चिंतेवर मात करणारे प्रभावी उपाय -चिंता सोडा आनंदाने जगा -डेल कार्नेगी | How to Stop Worrying & Start Living by Dale Carnegie (Marathi)

लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कार्नेगींनी १९९० मध्ये आपल्याला व्यावहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती तीआज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत.

चिंता सोडा सुखाने जगा
डेल कार्नेगी 

मराठी अनुवाद

 

Marathi Translation of
How to Stop Worrying & Start Living
by the Author
Dale Carnegie 

जर आपण आयुष्यातील वाईट प्रसंगांना विरोध केला, त्यांच्याशी जुळवून घेतले नाही तर काय होईल? आपण विलो वृक्षाप्रमाणे वाकण्यास नकार दिला आणि ओक वृक्षाप्रमाणे ताठर भूमिका स्विकारली तर काय होईल? आपल्या अंतर्मनातील संघर्ष वाढेल आपण चिंताक्रांत, गंभीर, तणावपूर्ण व वैफल्यग्रस्त होऊ.
 

डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले...
                                            - वॉरन बफे

 
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता.डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.
 
डेल कार्नेगी यांच्या ६ लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सुधारित स्वरुपात प्रकाशित झाल्या, लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कार्नेगींनी १९९० मध्ये आपल्याला व्यावहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती तीआज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत. 
 
 "चिता चिंता समाप्रोक्ता बिंदुमात्रं विशेषता।
सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता॥"
-
चिंता चिता समान-
तणाव (STRESS), नैराश्य (DEPRESSION), एकटेपणा (LONELINESS), भीती (FEAR) आणि चिंता (ANXIETIES) हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील (MODERN LIFESTYLE) प्रमुख दोष आहेत. 
 
हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तकं वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात आमुलाग्र बदल होईल.
  • भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जगा.
  • आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
  • स्वतःला कार्यमग्न ठेवा. 
  • चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
  • जुन्या नोंदी तपासून बघा.
  • सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा.
  • आनंदाचे ते क्षण आठवा... कटू आठवणी विसरून जा.
  • आर्थिक चिंता दूर करा.
  • तणाव दूर करा. तरूण रहा.
  • स्वतःचा शोध घ्या. 

मी माझ्या मिसुरीच्या शेतावर अनेक झाडे लावली होती. सुरुवातीला ती खूप भराभरा वाढली. पण मग असा काही वादळाचा तडाखा बसला की प्रत्येक फांदीन्फांदी बर्फाच्या ढिगा-याखाली उन्मळून पडली. बर्फाच्या ओझ्याखाली विनम्रपणे वाकण्याऐवजी या झाडांनी आत्मप्रौढी मिरवत वादळाशी संघर्ष केला आणि आत्मनाश ओढवून घेतला. 

मी स्प्रुस आणि पाअीन वृक्ष कधीही बर्फामुळे उन्मळून पडलेले पाहीले नाहीत. या सदाहरीत जंगलांना वाकायचे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यायचे माहीती आहे. 

जर आपण आयुष्यातील वाईट प्रसंगांना विरोध केला, त्यांच्याशी जुळवून घेतले नाही तर काय होईल? आपण विलो वृक्षाप्रमाणे वाकण्यास नकार दिला आणि ओक वृक्षाप्रमाणे ताठर भूमिका स्विकारली तर काय होईल? आपल्या अंतर्मनातील संघर्ष वाढेल आपण चिंताक्रांत, गंभीर, तणावपूर्ण व वैफल्यग्रस्त होऊ.

तणाव (STRESS), नैराश्य (DEPRESSION), एकटेपणा (LONELINESS), भीती (FEAR) आणि चिंता (ANXIETIES) हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील (MODERN LIFESTYLE) प्रमुख दोष आहेत. या पुस्तकातून आपण शिकणार आहोत, की, काळजी करण्याची गरज का नाही आणि आपण तणाव, नैराश्य, चिंता यापासून कसे दूर राहू शकतो आणि यशस्वी, निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगू शकतो. 

तुमच्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि ते उदंडपणे कसे जगायचे हे जाणून घेण्यासाठी अवश्य हि पुस्तक वाचा आणि यातील महत्वाचे सल्ले आचरणात आणा आणि चिंता सोडा आणि आनंदाने जगा.


 

How to Stop Worrying & Start Living by the Author 

पुस्‍तकः चिंता सोडा आनंदाने जगा
चिंतेवर मात करणारे प्रभावी उपाय 
लेखक: डेल कार्नेगी
मराठी अनुवाद
पुस्‍तक श्रेणी: व्यक्तिमत्व विकास
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन 

 📑🔖📕📖📗📘📙
 
 
इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive