स्वतःचाच पराभव करणार्‍या वागुणकीवर मात करण्यासाठी -गेट आऊट ऑफ युअर ओन वे - Get out of your own way (Marathi)

स्वतःचाच पराभव करणार्‍या वागुणकीवर मात करण्यासाठी
गेट आऊट ऑफ युअर ओन वे
मार्क गुल्स्टोन आणि फिलीप गोल्डबर्ग

मराठी अनुवाद
पुस्तक परिचय

 
 Get out of your own way (Marathi)
गेट आऊट ऑफ युअर ओन वे

Mark Goulston and Philip Goldberg
Book Review in Marathi

 

यश आणि आनंद मिळण्यापासून आपणच आपल्याला बर्‍याचदा दूर ठेवत असतो. आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो. स्व-पराजय करणारी आपली वागणूकच याला कारणीभूत असते. ही वागणूक कशी तयार होते याबाबत हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक आपल्याला या वागणुकीच्या मुळाशी कोणत्या भावना असतात तिथपर्यंत घेऊन जातं. बर्‍याचदा याची मुळं आपल्या बालपणात सापडतात. स्व-पराजय करणार्‍या या वागणुकीवर मात कशी करावी, यासाठी पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात उपाय किंवा तोडगे दिलेले आहेत. 
‘स्व-पराजय करणारी वागणूक ते समृद्ध करणारी वागणूक’ हे रूपांतरण घडवून आणण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन या पुस्तकाच्या रूपाने तुम्हाला मिळेल. अतिशय मौल्यवान पुस्तक. स्व-पराजय करणार्‍या 40 वागणुकी या पुस्तकातून स्पष्टपणे कळतात आणि त्यांच्यावर मात कशी करायची यासाठी अतिशय प्रॅक्टिकल उपायही मिळतात. आनंदाच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला हवं तसं जीवन जगण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा.

- जॅक कॅनफिल्ड, ‘चिकन सूप फॉर द सोल’चे सहलेखक 
लेखकांविषयी:
मार्क गुल्स्टोन, एम.डी. हे बोर्ड-सर्टिफाईड मानसोपचारतज्ज्ञ अ बर्कले, बोस्टन युनिव्हर्सिटी, द मेनिन्जर फाउंडेशन, आणि यूसीएलए इ घेतलं आहे. ते न्यूरोसायकिअ‍ॅट्रिस्ट युनिव्हर्सिटी इथे असिस्टंट क्लिनिक आहेत. लॉस एंजेलिस बिझनेस जर्नल आणि स्पेन डेली न्यूज यामध्ये स्तंभलेखन करतात. पुस्तकाचे सहलेखक फिलीप गोल्डबर्ग यांनी अने लेखन तसेच सहलेखन केले आहे.
 
गेट आऊट ऑफ युअर ओन वे
(स्वतःचाच पराभव करणार्या वागुणकीवर मात करण्यासाठी ......)

एक असं पुस्तक ...जे माझ्याच कामाचं आहे! माझ्यासाठी आहे....वाचल्यानंतर नक्की वाटेल! यात केवळ समस्या नव्हे तर त्याची उत्तरं ही आहेत....

जेव्हा अपयशी व्यक्तीला विचारले जाते की, ‘तुझ्या यशाच्या मार्गातील अडथळा काय?’ तेव्हा तो वेळ, पैसा, लोक, परिस्थिती अशी मोठी यादी सांगतो. आणि ते अडथळे पार करणे त्याला कठीण वाटत असतं. पण जर त्याला हे समजलं की, तोच त्याच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि तो कसा दूर करायचा तर तो सहजतेने यश मिळवेल.
 
खरंतर, यश आणि आनंद मिळण्यापासून आपणच आपल्याला बर्याचदा दूर ठेवत असतो. आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो.  स्व-पराजय करणारी आपली वागणूकच याला कारणीभूत असते. ही वागणूक कशी तयार होते याबाबत हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक आपल्याला या वागणुकीच्या मुळाशी कोणत्या भावना असतात तिथपर्यंत घेऊन जातं. बर्याचदा याची मुळं आपल्या बालपणात सापडतात.

अतिशय मौल्यवान अशा या पुस्तकात स्व-पराजय करणार्या 40 वागणुकी सांगितल्या असून त्याच्यावर मात कशी करायची यासाठी अतिशय प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत. या पुस्तकाची रचना ही - सुरुवातीला स्व-पराजय करणारी वागणूक दिली आहे, त्यानंतर त्या वागणुकीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ते दिले आहे व प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्व-पराजय करणार्या त्या वागणुकीवर मात कशी करायची यासाठी उपाय दिले आहेत.

या पुस्तकामध्ये -

  • चालढकल करणं (Procrastination)
  • ‘नाही’ म्हणायचं असताना ‘हो’ म्हणणं! (Saying Yes instead of No)
  • माझंच बरोबर आहे, असं मानणं! (Assuming I'm always Right..!)
  • आपल्या चुकांतून न शिकणं! (Not Learning from Mistakes)
  • आततायीपणा किंवा अट्टाहास करणं! (Immediacy)
  • मनाला फार लावून घेणं! (Getting too attached to the mind)
  • अवास्तव अपेक्षा ठेवणं! (Unrealistic or Over Expectations)
  • पटकन हार मानणं! (Perseverance)
या आणि अशा प्रकारच्या 40 स्व-पराजय करणार्या वागणुकी दिल्या आहेत. आणि त्यावरील प्रॅक्टिकल उपायही दिले आहेत.  ‘स्व-पराजय करणारी वागणूक ते समृद्ध करणारी वागणूक’ हे रूपांतरण घडवून आणण्यासाठीचा अॅक्शनप्लॅन असलेले, आनंदाच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला हवं तसं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आवर्जून वाचा.
 
 
पुस्तक: गेट आऊट ऑफ युअर ओन वे.

लेखक: मार्क गुल्स्टोन आणि फिलीप गोल्डबर्ग.

प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा लि पुणे.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive