डू इट टुडे -डेरीअस फॉरॉक्स -(मराठी) | Do It Today by Darius Foroux | Book Summary in Marathi -सारांश भाग -2

सबबी, टाळाटाळ या सवयींवर मात करा, उत्पादकता व कार्यक्षमता सुधारा आणि अधिक अर्थपूर्ण गोष्टी साध्य करा.  Productivity  वर लिहिल्या गेलेली एक अप्रतिम पुस्तक

आजची कामं आजच करा
डू इट टुडे

डेरीअस फॉरॉक्स

पुस्तक सारांश मराठी
भाग -2

Do It Today
by Darius Foroux
Book Summary in Marathi

Part-2

👉 to read part-1 

 💡सूचना: 📖📗📘📙

या पुस्तकाच्या सारांश भाग-१ मध्ये आपण 9 पैकी 4 नियम पहिले आहेत, उर्वरित नियम भाग-२ मध्ये पाहूया.  वाचकांना विनंती आहे कि या पुस्तकातील गाभा समजून घेण्यासाठी कृपया सारांश भाग-१ अगोदर वाचा.

👉भाग-1 वाचण्यासाठी इथे जा
📖📗📘📙

👇पुस्तकाचा पुढील उर्वरित सारांश
भाग-२

5.  सुट्टी घ्या:  सुट्टी घेणे तुमच्या उत्पादकतेला (productivity) वाढवतं  आणि तणाव कमी करतं. Take a Vacation it boosts your productivity and reduces stress.

जेंव्हा तुमच्या फोनची बॅटरी कमी होऊन जाते तेंव्हा तुमची तुमच्या फोनला रिचार्ज करता. परंतु कधी कधी तुमची तुमच्या सर्वांत महत्वाची गोष्ट  (precious possession) म्हणजेच तुमच्या शरीराला रिचार्ज करणे विसरून जाता. सकाळी उठणं आणि या जगात जगणं खूपच कठीण काम आहे. मग, एखादी सुट्टी घेऊन आपण हेच जगणं अधिकच कठीण का करून घेतो? 

लेखक त्या सुट्ट्यांविषयी बोलत नाहीत जिथं तुम्हीच स्वतःला रिचार्ज करण्यापेक्षा कामंच करत असता, खरे तर, इथं त्या सुटयांविषयी बोलत आहेत जे कि एका विशिष्ट कारणासाठी घेतलेल्या आहेत. आणि ते कारण आहे, "स्वतःच्या बॅटरीला रिचार्ज करणे."  ज्यामुळे तुम्ही जोमाने, उत्साहाने, मेहनतीने काम करू शकाल.

अभ्यासातून असे कळले आहे कि, एक सुट्टी, अतिताण-तणाव आणि चिंत-नैराश्याची भावना, (बर्नआउटला) कमी करण्यास मदत करते. सुट्टी.  आजचे धकाधकीचे जीवन, वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचे वाढते ओझे, सोबतच कामातील अपेक्षांचे वाढते दबाव, व्यस्तता, स्वतःकडे दुर्लक्ष करणे आपल्याला मानसिक-शारीरिक थकवा आणतो, तणावग्रस्त करतो. 
यासाठी सुट्टी घेणं एक चांगलं कारण असू शकतं.  परंतु, जसं कि तुम्हाला माहीतच आहे, लेखक उत्पादकतेमध्ये खूपच रुची दाखवतात, तर सुट्टीच्या बाबतीत ते स्वतःशीच विचारतात, कि, काय मी सुट्टयांहून परत येऊन जास्त कामं-गोष्टी करू शकेन?  तर याचे उत्तर आहे, होय..! 

तीन ते चार दिवसांच्या सुट्ट्या घेणं तुमच्या शारीरिक व मानसिक थकवा, अतीताणतणाव दूर करून उत्साह-जोम-ऊर्जा भरण्याचे काम करते. आणि त्यानंतर परत आल्यावर अजून जास्त उत्पादक, कार्यक्षम (productive) बनाल. हे तुम्ही गुंतवलेल्या तुमच्या पैश्यांचा आणि वेळेचा उत्तम परतावा (ROI) आहे.

 ६.  Eliminate Mindless Browsing
"झोम्बी"सारखं सोशला मीडीयावर रेंगाळणं बंद करा  

आपल्यापैकी सर्वांचेच असेही काही दिवस जेंव्हा आपण अनुत्पादक (productive) म्हणजेच कामं होत नाहीत, किंवा आपल्याजवळ काही करण्यासाठी ऊर्जाच नसते. जेंव्हा तुम्हाला असं वाटते कि, तुम्ही अनुत्पादक (productive) नाहीत तर नक्कीच इथं लक्ष विचलित करणारे अडथळे त्यासोबतच तुमचे एकापेक्षा जास्त कामं करण्यामुळे (multitasking) असे होत असेल याची शक्यता आहे.  

Stop Multitasking Start Uni-tasking
Read more about: ONE THING

जेंव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी एकदाच करत असता, जसे, इ-मेल पाठवणे, मित्राशी बोलणं आणि फेसबुक चेक करणे.  अशा वेळी तुम्ही मल्टीटास्किंग मुळे होणाऱ्या दुष्परिणामाचे शिकार असता.  याला context switching असे म्हणतात.   एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याच्या प्रयत्नामुळे मेंदूमध्ये खूप ऊर्जा वाया जात असते. परिणामी तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला उत्साह राहत नाही.  

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इथे एक अभ्यास अभ्यास करण्यात आला आणि त्यात असे कळाले कि, एखादे काम चालू असताना एकदा लक्ष विचलित झाल्यानंतर (interruption) मूळ कामावर परत येण्यासाठी जवळपास २०-२५ मिनिटे लागतात. कारण तुम्ही एकापेक्षा जास्तवेळा interrupt होत असता. त्यामुळे ते खूपच लवकर होत असल्याने आपला संपूर्ण दिवस कसा निघून घेला आपल्याला कळतच नाही. आणि तुम्हाला असे वाटते कि तुम्ही दिवसभरात काहीच केलेलं नाही.
(Read more about FLOW State)

"क्लीफ्फेरड नास" जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत समाजशास्त्री आहेत, त्यांनी मल्टीटास्किंगवर अभ्यास केला त्यांच्यानुसार, ज्या व्यक्ती मल्टीटास्किंग मध्ये जास्त गुंतून राहतात त्यांना (suckers for irrelevancy) असे म्हंटले आहे.  

आपण  मल्टीटास्किंगमध्ये गुंतून राहतो कारण आपले लक्ष विचलित करणारे सोशल मीडिया वरील नोटिफिकेशन्स-संदेश सूचना हे आहेत, जे कि एकप्रकारे व्यसनाधीनताच आहे. आपण स्वतःला नियंत्रित करू शकत नाही जेंव्हाहि संदेश-सूचना-नोटिफिकेशन येतात आपल्याला स्वतःशीच एक प्रश्न विचारला पाहिजे कि, काय, मला ह्या नोटिफिकेशनला किंवा त्या व्यक्तीच्या संदेश-इमेलकडे मला लक्ष द्यायला पाहिजे? 

प्रत्येकवेळी जेंव्हा आपल्या फोनवर नोटिफिकेशन पॉपअप होते तेंव्हा आपल्याला एक संकेत (crush) मिळतो ज्यामुळे मेंदूमध्ये डोपामिन हॉर्मोन सोडतो. आणि हा डोपामिन संप्रेरक आपल्या शरीरातील, मेंदूमध्ये सुख-आनंद यासाठी जबाबदार असतो. आणि आपल्याला आनंद-सुखाचा एक रोमांच शरीरात जाणवतो. हि आनंदाची जाणीव व्यसन लावणारी असते. आणि आपण तीच कामं करायला लागतो ज्यामुळे डोपामिन उद्दीपित होतो. 

इथं ड्रग्स आणि नोटिफिकेशन हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. मग व्यासनाधीनत्यासाठी जबाबदार असणारे हे नोटिफिकेशन यावर तुम्हाला विचार करायला पाहिजे. ड्रग्स आणि नोटिफिकेशन ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मुळे आपल्याला डोपामिन मिळत असतो. डोपामिन शरीरात एक लव्हाळा (rush) बनवतो, रोमांच शरीरात सोडतो परंतु त्यामुळे तुम्हाला थकवतो सुद्धा. यासाठीच तुम्ही उत्पादक (Productive) नसतानाही दिवसाच्या शेवटी स्वतःला थकलेले वाटते.  हि एक धोकादायक प्रक्रिया आहे. आणि आपल्याला ह्या पुनरावृत्तीला थांबवायला पाहिजे.

प्रोडक्टिव्ह होण्याचा सरळ अर्थ आहे, कि, आपल्या दिवसाचे नियंत्रण घेणे.  तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला जी गोष्ट सर्वात जास्त हानी पोहोचवते ती म्हणजे, ब्राउजिंग.. ती आपल्या विचारक्षमतेला जवळजवळ मारूनच टाकते. जेव्हाही आपण ब्राउज करत असतो. आपलयाला वेळेचे भानच राहत नाही.  तुम्ही कदाचित एखाद्याला असं बोलताना ऐकलेले असेल, "काय..! मी मागील दोन तासापासून काहीच केलं नाही..!


उगीचाच काहीही कारण नसताना आजकाल एक सवय लागलेलीआहे फोनवर सतत न संपणारी माहिती, पोस्ट, व्हीडिओ, फीड, मेसेज-नोटिफिकेशन बघणे, स्क्रॉल करणे पूर्णपणे बंद करा, आवश्यक तेवढं, गरजेचं घ्या, स्वतःचे ध्यान व वेळेचे भान ठेवा तंत्रज्ञान कंपन्यांचे नाही..!  

यासाठीच लेखक आपल्याला, स्वतःचा "लक्ष" देण्याचे आणि वेळेचे नियंत्रण (control of time) स्वतःच्या हातात घ्यायला सांगतात.  इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कि, असं काहीतरी करा ज्यामुळे तुमच्या वेळेची किंमत रहिल.  स्वतःच्या वेळेबाबत सतर्क, सावधान राहा. आणि त्याला अशाप्रकारे करा कि ज्यामुळे तुमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारेल आणि दर्जा वाढेल.

७. पूर्वीपेक्षा कित्येकपट जास्त प्रोडक्टिव्ह बनविणाऱ्या २० गोष्टी 20 Things that will make you more productive than ever:

जर तुमच्याजवळ एक योग्य मानसिकता (mindset) नाही तर उत्पादकता वाढविणारे साधने, पद्धती, युक्त्या-क्लृप्त्या, ऍप्स किंवा हॅक्स काम करणार नाहीत, कारण प्रोडक्टिव्हिटी हि एक जगण्याची पद्धत आहे.  उत्पादकतेचा अर्थ म्हणजे, जास्तीत जास्त आउटपुट प्राप्त करणे.  (achieving maximum output). कामं पूर्ण करणं.  आणि वेळ वाया न घालविणे.  

लेखक इथे २० गोष्टी आपल्याला सांगतात जी त्यांनी मागील तीन वर्षांपासून करत आहेत, ज्यामुळे ते खूपच जास्त प्रोडक्टिव्ह बनलेले आहेत:

१. Always cut to the Chase

पाठपुरावा करणं सोडून द्या. आयुष्यत सर्वच गोष्टी आहेत, कित्येक बकवास आहेत, तर काही अशाही गोष्टी आहेत ज्या कामाच्या आहेत. गप्पा-टप्पा, लहान संभाषण, वरवर बोलणं, लांबवणं ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.  जर तुम्हाला कामं पूर्ण करायची असतील, तर थेट कृती करा.

२. Record all your thought and Ideas

आपल्या सर्व विचार आणि कल्पनांना रेकॉर्ड करा
Computer सारखी आपल्याजवळ रँडम ऍक्सेस मेमरी म्हणजेच "रॅम" (RAM) आहे.  तुमची "रॅम" आवश्यक असलेल्या अल्पकालीन माहितीला साठवून ठेवत असते, परंतु तुमच्या "रॅम" ची साठवण्याची क्षमता कमी आहे, जेंव्हा ती भरून जाते, तेंव्हा तिथे नव्या माहितीसाठी जागा बनविण्यासाठी तिथे असलेल्या अगोदरच्या साठवलेल्या माहितीला आपोआपच (delete) नष्ट करते.  

तुम्हाला तुमच्या विचारांना लिहायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या "रॅम" ला रिकामी (unload) करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला जास्तीची मेंदूची ऊर्जा मिळेल.  जर तुम्ही लिहिलेल्या विचारांना कधीही पाहणार नसाल तरीही लिहा. ज्यामुळे तुम्हाला खूप मदत मिळते.

३. Say No नाही म्हणा

जेंव्हा कामाची गोष्ट येते तेंव्हा लेखक त्या सर्वच गोष्टींना नाही म्हणतात ज्या त्यांच्या ध्येय-उद्दिष्ट आणि मूल्यांना समर्थन करत नाहीत. कारण आपण एका मुबलक जगात राहतो, जिथे सगळ्यांना खूपच जास्त मात्रेत गोष्टी मिळालेल्या आहेत.

४.  दर ३० ते ४५ मिनिटांनी एक ०५ मिनिटांचे विश्राम घ्या

ह्या वेळेत तुम्ही तुमच्या पाठीला ताणू शकता, मायक्रो exercise करू शकता.  थोडेसे चार पाउलं चालू शकता, पाणी पिऊ शकता. परंतु सर्वात महत्वाचं, तुम्ही तुमच्या कामावरून आपले लक्ष काढू शकता. 

👉Take a 5 Minute Break

५.  जे काही तुम्हाला विचलित करतं  त्याला काढून टाका.

Eliminate Everything that Distracts you
"willpower overrated" इच्छाशक्ती ओव्हररेटेड आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट विचलित करत असेल तर त्यापासून दूर जा, ती गोष्ट दूर करा,  किंवा काढून टाका.  लेखांच्या एका मित्राला बातम्यांचे व्यसन होते, लेखकांनी त्यांना सुचविलं कि, टीव्ही पाहणे बंद करा.  बातम्यांचे ऍप्स डिलिट करा आणि आपल्या लॅपटॉपवरील (news sites) बातमी देणारे संकेतस्थळ बंद करा. 

दोन आठवड्यानंतर त्यांनी लेखकांना सांगितलं कि, "आता ते एक नवीन व्यवसाय सुरु करत आहेत."  असं कधीच समजू नका कि तुम्ही विचलनांपासून मुक्त (distraction free) आहात. त्यांना काढून टाका.

६. Keep away clutter गोंधळ आणि अव्यवस्थितपणा यापासून दूर राहा

एका गोंधळलेल्या, अव्यवस्थित मनाचा अर्थ एक गोंधळलेले, अव्यवस्थित जीवन. आणि एका गोंधळलेल्या मेंदूसोबत तुम्ही काम करू शकत नाही. लेखक आपल्याला एका सहज, साधारण अशा वातावरणात काम करायला सांगतात. एक टेबल, एक लॅपटॉप, एक वही.  व्यवस्थित आणि सोपं ठेवा, तुम्हाला जास्त देखावा करण्याची गरज नाही.

७.  Focus on One thing एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.

जर तुमच्याजवळ पुनरावृत्तीचे म्हणजेच परत परत येणारे काम असेल तर, त्या सारख्याच गोष्टींना एका दिवशीच करा. लेखक एक ब्लॉगपोस्ट दोन ते तीन दिवसात लिहितात. आणि सप्ताहाच्या बाकीच्या दिवसात ते आपले इतर व्यवसाय, कामं करतात. ते लिहिण्याच्या दिवसात फोन बंद करून टाकतात. आणि फक्त लिहितात. (read more the 20 Second Rule)

८.  खूप जास्त माहिती ग्रहण करू नका stop consuming so/too much information

तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीवर १०० व्हिडीओ बघायचे नाहीत, जर तुम्हाला एखादी कामाची माहित मिळाली तिथेच एकच बघा, जास्त शोध घेऊ नका. अति तिथं माती या म्हणी प्रमाणे, जास्त कधीही चांगलं नसतं.  

९.  दिनचर्या बनवा Create Routines

निर्णय-निवड तुमच्या मेंदूला थकवा देतात. तर, दिनचर्या निर्णयांना काढून टाकतात.  याचा एकाच अर्थ  होतो, कि, जास्त मेंदूची शक्ती.  दिनचर्या कार्यक्षम आहे.

१०.  एकापेक्षा जास्त कामं करू नका don't multitask

अगोदरच सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यत्ययाने-अडथळ्याने परत मूळ कामावर लक्ष द्यायला २० ते २५ मिनिटे लागत असतात. म्हणजे आपल्या महत्वाच्या प्रोडूक्टिव्ह उपयोगी वेळेचे व्यय आहे. 

११.  दिवसातून दोन वेळेसच इमेल चेक करणे

दरवेळी जेंव्हा तुम्ही इमेल चेक करता, तेंव्हा तुम्हाला मेंदूमधून डोपामिन संप्रेरकांचं (hormone) चा एक (rush) मिळत असतो, इमेल चेक करणे आपल्याला चांगले वाटते. आणि आपल्यापैकी अधिकांश ह्याचे व्यसनाधीन होऊन जातात. डोपामिन एक rush बनवतो शरीरात रोमांच उत्पन्न करणारे रसायन सोडतो ज्यामुळे आपल्याला सुख-आनंद-मजा वाटते (काही वेळेसाठी), आणि हा तुम्हाला थकवतो सुद्धा. 

यामुळेच दिवस संपताच थकलेले जाणवते. भलेही तुम्ही मग दिवसभर काहीही उत्पादक केलं नसेल तरीही शरीरात शीण येतो. असं करण्यासाठी नोटिफिकेशन बंद करा, आणि इमेल ठराविक वेळेतच तपासा.

१२. दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या तासात कोणतेही स्मार्ट फोन नको No Smartphone during the first hours of the day

तुम्हाला व्यत्यय देणे हे एका स्मार्टफोनचे प्राथमिक कार्य आहे. परंतु इतर लोकांमुळे किंवा ऍप्समुळे तुमच्या सकाळच्या पहिल्या काही तासांसाठी व्यत्यय येऊ देऊ नका. पहिल्या तासात आपल्या दिवसभराबद्दल विचार करा, पुस्तक वाचा आणि न्याहरी-नाश्ता यांना मजेसाठी वापर करा.
👉SMART PHONE to SMART LIFE: Hyper Focus

 

१३. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करणे plan the next day

दररोज रात्री झोपण्याअगोदर लेखक आपल्या पुढच्या दिवसातीळ कामांना प्राधान्यक्रम देन्यासाठी ५ मिनिटे घेतात. यामुळे जेंव्हा ते दुसऱ्या दिवशी उठतात, तेंव्हा ते अजून जास्त लक्ष केंद्रित करू शकतात. (more focused).  त्यांना वाटते, जर ते या कामाला करणार नाही तर ते त्यांचा वेळ वाया घालवतील.

१४.  कमीत कमी विचार करा Keep Thinking to minimum

जेंव्हा लोकं असं म्हणतात, कि, मी विचार करत आहे, तर त्यांचा विचार करण्याचा अर्थ, चिंता करणे असा होतो.  जास्त विचार करू नका.  बास करा, जरा थांबा, आणि बघा कि काय होतं ते..! जर जे काही होत आहे, ते तुम्हाला चांगलं वाटतं, योग्य वाटतं, तर सुरु ठेवा, अन्यथा, करू नका.

१५. व्यायाम करा Do Exercise  

आयुषयात काही गोष्टी खूपच जास्त महत्वाची-गरजेची आहेत. अन्न-पाणी-राहण्याचे ठिकाण, नातेसंबंध आणि व्यायाम. ह्या गोष्टींविना तुम्ही योग्यरीत्या कार्य-काम करू शकणार नाही.  शास्त्रीय संशोधन असं दाखवतं कि, दैनंदिन व्यायाम तुम्हाला जास्त आनंदी, हुशार आणि उर्जावान बनवू शकते.

१६. थोडंसं हसा Laugh a little :)

हसा, हसण्याने तणाव कमी होतो. आणि जर तुम्हाला जर तुमची प्रोडक्टिव्हिटी वर ठेवायची असेल, वाढवायची असेल, तर तुम्हाला ताण-तणाव नसायला पाहिजे. म्हणून शक्य तितकं आपल्या चेहऱ्यावरील होठांचे कोपरे वर ठेवा, smile please :) म्हणजेच हसत राहा, आनंदी राहा. 

👉SMILE is a CURVE that KEEPS everything STRAIGHT :)

१७.  बैठकांना जाऊ नका Don't go to the meetings  

हे त्या लोकांसाठी कठीण आहे, जे कंपन्यांसाठी कामं करतात.  काही कंपन्यांकडे बैठकांची संस्कृती असते. लोकं  फक्त महत्वाचे दिसण्यासाठीच बैठकांचे आयोजन करत असतात. आणि यामुळेच कामांना टाळाटाळ (Procrastinate) करत असतात.

१८.  काय हे खरंच गरजेचं आहे? Is that really necessary?

स्वतःशीच असा प्रश्न विचारा? तुम्हाला कळेल कि, अधिकतर वेळा तुमचे उत्तर "नाहीच" असे असेल.  म्हणून ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, त्यांना का करायचं आहे?

१९.  जर तुमचा दिवस खराब गेला असेल तर, पूर्वप्रस्थापित- रीसेट बटन दाबा if you have  a shitty day, press reset button

कोणी तुमच्यावर नाराज झाला असेल, किंवा तुमच्यासोबत काहीतरी वाईट झालं असेल.  असं सगळ्यांसोबत होतचं असते. याविषयी जास्त विचार करू नका. एकट्यात स्वतःसोबत काही वेळ घालवा. धान्य करा. संगीत ऐका. किंवा पायी चालायला जा. मूळ प्रवाहात येण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या दिवसाला वाया जाऊ देऊ नका.

२०.  कामं करा do work  

होय, कामाबद्दल बोलणं काम करण्यापेक्षा सोपं आहे.  कोणीही असं करू शकतो. परंतु तुम्ही सगळ्यांसारखेच नाही. तुम्ही एक मेहनती व्यक्ती (productivity beast) आहोत. म्हणून एका मेहनती व्यक्तीसारखंच कामं करा.  

 

८. जर तुम्हाला अधिक कार्यक्षम (productive) व्हायचं असेल तर तुम्हाला एक ब्रेक घ्यायला पाहिजे If you want to be more productive, research shows that you need a break

लेखकांनी प्रोडूक्टिव्हिटीवर डझनभर पुस्तकं वाचलेली आहेत, आणि वेळेचे नियोजन यावर असंख्य लेख वाचलेले आहेत.  आणि स्वतःच्या प्रोडूक्टिव्हिटीला वाढविण्यासाठी, (boost productivity) वेगवेगळ्या पद्धतींना तपासून पाहिलं आहे.  कल्पना सोपी आहे, त्यांना त्याच वेळेत जास्तीत जास्त काम करायचे आहेत, ते शॉर्टकट किंवा हॅक्स शोधत नाहीत. त्यांना काम करायला चांगलं वाटते. 

परंतु एक गोष्ट जी त्यांना चांगली वाटत नाही ती म्हणजे, अशा गोष्टींवर वेळ वाया घालविणे जी कामाची नाहीत. कधी कधी ते यूट्यूब बघायला सुरु करतात, आणि पाहता पाहता २ तास निघून जातात. आणि मग ते यू ट्यूब मुळे निराश होतात. पण, इथं काही अर्थ होत नाही. हे तसेच आहे जसं तुम्ही काल रात्रीला दारू पिली आणि आज तुम्ही त्यावर रागवत आहोत. समस्या दारूची नाही, तर तुमची आहे. तुम्ही एक ग्लास पिऊन थांबू शकले असते. तुम्ही एक व्हिडीओ पाहून यू ट्यूब बंद करू शकले असते.  

लेखकांनी ह्या निराशेला काढून टाकण्याची एक पद्धत शोधून काढली, त्यामुळे  काम करण्यात मजा येते, आनंद येतो. आणि कामात कमी चिंता होते. समाधान-उपाय सोपं आहे, दर ३० मिनिटांनी ५ मिनिटांची विश्रांती घ्या, यालाच "पोमोडोरो तंत्र" pomodoro technique" असेही म्हणतात. 

हि पद्धत काम करते, कारण, हि पद्धत जैवउत्क्रांती (Evolutionary Biology) वर अवलंबून आहे. आपला मेंदू एकाच कामावर-गोष्टीवर जास्तवेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपला मेंदू आपल्याला जिवंत राहण्यासाठी विकसित झालेला आहे. यासाठीच तो आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तो नेहमी सतर्क असतो. म्हणूनच खूपवेळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आपल्या मेंदूसाठी कठीण आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ एलिनोर यांचे संशोधन असे दाखवते कि, एखाद्या कामाला activate आणि deactivate करणं आपल्याला नेहमी फोकस्ड ठेवतो. जेंव्हा तुम्ही एखाद्या कामाला पूर्ण करत असाल, (जसे, परीक्षेसाठी अभ्यास करणे, सादरीकरण तयार करणे, किंवा अहवाल लिहिणे इत्यादी) तर, छोटे आणि नियोजित विश्रांती (break) घेणे कधीही चांगले. 

जेंव्हा तुम्ही विश्रांती-विराम घेता, तर तुम्हाला पुनर्मूल्यांकन (re-evaluate) करण्यासाठी काही क्षण, सेकंद मिळतात. कधी कधी तुम्हाला हेही माहित होते कि, तुम्हाला आपल्या कामातील दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतःच्या कामाला समायोजित (adjust) करावे लागेल. दुसरीकडे तुम्ही जर एखाद्या कमला विराम न घेताच करत असाल, तर, तुम्ही लवकरच त्यावरून लक्ष हरवून बसाल आणि कामाच्या गुणवत्तेला सांभाळू शकणार नाही.

यासाठीच, ५ मिनिटांची विश्रांती ३० मिनिटे काम कारण्याऐवढेच महत्वाचे आहे. 

आपल्या विश्रांतीला गंबीरतेने घ्या, त्यांना बक्षिसांसारखं बघा. घेतलेल्या विश्रांतीला (break) काही पाऊलं चालण्यासाठी, काही अंग ताणण्याचे कसरती करण्यासाठी, किंवा असं काही करण्यासाठी ज्यामुळे तुम्हाला अराम देईल.  तुम्ही जे काम केलं आहे त्यावर आनंदी व्हा. जर तुम्हला हि पद्धत वापरयाची असेल तर, इथं काही गोष्टी आहेत ज्या तुमची मदत करू शकतात. 

  • विश्रांतीसाठी ऍप्प वर ३० मिनिटांचा गजर-अलार्म लावा आणि, 
  • ३० मिनिटांच्या विश्रांतीमध्ये एकच काम करा 
  • आणि आपल्या विश्रांतीला टाळू नका.
  • ब्रेक घेताना इमेल, चेक करू नका. 
  • चार इंटर्वल नंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. 
  • आणि ३० मिनिटांच्या स्ट्रेचमध्ये असाल तर अनावश्यक, खोट्या व्यत्यय आणि आपत्काल यासाठी पुढं ढकलू नका. 
  • प्रामाणिक राहा. 
  • दररोजचे ध्येय-उद्दिष्ट ठरवा. 

९.  एका वर्षात १०० पुस्तकं कशी वाचावी how to read १०० books in a year  

सारांशाच्या शेवटी आपण आलेलो आहोत, यामध्ये असं सांगितलेलं आहे कि एका वर्षात १०० पुस्तकं कशी वाचावीत? सर्वच यशस्वी लोकं पुस्तकं वाचन करतात. जर तुम्ही एखाद्या महान व्यक्तीचे आत्मकथा वाचाल तर, तुम्हाला कळेल कि, तेसुद्धा पुस्तकं वाचत होते. जास्तीत जास्त वाचन करण्यासाठी लेखक ५ पद्धती सांगतात.  

१.  buy in bulk एकदाच खरेदी करणे

जर तुम्हाला जास्त वाचन करायचं असेल तर, तुम्हाला जास्त पुस्तकं खरेदी करावी लागतील. काही लोकं ह्या गोष्टीला समजत नाहीत, ते ५००० पाच हजार रुपये फक्त शूज खरेदी करण्यासाठी खर्ची करतील, परंतु घरबसल्या ऍमेझॉन वरून २० पुस्तकं खरेदी कारणार नाहीत. कल्पना साधीच आहे, जर तुमच्या घरात जास्त पुस्तकं असतील तर, तुमच्याजवळ जास्त निवडी असतील (choices).  आणि हे तुमची मदत करेल.  

कारण, जी पुस्तक तुम्ही वाचत असता, ती पुस्तक आगाऊ अगोदरच नियोजित नसते. तुम्ही एका पुस्तकाला वाचून संपवता, आणि तुम्ही यादी बघता आणि निवडता कि पुढं काय वाचायचं आहे? कोणती पुस्तक वाचू? यावर जास्त विचार करू नका. कारण तुम्ही तासंतास पुस्तकांची समीक्षा वाचण्यातच जातील, जो कि वेळेचा अपव्ययच आहे. 

पुस्तकांची यादी (inventory of books) ठेवणे, वाचण्याच्या गतीला स्थिर ठेवतो.  तुमच्याजवळ वाचन न करण्याचे कारणच नसते.  

२.  नेहमीच वाचन करत राहा. always be reading  

लेखक नेहमीच सांगतात, कि नेहमीच वाचत राहा. ते दररोज किमान एक तास वाचन करतात. आठवडी सुट्टी आणि इतर वेळी त्याहीपेक्षा जास्त वाचन करतात. आपल्या वेळापत्रकाप्रमाणे आणि दैनंदिन जीवनातील परिस्थितीनुसार वाचन करण्याचा प्रयत्न करा. काहीही सबबी, करणं  देऊ नका. जसे कि, मी खूप थकलेलो आहे, किंवा मी खूप व्यस्त आहे, वेळ मिळत नाही असे इत्यादी.  

नेहमी वाचन करणे म्हणजे, तुम्ही प्रवासात रेल्वेमध्ये, विमानात असाल तर तिथे, जेवण करताना, रांगेत असताना, डॉक्टर जवळ वाट बघताना, आणि सर्वांत महत्वाचं सर्वजण जेंव्हा बातम्या बघण्यात वेळ वाया घालवत असतात तेंव्हा, किंवा फेसबूकवर शंभराव्यावेळा चेक करत असत, तेंव्हा तुम्ही पुस्तकं वाचू शकता. आजकाल तर ऑडिओबुक सुद्धा आहेत. तर तुम्ही अशा रीतीने पुस्तकं वाचन कराल तर नक्कीच वर्षभरात १०० पेक्षाही जास्त पुस्तकं वाचू शकता. 

गणिताच्या हिशोबाने बघायचं झाल्यास असं दिसते कि, अधिकांश लोकं  एका तासात ५० पानं वाचत असतात. जर तुम्ही एका आठवड्यात १० तास वाचन कराल तर, एका वर्षात २६ हजार पानं वाचून काढाल आणि एका पुस्तकात जवळपास सरासरी २५० पानं असतील तर, सरसरीत तुम्ही १०४ पुस्तके वाचून काढाल.  जर तुम्ही २ आठवड्यांचा ब्रेक जरी घेतलात तरी, तुम्ही एका वर्षात कमीत कमी १०० पुस्तकं वाचूनच काढाल.  

हे तुमच्या वेळेच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा आहे. good return on your time invested .

३.  फक्त संबंधित पुस्तकाचं वाचा read relevant books only  

सर्वच पुस्तका सगळ्यांसाठी नाहीत, एक पुस्तक बेस्टसेलर असू शकते. परंतु ती सुद्धा तुमच्यासाठी योग्य नसेल. जर तुम्हाला पुस्तकांची पानं फिरवायची नसतील (फ्लिप) कि तुम्हाला अजून किती पुस्तकं अजून वाचायचं आहे, तर त्या पुस्तकाला ठेऊन द्या. कारण ती पुस्तक तुमच्यासाठी नाही. त्याच पुस्तकांना वाचा जी तुमच्या कामाशी किंवा तुमच्या आवडीच्या असतील. त्या लोकांची पुस्तकं वाचा ज्यांना तुम्ही खूप मानता.  

४.  एका पुस्तकासोबत अनेक पुस्तकं वाचा read multiple books simultaneously

वाचण्याचे कोणतेही नियम नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यांना वाचू शकता. कधीकधी लेखक पाच पुस्तकं वाचत असतात. ते एका पुस्तकाचे ५० पानं सकाळी वाचत असत आणि दुपारी दुसरी एखादी पुस्तक वाचत. त्यांना असे वाचन करणे आवडते. जर तुम्ही एखादे असे पुस्तक वाचत आहोत जे किचकट, क्लिष्ट आहे, तर तुमची इच्छा असेल कि तुम्हाला सायंकाळी सोपं काहीतरी वाचायला पाहिजे.  

झोपण्यापूर्वी लेखकांना आत्मकथा वाचणे आवडते. कारण त्या गोष्टींसारखी असतात. लेखक अंथरुणावर झोपून गुंतवणूक विषयीचे पुस्तक वाचत नसतात कारण जर ते असे करतील तर, ते ३.०० वाजेपर्यंत जगातील कारण त्यांचा मेंदू नव्या गोष्टींनी भरलेलं असेल.

६.  ज्ञानाला retain the knowledge

ज्ञान-माहिती तेंव्हाच चांगले आहे जेंव्हा तुम्ही त्याचा उपयोग कराल. ज्ञानाला वापरण्यासाठी तुम्हाला एक सिस्टिम पाहिजे असते. जे असं करू शकेल. जेंव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकाला वाचत असता. margin वर नोट बनवून घ्या. एका पेनाचा वापर करा. आणि गरज भासल्यास महत्वाच्या गोष्टींना रंगवा.  

वाचन करताना तुम्हाला असं काही मिळत असेल, जे कि खूप महत्वाचं आहे, तर पानाच्या वरून किंवा खालच्या बाजूस दुमडून ठेवा. तुम्ही जेंव्हा असे करता, तेंव्हा पुस्तक संपल्यावर त्या दुमडलेल्या पानांना परत वाचा. त्या महत्वाच्या शब्दांना, वाक्यांना लिहून काढा जी तुम्ही तुमच्या जीवनात उतरविणार आहोत.

 

Read Related: 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

Conclusion

तर मित्रानो आपण ह्या पुस्तकातून procrastination म्हणजेच टाळाटाळ करणे काय असते आणि ते आपण कसे थांबवू शकतो हे शिकले. 

  • तणाव ना घेताही आपली productivity कशी वाढवावी, आणि आपल्या जीवनात अधिक अर्थपूर्ण गोष्टी कशा मिळवाव्यात जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाला आनंदाने जगू शकाल. 
  • आपण हे देखील शिकलं कि procrastination म्हणजेच टाळाटाळ ह्या सवयीला कसे सोडावे, काढून टाकावे. आणि productive लोकांच्या काय सवयी असतात. 
  • आपलं फोकस कसा बनवावे लक्ष केंद्रित कसे करावे, कोणत्या गोष्टी तुम्हाला अधिक productive बनववगात`बनवतात, आणि तुम्ही एका वर्षात १०० पुस्तकं कशी वाचू शकता. इत्यादी. 

आता वेळ आहे, ह्या गोष्टींना आपल्या अस्सल वास्तिवक आयुष्यात वापरण्याचा, आत्मसात करण्याचा आणि यशाचे शिखर गाठण्याची.  पुस्तक मागवून सविस्तर वाचन करू शकता. 

👉भाग-1 वाचण्यासाठी इथे जा

📖📗📘📙

💡🙏👉विशेष विनंती: 

मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका. 

लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील.  कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.


ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.  


www.evachnalay.in

👉Also Read: 

 

तर वाचक मित्रांनो ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember



www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive