माणूस जसा विचार करतो तसा बनतो -सारांश -भाग-2 | अ‍ॅज अ मॅन थिंक्स-जेम्स अ‍ॅलेन | As a Man Thinketh by James Allen

 मूर्ती लहान किर्ती महान या उक्‍तीप्रमाणे ही पुस्‍तक छोटीशी जरी असली तरी यातील गाभा महत्‍वाचा असून आवाकाही खूप मोठा आहे, मानवी मनाच्‍या मूळाशी असलेले विचार, विचाराची शक्‍ती, विचारांचा प्रभाव व विचारांच्‍या शक्‍तीचा वापर कसा करावा याबद्दल जीवन बदलून टाकणारी पुस्‍तक..!

विचारांचा प्रभाव हेच उन्नतीचे शिखर
माणूस जसा विचार करतो
जेम्‍स ऍलन

मराठी अनुवाद
पुस्‍तक सारांश
भाग-2

 

 As a Man Thinketh -Vicharanchi Shakti Olkha - Marathi 
by James Allen (Author), Sachin Raylwar (Translator)
Marathi Book Summary

सारांश भाग-2  

📑🔖📕📖📗📘📙
👉सारांश भाग-1 वाचन करण्‍यासाठी
📑🔖📕📖📗📘📙

पुस्‍तकाविषयी 

  • या पुस्‍तकात लेखकांनी मुळतः आपल्‍या विचारांवर भर दिलेला आहे. 
  • आपले विचार किती शक्‍तीशाली असतात
  • विचारांच्‍या बळावरच पुढील कार्ये होत असतात
  • विचारच आपले भविष्‍य घडवतात
  • आपले विचारच असतात जे आपल्‍याला आपल्‍याला हवी तशी परिस्थिती निर्माण करून देत असतात. 
  • आपल्‍या आवडी-निवडी यांच्‍यावरही आपल्‍या विचारांचा प्रभाव असतो. 
  • आपण आपले जीवन आपल्‍या विचारांनी बदलू शकतो. 

📑🔖📕📖📗📘📙 

👉💡सूचना/टीपः

सात विविध प्रकरणातून आपल्‍याला ही पुस्‍तक विचारांबद्दल शिकवते. आपण सातपैकी तीन प्रकरणं सारांश भाग-1 मध्‍ये बघितले आहेत. वाचकांना विनंती आहे की या पुस्‍तकाचे सारांश भाग-1 अगोदर वाचन करा. इथून.
उर्वरित प्रकरण या भागात पाहू...

सारांश भाग-1 मध्‍ये आपण पाहिले आहे की, विचार आणि चारित्र्य यांचा संबंध, प्रभाव, वापर कसा करावा, विचारांचा परिस्थितीवरील प्रभाव, शरिर व आरोग्‍यावर विचारांचा प्रभाव आता यापुढे भाग-2 मध्‍ये पाहुया विचार आणि उद्देश, उद्दिष्‍टप्राप्‍तीमधील 'विचार' घटक, दूरदृष्‍टी आणि आदर्श, मनःशांती व इतर प्रकरणांचे सारांश..

📑🔖📕📖📗📘📙 

 

👇सारांश भाग-2 👇

विचार आणि उद्देश (Thoughts and Purpose)

जर तुमचे विचार तुमच्‍या उद्देशाशी जुळलेले नसेल तर, काहीही हाशील होणार नाही. प्राप्‍त होणार नाही.  ज्‍यांचा आयुष्‍यात कोणताही उद्देश नसतो ते सहजच चिंता, भिती आणि त्रासात अडकून पडत असतात, या गोष्‍टी माणसाला अपयश, विफलता, दुःख, तोटा, आणि कमकुवतपणा यांकडे घेऊन जातात.  प्रत्‍येक माणसाने स्‍वतःच्‍या हृदयात मिळवू शकेल असा, एक उद्देश ठेवला पाहिजे.  

त्‍याला त्‍या उद्देशालाच आपल्‍या विचारांचा केंद्रबिंदू बनवायला पाहिजे.  उद्देश प्राप्‍त करण्‍यासाठी त्‍याला स्‍वतःला समर्पित करायला पाहिजे.  आणि आपल्‍या विचारांना लालसा आणि कल्‍पनेमध्‍ये भटकण्‍यापासून थांबवायला पाहिजे. 

जर तो स्‍वतःच्‍या उद्देशाला प्राप्‍त करण्‍यात वारंवार अपयशी होत असेल तर त्‍याच्‍या चरित्राची शक्‍तीच त्‍याच्‍या यशाची ओळख बनत असते आणि तेच त्‍याच्‍या भविष्‍यातील विजय आणि शक्‍ती यासाठी नवी सुरूवात बनत असते.    जसे शरिराने कमकुवत व्‍यक्‍ती सरावाने आणि प्रशिक्षणाने स्‍वतःला बळकट बनवू शकतो त्‍यासारखेच कमकुवत विचारांच्‍या व्‍यक्‍तीसुद्धा योग्‍य विचारांनी स्‍वतःला बळकट बनवू शकतो. 

कमकुवतपणाला हटवून आणि उद्देशासह विचार करून त्‍या बळकट लोकांमध्‍ये जाऊन मिसळू शकता जे अपयशाला यशाचा मार्ग समजत असतात. आपल्‍या उद्दशाला प्राप्‍त करण्‍यासाठी व्‍यक्‍तीला उजवीकडे-डावीकडे न पाहता, इकडे तिकडे न बघता, स्‍वतःच्‍या यशाकडे जाणारा मार्ग मानसिकरित्‍या बनवायला, तयार करायला पाहिजे. 

स्‍वतःमधून भिती आणि शंकेला कठोरपणे काढून टाकले पाहिजे, या गोष्‍टी तुमच्‍या प्रयत्‍नांना, श्रमाला, मेहणतीला खराब करत असतात.  भिती आणि शंका यामुळे कधीही कोणी काही प्राप्‍त केलेलं नाही आणि कधी प्राप्‍त करूही शकनार नाही. या गोष्‍टी नेहमीच तुम्‍हाला अपयशाकडे घेऊन जात असतात. 

भिती आणि शंका हे ज्ञानाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत.  जो माणूस भिती आणि शंकेला जिंकतो तो अपयशालादेखिल जिंकत असतो. 

 

उद्दिष्‍टप्राप्‍तीमधील 'विचार' घटक (The Thought Factor in achievement)  

माणूस जे काही मिळवतो किंवा जे काही मिळवू शकत नही ते त्‍याच्‍या विचारांचा थेट-सरळ, स्‍पष्‍ट परिणाम असतात.  एखाद्या माणसाचा कमकुवतपणा किंवा शक्‍ती, शुद्धता किंवा अशुद्धता इतरांची नसून त्‍याच्‍या स्‍वतःची असते आणि ते स्‍वतःहून सहजरित्‍या बदलल्‍या जाऊ शकतात, इतरांकडून नाही. 

त्‍याचे सुख-दुख सर्वकाही त्‍याच्‍या स्‍वतःमुळेच आतून निघालेले आहेत.  जो जसा विचार करतो तो तसाच आहे.  जसे विचार तो करत राहिल तो तसाच राहील. 

एक बळकट, बलवान, सामर्थ्‍यवान माणूस कधीच एखाद्या कमकुवत माणसाची मदत करू शकनार नाही जर कमकुवत व्‍यक्‍ती त्‍याची मदत घेण्‍यास नाकारत असेल तर. आणि त्‍या कमकुवत व्‍यक्‍तीलादेखिल आपल्‍या मेहणतीने, परिश्रमाने स्‍वतःला बळकट, सामर्थ्‍यवान बनवले पाहिजे आणि अशी शक्‍ती बनवायला पाहिजे,अशी शक्‍ती जी तो इतरांमध्‍ये पाहत असतो. 

ज्‍याने कमकुवतपणाला जिंकलं आहे आणि सर्वप्रकारच्‍या लोभी, लालसेच्‍या विचारांना दूर सारलेलं आहे तोच व्‍यक्‍ती वर उभारून येऊ शकतो, काहीही मिळवू शकतो, जिंकू शकतो, यशस्‍वी होऊ शकतो.  

तो कमकुवत फक्‍त तेव्‍हाच राहू शकतो जेव्‍हा तो स्‍वतःच्‍या विचारांना उभारून वर येऊ देत नसतो.  सफल, यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍याला स्‍वतःच्‍या लालसेचा बलिदान द्यावा लागतो. लोभी वृत्‍तीचा, विचारांचा त्‍याग करावा लागतो.  

आपल्‍या विचारांवर नियंत्रण मिळविल्‍याविना तो इतर मोठ्या जबाबदा-यांना सांभाळू शकेल असा लायक नसेल.  तो जसे विचार निवडेल, तो तिथपर्यंतच मर्यादित राहिल.  हे जग लालची-लोभी आणि अप्रामाणिक लोकांना प्रोत्‍साहन देत नाही, साथ देत नाही, खरेतर, ते प्रामाणिक लोकांची मदत करत असते. 

योग्‍य विचारांनी मिळविलेल्‍या गोष्‍टी सावधगिरीनेच बनविली जाऊ शकते. बरीच लोकं यश मिळाल्‍यानंतर अपयशाकडे परत जायला लागतात. ज्‍याला कमी मिळवायचं आहे, त्‍याला कमी, ज्‍याला खूपच जास्‍त प्राप्‍त करायचं आहे अशांना त्‍याग, बलिदानदेखिल मोठंच द्यावं लागतं. 

 

दूरदृष्‍टी आणि आदर्श (Vision and Ideals) 

The dreamers are the saviors of the world म्‍हणजेच स्‍वप्‍नं पाहणारेच जगाचे रक्षक आहेत.   ज्‍याप्रकारे  दृश्‍य जग, दिसू शकणारं जग, अदृश्‍य गोष्‍टींनी चालत असते, तसेच माणसाने आपल्‍या सर्व गोष्‍टी आणि पाप यांमधून उभारून वर येण्‍यासाठी तो आपल्‍या सुंदर स्‍वप्‍नांनी पोषित दृष्‍टीकोनाने समस्‍या सोडवत असतो. 

मानवता आपल्‍या दूरदृष्‍टीने, स्‍वप्‍नं पाहणा-या लोकांना विसरू शकत नाही, ती त्‍यांच्‍या आदर्शांना, मूल्‍यांना निष्‍प्रभ, क्षीण किंवा लुप्‍त आणि कोमेजून नाहीसे होऊ देऊ शकत नाही. मानवता त्‍यांच्‍या स्‍वप्‍नंदृष्‍ट्यांच्‍या आदर्शांना मरू देऊ शकत नाही, ती त्‍यांच्‍या अस्‍सलपणाला जाणून आहे आणि एक दिवस पाहील आणि जाणून घेईल.

संगीतकार, मूर्तीकार, चित्रकार, कवी, ऋषी हे सर्व या जागाच्‍या पार दूस-या जगातील, स्‍वर्गाचे निर्माता आहेत.   जग सुंदर आहे कारण ही लोकं इथं जगली आहेत, यांच्‍याविना मानवतेची मेहनत, परिश्रम सर्व वाया गेले असते. 

जो सुंदरता, सौंदर्य यांची दृष्‍टी बाळगतो आणि आपल्‍या हृदयात ठेवतो एके दिवशी त्‍याची जाणीव त्‍याला होत असते. जशी दृष्‍टी तशी सृष्‍टी, जैसे ध्‍यानी-मनी तैसे जगी.  कोलंबसने एका वेगळ्याच प्रकारच्‍या दृष्‍टीने जगाला पाहिले, आणि त्‍याला शोधलंसुद्धा.  बुद्धाने अंतरर्गत शांती आणि सुंदरता यांची दृष्‍टी ठेवली आणि त्‍यांनी ती प्राप्‍तदेखिल केली.  आपल्‍या दृष्‍टीला जपा, काळजी घ्‍या, हृदयात जतन करा.  आपल्‍या आदर्शांचे कौतुक करा, जपा, हृदयात जतन करा, काळजी घ्‍या.  जो संगीत तुमच्‍या हृदयात वाजतं, निनादतं, जे सौंदर्य तुमच्‍या मन-मेंदूमध्‍ये आहे त्‍याला जपा, जतन करा, काळजी घ्‍या.  

जर तुम्‍ही यांच्‍याशी नेहमी खरे बनून, एकनिष्‍ठ राहाल तर तुमचे जग बदलेल.  जे विचार करत नाहीत आणि दर्लक्ष करतात, ते फक्‍त वस्‍तू-गोष्‍टींच्‍या परिणामालाच पाहतात, त्‍या गोष्‍टींना नाही आणि तेच व्‍यक्‍ती नशीब व संधीबद्दल बोलतात. 

एखाद्या माणसाला श्रीमंत-धनवान होताना पाहून ते म्‍हणतात, तो किती नशीबवान, सुदैवी आहे..!, कोणाला बौद्धीक बनताना पाहून ते म्‍हणतात, तो किती कृतज्ञ आहे, ते त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना, त्‍याग-बलिदानाला पाहत नसतात जी त्‍यांनी केलेले असतात. खरेतर त्‍यांना त्‍यांनी केलेल्‍या बलिदान-त्‍याग याबद्दल माहितही नसते. ते अंधार आणि मनातील भीतीला, त्रासाला बघत नसतात तर ते फक्‍त आनंद, सुख आणि प्रकाशालच ते पाहत असतात. आणि त्‍यालाच ते नशीब (luck) असे नाव देतात. 

ते त्‍यांनी केलेल्‍या कठीण प्रवासाला पाहत नसतात, तर फक्‍त सुंदर दिसणा-या अंतिम ठिकाणालच ते पाहत असतात.  आणि त्‍यालाच ते भाग्‍य, दैव (fortune) असे म्‍हणतात.  जसा दृष्‍टीकोन तुम्‍ही तुमच्‍या मनात ठेवाल, जसे आदर्श तुम्‍ही तुमच्‍या हृदयात उच्‍चस्‍थानावर बसवाल, यामुळेच तुमचे जीवन बनेल, तेच तुम्‍ही बनाल. 

 

मनःशांती (Serenity) 

मनाची शांती ज्ञानाच्‍या सुंदर रत्‍नांपैकी एक आहे. हे स्‍वयंनियंत्रणासाठी, आत्‍मसंय्यमासाठी केलेल्‍या दीर्घ आणि  चिकाटीपूर्ण मेहनीतीचे साफल्‍य आहे.  प्रदीर्घ शांतचित्‍ताने आणि सातत्‍याने केलेल्‍या प्रयत्‍नांचा फळ आहे.  असे असणे परिपक्‍व अनुभव असल्‍याचे दर्शविते.  

एक शांत माणूस स्‍वतःला कसे सांभाळायचे हे जाणून असतो. स्‍वतःला इतरांच्‍या अनुकूल कसे बनवावे हे त्‍याला माहित असते. एक माणूस जितका शांत असेल, त्‍याची सफलत त्‍याचे यश तेवढेच मोठे असेल. 

स्‍वनियंत्रण, आत्‍मसंय्यम (self control) वाढवून एक सामान्‍य व्‍यापारीसुद्धा स्‍वतःला व्‍यापारात यशस्‍वी बनवू शकतो.  शांत आणि सामर्थ्‍यशाली, बलवान व्‍यक्‍तीला नेहमीच प्रेम दिलं जातं. तो एका तहानेने व्‍याकूळ अशा जमीनीवर सावली, छाया देणा-या वृक्षाप्रमाणे असतो किंवा वादळामध्‍ये आश्रय देणा-या दगडासारखे असतात.  

तुम्‍ही जिथंही असाल, तुम्‍ही कोणत्‍याही परिस्थिती राहत असाल, हे जाणून घ्‍या कीः आयुष्‍याच्‍या सागरामध्‍ये बेटावर सुखाचे, धन्‍यतेचे बीज हसत आहेत आणि तुमच्‍या आदर्शांचे किनारे तुमची वाट पाहत आहेत. 

सारांश समाप्‍त 

सारांश भाग-1                         अवांतर वाचण्‍यासाठी                         सारांश भाग-2

 

 

📑🔖📕📖📗📘📙

आशा आहे वाचकांना हे सारांश आवडले असेल. आम्‍हाला आशा आहे या व अशाच पुस्‍तकांद्वारे आपल्‍या विचार करण्‍याच्‍या शक्‍तीला समजू शकाल, आणि या शक्‍तीला आपल्‍या जीवनात अनुसरन करून आपल्‍या जीवनाला अधिकाधिक उत्‍तम बनवाल.

ज्‍यांना गरज आहे, अशा सर्व मित्र-परिवार, सोबती ज्‍यांना जीवनात पुढे जायचे आहे अशा लोकांसोबत या पुस्‍तकाबद्दल चर्चा करा, त्‍यांना ही पुस्‍तक वाचन्‍यास उद्युक्‍त करा, प्रोत्‍साहन द्या, नक्‍कीच ते तुम्‍हाला प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरूपाने धन्‍यवाद देतील. 

🙏
ई- वाचनालयात भेट देऊन धैर्यपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल,
आपला अमूल्य वेळ दिल्याबदद्ल आपले मनःपूर्वक धन्यवाद.  


वाचकांना विनंती आहे की, अपल्याला -वाचनालय (www.evachnalay.in) या संकेतस्थळावर काही त्रुटी, तक्रारी असल्यास, गैरसोय, असूविधा, अडचण उद्भवल्यास, एखादी समस्या असल्यास, किंवा काही सूचना द्यायच्या, संकल्पना सुचवायच्या असतील तर निसंकोचपने व्यक्त करा, स्वतः चे मत टिप्पणी द्वारे मांडा, काही आवडले-समजले नसल्यास, सुधारणा हवी वाटल्यास ई-मेल, संदेशद्वारे आम्हाला कळवा, आम्ही आपली दखल अवश्य घेऊ.  

वाचकहो, तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे सारांश पाहिजे आहे आम्हाला टिप्पणी द्वारे किंवा इमेल संदेश द्वारे कळवा, आम्ही नक्कीच तुमच्यासाठी बनवू.    

तुम्हाला आमचे काम आवडले असल्यास दिलेल्या दुव्यावरून पुस्तकं किंवा काहीही खरेदी करा वाचन चळवळ सुरू ठेवण्यास (Mission Make India Read) आणि हे संकेतस्थळ चालविण्यास तुमच्या सहकार्याने अमेझॉनतर्फे मदत होईल.    

आशा आहे तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल, ज्ञानात भर पडली असेल.   पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात वापरून, ज्ञान वास्तविक जीवनात आचरणात आणून, आपले स्वतःचे व इतरांचेही जीवन समृद्ध बनवाल अशी अपेक्षा आहे.  

👉💡लक्षात ठेवा: वाचन-मनन-चिंतन-लेखन-आचरण   

 

🙏
ई- वाचनालयात भेट देऊन धैर्यपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल, आपला अमूल्य वेळ दिल्याबदद्ल आपले मनःपूर्वक धन्यवाद.   

🙆
तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवत राहा.


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive