल्या सर्वांचीच अशी प्रवृत्ती
असते. आपण एकदाका हे मानवी स्वभावाचे पैलू मान्य केले कि आपण ह्या
भावनावेगावर ताबा मिळवून त्यापासून फायदा करून घेऊ शकत्तो. आणि त्यांचा
आपल्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व
गुंतागुंतीचं असतं.
पण काही मानवी अनुभव सर्वांनाच येतात. मानवी स्वभाव अधिक जाणून घेतल्याने आपल्याला भावनावेगावर अधीक नियंत्रण मिळवून, अधिक चांगले निर्णय घेता येतात पर्यायाने अधिक चांगले जीवन जगता येते. ह्या पुस्तकाच्या सारांशामधून आपण पुढील मुद्दे जाणून घेणार आहोत:
१. दीर्घकालीन दृष्टिकोन असणं का अधिक चांगलं असतं ?
२. आपल्याबरोबर नेहमी वास्तव गट का असावा? आणि
३. मृत्यूचा विचार मनात असणं फायदेशीर का आहे?
💡सूचना: 📖📗📘📙
या पुस्तकाच्या सारांश भाग-१ मध्ये आपण मानवी स्वभावाचे १८ पैकी ९ नियम पहिले आहेत, उर्वरित नियम भाग-२ मध्ये पाहूया. वाचकांना विनंती आहे कि या पुस्तकातील गाभा समजून घेण्यासाठी कृपया सारांश भाग-१ अगोदर वाचा.
👉भाग-1 वाचण्यासाठी इथे जा
📖📗📘📙
👇पुस्तकाचा पुढील सारांश उर्वरित
भाग-२
१०. हेवा, मत्सर, असूया यांचा नियम Envy
आजचा समाज पद, प्रतिष्ठा, स्थिती, कामगिरी, उपलब्धी यासाठी संघर्षाला समर्थन करतो. तथापि, खरेतर यामुळे जिद्दीपणा, हट्टीपणा, दुराग्रह या गोष्टींना वाव मिळतो, या गोष्टी वाढतात आणि मत्सर, हेवा यासाठीचे कारण बनू शकतात. काही लोकं फक्त दुसऱ्यांच्या यशाची नक्कल करण्याची आशा ठेवतात. स्वतःची इतरांशी तुलना फक्त तुमच्या स्वतःचीच किंमत कमी करत असते आणि समाजात तुमच्या स्थितीला धोक्यात आणू शकते.
Society supports struggle for position, prestige, status, existence.
आपल्यापैकी काहींसाठी हे, कामात उत्कृष्ट बनण्याचा, सुधारणा करण्याचा संकेत असू शकतो परंतु, इतरांसाठी मात्र हे खोलवर गंभीर असलेल्या मत्सराचे कारण बनू शकतो आणि ह्या भावना खूपच हानी पोहोचवत असतात.
स्वतःवरून ध्यान हटवून, मत्सर, हेवा संपणं शिका. तुलना करण्याऐवजी स्वतःची किंमत (Self worth) वाढवा.
11. The Law Of Grandiosity भव्यतेचा नियम
खुपसाऱ्या गोष्टींबद्दल विचार करायची हर तऱ्हेच्या माणसाला सवय असते. यामध्ये आपल्या यशाचं लोभ सुद्धा येतं, जे त्यांच्या सामाजिक स्थितीशी, जुळलेला असतो. अनेकदा हे विचार खूप मोठं रूप धारण करून घेतात जो सद्य व सत्य, वास्तविकतेपासून खूप दूर असतो. आपण सर्वोतपरी, मोठं-श्रेष्ठ होण्याच्या प्रयत्नांत वास्तविकतेला, प्रत्यक्षात हरवून बसतो. परिणामस्वरूप आपण अविवेकी, तर्क न करता निर्णय घ्यायला लागतो आणि फक्त कल्पनेपर्यंतच सीमित राहतो.
सफलतेसाठी, यशासाठी तुमचा दृष्टिकोन, तुमचे योगदान, दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही जे मूल्य वाढवता त्यानुरूप ते असायला पाहिजे. अनेकदा आपले छोटेसे यश, सफलता आपल्या मोठं होण्याच्या विचारला अतिशय धोकादायक पातळीपर्यंत वाढवत असतं. खूपच भव्य होण्याच्या आकांक्षेला जन्म देतो. आपण नशीब, सुदैवाची भूमिका आणि इतरांचे योगदान यांना विसरत चाललो आहोत.
वास्तविकतेपासून दूर, आपण विनातर्क निर्णय घेत असतो, यामुळेच आपले यश नेहमीच सतत टिकून राहत नाही. आपल्याला स्वतःमधून एकदुसऱ्यापेक्षा मोठं-श्रेष्ठ होण्याच्या विचारला कमी करायला पाहिजे आणि आपल्या आतील सीमेला मर्यादित करावं लागेल. महान होण्याच्या भावनेला आपल्या कर्माने-कामाने-कामगिरीने, उपलब्धीने आणि समाजाच्या योगदानाने जोडून ठेवा.
12. The Law Of Gender Rigidity
खरोखरच, पुरुष किंवा स्त्री दोघांनाही जादुई छडी फिरूवून नियंत्रित करणे इतकं सोपं काम नाही. तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल आणि हे समजावं लागेल कि यामुळे तुमच्या विचारांवर कसा प्रभाव पडतो आणि काय परिणाम करील, आणि तुम्हाला घडणाऱ्या दैनंदिन चकमकीत दोन हात करण्यासाठी बळकट आणि पुढच्या क्षणासाठी भाकीत करण्यायोग्य अनुमानित बनवते.
स्त्री आणि पुरुषाच्या या शक्तीच्या चिन्हाला मिटवून तुम्ही स्वतःचा अस्सल-प्रामाणिक संस्करण जगासमोर ठेवता. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, तुम्ही स्त्री-पुरुष पैकी कोण श्रेष्ठ किंवा पुरुषी अहंकार बाजूला सारून, "जेण्डर रोलप्ले" म्हणजेच लिंगश्रेष्ठ भूमिका निभावण्याचा मोह टाळून, लालसेतून बचाव करून तुम्ही द्रुद्गतीने, वेगाने यशाचे शिखर चढू शकता.
आपल्या सर्वांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये काही विशेष गुण-गोष्टी असतात. स्त्रीसुलभता आणि पुरुषी मर्दाना गुण, काही अनुवांशिकरीत्या येतात तर काही विरुद्धलिंगी पालकांकडून आपल्यामध्ये येत असतात. स्त्री आणि पुरुषाच्या भूमिकांना ओळखून आपण ह्या विशेष गुणांना बदलत राहतो, जी आपल्याकडून अपेक्षित असते. आणि आपण त्यासाठी एक मोठी किंमत मोजत असतो. आपण आपल्या चारित्र्याला हरवून बसतो.
तुम्हाला ह्या हरवलेल्या गुणवैशिष्ट्यांची माहित असायला पाहिजे आणि त्यांसोबत पुन्हा जुळलं पाहिजे जेणेकरून सर्जनशील-रचनात्मक शक्ती बनू शकेल.
13. The Law Of Aimlessness
आजच्या ह्या आभासी-डिजिटल युगात कधीकधी लोकांना अस्थायी निराशा आणि अपयशांना सामोरे जाण्यासाठी स्वतःहून पुढे जावे लागते. स्वतःला पुढे न्यावे लागते. सतत-वारंवार येणारे अपयश, आपण दिशेपासून भरकटत असल्याचेच चिन्ह असते. अल्पावधीच्या मानसिकतेने आपण आपल्या भयाचा-भितींचा सामना करत असतो, जो दीर्घावधीत आपल्याला त्रासदायक असू शकतो,अडचणी निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच, यासाठीच, लक्ष्य नसलेला खेळ अतिशय धोकादायक असतो.
भविष्याचा दृष्टिकोन आणि त्याची कल्पना हि विनाध्येयाच्या भावनेवर विजय मिळविण्याची, विनालक्ष्याच्या जाणिवेला हरविण्यासाठीची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.
आपण माणसांना आपल्या जागरूक मनाच्या निर्णयांवर निर्भर-अवलंबून राहावे लागते. जेंव्हा जीवनात कारकिर्दीच्या मार्गावर चालताना, अपयश हाताळन्याची वेळ येते तेंव्हा आपण जे काही योग्य-चांगलं करू शकतो ते करत असतो. परंतु, आपल्या मेंदूमध्ये आपण दिशा नसण्याची कमतरता आपल्याला जाणवत राहते.
यापासून बचाव करण्याचा एक सर्वोत्तम पद्धत आणि मार्ग आहे आणि तो म्हणजे,
हेतूच्या जाणिवेला वाढविणे..! ध्येय-लक्ष्य-उद्दिष्ट यांच्या भावनेला
विकसित करणे, वाढविणे आणि या माहितीला दिशा देण्यासाठी वापरणे. एव्हढंच
नाही, तर, आपल्या शंका आणि अपयशाचासुद्धा एक हेतू असतो. आपल्याला-स्वतःला
बळकट-बलवान करणे हे ह्या शक्ती आणि दिशेसोबत आपण करत असलेल्या
कृतींना-कार्याला कमालीचे बळ मिळत असते.
👉→direction is more important than speed.
14. The Law Of Conformity
अनुरूपतेचा किंवा सारखेपणाचा नियम
लोकं स्वतःला आत्मविश्वासू आणि स्वयंपूर्ण असल्याची छाप सोडू इच्छितात. काही वाईट होण्याच्या भीतीने गर्दीची नक्कल करायला लागतात. (group mindset) गटातील मानसिकतेपासून आपण जेवढं दूर राहू पाहतो तेवढंच आपल्या जीवनांत परतायचा कोणताही मार्ग आपल्याला दिसत नसतो. असं करण्यामुळे आपण आपली वेगळी ओळख (uniqueness) आपण गमावून बसतो आणि वाईट वाटून घेत असतो.
आपल्या चारित्र्याची एक बाजू असते जी आपल्याला माहित नसते, आपल्याला त्याची जाणीव नसते, असा माणूस, अशी व्यक्ती, जी गर्दीमध्ये, गटा-समुहामध्ये आपण बनतो, असतो. ह्या समूह मानसिकतेमध्ये आपण अजाणतेपणी, आपण जे काही बोलतो, किंवा करतो ते सर्वकाही त्यांची नक्कलच करत असतो. आपण वेगळं विचार करतो आणि वेगळ्या भावनांची जाणीव करत असतो, आपण अधिक धोका पत्कारात असतो कारण सर्वचजण असं करत असतात.
आपले सामाजिक व्यक्तिमत्व (social personality) कळप मानसिकतेचे परिपाक आहे. समाजाच्या ह्या सामाजिकतेपायी आपण जे आहोत ते दबून जात असतो, आणि आपल्या वेगळेपणावर (uniqueness) सामाजिक व्यक्तिमत्व त्यावर वर्चस्व गाजवत असते. इतराना इतकं ऐकल्यामुळे आपण हळू हळू आपल्या वेगळेपणाला आणि स्वतःबद्दल विचार करायच्या क्षमतेला हरवून बसतो.
स्वयं-जाणीव (self awareness) विकसित करणे, स्व जाणीव वाढविणे हेच यावर उपाय आणि समाधान आहे. ह्या सांजेसोबत आणि ह्या स्व-जाणिवेने आपण एक उत्कृष्ट सामाजिक कलाकार, (सोशल ऍक्टर) किंवा नट बनू शकतो. असे कलाकार जे इतरांसोबत सहजपणे मिसळू शकतात आणि सहकार्य करू शकतात, त्यासोबतच स्वतःच्या स्वातंत्र्याला आणि तर्काला शाबूत ठेवू शकतात.
15. The Law Of Fickleness
जेंव्हा तुम्ही एखाद्या पुढारी किंवा नेत्याच्या भूमिकेत असता, तेंव्हा कणखर आणि कठीण वागणुकीसाठी नेहमी तय्यार राहा. प्रत्येक चूक जी तुम्ही कराल, ती चूक, पुढे जाऊन तुमचा मुकुट हिसकावून घेण्यासाठी इतर कोणासाठी एक संधी असू शकते. यावर उपाय आणि समाधान हेच आहे कि, आपले पाय नेहमी जमिनीवर असायला पाहिजेत, जेणेकरून आपण अशा आक्रमणांना तोंड देऊ झाकतो आणि हल्ल्यांचा सामना करू शकतो.
ह्या प्रक्रियेत तुमच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात, आणि तुमची प्रतिष्ठा-सामाजिक स्थिती चौकशीचा विषय होऊन बसेल. स्वतःला एक योग्य नेता दाखविण्यासाठी अशा मोठ्या शक्ती-सत्ता-अधिकाराला सांभाळणाऱ्या व्यक्तीला लोकांची मदत करायला पाहिजे. अनुभवी नेते ह्या कला-कौशल्याचा सर्व करत असतात. आपल्या अनुभवाचा वापर प्रत्यक्षात करत असतात कारण ते ह्याचे दुष्परिणाम जाणून असतात.
तसे पाहता, आजच्या घडीला नेतृत्वाची शैली काळासोबत बदलली आहे. परंतु एक गोष्ट तशीच आहे, सत्तेत ज्यांना राहायचे असते ते नेहमीच महत्वाकांक्षी असतात. ते नेतृत्व करू इच्छितात परंतु स्वतंत्र राहणेसुद्धा त्यांना आवडते. कोणतेही त्याग न करता, बलिदान न देता, ते सुरक्षित राहून यशाचा आनंद उपभोग घेऊ इच्छितात.
जेंव्हा तुम्ही एखाद्या गटाचे नेते असता, तेंव्हा लोकं तुम्हाला सतत-वारंवार अशा क्षणी डिवचत असतात जेंव्हा तुम्ही कमकुवत असता. त्यांचा मित्र असणे किंवा त्यांच्या बरोबरीचे असणे अशी त्यांची समजूत होईल, यासाठी असे विचार करू नकार कि, तुम्हला त्यांची निष्ठा आणि विश्वास मिळविण्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे याचा विचार करू नका. असे केल्यास याचा अर्थ असा होईल कि तुम्ही त्यांचे मित्र किंवा त्यांच्या बरोबरीचे आहोत.
लोकं तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, आपल्या हेतूंबद्दल रहस्यमयी बनून राहा आणि लपून असलेल्या निंदेने उत्तर द्या. जर तुम्हाला नेतृत्व करायचे असेल तर ह्या कलेत निःपून व्हा. एकदाका तुम्ही लोकांचा विश्वास मिळविलात, तर तेंव्हा ते तुमच्यामागे, तुमच्यासोबत उभं टाकतील मग परिस्थिती भलेही कितीही वाईट का असेना.
16. The Law Of Aggression आक्रमक ऊर्जा
जगाला तुमच्या शक्तीची, ऊर्जेची गरज आहे. तुम्हाला उत्तम-सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी लोकं शक्य असलेली प्रत्येक गोष्ट करत असतात. ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानी तुम्हाला श्रेष्ठ-मोठं-वरचढ आहोत असे दर्शवून, स्वतःच्या लालसेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा गटबाजीमध्ये वावरण्यासाठी अत्यंत निःपुणता असावी लागते. जर तुम्ही ह्या आक्रमक चतुर-चालीचे निरीक्षक बनत असाल तर तुम्ही तेंव्हाही उभं ठाकाल जेंव्हा गोष्टी तुमच्या हातातून निसटून जात असतात. आक्रमक ऊर्जा वाईट नाही.
जर तुम्ही आक्रमक ऊर्जा नियंत्रणात ठेवू शकत असाल तर, अल्पकालीन अपयश असतानासुद्धा तुम्हाला हि ऊर्जा निश्चयी आणि करारीपणात बांधून ठेवत असते.
तुमच्या सभोवतालची माणसं वरून अतिशय सभ्य आणि सुशील दिसतात, परंतु ह्या मुखवट्याकही ते अतिशय चिडखोरपणाचा आणि समाधानाचा सामना करत असतात. तुम्हाला लोकांच्या असमाधानकारक आक्रमक तीव्र इच्छेला निरीक्षण केलं पाहिजे. ते तुम्हाला भावनिक, रागीट आणि विचार करू न देणे यावर अवलंबून असते. त्यांना हि शक्ती देऊ नका. जेंव्हा गोष्ट तुमच्या आक्रमक ऊर्जेची येते तेंव्हा तुम्हाला ह्या उर्जेला नियंत्रित करून तुम्ही ह्या ऊर्जेचा उपयोग स्वतःच्या कार्यक्षमतेसाठी, उत्पादकता वाढविण्यासाठी करण्यास शिकायला पाहिजे.
स्वतःसाठी उभं ठाकणे, समस्यांवर आक्रमण-हल्ला करणे, आणि मोठ्या महत्वाकांक्षेला ओळखणे शिकले पाहिजे.
17. The Law Of Generational Myopia
पिढीमधील अंतर हे काही खोटं, नाहीये, कारण प्रत्येक नवी पिढी स्वतःची मूल्य आणि जगण्याची रूपरेषा बनवत असते. ती पिढी त्यांच्या सदस्यांचे वर्तन बनवते, आणि त्यांना जगावर एक शक्तिशाली प्रभाव बनविण्यासाठी वापरत असते. समस्या अशी आहे कि, आपण हे सर्व जे काही करत असतो ते आपल्या सहजतेच्या किमतीवर करत असतो. आपण सर्जनशीलतेच्या बाबतीत स्वतःला थांबवत आहोत.
संकल्पनांवर शंका केल्या विनाच. तुम्ही ज्या पिढीत जन्मलेले आहात ती तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त तुमच्याबद्दल सांगते कि तुम्ही काय आहोत? आपली आजची हि पिढी मागील पिढीपासून स्वतःला वेगळं ठेवू इच्छिते आणि जगासाठी एक नवी आवाज बनवू इच्छिते. तुमचं काम हे आहे कि तुम्ही कोण आहोत आणि तुम्ही जगाला कसे पाहता? तुम्ही ते बनू शकता जो जगाला नवे मार्ग दाखवेल, नव-नवीन ट्रेंड सेट करेल ज्याची आजच्या पिढीला भूक आहे.
18. The Law Of Death Denial
मृत्यू हे एक कटू परंतु अटळ सत्य आहे. तुम्ही काहीही करून त्यावर विजय मिळवू शकत नाही, निदान आजतरी नाहीच नाही. जन्मलेला हर एक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यू पावेल. प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे पण तो दिवस कोणता, ठिकाण कोणते असेल हे मात्र कुठेही लिहिलेलं नाही.
मृत्यू आपल्या सर्वांवर हसत असते. मृत्यूच्या होण्याची अनिश्तितता जाणणे, समजणे खरोखरच एक शक्तिशाली साधन आहे जो तुम्ही मिळवू शकता. यामुळे तुमच्यामध्ये एक "सेन्स ऑफ अर्जेंसी" म्हणजेच "तातडीची किंवा निकडीची भावना" बनविण्यात मदत होते ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामासाठी इंधन मिळत असतो.
आपल्या मेंदूला अशाप्रकारे विचार करण्यासाठी प्रशिक्षित करणे योग्य व वेळेत परिणाम मिळविण्याचा एक उत्तम मार्ग आहे, एक चांगली पद्धत आहे. आपल्यापैकी अधिकांश लोकं मृत्यूच्या विचारला नजरअंदाज करून, कानाडोळा करून जीवन जगत असतात. खरेतर, मृत्यूचे भय यापेक्षा मृत्यूची भावना आपल्यामध्ये नेहमीच असायला पाहिजे. जीवनाची क्षणभंगुरतेची जाणीव आपल्या ध्येय-लक्ष्य-उद्देशाच्या भावनेला भरून टाकत असते आणि ध्येयांच्या तातडीची-निकडीची (urgency of goals) जाणीव करून देत असते. यामुळे "ह्या छोट्याशा जीवनात खरोखरच नेमकं काय महत्वाचं आहे" अशी आपल्याला प्रमाणाची भावना सुद्धा मिळते.
sense of purpose- उद्देशाची भावना
sense of proportion- प्रमाणाची भावना
बरेचजण स्वतःला इतरांपेक्षा वेगळं करण्याचा, वेगळं बघण्याचा प्रयत्न करत असतात या ऐवजी आपल्याला हे पाहिलं पाहिजे कि, आपल्याला सर्वांना एकसारखं समजून बघायला पाहिजे कि, कसं जीवन आपल्या सर्वांना सामान रूपाने जोडत असते.
तर मित्रांनो, छोट्या विचारांशी लढा, संकुचित मनोवृत्तीने बाहेर पडा (come out of narrow minded aspects). जेंव्हा एखादी गोष्ट, एखादा विचार तुमच्या मनात खोलवर बसलेला असेल, तर तेंव्हा, आपली मानसिकता (mindset) बदलणं सोपं नसतं . जे लोकांनी तुम्हाला शिकवलं आहे, त्याऊपरही तुम्हाला पुढं जाण्यासाठी पाठपुरावा करणारे, प्रभावित करणारे लोकं बोटावर मोजण्याइतकेच मिळतील.
तुम्हाला तुमचं मत पुढं ठेवण्याअगोदर इतरांच्या मतांचा मान ठेवायला पाहिजे, कदर करायला पाहिजे. असं कधीच दाखवू नका कि तुम्हाला सर्वकाही माहित आहे. जरी आपण बेकार असलेले सल्ले आत्मसात करण्यापासून स्वतःला थांबवत असतो. परंतु हे सर्व पूर्णपणे योग्यतेवर अवलंबून असते.
तुम्ही तुमचा नैसर्गिक कल जाणून घेतल्याविना, आपला रोख कुठं आहे हे माहित केल्याविना तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत्त, गंतव्य स्थानापर्यंत कसे पोहोचू शकता? हि एक सरळ-साधी-प्रक्रिया आहे जी तुम्हाला आत्मविश्वासाने पुढं जाण्यासाठी आणि अनुमानित अडथळ्यांचा-समस्यांचा सामना करण्यासाठी प्रेरित करत असते.
सारांश समाप्त
📖📗📘📙
|
वाचकमित्रांनो, आशा आहे तुम्ही ह्या मानवी स्वभावाच्या नियमांना शिकून-समजून-उमजून,आपल्या जीवनात उपयोगात आणून, दैनंदिन जीवनात आत्मसात करून, त्यांचा स्वतःला व इतरांना आयुष्यात पुढं जाण्यासाठी, स्वतःची व दुसऱ्या गरजूंची मदत करण्यासाठी, ध्येय व दिशा ठरवण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी, या नियमांचा वापर करून एक सुखी, आनंदी, आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी कराल.
💡🙏👉विशेष विनंती:
मित्रांनोलक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका.
लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील. कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.
ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
www.evachnalay.in |
18 Laws Of Human Nature
1. The Law Of Irrationality
2. The Law Of Narcissism
3. The Law Of Role-Playing
4. The Law Of Compulsive Behavior
5. The Law Of Covetousness
6. The Law Of Shortsightedness
7. The Law Of Defensiveness
8. The Law Of Self-Sabotage
9. The Law Of Repression
10. The Law Of Envy
11. The Law Of Grandiosity
12. The Law Of Gender Rigidity
13. The Law Of Aimlessness
14. The Law Of Conformity
15. The Law Of Fickleness
16. The Law Of Aggression
17. The Law Of Generational Myopia
18. The Law Of Death Denial
👉Also Read:
- 48 Laws of Power सत्ता: अधिकार प्राप्तीचे ४८ नियम
- How To Recognize Human Nature (Marathi) मनुष्य स्वभाव कसा ओळखावा
- The Laws of Nature (Marathi)
- BodyLanguage देहबोली: शरीराची भाषा
- Attitude is Everything
धैर्यपुर्वक ह्या द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन या पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद.
तर वाचक मित्रांनो द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन ह्या पुस्तकाचे सारांश तुम्हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्याकडे अगोदरच होती व तुम्ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्हाला खालील टिप्पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्यक कळवा.
तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्थळवर तुम्हाला काही त्रुटी दिसून आल्यास, तुमच्या सूचना, तक्रारी, प्रश्न, अडचणी-समस्या असतील काही सुधारणा हव्या असतील, तर आम्हाला खालील टिप्पणी व ई-मेल द्वारे अवश्य कळवा, आम्ही आपली दखल अवश्य घेऊ. धन्यवाद.
#द 7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी पुस्तक परिचय #पुस्तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi #Book Summary in Marathi #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
पुस्तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्तरपणे पुस्तक वाचन करून आपले व्यक्तीमत्व सुधारा, आपला विकास करा, यशस्वी व्हा.
वैयक्तिक विकास, स्वयंमदतीवर ही पुस्तक तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्थळावरील अशाच संवाद कौशल्यांवर, लोकव्यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्तक सारांश अवश्य वाचा.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- एटामिक हॅबीट- Atomic Habit ऍटॉमिक हॅबिट
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
इतर संबंधितः
- बहुरंगी बुद्धिमत्ता - श्रुती पानसे (Multiple Intelligence)
- बहुविध बुद्धिमत्ता - हावर्ड गार्डनर (Multiple Intelligence)
- भावनिक बुद्धिमत्ता - डॅनियल गोलमन (Emotional Intelligence)
- भावनिक बुद्धिमत्ता 2.0 -ट्रॅव्हिस ब्रॅडबरी (Emotional Intelligence 2.0)
- आर्थिक बुद्धिमत्ता - रॉबर्ट कियोसाकी (Financial Intelligence)
- कृत्रिम बुद्धिमत्ता - अच्युत गोडबोले (Artificial Intelligence)
- सामाजिक बुद्धिमत्ता - डॅनियल गोलमन (Social Intelligence)
- इमोशनल हायजॅक -मनोज अंबिके (Emotional Hijack)
- आध्यात्मिक बुद्धिमत्ता - (Spiritual Intelligence)
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो.
|
|
टिप्पण्या