माईंड मॅप काय आहे? आणि त्याचा कसा उपयोग करावा? (What is Mind Map and How to Use it?) Mind Map in Marathi

लक्षात ठेवण्यासाठी, कमी शब्दात समजून घेण्यासाठी याचा उपयोग कुठंही करू शकता, शिकण्यासाठी, अभ्यास करताना, शिकलेलं लक्षात ठेवण्यासाठी, प्रेसेंटेशन बनविण्यासाठी, समजावण्यासाठी, काम करताना, ध्येय ठरविण्यासाठी, नियोजन करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी असं कुठंही वापर करू शकता.  

माईंड मॅप 

 

माईंड मॅप काय आहे? आणि त्याचा कसा उपयोग करावा?

तुम्ही जेकाही वाचत आहात, बघत आहात, ऐकत आहात  त्या सर्व गोष्टींना अशा रितीने, पद्धतीने आपल्या वहीमध्ये, कागदावर, लॅपटॉप मध्ये वर्ड पेज वर, नोंद करून ठेवणे जेणेकरून तुम्हाला सर्व मुद्दे, गोष्टी, टिपणं लक्षात राहतील आणि नंतर तुम्ही जास्त श्रम न करता समजून घेऊ शकाल आणि इतरांनाही सहज समजावून सांगू शकाल.  


इथं लक्षात घेण्यासाठी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा माईंड मॅप -मानचित्र वेगळंवेगळं असू शकते कारण, प्रत्येक माणसासाठी महत्वाचे मुद्दे-गोष्टी वेगवेगळे असू शकतात.  म्हणजे एखाद्याला एक गोष्ट महत्वाची वाटू शकते तर दुसऱ्याला इतर गोष्ट महत्वाची वाटू शकते.  प्रत्येकाच्या मेंदूमध्ये व्यक्तिपरत्वे माहितीची साठवणूक, जपवणूक, प्रक्रिया, लक्षात ठेवण्याची पद्धत भिन्न भिन्न असते. म्हणूनच, तुम्ही तुमचा माईंड मॅप तुमच्या पद्धतीने बनवू शकता आणि मी माझ्या पद्धतीने.  दोघांनाही ज्यांची त्यांची माहिती, गोष्टी लक्षात राहतील.  

आता इथं प्रश्न येतो की माईंड मॅप बनवायचं कसं?  अभ्यास करताना, शिकत असताना नोट्स घेताना तुम्हाला फक्त महत्वाच्या गोष्टी, मुद्दे, माहिती लिहून काढायच्या असतात पण माईंड मॅप करताना सर्वच लिहून काढण्याची गरज नसते. तुम्हाला एक कोरं वहीचं पान घ्यायचं आहे किंवा कोरं कागद घ्यायचं ज्यावर रेषा नसतील, रेषा असलेलं पानही चालेल पण रेषा नसणारे उत्तम राहील.

मग, तुम्हाला जो मुद्दा, ज्या गोष्टीबद्दल माईंड मॅप बनवायचा आहे त्या शब्दाला, संकल्पनेला, की-वर्डला कागदाच्या मधोमध लिहून काढा, त्याच्या अवतीभोवतीच आपल्याला माईंड मॅप बनवायचा आहे. मग त्याला चौकोन, गोल असा एखाद्या आकृतीमध्ये लिहून त्या डब्याच्या आजू बाजूला, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली असे रेषा ओढून, झाडाच्या फांद्या-असतात तश्या संकल्पनेशी निगडित, संबंधित महत्वाच्या शाखा बनवायच्या आहेत. त्यामध्येही ठळक मुद्यांशी  संबंधित शब्द लिहायचे  मग त्यातहि अजून गरजेनुसार उपशाखा बनवू शकता. 

समजा, तुम्हाला आर्थिक नियोजन करायचे आहे तर त्यासाठी मध्यवर्थी संकल्पना असेल आर्थिक नियोजन-यानंतर असेल डावी कडे किंवा उजवीकडे इनकम उत्पन्नाचे स्रोत, मग महिन्याचा खर्च, विमा, आपत्कालीन राशी, emergency फंड, बचतीचे विविध मार्ग, गुंतवणुकीचे पर्याय, सेवा निवृत्ती नियोजन, संपत्ती निर्मिती हे झाले ठळक मुद्दे किंवा मुख्य शाखा त्यानंतर त्यांच्याशी निगडित उपशाखा माहितीपर किवर्ड, शब्द लिहायचे जसे, विमा ह्यामधे आरोग्य विमा, मोटार विमा, टर्म इन्शुरन्स, इत्यादी मग त्यातही उप शाखा बनवू शकता जसे कोणत्या कंपनीचे घ्यायचे त्याचे नाव, रक्कम, सवलती, सोयी-सुविधा इत्यादी.  

आपल्या गरजेनुसार, सोयीनुसार, कितीही मोठा किंवा लहान माईंड मॅप तुम्ही बनवू शकता. जेणेकरून तुम्ही चांगल्या रीतीने समजू शकाल. आणि या माईंड मॅप मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या, गरजेच्या वाटतील त्या ठेवायच्या आहेत. 


या माईंड मॅप संकल्पनेतून तुम्ही काय शिकू शकता? किंवा ह्याचा काय उपयोग होतो? 

तर याचे उत्तर आहे, तुम्ही याचा उपयोग कुठंही करू शकता, शिकण्यासाठी, अभ्यास करताना, शिकलेलं लक्षात ठेवण्यासाठी, प्रेसेंटेशन बनविण्यासाठी, समजावण्यासाठी, काम करताना, ध्येय ठरविण्यासाठी, नियोजन करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी असं कुठंही वापर करू शकता.  

लक्षात ठेवण्यासाठी, कमी शब्दात समजून घेण्यासाठी.  




MindMap of Mind..! मनाचे मानचित्र

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive