डू इट टुडे -डेरीअस फॉरॉक्स -(मराठी) | Do It Today by Darius Foroux | Book Summary in Marathi -सारांश भाग -१

सबबी, टाळाटाळ या सवयींवर मात करा, उत्पादकता व कार्यक्षमता सुधारा आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टी साध्य करा.  Productivity  वर लिहिल्या गेलेली एक अप्रतिम पुस्तक

आजची कामं आजच करा
डू इट टुडे

डेरीअस फॉरॉक्स

पुस्तक सारांश मराठी
भाग -१


 Do It Today: Overcome Procrastination, Improve Productivity, and Achieve More Meaningful Things
by Darius Foroux

Book Summary in Marathi  

सारांश भाग -१

सबबी, टाळाटाळ या सवयींवर मात करा, उत्पादकता व कार्यक्षमता सुधारा आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टी साध्य करा.  Productivity  वर लिहिल्या गेलेली एक अप्रतिम पुस्तक -डू इट टुडे आणि डेरीअस फॉरॉक्स लेखक आहेत.  

#BOOKSHORT | डू इट टुडे या पुस्तकात तुम्ही शिकाल:

  • आपण गोष्टींना का टाळत असतो?
  • आणि आपण यातून बाहेर कसे येऊ शकतो?
  • टाळाटाळ करणे कसे सोडू शकतो?
  • ताण तणाव न घेताही आपली उत्पादकता-कार्यक्षमता (Productivity-Efficiency) कशी वाढवू शकतो?
  • आणि आपल्या आयुष्यात अधिक अर्थपूर्ण गोष्टी कशा मिळवाव्यात? ज्यामुळे त्यांचा अधिक आनंद घेऊ शकू?
  • या पुस्तकात हेही शिकणार आहोत कि टाळाटाळ करण्याच्या सवयीला कशी मात द्यावी?
  • अनुत्पादक-अकार्यक्षम लोकांच्या कोणत्या सवयी असतात?
  • आपले लक्ष केंद्रित करणे (Focus) कसे वाढवावे?
  • अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अधिक (productivity & efficiency) उत्पादनक्षमता-कार्यक्षम-कार्यकुशल बनवतात?
  • आणि तुम्ही एका वर्षात १०० पुस्तकं कसे वाचू शकता?


पुस्तकातील नऊ भागात तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे:

1. What Author do when he can’t focus 

2. How to beat procrastination 

3. The Habits of Unproductive People  

4. How To Focus Better 

 5. Take A Vacation 

6. Eliminate Mindless Browsing 

7. 20 Things Will Make You Productive  

8. You Need A Break 

9. How To Read 100 Books A Year

 

  • नियम बनवणे
    Make rules
  • अति विचार न करणे
    Don't think too much.
  • विचलित करणाऱ्या गोष्टी-संदेश, सूचना तपासणे बंद करणे
    Eliminate check notification.
  • अनावश्यक गोष्टींना-व्यक्तींना "नाही" म्हणणे शिकणे
    Learn to say NO for unnecessary things.
  • दैनंदिनी लिहिण्याची सवय लावणे
    Do Journaling.
  • नियमांचे अनुसरण करणे, शिस्त लावणे
    Follow your rules.
  • तुमची वेळ नाही तर, तुमचे हेतू व्यवस्थापन करा
    Manage your intentions not your time.
  • स्वतःला रिचार्ज करण्यासाठी उसंत घ्या, सुट्टी घ्या, बाहेर फिरायला जा
    Go on Vacation to recharge yourself.
  • सामाजिक माध्यमांवर न संपणारी यादी स्क्रोलिंग बंद करा
    Eliminate endless browsing.
  • कृतज्ञ बना 
    Be grateful.
  • दैनंदिन ध्येय-उद्दिष्टे ठरवा
    Set a daily goal.
  • पुस्तक वाचक बना
    Be book reader.

या पुस्तकात productivity शी संबंधित जवळपास सर्वच गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि जो कोणी या पुस्तकाला योग्य रीतीने, मन लावून समजून घेईल ती व्यक्ती नक्कीच स्वतःची productivity कित्येक पट वाढवून घेईल. एकदा सुरु केलेले काम पूर्ण करण्यासाठी, संपविण्यासाठी संघर्ष करावा लागतो? फोनवरील संदेश-सूचना व इतर कारणांमुळे तुम्ही कामावर लक्ष देऊ शकत नाही? मन विचलित होत असते? कामामध्ये तुम्हाला नेहमीच काही ना काही व्यत्यय, अडथळा येत असतो? 

जसे उदाहरणार्थ, 

एखादी व्यक्ती, एखादी बैठक, एखादे कॉल, एखादे मेसेज, एखादे नोटिफिकेशन किंवा एखादी बातमी- news.  नक्कीच यासर्व गोष्टींना तुम्ही दोष देऊ शकता, परंतु हे बरोबर नाही.  कारण बाह्य जगाला आपण थांबवू शकत नाही, पण, स्वतःला तर आपण त्यांपासून बचाव करू शकतो.  तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत, अस्थिर करू शकत नाहीत.  

तुम्ही जेव्हाही फोकस्ड नसता, जेव्हाही तुमचं लक्ष केंद्रित होत नसते, तेंव्हा नक्कीच तुम्ही इतर कोणाला, किंवा गोष्टींना तुमच्या डोक्यामध्ये जाण्याची परवानगी देत असता.

अशा पद्धतीने लेखकांनी व्यत्यय-अडथळा (interruption) काय आहे हे समजावून सांगितलं आहे. मग तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठी, फोकस improve करण्यासाठी काय करू शकता? लेखक इथे दोन गोष्टी सांगतात,

  • काढून टाका, Eliminate
  • काढून टाका, Eliminate
  • काढून टाका, Eliminate

1.  काढून टाका, Eliminate, दूर करा: 

दररोज आपण काही ना काही जमा करत असतो. आपण इथे त्या गोष्टीबद्दल बोलत नाहीत ज्या आपण खरेदी करतो त्या गोष्टी नाही तर, आता इथे काढून टाकणे म्हणजे आपण खरेदी केलेल्या गोष्टी काढून टाकणे नाही तर कल्पना (Ideas) आपण दररोज खुपसाऱ्या आयडिया -संकल्पना, विचार, सल्ले, सूचना गोष्टी यांना सामोरे जात असतो. त्यापैकी आपण काही आत्मसात करतो, अंगिकृत करतो, स्वीकारतो, मान्य करतो, संमती देतो, कबूल करतो, विश्वास करतो आपलं बनवून घेतो.  

उदाहरणार्थ, 

लेखकांना जेंव्हा लोकांनी, मित्रांनी, शुभचिंतकांनी असे सांगितले कि तुम्ही चांगलं लिहिता, बोलता मग तुमचे YOUTUBE चॅनेल सुरु करून व्हिडीओ का नाही बनवत.  तुम्हाला व्हिडीओ बनवायला पाहिजे.   

लेखकही त्यांच्या मित्रांना, टीम मेम्बर्सना, सहकाऱ्यांना सल्ला देत होते कि, ते त्यांचे जीवन, कारकीर्द आणि व्यवसायाला कशारितीने सुधारू शकतात.  ही गोष्ट आपण सर्वच करत असतो,  आणि यात काही वाईटही नाहीये.  समस्या तेंव्हाच होते जेंव्हा आपण लोकांकडून मिळणाऱ्या इनपुट (Input) म्हणजेच सल्ले-सूचना-कल्पना यांना फिल्टर (Filter) करत नाही, चाळणी-गाळणी लावत लावत नाही.  

जेंव्हा लेखकांना लोकांनी जेंव्हा असं म्हटलं कि त्यांना YouTube व्हिडिओ बनवायला पाहिजे, तर त्यांनी त्यांची मनात विचार केला कि, मला व्हिडिओ बनवायला पाहिजे, त्यांचा सल्ला ऐकून लेखकांनी व्हिडीओ बनवले आणि त्यांना अपलोड देखील केलं, त्यांना चांगली सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली, व्हिडिओसुद्धा चांगले होते.   

परंतु यात एकच अडचण होती, व्हिडिओ बनविण्यासाठी लेखकांना खूप वेळ आणि लक्ष (attention) द्यावा लागत होता आणि यामुळेच ते त्यांच्या मूळ कामावर म्हणजेच लिहिण्यावर आणि पॉडकास्ट बनविण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते आणि हिच ती नेमकी गोष्ट होती जी लेखकांना करायची मुळातून इच्छा होती. व्हिडिओमुळे त्यांचा फोकस आणि त्यांचे काम दोन्ही मध्ये त्यांना त्रास सहन करावा लागला.

मग त्यांनी स्वतःशीच एक प्रश्न विचारला कि, कोणती गोष्ट मला काढून टाकायला पाहिजे? की ज्यामुळे माझे जीवन सोपं होईल आणि लक्ष केंद्रित करणे सहज होईल. या बाबतीत त्यांनी YouTube वर लक्ष केंद्रित करणं बंद केलं. 

एलिमिनेशन म्हणजेच काढून टाकणे हे एक महत्वाचे धोरण (Key Strategy) आहे, आवश्यक कौशल्य आहे ज्याला लेखक त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू व क्षेत्रात वापरतात.  आपण इतक्या वर्षात इतक्या अनावश्यक गोष्टींना जमा करून घेत असतो कि, आपले मेंदू कल्पना (Ideas), योजना (Projects) यांनी भरून गेलेलं असते.  आणि यांना सातत्याने, वेळेवर साफ करणे गरजेचे आहे. काढून टाकने  जरुरीचे आहे.  

जर तुम्हालाही लक्ष केंद्रित करण्यात अडथळे येत आहेत तर ह्या स्ट्रॅटेजिला नक्कीच उपयोग करून बघा. आपल्या आयुषयाला इतकं साधं (Simple) बनवून घ्या कि, तुमच्यासाठी जीवन जगणे खूप सोपं (Easy) होऊन जाईल. 

 

2.  अगोदरच्या यशाचा विचार करणे

दुसरी गोष्ट जी लेखक करतात ती म्हणजे, "Think about the success of first" अगोदरच्या यशाचा विचार करणे.  मागे मिळवलेले यश आणि आनंदाचे क्षण यांबद्दल विचार केल्याने आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन या हॉर्मोन चे प्रमाण वाढते. आपल्या पेशी तयार करणारे सेरोटोनिन एक रासायनिक मज्जातंतू (Chemical Nerve) आहे.  

सेरोटोनिन नैराश्य (depression) कमी करण्यामध्ये, मूड स्थिर करण्यासाठी, झोपेला नियंत्रित करण्यात, आणि चिंत, काळजी (anxiety)  यांना कमी करण्यास मदत करतो. सेरोटोनिनचे आपल्या सामान्य आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठी भूमिका असते. ह्या हॉर्मोनमुळे (delayed gratification regulate) नियमन होते. म्हणजेच लगेच मिळणाऱ्या अल्पावधीच्या समाधानासाठी पुढील दीर्घकालीन फायद्यासाठी सुद्धा हाच जबाबदार असतो.  यासाठीच सेरोटोनिन आपल्या (फोकस) लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. 

जेंव्हा तुमची सेरोटोनिन ची गतिविधी कमी होते तेंव्हा त्यामुळे दीर्घकाळात लक्ष केंद्रित न होण्याची समस्या वर येऊ शकते. जेंव्हा तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करू शकत नसाल किंवा फोकस हरवून बसता तेंव्हा तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन चे प्रमाण कमी झाल्याची दाट शक्यता असते. 

यासाठीच तुम्हाला अल्पकालीन मजेसाठी, आनंदासाठी जसे कि, बाहेर फिरायला जाणे, दारू-सिगारेट पिणे, व्यसन करणे, पॉर्न  बघणे, बाजारात खरेदी करणे, किंवा टीव्ही पाहण्यातच स्वैर आनंद मिळत असेल तर तुमच्या सेरोटोनिन रसायनाची गतिविधी वाढवायला पाहिजे.   अभ्यासात असे आढळून आलेले आहे कि, ह्याच गोष्टी तुम्ही शारीरिक व्यायामानेही (Physical Exercise) मिळवू शकता. 

परंतु हीच गतिविधी तुम्ही एका मानसिक व्यायामानेही (Mental Exercise) करू शकता.  तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे कि तुमच्या भूतकाळातील सकारात्मक भावनांना आठवणे. जेंव्हा सेरोटोनिनचा स्तर शरीरात वाढत तर तेंव्हा तुमचा फोकस सुद्धा वर जातो. लक्ष केंद्रित करण्यास सोपे होते. आणि हीच ती महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला पाहिजे... फोकस.

विज्ञानानुसार टाळंटाळ च्या सवयीला कसे बाहेर काढावे?  

टाळाटाळ करणे आधुनिक सभ्यतेच्या सुरुवातीपासूनच (आधुनिक युगापासूनच) आहे. प्राचीन, ऐतिहासिक व्यक्ती जसे, लिओनार्दो द विंची, पाब्लो पिकासो, बेंजामिन फ्रँकलिन यांसारख्या लोकांनीही सांगितलेलं आहे कि, टाळाटाळ हा परिणामांचा शत्रू आहे. विलंब हा निकालाचा शत्रू आहे. 

टाळाटाळ याची गंमत अशी कि, आपल्या सर्वांनाच हे माहित आहे कि हानिकारक आहे, कोणालाही टाळाटाळ करू वाटते? कोणालाच नाही.  टाळाटाळ करणे लेखकांच्या आयुष्याचीच गोष्ट होती.  विद्यालयात शिकताना लेखक एकदम मस्त असत. मौज-मस्ती-मजा करत होते. आराम करत होते. बाहेर पार्टी करायला जात असत. आणि परीक्षेच्या एक आठवड्या आगोदर ते स्वतःशी म्हणत, "मी सुरुवातीपासूनच अभ्यास करायला का नाही घेतलं? मग ते विचार करत कि, सुरुवातीला तर मी अभ्यास करत नव्हतो, खरे तर, पार्टी आणि मौज मजा करत होतो.  आणि शोधाभ्यास  हेच दाखवतात कि, जेंव्हा तुम्ही टाळाटाळ करता तेंव्हा तुम्हाला अल्पावधीसाठी (शॉर्टटर्म) आनंद वाटत असला परंतु दीर्घ कालावधीत तुम्हाला त्रासच होईल.
 

एक गोष्ट जी सगळ्या टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीमध्ये समान आहे ती म्हणजे, टाळाटाळीला एक बक्षीस आहे.  अमेरिकन सायकॉलॉजी सोसायटी जर्नल मध्ये एक शोध अभ्यास निबंध प्रकाशित करण्यात आला. आणि त्यामध्ये टाळाटाळीची किंमत लिहिलेली होती..! ती किंमत होती, नैराश्य (depression), तर्कहीन वर्तन (irrational belief ), खालावलेला आत्मसन्मान  (low self esteem), काळजी, चिंता (anxiety) आणि ताण-तणाव (stress). 


👉 टाळाटाळीची किंमत:  

  • नैराश्य (depression), 
  • तर्कहीन वर्तन (irrational belief ), 
  • खालावलेला आत्मसन्मान  (low self esteem), 
  • काळजी, चिंता (anxiety) आणि 
  • ताण-तणाव (stress).

टाळाटाळ करणे हे काही निष्पाप वर्तन (innocent behaviour) नसून ते एका "वाईट स्वनियमनाची"  (poor self regulation) निशाणी आहे. अभ्यासक टाळाटाळ करण्याला दारू (alcohol) आणि ड्रग (drug abuse) यांच्या व्यसनासोबत तुलना करतात. स्वनियमन, स्वनियंत्रण आणि इच्छाशक्ती त्या गोष्टी आहेत ज्यांना आपण अवास्तव महत्व देतो.  तर, इच्छाशक्ती, स्वयंशिस्त यावर अवलंबून राहण्यापेक्षा, काम करण्याचं एक सिस्टिम-व्यवस्था बनवून घेणं  कधीही चांगलं.  अनेकजणांना दिनचर्या (routine) आणि व्यवस्था (system) चांगली वाटत नाही. कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असते. परंतु स्वतंत्रता तुमचा शत्रू आहे. तथ्य तर हे आहे कि, तुम्हाला जर गोष्टींना पूर्ण करायचे असेल तर, तुम्हाला नियमांची गरज भासेल.   

👉इथे  काही गोष्टी आहेत ज्या परिणामकारक ठरलेले हे सिद्ध झालेलं आहे,

  • दररोज अर्धा तास व्यायाम करणे,
  • स्वस्थ आहार घेणे
  • विचलनांना काढून टाकणे
  • आत्मप्रेरित होणे 
  • accountability systems, 
  • working in intervals मध्ये काम करणे,  
  • exercising 30 minutes every day, 
  • a healthy diet, 
  • eliminating distractions and most importantly 
  • internal motivation.

जर तुम्ही योग्य उत्पादकतेच्या क्लृप्त्या, योजनांना (productivity tactics) एकत्रित कराल, तर तुम्हाला एक उत्पादक प्रणाली, व्यवस्था मिळेल (productive system).  deadline मुदतीची तारीख तत्परतेला वाव देते, उत्तरदायित्व जबाबदार बनवते, दोन कामांमध्ये अंतर ठेऊन काम केल्यास तुमचा फोकस वाढतो, व्यायाम आणि आहार तुम्हाला अजून जास्त ऊर्जा पुरवतात. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी काढून टाकल्यास मोह कमी होईल.  परंतु कोणतीच व्यवस्था तुमची तोपर्यंत मदत करणार नाही जोपर्यंत तुम्ही आत्मप्रेरित होणार नाही.  (internally motivated). 

लोकं  या गोष्टींना जास्तच किचकट, अति क्लिष्ट (over complicate) करतात. परंतु, हे काही रॉकेट सायन्स नाही तर स्पष्ट शास्त्र-विज्ञान आहे. 

 

३. तुम्हाला नक्कल करू वाटत नसणाऱ्या अनुत्पादक-अकार्यक्षम लोकांच्या सवयी  

the habits of unproductive people you don't want to copy

अनुत्पादक लोकांच्या काही सवयी असतात. जर तुमच्यामध्ये यापैकी काही सवयी असतील तर चिंता करू नका, आपण सर्वचजण कधी कधी अनुत्पादक होतच असतो. परंतु तुमच्यामध्ये खालीदिलेल्या चारपैकी जास्त सवयी असतील तर, ही बदलायची वेळ आहे असं समजा. 


१. Worrying too much खूपच जास्त चिंता करणे

overthinking, अतिविचार करणे:

  • काय होईल जर मी मानसिक-आर्थिक-वैयक्तिकदृष्ट्या कोसळलो, तुटलो?
  • जर माझी नोकरी गेली?
  • जर मला कर्करोग कॅन्सर झालं ?
  • जर विमान कोसळलं?

आपण आपलं डोकं जमिनीत इतकं जास्त दाबून घेतो कि, आपल्याला हे दिसतच नाही, कि, असे विचार करणं म्हणजे स्वत:मध्येच गढून जाणारे, स्वतःच्या विचारातच गुंग असणारे (self absorbed thinking), आत्ममग्न विचार करणे होय. हे फक्त माझ्या.., माझ्या... आणि फक्त माझ्याच विषयी आहे. 

हे सर्व उदाहरण लेखकांच्या जीवनातीलच आहेत. ते "काय होईल जर" (what if) ह्या विचारांच्या खेळाचे राजेच होते. परंतु इथे एक गोष्ट आहे, तुम्ही या क्षणी-एका सेकंदात मारणार नाही, म्हणून, स्वतःमधून वर उठा, चिंता करणे सोडा, आणि काहीतरी कामाचं करा, do something concrete, rigid, productive.

चिंता आणि चिता यामध्ये फार तर एका अनुस्वारच फरक आहे, चिंता चितेसमान असते अशी एक म्हण आहे, त्यामुळे अतिचिंता करून स्वतःला कमकुवत बनविण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी ठोस कामगिरी करा आणि स्वतःला बलवान-बळकट बनवा. 

action causes motivation.  चुकत-शिकत-समजून-उमजून कृती करत राहिल्यास प्रेरणा आपोआपच मिळते, कामात मग्न राहून आपण असे करू शकतो.  

२.   checking things गोष्टींना तपासणे

👦 तुम्ही काय करत होतात?
💁 मी फक्त फेसबुक चेक करत होतो..!

"चेकिंग" किंवा तपासणे हि काही कामाची गोष्ट नाही.  हे एखादे VERB -किर्यापद असू शकते परंतु एक खरी कृती नाही.  (CHECKING IS NOT A REAL ACTION).  जेंव्हा लेखकांनी ब्लॉगिंग सुरु केली, तेंव्हा ते विनाकारणच स्टॅट्स किंवा आज किती जणांनी ब्लॉग पहिला याची आकडेवारी चेक करत असत.  

तेंव्हा त्यांनी स्वतःशीच एक प्रश्न केला कि "हे बघून मला काय मिळेल? त्यांच्या असं लक्षात आलं कि "काहीही नाही." तुम्ही  माहितीला ग्रहण करत राहता. (consume information).  लेखकांना असे फक्त आकडेवारी तपासणे-नोटिफिकेशन चेक करणे कमी करायचं होतं.  यासाठीच त्यांनी फोनमधील सर्वच समाजमाध्यमांची ऍप्प काढून टाकली, deleted social media apps. 


चेकिंग हि के सवय आहे जी तुम्ही पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. फक्त एक किंवा दोन चेक करणाऱ्या गोष्टीच ठेवा. जी तुम्हाला चांगली वाटतात, बाकी सर्व हटवा.  तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मिसिंग होत नाहीत, किंवा नोटिफिकेशन चेक न केल्यास तुम्ही काहीही गमावणार नाही.

३.  Escaping life  आयुष्यपासून दूर पळणे, सुटका करून घेण्यासाठी दूर-दूर जाणे,

काही वर्षांपूर्वी जेव्हाही लेखक चिंतीत होत होते, जेव्हाही त्यांना ताण-तणाव होत असे तेंव्हा ते स्वतःशी असं बोलत होते, "मला ड्रिंक करायला पाहिजे की मला सुट्टीवर जायला पाहिजे?" आणि जेंव्हा त्यांना कामावर किंवा वैयक्तिक नात्यामध्ये जास्तच वाद किंवा समस्या येत होत्या तेंव्हा लेखक स्वतःला असं दिखावा करत होते कि त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत.
मग, काय त्यांनी ह्या समस्यांना सोडवलं असेल? उत्तर आहे, "नाही".  ते फक्त त्यांच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.  

समस्यांपासून दूर पळणे तुम्हाला तुमच्या वाईट चाललेल्या जीवनातून (shitty life) काहीवेळ निवांतपणाचे बळ (stamina) देऊ शकतो. परंतु आपल्याला माहित असतं कि समस्या तोपर्यंत सुटणार नाही जोपर्यंत तुम्ही समस्यांना मुळासकट पकडून दूर फेकून देणार नाही.

४.  Saying Yes होय म्हणणे

अधिकतर लोकं "नाही" म्हणायला घाबरतात.  कदाचित तुम्ही लोकांना वाईट वाटू द्यायचं नसेल, किंवा त्यांना अपमानित करायचं नसेल.  कदाचित तुम्ही "नाही"  हा शब्द त्रासदायक वाटत असेल. ह्या गोष्टी खरोखरच महत्वाची नसतात. महत्वाचं तर हे आहे कि, जर तुम्ही नेहमीच "होय" म्हणत असाल, तर नक्कीच तुम्ही इतर कोणाचे तरी जीवन जगात आहात. याविषयी विचार करा. 

आतमधून आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की हे खरं आहे. जर तुम्ही "होय" म्हणतच राहाल तर तुम्ही तुमची  वेळ सुद्धा नियंत्रित करत नसाल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घ्यायचे असल्यास लक्षावधी गोष्टींना "नाही" म्हणा आणि खूपच जास्त महत्वाच्या गोष्टींना "होय" म्हणा.  

५.  Not writing things Down गोष्टींना न लिहिणे

काय तुम्ही इतके स्मार्ट-हुशार आहोत कि सर्वच गोष्टींना लक्षात ठेऊ शकाल? कारण आम्हाला असे वाटत नाही. आपले विचार, कल्पना आणि कामाच्या गोष्टींना न लिहिणे एक मूर्खपणाची कल्पना आहे.   

कारण जेंव्हा तुम्ही आपल्या स्मरणशक्तीवर विसंबून-अवलंबून राहता तेंव्हा तुम्ही खूप जास्त मेंदूची ऊर्जा-शक्ती वाया घालवत असता. आणि जेंव्हा तुम्ही सर्वच गोष्टींना लिहून काढता तेंव्हा तुम्ही तुमच्या मेंदूच्या शक्तीला त्या गोष्टींसाठी वापरू शकता ज्या अतिशय गरजेच्या आहेत. जसे कि, समस्या समस्या सोडविणे.  

यामुळे तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष देऊ शकाल ज्या तुमच्यासाठी कामाच्या आहेत. आणि तुमच्या जीवनात तुमची मदत करत असता. जर तुम्ही (Journaling) दैनंदिनी लिहित असाल तर उत्तमच.  

६.  Ignoring/Neglecting your Own Personal Education

आपल्या वैयक्तिक स्वयं-शिक्षणाला दुर्लक्षित करणे

असा कोण आहे जो एखादी गोष्ट शिकतो आणि नेहमीसाठी थांबतो? लेखक नेहमीच असा विचार करत असत कि, जेंव्हा तुम्ही विद्यालयातून उत्तीर्ण होता आणि तेंव्हाच शिक्षण संपतं. परंतु नंतर त्यांना खरी गोष्ट कळली कि, जेंव्हा तुम्ही शिकणं थांबवता तेंव्हा आयुष्यदेखील थांबतं.    

 YOUR LIFE STOPS WHEN YOUR LEARNING STOPS.

स्वतःवर गुंतवणूक  करा. नव्या नव्या गोष्टी शिका.  पुस्तकं वाचा. अभ्यासक्रम करा. शैक्षणिक, तुमच्या क्षेत्रातील व्हिडिओ बघा. घरूनच किंवा इतर ठिकाणी जाऊन, कसेही करा पण करा.  शिका.  असं केल्याने तुम्ही अजूनही जास्त PRODUCTIVE कार्यक्षम होऊन जाल.  आणि जीवनात उत्साही राहाल.

७.  Hating Rules नियमांचा द्वेष-आवडत तिरस्कार करणे

अधिकांश लोकांना नियम आवडत नाहीत. जेंव्हा आपण लहान असतो तेंव्हापासूनच याची सुरुवात होते.  "मला ते का करायचं आहे?" why do I have to do? परंतु आपण जेंव्हा मोठे होतो, तेंव्हा आपण नियम पाळत नाही. 

लेखकांचं असं मत होतं की नियम हे व्यर्थ असतात, अशा विचारासाठी आज ते स्वतःला मूर्ख-पागल म्हणून घेतात. परंतु नंतर त्यांना कळून चुकले कि, खरेतर नियम आपल्या आयुष्यातील सर्वांत चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. जेंव्हा productivity ची गोष्ट येते, पहिला नियम आहे, नियंम असणं. 

जर तुम्हाला नियमाविना राहायचं असेल, तर हि तुमची मर्जी आहे. आयुष्य म्हणजे काय एखादे कुस्तीचे मैदान नाही, जिथं नियम असतात. नियम खरंतर आपल्याला समस्या सोडवायला मदत करत असतात. 

#discipline does not takes freedom, it gives you freedom -Shiv Khera

४.  How To Focus Better:  Manage Your Attention (Not Your Time)

लक्ष केंद्रित कसा करावा: वेळेचे नाही तर तुमच्या "लक्ष" चे व्यवस्थापन करा

सरसरीत एका दिवसात विचलित न होता, किती मिनिटं काम  करू शकता?
१० मिनिटं, ३० मिनिटं, कदाचित ५० मिनिटं .

जर तुम्हाला असं वाटत असेल कि हे कमी आहेत तर, फक्त स्वतःच्या आयुष्याचे निरीक्षण करा.  आपल्यातील अधिकांश लोकं १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ विचलित न होता, काम करू शकत नाही, डिस्टर्ब न होता राहू शकत नाही. आपण इतके जास्त जोडलेले आहोत, कि, स्वतःवर आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढणे अशक्य होऊन जातं.  

आपल्यापैकी काही लोकांना दररोज १०० पेक्षा जास्त नोटिफिकेशन -सूचना येत असतात. अधिकतर लोकांचा वेळ आलेल्या नोटिफिकेशन्स चे उत्तर देण्यातच निघून जात असतो.

विचलित होणे, distraction हि एकविसाव्या शतकातील पहिली जागतिक समस्या नाही, डिस्ट्रॅक्शन आयुष्याचा एक भाग आहे. याचा तुमचा स्मार्टफोन, लिंक्डइन फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब किंवा टिंडर यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. हे एक मानवी स्वभाव आहे, आपल्याला कामात व्यस्त राहणे आवडते, बिझी राहणे चांगलं वाटते. 

सॉक्रेटिस, जे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या स्थापना करणाऱ्यांपैकी एक आहेत, त्यांनी २४०० वर्षांपूर्वीच आपल्याला डिस्ट्रॅक्शन बद्दल चेतावणी दिली होती. शेकडो वर्षांपूर्वीच मानवी स्वभावातील ह्या धोक्याची सूचना दिलेली होती. busyness-व्यस्तता हि काही चांगली गोष्ट नाहीये.  कारण व्यस्तता (busyness) आणि विचलित होणे (distraction) एकासोबतच चालत असतात. विचलन distraction सगळीकडेच आहे. 

तर, तुम्हाला तुमच्या वेळेचे व्यवस्थापन करण्यात नाही तर, ताण-तणावाला व्यवस्थापित करण्यात उत्तम व्हावेच लागेल. कारण हीच सर्वात मोठी चूक आहे जी अधिकांश लोकं करत असतात. आपण चुकीनेच असे समजतो कि,  आपण आपल्या वेळेचे व्यवस्थापन करू शकतो. परंतु वेळेला व्यवस्थापित (manage) केलं जाऊ शकत नाही.  जी गोष्ट तुम्ही नियंत्रित करू शकता ती हे तुमचं "लक्ष" (attention). आणि हे लक्षात ठेवा कि, फोकस किंवा लक्ष केंद्रित करणं तुमच्या जीवनाला निर्धारित करत असतो. 


लक्ष केंद्रित नसणं म्हणजे आपल्या लक्षावर नियंत्रण नसणं आणि नियंत्रण नसणं म्हणजे निराशा, विफलता. आणि आपण सर्वांनाच माहित आहे कि, निराशा आपल्याला कुठपर्यंत नेत असते.
तर, आपल्या लक्षावर लक्ष द्या. आपल्या लक्षाला व्यवस्थापित करा, वेळेला नाही.

low focus म्हणजेच आपल्या attention वर no control, आणि no control याचा अर्थ आहे frustration.

यासोबतच तुम्ही इतर पुस्तकं जसे: 

  • मेक टाइम, 
  • वेळेचे व्यवस्थापन, 
  • ईट दॅट फ्रॉग 
यांसारखी पुस्तकं वाचू शकता.

यासोबतच आपण पाहणार आहोत, सुट्टी घेणे आपले ताण-तणाव कसे कमी करू शकते आणि आपली उत्पादकता म्हणजेच productivity मध्ये कशी वाढ होते.  परंतु ते पाहूया या पुस्तकाच्या पुढील भागात.  

 सारांश भाग-२

#BOOKSHORT

Introduction

1. What Author do when he can’t focus 

2. How to beat procrastination 

3. The Habits of Unproductive People  

4. How To Focus Better 

5. Take A Vacation 

6. Eliminate Mindless Browsing 

7. 20 Things Will Make You Productive  

8. You Need A Break 

9. How To Read 100 Books A Year 

Conclusion

 #Productivity #Procrastination #heartset #mindset #skillset #habits
#Do It Today (Marathi) by Darius Foroux | #Book Summary in Marathi 

💡🙏👉विशेष विनंती: 

मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका. 

लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील.  कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.


ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.  


www.evachnalay.in

👉Also Read: 

 

तर वाचक मित्रांनो ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember


www.evachnalay.in

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive