स्वयंशिस्तीची शक्ती -सबबी सांगणे सोडा -ब्रायन ट्रेसी | No Excuses (Marathi) -Brian Tracy
आपल्या
जीवनातील आपल्या वैयक्तिक ध्येय, व्यवसाय आणि पैशाचे उद्दीष्ट आणि एकूणच
आनंद यासह आपण यश कसा प्राप्त करू शकता हे या पुस्तकात आपल्याला दर्शविले
जाईल.
चिरस्थायी आनंद आणि यश साध्य करण्याचे 21 शक्तीशाली मार्ग
स्वयंशिस्तीची शक्ती
ब्रायन ट्रेसी
मराठी अनुवाद
No Excuses (Marathi) by the Author Brian Tracy
तुमचे ध्येय आणि ते पुर्ण करण्यासाठी दरम्यानच्या
पुलाचे काम स्वयंशितस्त करत असते.
पुलाचे काम स्वयंशितस्त करत असते.
This book will show you how you can achieve success in all three major areas of your life, including your personal goals, business and money goals and overall happiness.
यशाची कल्पना, व्याख्या, परिभाषा व्यक्तिपरत्वे, प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. परंतू आपण ज्या जगात राहतो तिथे सर्वमान्य यशाची व्याख्या म्हणजेच आपल्या मर्यादित आयुष्यात पत-पैसा, पद, प्रतिष्ठा, सन्मान ते मिळवणे, आपल्याला जे आवडते ते करणे, आपला जन्म ज्यासाठी झालेला आहे ते करायला मिळणे, आपले स्वप्न प्रत्यक्षात जगणे, म्हणजेच यश प्राप्त करणे होय.
जगातील 1% एक टक्का लोकांना जे करायला मिळते, ते उर्वरित 99% लोकांना करायला का नाही जमत?
तर त्याचे उत्तर आहे, आपले विचार, आपला दृष्टीकोन, आपल्या अपेक्षा, महत्वाकांक्षा, आपले वातावरण, यशासाठी करावी लागणारी मेहणत-श्रम, प्रयत्न, सचोटी, चिकाटी, स्वयंशिस्त, सातत्य, सामर्थ्य, संय्यम-धैर्य, धीटपणा, ठामपणा, सच्चेपणा-प्रामाणिकपणा, या गोष्टींचा अभाव 99 टक्के लोकांमध्ये असतो. प्रत्येकामध्ये कमी-जास्त होऊ शकतो परंतू याच गोष्टी असतात ज्यांमुळे एक टक्का आणि 99 टक्के लोकांमध्ये फरक असतो.
परंतू, बहुतांश लोकं आपल्या आयुष्याकडे कसे पाहतात, त्यांचा दृष्टीकोन कसा असतो, त्याचे एक उदाहरणाने बघू,
- मला हे करणं जमत नाही,
- माझ्याकडे कौशल्यंच नाहीत,
- मला ते करणं शक्य नाही,
- माझे शिक्षण तेवढे नाही,
परंतू यापैकी एखादे कारणच असते जे आपल्याला आयुष्यात अशक्य ते शक्य करण्यास प्रेरित करू शकते. अपयशाचे किंवा एखादे काम, एखादी गोष्ट न करण्याची हजारो कारणं असू शकतात परंतू यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकमेव गोष्ट तुमच्या मनातून स्पष्ट झाली, पुर्वग्रह दुषित विचार काढून, मनातील जळमटे दूर करण्यासाठी डोक्यात फक्त एकमेव ध्येय पक्कं केलात, तुम्हाला ती यशाची किल्ली सापडली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल यात काहीच शंका घेण्यासारखी नाही.
तर ती यशाची किल्ली, जादूचा पिटारा, जादूचा मंत्र, प्रतिभा, बुद्धिमत्ता, लॉटरीचा पैसा, हे नूसन वर उल्लेख केल्याप्रमाणे आपले
विचार, आपला दृष्टीकोन, आपल्या अपेक्षा, महत्वाकांक्षा, आपले वातावरण,
यशासाठी करावी लागणारी मेहणत-श्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रेरणा-प्रयत्न, सचोटी, चिकाटी, स्वयंशिस्त,
सातत्य, सामर्थ्य, संय्यम-धैर्य, धीटपणा, ठामपणा,
सच्चेपणा-प्रामाणिकपणा, या गोष्टींनी यशाची किल्ली बनलेली आहे. यशाची ही किल्ली बनवावी लागते, ज्यांनी ही किल्ली बनवली त्यांना यश फार दूर नसते. आणि ते मिळवतातच.
एक टक्का लोकांमध्ये आणि 99 टक्के लोकांमध्ये असलेल्या अभाव आणि प्रभावाच्या या अंतराला भरून काढण्यासाठी जी ईच्छाशक्ती, स्वयंशिस्त, मेहणत लागते तीच यश आणि अपयश यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी पुरेशी असते. परंतू सर्वांमध्ये त्या गोष्टी समप्रमाणात नसतात. काही चांगल्या गोष्टी, सवयी, विचार, जाणीवपूर्वक अंगिकाराव्या लागतात, काही वाईट गोष्टी, सवयी, विचार हेतूपूर्वक काढून टाकाव्या लागतात. हे सर्वांना जमत नाही असेही नाही त्यासाठीच तर आज आपण स्वयंशिस्तीवरील या पुस्तकाचे सारांश बघणार आहोत.
विचार बदला आयुष्य बदला, ईट दॅट फ्रॉग, गोल्स या जागतिकस्तरावर गाजलेली लोकप्रिय पुस्तकांचे लेखक ब्रायन ट्रेसी आहेत. चला तर मग सुरू करूया पुस्तकाचे सारांशः
ब्रायन ट्रेसी आज एक यशस्वी व्यक्ती आहेत. परंतू हे यश त्यांना एका रात्रीत किंवा एका दिवसात मिळालेले नाही. ब्रायन एक अर्धवट शाळा सोडलेले व्यक्ती आहेत. त्यांना त्यांच्या सुरूवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता.
काही कारणांमुळे शिक्षण पूर्ण न केल्यामुळे त्यांना योग्य नोकरी मिळत नव्हती. तरी कसे-बसे त्यांना एक नोकरी मिळाली होती. अशी नोकरी जी खूपच वेळखावू, थकवणारी, मेहणत-श्रम करून घेणारी जिथं त्यांना सकाळी पाच वाजता उठावं लागे, कार्यालयात जाण्यासाठी वेगवेगळ्या बसमधून प्रवास करावा लागे, मग कुठे ते पोहोचत होते.
तेवढ्याच मेहनतीने ते कार्यालयात संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करत होते आणि हीच गोष्ट ते दररोज, पुन्हा-पुन्हा करत होते संपूर्ण महिनाभर सातत्याने.
परंतू एवढी मेहनत करूनही त्यांच्याकडे फक्त तेवढेच पैसे हाताला येत ज्यावर त्यांचा पोटा-पाण्याचा प्रश्न मिटत असे, आणि तेही एका छोट्याशा घरात. असंच काम कित्येक महिने केल्याने ते खूपच थकून गेले होते. मग त्यांना असे जाणवले की, ''नाही मला असे जीवन नकोय'', मला कसंही करून माझे जीवन बदलावेच लागेल.''
आणि त्यांना हेसुद्धा माहित होते की असं करण्यासाठी त्यांची मदत करण्यासाठी कोणीही येणार नाही. आणि म्हणूनच हे काम त्यांना स्वतःलाच करावे लागणार. यामुळेच मग त्यांना स्वतःमध्ये एक अशी गोष्ट केली की ज्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले.
एक महान विक्रेता, व्यवस्थापक आणि कोट्यावधींचा व्यवसाय करून एक यशस्वी व्यावसायिक, समुपदेशक, प्रेरणादायी वक्ता, असा प्रवास त्यांनी केला आणि कोट्यावधी पैसा कमावला आणि स्वतःची खूप भरभराट केली.
आता हे सगळं शक्य झालं ती गोष्ट नेमकी काय होती ती आपण पुढे पाहणारच आहोत. परंतू ती एक गोष्ट ज्या सवयीमुळे त्यांच्यामध्ये आली ती म्हणजे पुस्तक वाचण्याच्या सवयींमुळे.
कारण ज्या दिवशी त्यांनी हे ठरवलं की, ते स्वतःचे जीवन बदलतील. त्याच दिवसापासून त्यांनी स्वतःच्या जीवनाला बदलण्याची जबाबदारी घेतली, आणि खूपसा-या स्वयंमदत, स्वयंसुधार, स्वयंप्रेरणा देणारी, स्वयंविश्वास, उद्योग-व्यवसायासंबंधित, लोकव्यवहार, जनसंपर्क इत्यादी विषयांवरील पुस्तकं वाचायला सुरूवात केली.
वरील विषयांवर, त्या-त्या क्षेत्राशी संबंधित कित्येक पुस्तकं त्यांनी वाचून काढली. आणि खरोखरच हीच ती सवय होती ज्यामुळे ब्रायन ट्रेसी यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. आणि आज आपण ब्रायन ट्रेसी यांच्यासारखीच आयुष्य बदलणारी सवय तुमच्यामध्येसुद्धा रूजवण्यासाठी त्यांच्याच पुस्तकातील काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वाचकमित्रांनो, तुम्हीदेखिल ह्या पुस्तकातील गोष्टी तुमच्या जीवनात आत्मसात केल्यास नक्कीच ब्रायन ट्रेसीसारखं तुमचं आयुष्यदेखिल बदलून जाईल.
I will do it One day
I will do it Someday
SUNDAY
MONDAY
TUESDAY
WEDNESDAY
THURSDAY
FRIDAY
SATURDAY
Seven Days in a Week but there is no
SOMEDAY.!
SOMEDAY.!
कधीतरी नावाचे द्विप (someday Island -सम डे आयलॅंड )
जर तुम्ही मोठ-मोठी स्वप्नं पाहणा-या 100 लोकांशी विचाराल की केेव्हा तुम्ही तुमच्या त्या मोठ-मोठ्या स्वप्नांवर काम कराला, स्वप्नांना प्रत्यक्षात, वास्तवात आणण्यासाठी कधी सुरू कराल, तुमची स्वप्नं कधी पूर्ण कराल? तर जवळपास 80% लोकं हेच म्हणतीलः
- एक दिवस तर नक्कीच करीन.
- परीक्षेनंतर करीन.
- सुट्या झाल्यानंतर करीन किंवा
- या रविवार नंतर स्वप्नांवर काम नक्कीच करीन
- इत्यादी, इत्यादी आणि
- खरं तर हेच आहे की, तो एक दिवस कधीच येत नाही.
![]() |
आठवड्यात कधीतरी हा दिवसच नसतो..! |
कारण त्या 80 टक्के लोकांना एक आजार आहे ज्याला लेखकांनी नाव दिले आहेः ''एक्सक्यूजायटिस'' (Excusitis) किंवा कोणतंही निमित्त देऊन, कारण देऊन आपल्या स्वप्नांवर काम न करण्याचा आजार. आता या आजारावर मात करून जी लोकं पुढे येतात त्यांना म्हणतात "विजय" (winners) तर ज्यांना हा आजार हरवतो त्यांना म्हणतात "पराजय" (losers).
तर सर्वात पहिलं काम तुम्हाला करायचंय ते म्हणजे एक अर्ज भरा, तिकिट काढा आणि या एक्सक्यूजायटिस आजाराने पिडीत द्विपावरून उड्डान भरून बाहेर पडा. सबबी पुढं करण्यापेक्षा, कारणं समोर करण्यापेक्षा काहीतरी कृती करा.
कदाचित तुमच्या मनात असेही येत असेल की,
- नाही, नाही, माझी कारणं खरी आहेत,
- माझ्या सबबी खोट्या नाहीत,
- मी टाळाटाळ करत नाही,
- खरं तर माझ्याकडे वेळंच नाहये,
- पैसाच नाहीये,
- आमकं नाही, तमकं नाही,
- असं नाही तसं नाही,
- हे, नाही, ते नाही
तर आता स्वतःला एक प्रश्न विचारा, आणि मनातून विचारा... कित्येक लोकांना असं वाटत असतं की ते जीवनात पुढे जात नाहीयेत, कारण?
- त्यांचं लहानपण खूपच संघर्षपूर्ण होतं,
- दिवसभर कामामुळे त्यांना व्यायाम करायला वेळच उरत नाही,
- ते एखादं यशस्वी उद्योग-व्यवसाय उभा करू शकत नाहीत कारण
- त्यांचे चांगले संबंध नाहीत,
- चांगल्या ओळखी नाहीत,
- हातात पैसा नाहीये
परंतू, एकदा स्वतःच्या मनाला विचारा, काय खरोखरच हेच कारण आहे? काय खरोखरंच एकही व्यक्ती असा नाही ज्याने तुमच्यासारख्याच समस्यांचा सामना केला असेल जीवनात, जे स्वतः तुमच्यापेक्षाही जास्त व्यस्त राहतात, तरीही व्यायाम करतात, स्वतःचे चांगले संबंध नसतानाही, पैसा नसतानाही, चांगल्या ओळखी नसतानाही ज्याने यशस्वी व्यवसाय उभारला आहे आणि तो खूपच यशस्वी ठरला आहे.
जर तुम्ही प्रामाणिकपणे पाहाल आणि विचार कराल तर तुम्हाला जगामध्ये असे कित्येक व्यक्ती मिळतील ज्यांच्या समस्या, संघर्ष तुमच्याएवढंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त होतं. आणि त्यावरूनही त्यांनी संर्घातून वर आले आणि जीवनात यशस्वी झालेले आहेत. तर त्यांनी ते कसं शक्य करून दाखवलं? ते असं करू शकले कारण, त्यांनी परिस्थितीला दोष देण्याऐवजी, समस्या-संघर्षांच्या सबबी पुढं करण्याऐवजी, कारणं देण्याऐवजी त्या कारणांशी दोन हात केले, लढले, आणि आपली स्वप्नं प्रयत्नपूर्वक मिळविली.
प्रतिकूल परिस्थिती असतानाही, समस्या असतानाही जर ते यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही का नाही करू शकत? यासाठीच तुम्हाला जीवनात काहीही मिळवायचं असेल तर क्रमांक 1 च्या ''कारणेद्या'' या वाईट सवयीला आपल्यातून काढून टाका.
किमान प्रतिकाराचा नियम (Law of least resistance)
जर जास्तीत-जास्त लोकांच्या समोर दोन मार्ग ठेवले जातील, एक मार्ग पुस्तकं वाचन करण्याचा, स्वतःला, स्वतःच्या जीवनाला सुधारण्याचा कठीण मार्ग आणि दुसरा सोपा मार्ग, मित्रांसोबत बाहेर फिरणे, खाणे-पिने-मजा करणे, गेम खेळत बसणे दिवसभर, मोबाईलवर समाजमाध्यमांवर कित्येक तास घालवणे, इत्यादी.
अधिकतर लोकं पहिल्या मार्गाचा विचार करतील परंतू निवडणार नाहीत. ते दुसरा सोपा मार्ग निवडतील.
इथे तुमचा मेंदूसुद्धा तुम्हाला दुसराच सोपा मार्ग निवडण्यासाठी उद्युक्त करण्याची जास्त शक्यता आहे. मग भलेही तुम्ही कितीही चांगल्यारितीने समजत असाल, जाणून असाल, करत असाल की कठीण मार्गच तुम्हाला यश मिळवून देवू शकतो तरीही तुम्ही सोपा मार्गच निवडणार, आणि हीच सर्वात मोठी समस्या असते. आणि याच्याशी लढाण्याची एक उत्तम पद्धत जी ब्रायन ट्रेसी यांनी आपल्यात रूजविली होती, ती म्हणजे , स्वयंशिस्त.
स्वयंशितस्त (self discipline) म्हणजे ती कामं करणं जी तुम्हाला करायला पाहिजे. मग भलेही ते करण्यासाठी तुमचे मन असू द्या किंवा नको. आणि हाच गुण (characteristics) सर्वात महत्वाचा गुण असतो जो नेहमीच यशस्वी लोकांमध्ये पाहायला मिळत असतो जो तुम्हालाही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरवायला पाहिजे, स्वयंशिस्तीची चांगली सवय बाणवायला पाहिजे, अंगिकारायला पाहिजे, रूजवायला पाहजे. कारण अधिकांश अयशस्वी लोकांमध्ये ही सवय नसते.
लेखक ब्रायन ट्रेसी याच गोष्टीला 21 विविध मार्गांनी या पुस्तकाद्वारे समजावून सांगत आहेत, त्यापैकी काही आपण इथे पाहणार आहोत.
परंतू
त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, की यशापर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्ट
कदाचित खराब होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही ती वापरू शकनार नाही. परंतू
लक्षात ठेवा, यशापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पाय-या नेहमीच तयार असतात. गरज आहे फक्त त्या पाय-यांवर एक-एक करून वर चढत जाण्याची.
There Is No Lift to Success, You Have to Take the Stairs
स्वयंशिस्त आणि यश (Self Discipline and Scuccess)
एच.आय.हंट हे एक कच्च्या तेलाचे उद्योगपती आहेत, ते असं म्हणतात की, यशाच्या फक्त तीनच आवश्यकता असतातः
- ठरवणे (Decide)- नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते ठरवणे
- परत देणे (Give in Return)- मग हे ठरवा की तुम्हाला जे पाहिजे मिळवण्यासाठी तुम्ही काय काय देवू शकता, काय किंमत देवू शकता, काय त्याग करू शकता, आणि तीसरा,
- प्रत्यक्ष देणे (Paying the Price you Decided) ठरवलेलं करणे तुम्ही जी काही किंमत देण्याचे ठरवता, जो त्याग ठरवता, ती किंमत, तो त्याग प्रत्यक्षात त्याग करा,
यासाठीच मग ते त्या जापानी दंतवैद्याजवळ, डॉक्टर गेले आणि तिथे जावून त्या युक्त्या-क्लृप्त्या, पद्धती, तंत्रकौशल्यं एकेक करून शिकायला सुरूवात केली. ते तिथे खूप दिवस थांबले आणि ब-याचश्या नव-पद्धती, तंत्रकौशल्यं शिकून आत्मसात केल्या आणि मग ते परत जेव्हा अमेरिकेला आले आणि त्या शिकलेल्या जापानी पद्धतींना वापरायला सूरुवात केली. ज्यामुळे अल्पावधीतच ते बघता-बघता खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले. संपूर्ण देशामध्ये त्यांचे नाव व्हायला लागले. त्यांच्या शिकलेल्या नव्या पद्धतीमुळे.
आणि तुम्हीसुद्घा असेच करू शकता. तज्ज्ञांकडे जाणे तर सोडाच बहुतांश लोकं नवीन गोष्टी शिकतच नाहीत. परंतू तुम्हाल असे करायला नाही पाहिजे.
स्वयंशिस्त आणि चरित्र (self discipline and character)
स्वयंशिस्त आपल्या जीवनात आणण्यासाठी जी एक गोष्ट तुम्हाला खूप मदत करेल ती गोष्ट आहे तुमचं चरित्र (Character), जे बनतं तुमच्या व्यक्तीमत्वामुळे (Personality) तुमच्या व्यक्तीमत्वाचे समजा तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे स्वयंजाणीव (Self Idea) दुसरा स्वयं प्रतिमा (Self Image) आणि तिसरा स्वयंआदर (Self Esteem). आता एकेक करून आपण या गोष्टींना पाहुया.
व्यक्तीमत्वाचे तीन भागः (three parts of personality)
- स्वयंजाणीव (Self Idea)
- स्वयं प्रतिमा (Self Image)
- स्वयंआदर (Self Esteem)
स्वयं जाणीव
स्वयं जाणीव आपल्या मेंदूचा तो भाग असतो, जिथे तुमची मूल्यं, तुमचे आदर्श, तुमची ध्येयं आणि तुमची प्रेरणा, आकांक्षा, स्फर्तीस्थान इत्यादी तिथे असतात. आपण असे म्हणून शकतो की, इथे तुम्ही असे एक आदर्श व्यक्ती बनू पाहता जो तुमच्या हिशोबाने उत्तम असेल.
यशस्वी लोकांमध्ये असं पाहण्यात आलं की, त्यांचा जो स्वयंआदर्श (self ideal) असतो म्हणजेच जसा व्यक्ती त्यांना सवतःला बनायचं आहे तो एकदम स्पष्ट असतो. तर या उलट अशस्वी लोकांमध्ये त्यांचा स्वयंआदर्श स्पष्ट नसतो.
स्वयंप्रतिमा (Self Image)
तुमची स्वयंप्रतिमा एका आरशासारखी असते. ज्यामध्ये तुम्ही स्वतः स्वतःला पाहत असता की नेमकं तुम्ही कसे आहात. चांगले, वाईट, आत्मविश्वासाने भरलेेले, भयभीत, घाबरलेले, सकारात्मक, नकारात्मक जे काही असाल ते दिसत असता.
सर्वसाधारणपणे यशस्वी लोकांमध्ये शांत, प्रामाणिक, सकारात्मक अशी स्वयंप्रतिमा असते. तुम्हालाही तुमच्या स्वयंप्रतिमेमध्ये तुम्ही स्वतःला शांत, सकारात्मक प्रामाणिक, एक चांगले व्यक्तीसारखे असायला पाहिजे. ज्यामुळे स्वतःला एक शक्तीशाली व्यक्तीसारखे वाटेल. परंतू अधिकतर अयशस्वी लोकांमध्ये असं बघायला मिळत नाही.
स्वयंआदर (Self Esteem)
स्वयंआदर ही मूलभूतरित्या एक अशी भावना असते जी आपल्याला सांगत असते की, तुम्ही स्वतः स्वतःला किती पसंत (love) करता, किवा नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, स्वतःला तुम्ही किती मौल्यवान-महत्वाचे समजता या गोष्टी स्वयंआदर या भागात येतात.
जर तुम्ही स्वतःला प्रेम करता, पसंत करता तर, साहजिकच तुमचा स्वयंआदरदेखिल जास्त, असेल. तर या विरूद्ध जर तुम्ही स्वतःला पसंत करत नसाल तर तुमचा स्वयंआदरदेखिल कमी असेल. आणि महत्वाची समजण्याची बाब ही आहे की, जेवढं तुम्ही सकारात्मक (positive) राहाल तेवढंच तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही पसंत कराल. ज्यामुळे इतरजणही तुम्हाला पसंत करतील. आणि असेच हे चक्र चालत राहील. आणि, जर याच्या उलट झालं तर हे चक्रदेखिल उलट, विरूद्ध होईल.
कमी स्वयंआदर (न्यूनगंड) असेल तर (low self esteem) परिणामही वाईट पाहायला मिळतील. यामुळे उच्च स्वयंआदर (High Self Esteem) असणे गरजेचे आहे. आणि अधिकांश लोकांमध्ये ती नसते.
👉अधिक वाचाः आयुष्यात यश-अपयशाची तीन मुख्य कारणं
- न्यूनगंड
- भयगंड
- अहंगंड
तुमचे व्यक्तीमत्व कसेही का असेना आतापर्यंत, ते बनेलं आहे तुमच्या निवडीमुळे, कारण आपण मणुष्य एक निवड करणारे जीव आहोत. दररोज सकाळी उठल्यापासून आपण खूपसा-या निवडी करत असतो. एवढंच नाही तर ह्या सारांशाला इथपर्यंत वाचणे असूद्या किंवा हे वाचण सोडून इतर काही सूचना-संदेश, चलचित्र इत्यादीकडे न जाण्याची निवड ही तुमची स्वतःचीच आहे. ही तुमचीच निवड होती. आहे. ज्यामुहे तुम्ही आज काही चांगल्या गोष्टी शिकत आहात.
तर जेव्हाही तुम्ही अशा निवडी करता, जो तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी देतो, कठीण गोष्टींना निवड करण्याची मौलीक मदत करतो, काहीतरी मौल्यवान ज्ञान देतं. फालतूच्या, अनावश्यक, अल्पकालीन गोष्टी सोडून ह्या निवडी ज्यामुळे आपण अवघड गोष्टही करण्याचे विचार करत असतो.
टी.व्ही. पाहत बसण्याऐवजी, समाजमाध्यमांवर तासन-तास रेंगाळत बसण्याऐवजी, पुस्तकाचे सारांश वाचन करून काहीतरी शिकत आहात, स्वतःमध्ये सुधारणा, स्वयंविकास करत आहात. अशाच जेव्हा तुम्ही उत्तम निवडी करत असता तेव्हा त्या सर्व गोष्टी तुमची स्वयंआदराची भावना वाढवतात.
तुम्ही स्वतःला अधिक पसंत करायला लागता, इतरजण तुम्हाला पसंत करतात, जे मग तुम्हालाही अप्रत्यक्षरित्या मोठ-मोठी कामं करायला मदत करत असतात.
यासाठीच इतरांपेक्षा वेगळ्या निवडी तुम्ही सातत्याने, नेहमीच घ्याल, छोट्या-मोठ्या निवडी ज्यामुळे तुमचं स्वयंआदर वाढवेल. ज्यामुळे तुमची स्वयंशिस्तही आपोआपच वाढेल.
स्वयंशिस्त आणि काम (Self Discipline and Work)
जगातील काही शिर्षस्थानाच्या कार्यकारी अधिका-यांवर एक शोधाभ्यास करण्यात आला होता, त्यामधून असे समजले की, शिर्षस्थानाच्या अधिका-याकडे दोन महत्वपूर्ण गुण असतात. एक त्यांच्या प्राथमिकता ठरवण्याचा गुण, अशी कामं करण्याची जी मौल्यवान असतात आणि दुसरा गुण असतो त्यांची स्वयंशिस्त (Discipline) जो त्यांनी प्राथमिकता देवुन निवडलेल्या कामाला लवकरात लवकर संपविण्याचा गुण.
अशाच एका अभ्यासाअंती असे कळाले की, सर्वसाधारण कर्मचारी आणि इतर लोकं आपल्या एकूण वेळेच्या 50% वेळ वाया घालवत असतात, अनावश्यक, फालतूच्या गोष्टींवर जसे, कार्यालयातील गप्पा-गोष्टी, अनावश्यक चर्चा, अंतरजालावर उगाच फिरणे, काम सोडून इरत गोष्टी शोधत बसणे, कामाच्या ठिकाणावर समाजमाध्यमांवर सूचना-संदेशांची देवानघेवान करणे, चहा-कॉफी पीणे इत्यादी.
म्हणूनच ब्रायन ट्रेसी आपल्याला इथे सांगतात की, आपल्याला आपल्या आवश्यक, गरजेच्या कामांना आणि अनावश्यक कामांना वेगवेळे ठेवायला पाहिजे. आणि इथे तुम्ही परेटो तत्वाचा, 80/20 चा नियमाचा वापर करू शकता. जे तुम्हाला माहितीच असेल. नसेल तर खाली दिलेल्या दुव्यावरून अवश्यक सारांश वाचा.
आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तीनचा नियम (Law of Three) खूप मदत करेल. हा नियम असं सांगतो की, तुम्हाला तुमच्या पूर्ण करण्याची इच्छा आहे अशा त्या सर्व महत्वाच्या कामांची यादी बनवायला पाहिजे. पुढील एका आठवड्याची यादी, पुढील एका महिण्याची यादी अशाच पद्धतीने दिवसाची सुद्धा यादी बनवायला पहिजे. आणि या सर्व यादीपैकी सर्वात महत्वाच्या आणि गरजेच्या शिर्ष तीन कामांना प्राथमिकता द्या. या तीन शिर्ष तीन कामं अशी असतील जी तुम्हाला तुमचं ध्येयं पुर्ण करण्यासाठी अधिक मौलिक मदत करतील, किंवा तुमच्या संस्थेला, कंपनीला पुढे नेण्यासाठी यादीतील वरील तीन गोष्टीना प्राध्यान्य द्या. आणि लक्षात ठेवा हे करणं सोपं काम नक्कीच नाही.
कारण, त्या कामांनापण निवडणं एक कौशल्यच आहे, प्रतिभाच आहे जे तुम्हाला ते करता-करताच अनुभवास येईल. यासाठीच असं करायला लवकरात-लवकर सुरू करा. आणिलक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही सुरू कराल, तेव्हा तुमच्याजवळ खूप लोकं येऊ शकतात, एखादे काम घेऊन, विनंती घेऊन जे स्वतःच वेळ वाया घालवणारे असताता. यासाठीच अशा लोकांना तुम्हाला नाही म्हाणायला आलं पाहिजे. (Saying No is a ART). यामुळे तुमची स्वयंशिस्त अधिकच वाढण्यास मदत होईल.
तुम्हाला सातत्याने इतर विचलानांसोबत, (distractions) लढावं लागेल. तुमच्या प्राथमिकता दिलेल्या कामाला संपविण्यासाठी अशा अडथळ्यांवर मात करायला शिकावं लागेल. तुमचा फोन, इंटरनेट, समाजमाध्यमं, मित्र, या सर्वांना तुम्हाला नाही म्हणायला आलं पाहिजे.
यावरही लेखकांनी तुमच्या स्वयंशिस्तीत वाढ करेल असे अजून एक तीनचे सूत्र सांगितलेलं आहे.
त्रिसूत्री
- इतरांपेक्षा कामावर लवकर या
- इतरांपेक्षा थोडं जास्त मेहणत करा
- इतरांपेक्षा शेवटी कामावर उशीरापर्यंत थांबा
कारण बहुतांश लोकं ही कामं करणार नाही, आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच लवकर पुढे जाल. तुमची स्वयंशिस्त वाढेल, आणि तुम्ही अयशस्वी लोकांपेक्षा एक यशस्वी व्यक्ती नक्कीच बनाल.
इतर संबंधितः
👉स्वतः ब्रायन यांच्या शब्दात स्वयंशिस्तीच्या शक्तीबद्दल जाणून घ्या.!
इतर संबंधितः
- विचार बदला आयुष्य बदला,
- ईट दॅट फ्रॉग
- गोल्स
- स्वयंशिस्तीची शक्ती व महत्व
- मिलियन डॉलर हॅबिट्स
- यशप्राप्तीचे शिखर
Other Related:
- WRITE it DOWN Make it Happen
- SMART GOALS- Complete Guide to Goal Setting
- HOW TO SET GOAL -Warren Buffet Way
- DO IT TODAY-
- POMODORO Technique
- MINDMAPING for Clarity
- EAT THAT FROG
- NO EXCUSES
- Get It Done Now -गेट इट डन नाऊ
- START WITH WHY by Simon Sinek
- Find Your WHY by Simon Sinek
- IKIGAI -Find Your Passion
- So Good they Cant Ignore You- Don't Find Your Passion.!
टिप्पण्या