होम स्‍कूलिंगः पालकत्‍वाचा आढावा

प्रत्येक पालकांची धडपड ही त्यांच्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे म्हणून असते. तेव्हा मैत्रीचा सल्ला असा, की पालक जो खर्च करतात, ज्यासाठी करतात ते त्यांच्या पाल्याला मिळत आहे ना ते तपासत राहणे. जान्हवीच्या होमस्कूलिंगचा जन्म त्याच विचारातून झाला.

 होम स्‍कूलिंग

 पालकत्‍वाचा आढावा 

जान्‍हवी, ऋतुराज, नीलिमा

पुस्‍तक परिचय 

होम स्‍कूलिंगः पालकत्‍वाचा आढावा

कोविड काळात आपल्‍या सगळ्यांनाच घरातून 'शिक्षण' किंवा ऑनलाईन शाळा करावी लागली.  अर्थातच, मुले आणि पालक, अशा दोघांनाही याचा खूप त्रास झाला., परंतु आज आपण पाहणार आहोत अशा एका मुलीबद्दल जिने आपली संपूर्ण शाळा अशी घरातून केली आहे.  अर्थात, त्‍या काळात बाहेर जायाचे निर्बंध नसल्‍यामुळे एका अर्थी शिक्षण घरून असले तरी ते जास्‍त करून निसर्गाच्‍या सान्निध्‍यात झाले.  ज्‍याला आपण 'प्रॅ‍क्‍टीकल लर्निंग' म्‍हणतो किंवा 'फील्‍डवर' जाऊन अभ्‍यास- तोही हसतखेळ! 

 

  शिक्षण= बालक+पालक+शिक्षक

(फील्‍डवर जाऊन अभ्‍यास- रविंद्रनाथ टागोर यांची निसर्गशाळा- गितांजली आपल्‍या भारतीय संस्‍कृतिची ओळख असलेली शैक्षणिक प्रणाली गुरूकुल ही पद्धतदेखिल याचेच उदाहरण आहे असे नाही वाटत..?) 

अधिक वाचाः भारतीय शिक्षणाचा प्रवासः गुरूकुल ते कुलगुरू 

 

जान्‍हवी देशपांडे ही आता पदवीच्‍या पहिल्‍या वर्षाला आहे.  तिने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण घरातून केले-होमस्‍कूलिंग! असे का केले, असा प्रश्‍न पडणे स्‍वाभाविक आहे.  एका वाक्‍यात उत्‍तर द्यायचे तर मूल्‍यवर्धित शिक्षण आपल्‍या मुलीला मिळावे या हेतूने तिच्‍या पालकांनी हा निर्णय घेतला.  12 वर्षांपर्वी होमस्‍कूलिंग हा शब्‍दही फारसा कुणाला माहिती नव्‍हता, अशा काळात आपली वाट धुंडाळत त्‍यांनी हा  प्रयोग यशस्‍वी केला. 

होमस्‍कूलिंग म्‍हणजे केवळ शाळेत न जाणे किंवा घरूनच शिकणे, असे अभिप्रेत नसून विद्यार्थ्‍याला त्‍याच्‍या आवडीचे शिक्षण मुक्‍त वातावरणात घेता यावे हा त्‍यामागील उद्देश.  एक म्‍हण आहे, 

तुम्‍हाला एक रूपया मिळाला, तर आठ आण्‍याची भाकरी घ्‍या आणि आठ आण्‍याची फुले घ्‍या.  भाकरी तुम्‍हाला जगवेल आणि फुले तुमच्‍या जगण्‍याचे कारा होतील.   

होमस्‍कूलिंगमध्‍येही हेच अपेक्षित आहे.  विशिष्‍ट शिक्षणातून आपल्‍या उपजिविकेचा मार्ग तर शोधायचा आहे., पण म्‍हणून केवळ त्‍याच्‍यामागे धावून आपण आपले जगणे तर विसरून जात नाही ना, याची जाणीव इथे करून दिली जाते. गणिताइतकेच महत्‍त्‍व भाषेला आहे आणि भाषेइतकेच भूगोलाला आणि या सगळ्या इतकेच महत्‍व विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक स्‍वातंत्र्याला आहे.  याचा पुरस्‍कार होमस्‍कूलिंग करते.  विद्यार्थ्‍याला त्‍याच्‍या आवडीनुसार आणि वेळेनुसार वेगवेगळे विषय शिकता येणे म्‍हणजे होमस्‍कूलिंग.  

त्‍या काळात जान्‍हवीसाठी आणि तिच्‍या पालकांसाठी होमस्‍कमलिंग नवीन असले तरी 'इच्‍छा तिथे मार्ग' या न्‍यायाने त्‍यांनी आपली वाट शोधली.  दहावीला भरघोस मार्क मिळवून शिक्षणाच्‍या मूळ प्रवाहात येताना तिला होमस्‍कूलिंगचे झालेले फायदे चकित करणारे आहेत. 

मुलांना शिकायचा कंटाळा का येतो? हे शोधून काढले की अर्धे प्रश्‍न कमी होतात.  होमस्‍कूलिंग हेच करते.  उत्‍तम व्‍यक्तिमत्‍त्‍व घडलेले पाल्‍य असावे, अशी सगळ्याच पालकांची अपेक्षा असते.  मग पाल्‍य आपल्‍याबद्दल काय विचार करते, असा एकूणच पालकत्‍वाचा आढावा या पुस्‍तकात वाचायला मिळतो.  जान्‍हवी आणि तिचे आई-वडील यांनी तिघांनी मिळून हे पुस्‍तक लिहिले आहे. 

 

पुस्‍तकः होमस्‍कूलिंग- सा विद्या या विमुक्‍तये 

लेखकः जान्‍हवी, ऋतुराज, नीलिमा 

लेख साभारः दै.लोकमत, मंथन, पुस्‍तक परिचय 

🔊📻
लेखकांची मुलाखत नक्‍की ऐका
आकाशवाणी कोल्‍हापूर


 नीलिमा -जान्‍हवी-ऋतुराज

नीलिमा देशपांडे या कोल्हापूर येथे राहतात. त्यांनी मराठी साहित्यात एम ए केले आहे. त्या 'भाषांतर - एक तौलनिक अभ्यास' या विषयात पीएच डी करत आहेत. त्यांचा टूरीजम टेक्नॉलॉजीचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी केलेले संत साहित्यावरील लिखाण 'साप्ताहिक विवेक'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
 

खरे सांगायचे तर, प्रत्येक पालकांची धडपड ही त्यांच्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे म्हणून असते. तेव्हा मैत्रीचा सल्ला असा, की पालक जो खर्च करतात, ज्यासाठी करतात ते त्यांच्या पाल्याला मिळत आहे ना ते तपासत राहणे. जान्हवीच्या होमस्कूलिंगचा जन्म त्याच विचारातून झाला. 

अर्थात, प्रत्येक पालकाला ते शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. मला वाटते, पालकांनी त्यांच्या प्रायॉरीटीज बदलल्या तर त्यांना हवे ते देण्यास शाळा नक्की तयार होतील.

सध्या मुले व त्यांचे पालक मार्कांच्या मागे धावत आहेत, मुलांना किती कळते किंवा त्यांचे गुण- कौशल्य विकसित होत आहेत किंवा कसे याचा विचारच पालकांकडे नाही. मुलांना त्याचा दोष देऊन चालणार नाही. कारण, ती जबाबदारी पालकांची आहे. पालकांनीच बदलायला हवे, म्हणजे मग पालकांना हवे तसे शिक्षणात व संगोपनात सगळे बदल आपोआप दिसून येतील.
 
 

 

Janhavi Deshpande (Homeschooler)


 

📖📗📘📙📕📑

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.


 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive