Attitude is Everything-By Jeff Keller-Part -2

 Attitude is Everything-By Jeff Keller-Book Summary in Marathi- Part -2

अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग- लेखक जेफ केलर- भाग-२ 

भाग -१

Attitude is Everything

-By Jeff Keller 

 अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग

लेखक-जेफ केलर

''दृष्‍टीकोण-हेच-सर्वकाही''

भाग-२ 

 

 

 

 मागील सारांश भाग-१ मध्‍ये आपण ह्या पुस्‍तकातील यशाचे ६-शब्‍द-सुत्रे पैकी ३-महत्‍वाचे सुत्र पाहिले होते आणि भाग-२ मध्‍ये त्‍यापुढील सारांशमध्‍ये आपण जाणून घेणार आहोत की, आपल्‍या आरामाचे/सोईचे जागेतून Comfort Zone बाहेर कसे यावे.  तुम्‍हाला कळेल की कसं तुमच्‍या बोलण्‍याची पद्धत तुम्‍हाला यशस्‍वी होण्‍यापासून थांबविते. 

या सारांशाच्‍या भाग-२ मध्‍ये तुम्‍ही शिकाल की कसं आपल्‍या भितीला कमी करून तुम्‍ही यशाकडे वाटचाल करू शकता.  एखाद्या विजेत्‍यासारखी अभिवृत्‍ती-दृष्‍टीकोन बनवू शकता.  चला मग सुरू करूया अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग या पुस्‍तकाच्‍या सारांशाचा भाग-२.

 

लेखक म्‍हणतात, तुमच्‍या शब्‍दांमध्‍ये खूप शक्‍ती असते.  शब्‍द एक चांगले भविष्‍य घडवू शकतात किंवा ते बि-घडवू सुद्धा शकतात. तुम्‍ही स्‍वतःशीच जसे बोलता तसाच तुमचा विश्‍वास बनत असतो.  आणि जसा तुमचा विश्‍वास असतो तसे परिणाम तुम्‍हाला मिळायला लागतात. 

उदा. राहूल स्‍वतःशी आणि आपल्‍या मित्रांना नेहमी असे म्‍हणतो की, 

''मी विक्री करण्‍यामध्‍ये खूप कमी आहे, मला विक्री करणे मला जमत नाही. मी कधीच विक्री करण्‍यामध्‍ये चांगलं करू शकत नाही. ''

आता तो जेवढ्या वेळेस स्‍वतःशी व इतरांना असे बोलत राहिल तेवढ्यावेळेस त्‍याचा विश्‍वास (Belief) तेवढा मजबूत होत जाईल. 

आणि जेंव्‍हा त्‍याचा विश्‍वास त्‍याचा दृष्‍टीकोण बनून जाईल की तो खरोखरच विक्री करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होणार नाही तेंव्‍हा तो त्‍या दिशेने कृती/कार्य करणेसुद्धा कमी करेल. 

 तो उत्‍पादक (Productive) असे काहीही करणार नाही ज्‍यामुळे तो चांगला विक्रेता किंवा यशस्‍वी होईल. आणि ह्याच कारणामुळे त्‍याचा विश्‍वास (Belief) अधिक नकारात्‍मक होऊन जाईल.  आणि आतापर्यंत तुमच्‍या लक्षात आलेच असेल की त्‍याचे भविष्‍य कसे राहणार आहे. 

 

राहुलच्‍या अगदी उलट राहुलचा मित्र राजेश जो राहुल इतकेच कौशल्‍य आणि शिक्षण ठेवतो.  तो स्‍वतःशी व इतरांशी असे म्‍हणतो की, 

''तुम्‍ही बघा मी जगातील सर्वांत चांगला विक्रेता बनून दाखवेन.'' 

आणि राजेश या गोष्‍टीवर विश्‍वास ठेवतो की तो जगातील सर्वांत चांगला विक्रता बनेल. 

जसेकी, राजेशला स्‍वतःवर विश्‍वास आहे की त्‍याला जगातील सर्वांत चांगला विक्रेता व्‍हायचयं, तर तो कृती/कार्य देखिल तसेच करेल. 

तो स्‍वतःच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वावर (Personality) देहबोलीवर (Body language) आणि जनसंपर्क (Communication Skills),लोकांशी कसे बोलावे,वागावे इत्‍यादी कौशल्‍यांवर काम करेल ज्‍यामुळे तो जगातील सर्वांत चांगला विक्रेता बनला नाहीतरी कमीतकमी एक यशस्‍वी विक्रेता नक्‍कीच बनवेल. 

तर मित्रांनो बघितलोत तुम्‍ही की,

 कसं आपल्‍या (स्‍वतःशी व इतरांशी) बोलण्‍याची पद्धतच आपण यशस्‍वी होणार की नाही हे ठरवते. 


आपल्‍याला आपले ध्‍येय (Goals) इतरांना सांगायला पाहिजे का नाही?

 मित्रांनो वरिल उदाहरणावरून आपल्‍याला एक महान गोष्‍ट येथे शिकायला मिळते ती म्‍हणजे, 

आपले ध्‍येय कधीही एका नकारात्‍मक व्‍यक्‍तीला सांगायला नाही पाहिजे. 

कारण तो तुम्‍हाला ते सर्व मुद्दे पटवून सांगेल की ज्‍यांमुळे तुम्‍ही यशस्‍वी होणार नाहीत. आणि अधिकतर असे व्‍यक्‍ती तेच असतात ज्‍यांनी आपल्‍या जीवनामध्‍ये काहीच केलेलं नसतं. आणि दुस-यांना काही मोठं करताना त्‍यांना बघितलं जात नाही. 

उदा. 

असे समजा की तुम्‍ही एखादा व्‍यवसाय सुरू करायचा आहे आणि तो कसा सुरू करायचा याविषयी तुम्‍ही तुमच्‍या एखाद्या नातेवाईकाशी विचाराल ज्‍यांनी आपले जीवन दुस-याची नोकरी करण्‍यामध्‍ये घालवले.   तुम्‍हाला काय वाटते, ते तुम्‍हाला काय सल्‍ला देतील?  ते तुम्‍हाला एक संपूर्ण यादी देतील ज्‍यामध्‍ये असे सांगितले असेल की, का तुम्‍हाला व्‍यवसाय सुरू करायला नाही पाहिजे.  

आणि त्‍या नातेवाईकाशी थोडाच वेळ बोलल्‍यावर तुमचा स्‍वतःवरचा विश्‍वास (Confidence) एवढासुद्धा राहणार नाही की तुम्‍ही व्‍यवसाय सुरू करू शकाल. ह्यामुळेच आपले ध्‍येय फक्‍त अशा व्‍यक्‍तींसोबतच चर्चा करा जे तुमच्‍या क्षेत्राविषयी माहिती ठेवतात आणि एक सकारात्‍मक विचार करणारे असतात. 

आपल्‍या सर्वांना अशा लोकांची माहिती असेल जे नेहमी असेच म्‍हणत असतात की, 

मी हे नाही करू शकत. 

मी ह्यामध्‍ये चांगला नाही. 

हे तर माझ्यासाठी अशक्‍य आहे. 

आणि असा एखादा व्‍यक्‍ती दिवस-रात्र स्‍वतःशी व इतरांशी असेच बोलत असेल तर तो अजून काही नाही तर आपल्‍या मनाला अपयशासाठी तयार करत आहे. 


काय तुम्‍ही तुमच्‍या जीवनाच्‍या खाली दिलेल्‍या क्षेत्रांना नकारात्‍मक दृष्‍टीकोणातून पाहता? 

जसेः 

👉 Relationship- जनसंबंधः

लोकं माझा नेहमी फायदा उचलतात. 

👉 Finance वित्‍तीय/आर्थिक क्षेत्रः

मी नेहमी गरीबच राहून जाईन. 

👉 Career व्‍यवसाय-कारकीर्दः   कदाचित मी कधीच काहीच करू शकनार नाही. 

आणि तुम्‍ही असा एखादा नकारात्‍मक दृष्‍टीकोण ठेवत असाल तर तुम्‍हाला परिणामसुद्धा नकारात्‍मकच मिळतील. 

एक गोष्‍टी लक्षात घ्‍या की, जसे तुम्‍ही बोलता, जसे विचार करता तसे तुमचे अंतर्मन बनत असते.  म्‍हणून आपल्‍या शब्‍दांच्‍या शक्‍तीला ओळखा आणि एक सकारात्‍मक दृष्‍टीकोण ठेवा जो तुम्‍हाल मदत करेल ते सर्व मिळविण्‍यासाठी जे तुम्‍ही इच्छिलेआहे. 

समजा मी तुम्‍हाला विचारले की, 

कसे आहोत? How are you? 

तर तुमचं उत्‍तर दोन किंवा तीन शब्‍दांपेक्षा जास्‍त नसेल आणि हेच दोन-तीन शब्‍दा तुमच्‍या आणि तुमच्‍या दृष्‍टीकोणाबद्दल बरेच काही बोलून जातात. 

 

सर्वसाधारणपणे याचे प्रतिसाद-उत्‍तर तीन प्रकारे देतातः 

१.  Negative Response: नकारात्‍मक प्रतिक्रिया

२.  Mediocre Response: मध्‍यम प्रतिक्रिया

३.  Positive Response: सकारात्‍मक प्रतिक्रिया 

 

तर चला ह्या प्रकारांना थोडं खोलवर जाऊन समजूया. 

 
१.  Negative Response: नकारात्‍मक प्रतिक्रिया 

जेंव्‍हा तुम्‍ही एखाद्या नकारात्‍मक वृत्‍तीच्‍या व्‍यक्‍तीला विचाराल की तुम्‍ही कसे आहोत? तेंव्‍हा त्‍यांची प्रतिक्र‍िया अधिकतर असे असेल की- 

 

😴मी आज खुप थकलेलो आहे. 

😳आज तर माझा दिवसच नाही. 

😢जीवनात काहीच बरोबर होत नाहीए. 

😵आणि कदाचित कधी बरोबर होणारही नाही.

 

असे व्‍यक्‍ती स्‍वतः तर नकारात्‍मक जीवन जगतातच उलट जो त्‍यांचे हालचाल विचारतो त्‍यांनासुद्धा ते नकारात्‍मक वाटायला लावतात. 

 

२.  Mediocre Response: मध्‍यम प्रतिक्रिया : 

मध्‍यम प्रकारचे विचार व दृष्‍टीकोण ठेवणारे व्‍यक्‍ती म्‍हणतातः 

बस...भाऊ.. कटत आहे कसंतरी जीवन..

ठीक-ठाक आहे.... तसाच अगोदरसारखा... 

 

आता तुम्‍हीच सांगा, 

काय खरोखरच तुम्‍ही एका अशा व्‍यक्‍तीसोबत जीवन जगाल  जो फक्‍त ''कटत आहे कसंतरी जीवन'' म्‍हणतोय म्‍हणजे जीवनाला एकप्रकारे ओझं समजतो. 


काय तुम्‍ही अशा व्‍यक्‍तीसोबत व्‍यवसाय-व्‍यवहार कराल जो वरील प्रमाणे विचार करतो.  

कारण अशाच व्‍यक्‍तींनी वर्षानुवर्षे अशा मध्‍यम विचार करून आणि प्रतिक्रि‍या देऊन-देऊन त्‍यांनी स्‍वतःची अशी मध्‍यम प्रतिक्रि‍येची Mediocre Response दृष्‍टीकोणच विकसित  केलं आहे.  जो त्‍यांना मध्‍यम परिणाम व एक मध्‍यम जीवन देतो. जो कदाचित तुम्‍ही ते कधीही ईच्छिनार नाही. 

 वरील दोन्‍ही प्रतिक्रि‍यांच्‍या नंतर तिसरे आहे, 


३.  Positive Response: सकारात्‍मक प्रतिक्रिया 

सकारात्‍मक विचार व दृष्‍टीकोण असणारे व्यक्‍ती एका वेगळ्याच पद्धतीने उत्‍तर-प्रतिक्रिया देतात. 

तुम्‍ही कसे आहोत ? असे हालचाल विचारणारे प्रश्‍न केल्‍यास सकारात्‍मक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे असते-

झक्‍कास चालू आहे..

एक-नंबर...

अरे भाऊ यापेक्षा अजून काही असूच शकत नाही. 


अशा व्‍यक्‍ती तुम्‍हाला कधीही उदास, निराश, तक्रार करताना दिसणार नाही.  ते कधीही समस्‍येला घेऊन रडगाने गात नाहीत. तर समस्‍येवर उपाय काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. 

अशा सकारात्‍मक व्‍यक्‍तींसोबत कोणालाही राहायला आवडते. 

एक जुनी म्‍हण आहे बघा की, कुणाच्‍या येण्‍याने आनंद वाटतो तर कुणाच्‍या जाण्‍याने... आणि तुम्‍हाला एक असा दृष्‍टीकोण विकसित करायचा आहे की, तुम्‍ही येताच क्षणी लोकांना आनंदाने वेड लागतील.


-तक्रारी करणे थांबवाः (Stop Complaining) 

 लेडी हॉलंड म्‍हणतात, की चिंता, समस्‍या, तक्रारी ह्या छोट्या मुलांसारख्‍या असतात.  तुम्‍ही त्‍यांचा जेवढा लाड पुरवाल-प्रेम कराल तेवढ्या त्‍या वाढत जातील. 

 

 "Troubles are like babies, they grow larger by nursing."  

-Lady Holland

असा व्‍यक्‍ती कधही जीवनामध्‍ये काही मोठं करू शकणार नाही जो नेहमी तक्रारी करत राहतो. 

जर माझ्याजवळ पैसे असते तर मीसुद्धा व्‍यवसाय सुरू केला असतात. 

जर मला एका चांगल्‍या महावद्यिालयामध्‍ये प्रवेश मिळाला असता तर आज मला एखाद्या मोठ्या कंपनीमध्‍ये नोकरी मिळाली असती. 

कोणीतरी बरोबरच म्‍हटलेलं आहे की,    

तुमच्‍याजवळ पिण्‍यासाठी स्‍वच्‍छ पाणी आणि दोन वेळेचं जेवण आहे तर तुम्‍हाला तक्रार करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. 


मित्रांनो तुम्‍हाला ही गोष्‍ट समजायलाच पाहिजे की, तक्रारी दृष्‍टीकोण ठेवून तुम्‍ही जीवनामध्‍ये कधीच काही मोठं प्राप्‍त करू शकत नाही. 

याऐवजी तुम्‍ही हे बघा की तुमच्‍याजवळ कितीतरी अधिक आहे ज्‍यासाठी जगामध्‍ये लाखो लोक तडफडत आहेत. 


-आपल्‍या भितींवर विजय मिळवून पुढे कसे जाल? (How to overcome from fears?) 

 जर तुम्‍हाल खरोखरच यशस्‍वी व्‍हायचे असेल, तर तुम्‍हाला अस्‍वस्‍थ-Uncomfortable-असमाधानी व्‍हावे लागेल.....!

ही गोष्‍ट ऐकायला खूप सोपी वाटते. 

परंतू अधिकतर लोक तेव्‍हांच करतात जेंव्‍हा एखादे घाबरविणारे प्रसंग किंवा अस्‍वस्‍थ करणारी घटनेला सामोरे जातात. 

ते भितीमुळे कोणतीही कृती करत नाहीत.  त्‍यामुळे ते कधीही आपल्‍या (Comfortable Zone) सोईच्‍या-आरामाच्‍या जगामधून-क्षेत्रामधून बाहेर येत नाही.

 

मित्रांनो, आपल्‍या सर्वांचे काही भय असतात  आणि ते वेगवेगळे भय असतात. 

उदाहरणार्थः 

कोणाला लोकांसमोर भाषण द्यायची/बोलायची भीती असते, तर कोणाला जीवनामध्‍ये मोठ्या परिवर्तनामुळे भीत असतो. कोणी नापासा/अनुत्‍तीर्ण होण्‍याच्‍या भीतीने घाबरत असतो तर कोणी, नवीन मित्र बनविण्‍यापासून घाबरत असतात. 

येथे ''भय'' या शब्‍दाचा अर्थ असं नाही की, तो भय जो तुमच्‍या वैयक्तिक आणि व्‍यावसायिक वाढीच्‍यामध्‍ये मार्गात येत असतो आणि त्‍यामधून निघाल्‍याशिवाय तुम्‍ही जीवनामध्‍ये काहीही मोठं करू शकत नाही. 

असे समजा/कल्‍पना करा की, तुमचा कम्‍फर्ट झाेन-सोयीस्‍कर क्षेत्र हे एका वर्तुळासारखे आहे. ज्‍यामध्‍ये  तुमच्‍या त्‍या सवयी आणि दैनंदिन कार्य आहेत ज्‍यांना करून तुम्‍ही स्‍वतःला अस्‍वस्‍थ म्‍हणजेच अनकम्‍फर्ट वाटत नाही.

आणि जसं की आपल्‍याला सर्वांना माहितच आहे की आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रात राहुन कोणीही यशस्‍वी आजपर्यंत झालेलं नाही.   कारण जेंव्‍हाकेंव्‍हा आपण आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्राच्‍या बाहेर येण्‍याचा प्रयत्‍न करतो तेंव्‍हा आपण चिंतित, अस्‍वस्‍थ होतो.  घाबरतो.

यामुळे आपण परत आपल्‍या कम्‍फर्ट झोनमध्‍ये जातो. 


मित्रांनो, दुर्देैवाने सध्‍यातरी असे कोणतेच मार्ग उपलब्‍ध नाहीत ज्‍यामुळे चिंताग्रस्‍त न होता, कोणतेही भय न ठेवता, काहीही न करता आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रातून बाहेर येता येईल. 

तुम्‍हाला जिवनामध्‍ये काहीही मोठं करण्‍यासाठी आणि काही नवीन शिकण्‍यासाठी तुमच्‍या भयांना सामोरे जावेच लागेल, कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रातून बाहेर यावेच लागेल.  आपल्‍या भीतींवर विजय मिळवावाच लागेल. 


तर पुढच्‍यावेळेस जेंव्‍हाकेंव्‍हा आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रातून बाहेर येतेवेळेस तुम्‍हाला एखाद्या अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल जेथे तुमचं मन तुम्‍हाला म्‍हणेल,

     👉की हे तुमच्‍याने होणार नाही.  

   
👉तुम्‍ही काही मोठं करण्‍यासाठी बनलेले नाहीत.

तर एक गोष्‍ट लक्षात ठेवा की आपलं मनदेखिल भय आणि चिंता आपल्‍याला वाटू देतो कारण त्‍याला अन-कम्‍फर्टेबल म्‍हणजेच अस्‍वस्‍थ होणं पसंत नाही. परंतू,

तुम्‍ही अन-कम्‍फर्टेबल म्‍हणजेच अस्‍वस्‍थ झाल्‍याशिवाय काहीही प्राप्‍त करू शकत नाही.

यासाठी एक सकारात्‍मक दृष्‍टीकोन ठेवून आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रातून एक पाऊल बाहेर काढा. आणि तुम्‍हीआज एक पाऊल देखिल बाहेर काढला तर तुम्‍ही विजेते आहात.  कारण,

    👉सचिन तेंडुलकरने एका दिवसातच क्रिकेटमध्‍ये १०० शतकं पुर्ण केले नाहीत.

    👉डॉ.ए.पी.जे. अब्‍दुल कलाम साहेब एका दिवसातच भारताचे राष्‍ट्रपती झाले नाहीत.

परंतू त्‍यांचा दृष्‍टीकोणच एका विजेत्‍यासारखा होता ज्‍यामुळे ते विजेते बनले.

तर तुम्‍हालादेखिल आपल्‍या कम्‍फर्ट झोन-सोयीस्‍कर/आरामाच्‍या क्षेत्रामधून बाहेर येण्‍यासाठी दररोज छोटे-छोटे पाऊल घ्‍यावे लागेल.  आणि प्रत्‍येक पाऊला सोबत स्‍वतःशी असे म्‍हणावे लागेल की,


 "मी 

विजेता 

आहे. "

I AM

THE 

WINNER

 

 

 "Running away from your fears is a loosing strategy." -Jeff Keller 

 

तर मित्रांनो हा होता दृष्‍टीकोन हेच सर्वकाही ह्या पुस्‍तकाचं भाग-२.  ह्याच पुस्‍तकाचा सारांश भाग-१ वाचण करण्‍यासाठी दिलेल्‍या दुव्‍यावरून जाता येईल.  सारांश वाचण्‍यापेक्षा प्रत्‍यक्ष पुस्‍तक खरेदी करून आपल्‍या दृष्‍टीकोणात-अभिरवृत्‍तीमध्‍ये-मनोवृत्‍तीमध्‍ये परिवर्तन आणता येईल. 


  भाग -१ वाचण्‍यासाठी

 

खालील दिलेल्‍या लिंकवरून पुस्‍तकाची मराठी आवृत्‍ती किंवा इंग्रजी आवृत्‍ती खरेदीकरू शकता.  

 मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी                  इंग्रजी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी  

       

 

पुस्‍तक: अ‍ॅटिट्यूड-इज-एव्‍हरिथिंग

लेखक:   जेफ केलर

ऑनलाईन पुस्‍तकः        अमेझाॅन    फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक

 


धैर्यपुर्वक पुस्‍तकाचं सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपुर्वक धन्‍यवाद. 🙏

हे किंवा इतर पुस्‍तकाचे सारांश आवडल्‍यास आपल्‍या मित्र-नातेवाईक, हितचिंतक किंवा गरजू-होतकरू विद्यार्थी, लोकांपर्यंत पोहोचवून त्‍यांची मदत करा.  

ह्या व अशाच पुस्‍तक जीवनात परिवर्तन आणना-या पुस्‍तकांच्‍या सारांशसाठी ई-मेलद्वारे आमची सदस्‍यता घ्‍या आणि आपले जीवन समृद्ध बनवा. 

सदस्‍यत्‍व घेणे अगदी मोफत आहे.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive