माणूस जसा विचार करतो तसा बनतो -सारांश भाग-1 | अॅज अ मॅन थिंक्स-जेम्स अॅलेन | As a Man Thinketh by James Allen
मूर्ती लहान किर्ती महान या उक्तीप्रमाणे ही पुस्तक छोटीशी जरी असली तरी यातील गाभा महत्वाचा असून आवाकाही खूप मोठा आहे, मानवी मनाच्या मूळाशी असलेले विचार, विचाराची शक्ती, विचारांचा प्रभाव व विचारांच्या शक्तीचा वापर कसा करावा याबद्दल जीवन बदलून टाकणारी पुस्तक..!
विचारांचा प्रभाव हेच
उन्नतीचे शिखर
माणूस जसा विचार करतो
जेम्स ऍलन
मराठी
अनुवाद
पुस्तक
सारांश
भाग-1
As a
Man Thinketh- Vicharanchi Shakti Olkha - Marathi
by James Allen (Author), Sachin Raylwar (Translator)
Marathi Book Summary
भाग-1
पुस्तकाविषयी
- या पुस्तकात लेखकांनी मुळतः आपल्या विचारांवर भर दिलेला आहे.
- आपले विचार किती शक्तीशाली असतात,
- विचारांच्या बळावरच पुढील कार्ये होत असतात,
- विचारच आपले भविष्य घडवतात,
- आपले विचारच असतात जे आपल्याला आपल्याला हवी तशी परिस्थिती निर्माण करून देत असतात.
- आपल्या आवडी-निवडी यांच्यावरही आपल्या विचारांचा प्रभाव असतो.
- आपण आपले जीवन आपल्या विचारांनी बदलू शकतो.
सात विविध प्रकरणातून आपल्याला ही पुस्तक विचारांबद्दल शिकवते. लेखक म्हणतात, तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करता. तुमच्या सर्व विचारांचे एकत्रिकरण म्हणजेच तुमचे चरित्र होय. ही पुस्तक विचारांच्या शक्तीला आणि त्यांच्या योग्य उपयोग कसा घ्यावा हे सांगते. सात वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे या पुस्तकातून विचारांच्या शक्तीला सांगितलेलं आहे.
पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार
माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते.
दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते.
योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
लेखकाविषयी
जेम्स ऍलन हे एक ब्रिटिश तत्वज्ञानी लेखक होते. जेम्स त्यांच्या प्रेरणादायी पुस्तकं आणि कविता यासाठी प्रसिद्ध होते. ही पुस्तक 1903 साली प्रकाशित झाली होती. या पुस्तकातून लेखकांनी आपल्या विचारांच्या शक्तीला समजावून सांगितलेलं आहे त्यासोबतच, विचारांच्या शक्तीचा उपयोग कसा करावा हेसुद्धा सांगितले आहे.
हेही सांगितले आहे की, कसे माणूस आयुष्यात चांगल्या वाईट परिस्थितींना तोंड देत असतो. माणूस आपल्या विचारांना बदलून परिस्थितीलाही बदलू शकतो. ही एक अशी पुस्तक आहे जी तुमची स्वतःची मदत करण्यास मदत करेल. सात वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे या पुस्तकातून विचारांच्या शक्तीला सांगितलेलं आहे.
विचार आणि चारित्र्य (Thoughts and Character)
जसे बीज तुम्ही जमिनीत रूजवाल तेच उगवेल अशी एक म्हण आहे आपल्याकडे, त्यानुसारच आपण जे आणि जसे विचार आपल्या मनात रूजवू तसेच आपण बनत असतो. जर आपण सकारात्मक विचार रूजवले तर आपले चरित्रसुद्ध सकारात्मक, आशावादी बनेल, तुमचे व्यक्तीमत्वसुद्धा सकारात्मक बनेल, चांगल्या गोष्टी घडतील, जर आपण नकारात्मक विचार रूजवले तर आपले चरित्रसुद्धा तसेच बनेल, व्यक्तीमत्वदेखिल तसेच बनेल.
एखादा व्यक्ती आपल्या मनात जसे विचार करत असतो तसेच होत असते. तो आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती आणि घटना, प्रसंगांना सामोरे जात असतो. जसे बीज नसतील तर झाड बनणार नाही तसेच माणसाच्या लपलेल्या विचारांच्या रोवलेल्या बीयांमुळे पुढील कामं होत असतात. कामं, कृती ही माणसाच्या विचारांचं फुल आहे तर आनंद आणि दुःख हे त्याची फळं आहेत.
आपल्या मेंदुच्या-मनाच्या विचारांनीच आपल्याला घडवले आहे. आपण जसा विचार करू तसेच बनत असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार येत असतील तर त्याच्या मागे दुःख-वेदना तसेच येत असतात जसे बैलाच्या मागे गाडीची चाकं येतात. जर कोणी चांगले आणि शुद्ध विचार मनात आणत असेल तर सुख-आनंद त्याच्या मागे सावलीसारखे येत असते. माणूस नीती-नियमांनी बनत असतो, कावा किंवा दगा-धोका यामुळे नाही. आणि याचा प्रभाव अदृश्य विचारांच्या जगातसुद्धा तसाच होतो जसा दृश्य आणि स्पर्श करू शकणा-या वस्तू-गोष्टींनी बनलेल्या या जगात.
एक महान आणि देवासारखे चरित्र ही काही एखाद्या संधी किंवा उपकाराची गोष्ट नाही, तर सातत्याने केलेल्या ख-या, योग्य विचारांच्या फलस्वरूप मिळालेले आहे. माणूस स्वतःच स्वतःला घडवतो व बिघडवत असतो. स्वतःला बनवतोही आणि नष्टही करू शकतो. विचारांच्या शस्त्रागारात असे शस्त्र बनवतो-घडवतो जे त्याला स्वतःलाच नष्ट करत असतात. तो स्वतःसाठी अशी अवजारंसुद्धा बनवतो ज्यांच्या मदतीने तो सुःख आणि शांतीचा स्वर्गासारखे महाल बनवतो.
विचारांच्या योग्य निवड आणि वापरानेच माणूस परिपूर्णतेकडे, प्राविण्याकडे जात असतो तर वाईट विचारांच्या वापरामुळे तो पशूपेक्षाही खालच्या थरावर घसरत असतो.
या दोन टोकाच्या गोष्टींच्या दरम्यानच माणसाचे सर्व स्वभाववृत्ती येत असतात. माणूस स्वतःच त्यांचा रचयता, निर्माणकर्ता आणि स्वामीसुद्धा तोच आहे. (Man is Maker and Master of good and bad). शक्ती, समजूतपणा आणि प्रेम आणि विचार यांचा स्वामी असल्याच्या नात्याने मानवाजवळव प्रत्येक परिस्थितीची किल्ली आहे. आणि त्याच्यामध्ये असे काही आहे ज्यामुळे तो पाहिजे ते बनू शकतो. इच्छा असेल ते होऊ शकतो.
खूप शोध घेतल्यानेच सोनं आणि हिरे मिळत असतात, आणि माणूस स्वतःशी निगडीत प्रत्येक सत्य शोधू शकतो जर तो स्वतःच्या आत्म्याच्या खोलपर्यत गेल्यास. तो स्वतःच्या चारित्र्याचा रचयिता, निर्माण करता आहे, आयुष्याला घडवत असतो, आणि स्वतःच्या नियतीला स्वतः बनवत असतो.
विचारांचा परिस्थितीवरील प्रभाव (Effects of thoughts on circumstances)
माणसाचा मेंदू एका बागेसारखं असतं, हुशारी, समजदारीने खोदून, मशागत करून, जोपासणा करू शकतो किंवा रान्टी बनू दिलं जाऊ शकतं. जर यामध्ये आवश्यक बीज टाकले नाही तर त्यामध्ये अनावश्यक, बेकार, अशुद्ध बीज येऊन पडतील आणि त्याप्रमाणे रोपटे उगवायला लागतील.
जसे एक माळी आपल्या बागेची देखभाल करतो, बागेत नको त्या अशुद्ध बीयांना उगवण्यापासून थांबवत असतो, आणि ज्या शुद्ध फुलाफळांची त्याला गरज असते त्यांची जोपासणा करतो, वाढवतो. यासारखंच एका व्यक्तीनेसुद्धा आपल्या मेंदूमध्ये असलेल्या अनावश्यक, बेकार, अशुद्ध विचारांना काढून टाकून चांगल्या, गरजेच्या, आवश्यक, शुद्ध विचारांची फुले-फळे प्राप्त करू शकतो.
या पद्धतीचा वापर करून एक व्यक्ती आज नाही तर उद्या हे माहित करून घेतो की, तो स्वतः आत्म्याचा स्वामी आहे. मालक आहे आणि स्वतःच्या जीवनाचा निर्मातासुद्धा आहे. यासोबतच तो हेसुद्धा शिकतो की, कसं त्याच्या मनातील विचार त्याच्या चारित्र्याला, परिस्थितीला, आणि नशीबाला बनवू शकतो. आकार देऊ शकतो. विचार आणि चारित्र्य एकच आहे, आणि जसे चारित्र्य वातावरण, परिस्थिती यातून बनवलं किंवा शोधलं जाऊ शकतं. मानसाच्या जीवनातील बाह्य परिस्थिती त्याच्या अंतर परिस्थितीशी जुळलेले असतात.
याचा हा अर्थ नाही की, एकाच वेळी माणसाचे सगळे चारित्र्य दिसतील, खरेतर त्याची सध्याची परिस्थिती त्याच्या काही विचारांनी जुळलेली असते. जोपर्यंत माणूस स्वतःला बाह्य परिस्थितीचा जीव समजत असतो, तोपर्यंत माणूस परिस्थितीशी घेरलेलाच असतो, परंतू जेव्हा त्याला याची जाणीव होते की, तो एक रचनात्मक, सर्जनशील शक्ती आहे, तर तो लपलेल्या मातीला आणि बीयांना आदेश देऊ शकतो तेव्हा तो स्वतःचा खरा स्वामी, मालक बनत असतो.
ज्याने स्वयंनियंत्रणावर खूप वेळेपासून ताबा मिळवलिेला आहे, स्वनियंत्रणाचा सराव केलेला आहे, त्याला हे माहित असते की परिस्थिती विचारांनीच बनत असते. परिस्थितीचा उगम विचारांनी होत असतो. आणि त्यांनी हे नेहमीच लक्षात घेतलं असते की, त्यांच्या बाह्य परिस्थितीतील बदल हे त्यांच्या आंतरिक मानसिक परिस्थिती सारखीच आहे.
प्रत्येक विचाराचे बीज जे मेंदूमध्ये टाकले जाते, तो त्याच्या मुळांना पसरवत असतो, तो स्वतःच्या संधी आणि परिस्थिती बनवत असतो. चांगल्या विचारांनी चांगली फळं मिळत असतात. वाईट विचारांनी वाईट फळ मिळतं. आणि माणूस आपल्या ह्या आलेल्या पीकाने सुःख आणि दुःख दोन्हींची कापणी करत असतो. आपल्या विचारांनी केलेल्या कामाचे बरेवाईट फळ भोगत असतो.
कोणताही व्यक्ती नशीब आणि परिस्थितीच्या अत्याचाराने नाही तर स्वतःच्या विचार आणि इच्छांच्या आधारावर तुरूंगात जात असतो. आणि कोणी शुद्ध मनाचा-मेंदूचा व्यक्ती अचानकपणे, बाह्य दबावाला बळी पडून, अत्याचार, गुन्हा करत नाही, परंतू अपराधीचे, गुन्हेगाराचे विचार गुपचूपणे त्याच्या हृदयात वाढत असतात, आणि संधी मिळताच आपली शक्ती दाखवायला लागतात.
परिस्थिती माणसाला बनवत किंवा घडवत नाही, तर माणसाला स्वतःची भेट करू घालतात. ते त्या गोष्टी आकर्षित करत नाहीत ज्याची इच्छा त्यांनी केली आहे, खरे तर ते स्वतः जे आहेत त्याच गोष्टी आकर्षित करत असतात. त्यांचे धैर्य-शौर्य, महत्वकांक्षा, इत्यादी पाउलोपाउली विफल झालेले असतात. परंतू त्यांच्या आतील विचार आणि तीव्र इच्छा, स्वतःच वाढत असतात, मग त्या चांगल्या असो वा वाईट.
माणूस स्वतःच्या परिस्थितीला सुधारण्यासाठी उत्सुक असतो, परंतू स्वतःला सुधारायची त्यांची इच्छा नसते. त्यामुळे ते वाढतच राहतात. जो व्यक्ती स्वतःला शिक्षा करण्यावरून मागे हटत नाही, त्याला जे पाहिजे, ज्या गोष्टीवर त्याचा मन आहे अशा गोष्टी मिळविण्यापासून त्या व्यक्ती कधीही विफल होऊ शकत नाही.
एवढंच नाही तर, असा व्यक्ती ज्याचा हेतू फक्त धन-संपत्तीच कमावणे आहे त्याला बरेचसे त्याग व बलिदान देण्यासाठी नेहमी तयार असायला पाहिजे.
एक व्यक्ती आहे जो कमी नशीबाने- दुर्देवाने खूपच गरिब आहे, तो आपल्या सभोवतालच्या व घरच्या सुविधांच्या सुधारण्यासाठी खूपच चिंतित आहे, तरीही तो आपल्या कामावरून, कर्तव्यावरून किनारा करतो आणि असा विचार करतो की असे करून तो आपल्या मालकाला धोका देवू शकतो, कारण त्याची पगार कमी आहे. असा व्यक्ती एक सरळ, सहज गोष्ट समजत नाही जो की अस्सल सफलतेचा सिद्धांत आहे, आणि तो आपल्या दुर्दैवी, कमी नशिबतून बाहेर येण्यास तयारही नाही.
खरंतर अशाप्रकारच्या वाईट विचारांमुळेच तो स्वतःला गरीब, अतिगरिब, जास्तच गरीबीच्या गर्तेत घेऊन जात असतो.
एक धनवान, श्रीमंत व्यक्ती आहे जो सतत वाढत जाणा-या, पीडादायक, दुःखदायक आजारामुळे व त्याच्या स्वतःच्या लालसा, हाव यामुळे ग्रस्त आहे. तो त्यापासून सूटका मिळविण्यासाठी खूपसारा धन, पैसा द्यायलाही तयार आहे. परंतू तो आपल्या लालसेपोटी, लोभटवृत्तीचा, इच्छांचा बलिदान देत नाही. असा व्यक्ती स्वस्थ होण्याच्या लायकीचा नाही. कारण त्याने एका स्वस्थ जीवनाचा पहिला सिद्धांत शिकला नाही.
इथे एक मालक आहे जो धोका, कपट करून मजूरी देण्यापासून टाळत आहे, जेणेकरून तो स्वतः जास्तीचा नफा, फायदा कमावू शकेल. आणि आपल्या मजूरदारांची, रोजंदारीवर कामं करणा-या लोकांची मजूरी कमी करून टाकतो. असा व्यक्ती यश, सफलता प्राप्त करण्याच्या लायकीचा नाही. आणि जेव्हा तो नाव, पत-पद-प्रतिष्ठा आणि पैशाने कंगाल होऊन जातो तेव्हा ते परिस्थितीला जबाबदार धरतात. अशी अवस्था होण्याला तो स्वतः जबाबदार आहे हे समजण्याऐवजी तो परिस्थितीला दोष देत असतात.
परिस्थिती खूपच किचकट आहे, विचारांची मूळं खूपच खोल आहेत, सुःख-आनंदाची स्थिती व्यक्तीनुसार बदलत असते. यासाठीच माणसाच्या संपूर्ण आत्म्याची अवस्था त्याच्या जीवनाच्या बाह्य पैलूवरून, स्वरूपावरून सांगता येत नाही.
एका व्यक्तीला कित्येकवेळेस प्रामाणिक असूनही दुःख-कष्टाचा सामना करावा लागू शकतो, तर, एखादा अप्रामाणिक व्यक्ती अप्रामाणिक असूनही कित्येक पट पैसा-धन-संपत्ती कमावू शकतो परंतू, नेहमीच असं बोललं जातं की, एक प्रामाणिक व्यक्ती त्याच्या प्रामाणिकपणामुळे अयशस्वी होतो, विफल होतो आणि इतर लोकं त्यांच्या अप्रामाणिकपणामुळे यशस्वी होतात. यावरून असं लक्षात येतं की, अप्रामाणिक व्यक्ती जवळपास पूर्णपणे भ्रष्ट आहे आणि प्रामाणिक व्यक्ती चांगला आहे.
सखोल ज्ञान आणि विस्तृत अनुभवाचा प्रकाश टाकल्यानेच अशा प्रकारचे निर्णय चुकीचे आढळून येत असताता.
Warren buffet: Integrity, Intelligence and Energy but if
· Honesty is the Best Policy.
· Honesty is a very high expensive gift, Don't expect it from cheap people.',
· Price is what you pay. Value is what you get.
· Somebody once said that in looking for people to hire, you look for three qualities: integrity, intelligence, and energy. And if you don’t have the first, the other two will kill you. You think about it.
अप्रामाणिक व्यक्ती जवळपास
पूर्णपणे भ्रष्ट आहे
आणि प्रामाणिक व्यक्ती चांगला आहे.
अप्रामाणिक व्यक्तीमध्ये अशा काही सद्गुण (virtues) असू शकतात जे इतरांमध्ये नसू शकतात, आणि प्रामाणिक व्यक्तीमध्ये अशा काही वाईट गोष्टी, दुर्गुण (vices) असू शकतात ज्या इतरांमध्ये नसू शकतात.
प्रामाणिक व्यक्ती आपल्या प्रामाणिक विचार आणि कामामुळे चांगले परिणाम मिळवत असतात. याचप्रमाणे एक अप्रामाणिक व्यक्तीसुद्धा आपल्या अप्रामाणिक विचार आणि कृतीमुळे सुख आणि दुःख मिळवत असतात.
चांगले विचार आणि कृतीमुळे कधीच वाईट परिणाम मिळत नाहीत, आणि वाईट विचार आणि कर्मामुळे कधीही चांगले परिणाम मिळत नाहीत. दुःख नेहमीच खराब विचारांचा परिणाम असतो. बेकार, निरूपयोगी आणि अशुद्धीला नष्ट करणे हा दुःखाचा योग्य उपयोग आहे. एक व्यक्ती तोपर्यंत योग्य राहत नाही जोपर्यंत तो आनंदी, स्वस्थ आणि यशस्वी, सफल होत नाही आणि आनंद, स्वास्थ्य आणि यश ह्या तीन गोष्टी एका व्यक्तीच्या अंतर्बाह्य सभोवतालच्या वातावरणाच्या संतुलनाचा परिणाम असतात.
एक व्यक्ती असा विचार करू शकतो की, एखाद्या विचाराल गुप्त ठेवता येते पण असं नसतं. ती सतत सवय बनत जाते आणि सवयीच परिस्थिती बनवत असते. जसे, मद्यपान आणि नशा करण्याची सवयच विनाश आणि आजार यांचे कारण बनत असते. कोणत्याही प्रकारचे अशुद्ध विचार गोंधळात टाकणारी सवयीचे रूप घेत असतात, ज्यामुळे भटकवणारी परिस्थिती तयार होत असते.
भीती आणि शंकेचे विचार कमकुवत आणि घाबरविणा-या सवयी बनत असतात, त्यामुळे अपयशी होण्याची परिस्थिती बनत असते. आळशी विचारांनी अस्वच्छतेची आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी बनत असतात जे गोंधळ-दुर्गंधीयुक्त़ आणि पराकोटीचे दारिद्र्य अशी परिस्थिती निर्माण करत असते.
द्वेष, तिरस्कारयुक्त आणि निंदनीय विचारांमुळे दोषारोप आणि हिंसेच्या सवयी बनवत असतात. ज्यामुळे इजा, जखमा आणि छळ यांसारखी परिस्थिती तयार होत असते. स्वार्थी विचारांमुळे फक्त आपलाच फायदा बघण्याची सवय घनरूप घेत असते, ज्यामुळे अधिकच चिंतेची परिस्थिती बनत असते.
तर या उलट, सुंदर विचारांनी दयाळूपणाची सवय बनत असते. ज्यांमुळे उज्वल परिस्थितीचे स्वरूप आकार घेत असते. शुद्ध विचारांनी शांत राहणे आणि स्वयं नियंत्रण, आत्मसंय्यम यांच्या सवयी बनत असतात ज्यामुळे शांतीची परिस्थिती बनत असते.
साहसी विचारांनीच मानवी सवयी बनत असतात ज्यामुळे यशस्वी आणि स्वातंत्र्याची परिस्थिती आकारास येत असते. एक व्यक्ती स्वतः आपल्या परिस्थितीची थेट निवड करू शकत नाही परंतू, तो आपल्या विचारांची निवड तो करू शकतो आणि याप्रकारे तो आपल्या परिस्थितीला एक चेहरा देऊ शकतो.
शरीर व आरोग्यावर विचारांचा परिणाम (Effect of thought on Health and the Body)
शरीर मन-मेंदूचा नोकर आहे तो मन-मेंदूच्या कामांना पूर्ण करत असतो, मग भलेही ते हेतूपूर्वक निवडलेले असतील किंवा आपोआप बनलेले असतील. वाईट विचारांनी शरीर वेगाने बदलत आणि खराब होत असतो. खुशाल आणि सुंदर विचारांनी शरीर अधिकच उमेदी-उत्साही आणि सौंदर्यपूर्ण बनत असते.
शरीर मनाचा गुलाम असतो... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
भीतीचे विचार माणसाला गोळीच्या वेगाने मारत असतात. घाबरणे शरीराला आजार आणि विकारांसाठी खूले करून टाकत असते आणि अशुद्ध विचार माणसाच्या चेतासंस्थेला कमकुवत, छिन्न-छिन्न करून टाकत असतात. चिरडूण टाकत असतात.
माणूस जोपर्यंत अस्वच्छ विचार करत राहिल तोपर्यंत त्याचे रक्त अशुद्ध आणि विषक्त बनत राहील. एका स्वच्छ हृदयानेच, एक स्वच्छ शरीर आणि स्वच्छ जीवन निघत असते. तर, सडलेल्या विचारांनी, सडलेले जीवन आणि भ्रष्ट शरीर निघत असते. जो माणूस-व्यक्ती आपले विचार बदलनार नाही त्याला त्याच्या आहारात बदल केल्याने काहीच फरक पडणार नाही. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या विचारांना शुद्ध बनवून घेतो तेव्हा त्यानंतर तो अशुद्ध अन्न कधी खानार नाही.
जर तुम्हाला चांगल्या शरीराची इच्छा असेल तर आपल्या मनाची रक्षा करा. शरीराच्या आजारांना नष्ट करण्यासाठी खुशाल विचारांपेक्षा उत्तम डॉक्टर कोणताच नाही. तुम्ही तीव्र दुःख आणि शोक यांच्या सावलीला मिटविण्यासाठी सद्भावना शिवाय उत्कृष्ट काहीही नाही.
दु:ख आणि शोकाच्या सावलीला विखुरण्यासाठी सद्भावनेशी तुलना करण्यासारखा कोणताही सांत्वनकर्ता नाही. नेहमीच वाईट विचारांमध्ये राहण्याचा अर्थ आहे की स्वतःसाठी एक तुरूंग बनविण्यासारखे आहे.
👉पुढील उर्वरित सारांश भाग-2 मध्ये पाहू...
पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार
- तुम्हाला त्या सर्वोच्च स्वर्गावर आरूढ व्हायचे आहे का, तुम्हाला त्या नीचतम पातळीला जायचे आहे का, तर तुम्ही त्या शाश्वत सौंदर्याची स्वप्ने पाहा किंवा मग त्या नीचतम विचारांमध्ये लोळत राहा.
- कारण उंचावरील स्वर्ग म्हणजेच तुमचे विचार आणि नीच नरक म्हणजे तुमचे विचारच विचारांशिवाय परमशांती कुठेच नसते वेदना फक्त विचारांनाच माहीत असतात.
- विचारांशिवाय ही विश्वेही नष्ट होतील.
- मान-सन्मानाचे अस्तित्व केवळ स्वप्नांमध्येच असते
- आणि युगानुयुगे चाललेल्या त्या नाटकाचा
- उगम त्या चिरंतन विचारापासून होतो.
- प्रतिष्ठा आणि लज्जा व दु:ख,
- वेदना व यातना, प्रेम व तिरस्कार म्हणजे
- खरे तर नियतीवर अधिराज्य गाजविणार्या
- त्या चैतन्यमयी विचारांवर चढवलेला
- मुखवटा असतात. इंद्रधनुष्याचे
- निरनिराळे रंग मिळून
- प्रकाश एक प्रकाशकिरण बनतो,
- तसेच जगभरात घडणारे बदल
- मिळून एक चिरंतन स्वप्न बनते.
- आणि ते स्वप्न पूर्णपणे तुमच्या अंतर्मनात आहे
- आणि ते स्वप्न पाहणारा त्या पहाटेची वाट पाहत आहे
- ज्या पहाटेने त्याच्यात चैतन्यमयी व कणखर
- विचारांची जाग येईल
- अशाने ते आदर्श स्वप्न खरे होईल
- पाताळाच्या स्वप्नांचा नाश अशा स्वर्गात होईल
- सर्वोच्च, सर्वाधिक पवित्र अशा स्वर्गामध्ये
- केवळ शुद्ध आणि परिपूर्ण गोष्टीच वास्तव्य करतात.
- दुर्दैव हे विचारांच्या मंथनातून आले आहे
- चांगुलपणाचेही तसेच आहे
- प्रकाश आणि अंधकार, पाप आणि पुण्य
- हे त्याचप्रमाणे विचारांच्या माध्यमातून जन्मले आहेत.
- भव्य गोष्टींच्या विचारात मग्न राहा
- आणि तुमच्या नजरेला केवळ भव्य तेच पडेल
- आणि तुमचे मन सर्वोच्च गोष्टींवर केंद्रित करा
- मग तुम्हीसुद्धा सर्वोच्च पदावर पोहोचाल.
Life changeing word 😊
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्वागत, आणि वाचनासाठीच्या या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद. भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
उत्तर द्याहटवा