"थिंक लाइक अ मॉंक" हे
पुस्तक नकारात्मक विचारांवर आणि सवयींवर कशी मात करावी; आपल्या सर्वांच्या
अंतरंगात असलेली शांतता आणि उद्दिष्ट कसं प्राप्त करावं हे उलगडतं. जय
शेट्टी अमूर्त, गूढ असा बोध आपल्याला वापरता येण्याजोग्या सल्ल्यांच्या आणि
स्वाध्यायांच्या रूपात आपल्यासमोर मांडतात.
जेणेकरून आपला तणाव कमी होईल,
नाती फुलतील आणि आपल्या अंतरंगात असणारे उपहार आपण जगाला देऊ शकू. प्रत्येक
जणच संन्याशासारखा विचार करू शकतो आणि त्याने तो करावा, हेच जय शेट्टी
सिद्ध करून दाखवतात.
या पुस्तकातील दोन महत्वाच्या गोष्टी : Two Main Principles:
1. Know Your Identity
आपली अस्सल ओळख माहित करून घेणे
समजा तुम्ही एका आरशासमोर उभे आहात आणि त्या आरशावर धुळीचे थर चढलेले असेल, तर, तुम्ही स्वतःला स्पष्टपणे पाहू शकणार नाही. या उदाहरणामध्ये "आरसा" म्हणजे तुमची "खरी ओळख" आणि "धूळ" म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला अविश्वास, न्यूनगंड, स्वतःवरील शंका किंवा सेल्फ डाउट (Self Doubt).
जेंव्हा तुम्ही त्या आरशावरून धूळ काढून टाकता तेंव्हा तुम्ही स्वतःच्या प्रतिमेला स्पष्टपणे बघू शकाल. लेखक असे सांगतात कि, आरशावर जर धूळ चढलेली असेल तर आपण स्वतःच्या सेल्फ रिफ्लेक्शनला (Self Reflection) पाहू शकत नाही आणि जेंव्हा आपण धूळ साफ करतो तेंव्हा आपण स्वतःच्या आत्मप्रतिमेला पाहू शकतो.
लेखकांच्या मते, तुमची खरी ओळख (ट्रू आयडेंटिटी) धूळ नाही तर तुम्ही स्वतःच आहात.
2. Negativity नेगेटिव्हिटी -नकारात्मकता
नकारात्मकता सगळीकडेच आहे, छोट्या-छोट्या गोष्टींवर तक्रारी करणे, पाठीमागे बोलणे, इतरांशी तुलना करणे या सर्व गोष्टी नाकारात्मकता दर्शवतात. आपल्याला जास्तीत जास्त वेळ अशा लोकांसोबत खर्ची करायला पाहिजे ज्यांच्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी बदल आणत असतात, जसे की, शांतताप्रिय आणि आनंदी स्वभावाचे व्यक्ती.
प्रामाणिकपणे, स्वतःला व इतरांनां समजून घ्यायला, स्वतःला विकसित करण्यासाठी, सखोलपणे अधिक जाणून घेण्यासाठी सारांश किंवा पुस्तक अवश्य वाचा.
Author
जय शेट्टी
हे स्टोरीटेलर, पॉडकास्टर आणि पूर्वाश्रमीचे संन्यासी आहेत. व्हायरल
मार्गाने विद्वत्तेचा सर्वांपर्यंत सर्वदूर प्रसार करणं हे त्यांचं
उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या जगाला कलाटणी देणार्या लोकांच्या
फोर्ब्जच्या यादीत, 2017मध्ये ‘फोर्ब्ज थर्टी अंडर थर्टी’मध्ये त्यांचा
समावेश झाला होता.
सहज उपलब्ध होणाऱ्या, प्रसंगोचित आणि व्यवहार्य मार्गाने
जगाची कालातीत विद्वत्ता सर्वांना सांगण्याची, तिचा प्रसार करण्याची मोहीम
त्यांनी हाती घेतली आहे. शेट्टींनी 400हून अधिक व्हायरल व्हिडिओंची
निर्मिती केली आहे आणि त्याला 5 अब्जांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. "ऑन
पर्पज" या जगभरातील No.#1 ‘हेल्थ अँड वेलनेस पॉडकास्ट’चे ते सूत्रसंचालनही
करतात.
Website: www.thinklikeamonkbook.com
टिप्पण्या