मिलियन डॉलर हॅबिट्स - सारांश भाग-1- ब्रायन ट्रेसी -मराठी अनुवाद | Billion Dollar Habits by Brian Tracy (Marathi Book Summary Part-1)

तुम्‍ही कोण आहात? कुठून आला आहात? काय करता? तुमचं वय काय? या सगळ्या गोष्‍टींनी काही फरक पडत नाही. गरज आहे ती फक्‍त तुम्‍ही मिलेनियर्स लोकांच्‍या सवयी शिकण्‍याची.

मिलियन डॉलर हॅबिट्स
ब्रायन ट्रेसी 

मराठी अनुवाद 

पुस्‍तक सारांश
भाग-1

 

Billion Dollar Habits by Brian Tracy (Marathi)
पुस्‍तक सारांश
भाग-1

पुस्‍तकाविषयी थोडक्‍यात 

मिलेनियर लोकं सामान्‍य लोकांपेक्षा एकाच गोष्‍टीमुळे वेगळे असताता आणि ती गोष्‍ट आहे हॅबिट्स म्‍हणजेच आपल्‍या सवयी.  जर तुम्‍हीसुद्धा मिलेनियर लोकांच्‍या सवयी शिकलात, त्‍या सवयींचा सराव करून त्‍याची पुनरावृत्‍ती कराल तर तुम्‍ही ही मिलेनियर लोकांच्‍या क्‍लब मध्‍ये सहभागी होवू शकता.  या पुस्‍तकात आम्‍ही तुम्‍हाला त्‍या सगळ्या सवयींबद्दल  सांगणार आहोत, ज्‍या तुम्‍हाला यशस्‍वी बनवतील, मिलेनियर बनवतील. 

हे पुस्‍तक कोणी वाचायला पाहिजे?

  • त्‍या सगळ्या लोकांनी जे एखाद्या कंपनीचे कर्मचारी आहेत किंवा 
  • छोट्या उद्योग, व्‍यवसाय चालक, स्‍वयंरोजगार आहेत 
  • ज्‍यांना आपली स्‍वप्‍नं प्रत्‍यक्षात जगायची आहेत
  • ज्‍यांना आपले आयुष्‍य स्‍वतःच्‍या नियमांवर जगायचे आहे 
  • ज्‍यांना स्‍वतःचे भवितव्‍य घडवायचे आहे
  • ज्‍याला कोट्याधिश, मिलेनियर बनायचे आहे 

 लेखकाबद्दल दोन शब्‍द

ब्रायन ट्रेसी क मोटीव्‍हेशनल स्‍पीकर आहेत. त्‍यांनी 1984 मध्‍ये ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल फाऊंडेशनची स्‍थापना केली.  त्‍यांची कपंनी ट्रेनिंग प्रोग्रॅम ऑफर करते, तसेच वैयक्तिक आणि व्‍यावसायिक कंपन्‍यांना कोचिंग आणि सेमिनार्स देखिल प्रोवाईड करते.

चला तर मग सुरू करूया मिलियन डॉलर हॅबिट्स पुस्‍तकाचे सारांश 

 

थोडक्‍यात पुस्‍तक प्रस्‍तावना

काय तुम्‍हीही मिलेनियर बनण्‍याचे स्‍वप्‍न बघता?

जर उत्‍तर 'होय' असेल तर तुम्‍ही हे पुस्‍तक नक्‍कीच वाचायला हवे.  कारण मिलेनियर बनण्‍याचं स्‍वप्‍न काही फालतू किंवा इंग्रजीत म्‍हणतात त्‍याप्रमाणे अगदी 'होपलेस स्‍वप्‍न' नाहीये.  हे काही असं स्‍वप्‍न नाही जे पूर्ण होऊ शकत नाही.  तुमच्‍या आधीही ब-याच लोकांनी अशी स्‍वप्‍नं बघितली होती आणि ते लोकही गरीब होते किंवा कमी शिकलेले होते. 

त्‍यांच्‍याजवळ काही खास कौशल्‍यसुद्धा नव्‍हती, तरीसुद्धा सगळ्या आव्‍हानांना पार करून ते यशस्‍वी झालेले आपण पाहू शकतो. उदा.धीरूभाई अंबानी

तर मग तुम्‍ही पण असं का करू शकत नाही? नक्‍कीच करू शकता..! तुम्‍ही कोण आहात? कुठून आला आहात? काय करता? तुमचं वय काय? या सगळ्या गोष्‍टींनी काही फरक पडत नाही. गरज आहे ती फक्‍त तुम्‍ही मिलेनियर्स लोकांच्‍या सवयी शिकण्‍याची. 

वाचकमित्रांनो तुम्‍हीदेखील तेच करा जे या .यशस्‍वी लोकांनी केलंय.  खखरं तर यशस्‍वी लोकांना काही चांगल्‍या सवयी असतात, त्‍या उलट अयशस्‍वी लोकांना काही वाईट सवयी असतात.  हे पुस्‍तक तुम्‍हाला त्‍या चांगल्‍या सवयींबद्द्वदल शिकवेल ज्‍यांची प्रॅक्टिस करून तुम्‍ही देखिल एक मिलेनीयर बनून तुमचं स्‍वप्‍नं पूर्ण कराल. 

 

तुम्‍ही जे करता तेच तुम्‍ही असता (You are what you do) 

जरा त्‍या  लोकांबद्दल विचार करून बघा जे तुम्‍हाला अत्‍यंत यशस्‍वी वाटतात.  असं काय आहे त्‍यांच्‍याकडे जे त्‍यांना यशस्‍वी बनवतं? त्‍यांची कोणती खास सवय त्‍यांना तुमच्‍यापेक्षा अधिक यशस्‍वी बनवते? तुम्‍ही जिथे अगोदर होता आजही तिथेच आहात, आणि याचं कारण तुम्‍ही स्‍वतः आहात.  तुचा प्रेझेंट टाईम म्‍हणजे तुमच्‍या कृती, तुमच्‍या निवडी, आणि तुमच्‍या निर्णयांमुळे आहे ज्‍याची निवड तुम्‍ही स्‍वतः केली आहे आणि हेच निर्णय तुमचं भविष्‍य ठरवतील. 

जर तुम्‍हीही आता खूप जास्‍त यशस्‍वी बनण्‍याचे स्‍वप्‍न बघत असाल तर तुमचं हे स्‍वप्‍न पूर्ण होऊ शकतं कारण सगळं काही तुमच्‍या हातात आहे.  विश्‍वास ठेवा, तुमच्‍यासाठी काही मर्यादा नाहीत.  ही वेगळी गोष्‍ट आहे की, जर तुम्‍ही स्‍वतःसाठी मर्यादा आहेत असं समजत असाल तर मग कोएाीच तुमची मदत करू शकत नाही. 

तुम्‍ही स्‍वतः तुमच्‍या यशावर नियंत्रण ठेवू शकता. सगळं काही तुमचे विचार, तुमचे शब्‍द आणि तुमच्‍या कृतीवर निर्धारित आहे.  तुमच्‍या रोजच्‍या जगण्‍यातली 95% कामं तुमच्‍या सवयींशी (हॅबिट्सशी) निगडित असतात.  आणि यामुळेच यशस्‍वी लोकं सक्‍सेस हॅबिट्सची प्रॅक्टिस करतात, रोज ते त्‍या गोष्‍टींना पुन्‍हःपुन्‍हा करतात.  ही गोष्‍ट त्‍यांना दुस-यांपेक्षा वेगळं बनवते. 

तुम्‍हाला ही या यशाच्‍या सवयींंची सुरूवात करायची आहे.  हे ही लक्षात ठेवा की आपण जर ठरवलं तर आपण आपल्‍या वाईट सवयींपासून पिच्‍छा सोडवू शकतो आणि चांगल्‍या सवयींना आचरणामध्‍ये आणू शकतो.  

जॉर्ज वॉशिग्‍टन अमेरिकेचे पहिले राष्‍ट्राध्‍यक्ष होते.  जेव्‍हा ते कुमारवयात होते तेव्‍हा त्‍यांनी एक पुस्‍तक वाचले, ''द रूल्‍स ऑफ सिवीलिटी ऍण्‍ड डिसेंट बिहेवियर'', त्‍यांनी या पुस्‍तकातील सगळे 110 नियम आपल्‍या छोट्याशा वहीत लिहून ठेवले.  

दररोज ते त्‍या नियमांचं वाचन करत आणि एक-एक करून त्‍याची अंमलबजावणी आपल्‍या दैनंदिन जीवनात करत होते.  या पुस्‍तकामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये चांगल्‍या सवयी निर्माण झाल्‍या.  आणि अशाप्रकारे आपल्‍या कुमार वयातच त्‍यांनी या नियमांचा सराव सुरू केला.  

जेव्‍हा मोठे होऊन ते राजकारणात गेले तेव्‍हा याचांगल्‍या सवयी त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्‍या होत्‍या.  या चांगल्‍या सवयींना आत्‍मसात करायला त्‍यांना जराही अडचण आली नाही.  म्‍हणूनच तुम्‍हीही अशा चांगल्‍या सवयींना आपल्‍या आयुष्‍यात आत्‍मसात करा व त्‍यांचा दैनंदिन सराव करा आणि त्‍याची पुनारावृत्‍ती करा.  मग तुमच्‍यामध्‍ये देखील आपोआपच या चांगल्‍या सवयी अंगिकारल्‍या जातील, चांगल्‍या सवयी बाणवतील, रूजतील. 

 

तुमच्‍या सवयी येतात तरी कुठून? (Where your habits come from?) 

माणसाच्‍या मेंदूत 20 दसलक्ष च्‍या आसपास चेतापेशी, न्‍यूरॉन्‍स असतात. आणि यातील प्रत्‍येक न्‍यूरॉन बाकीच्‍या 20,000 न्‍यूरॉन्‍सशी जोडलेले राहतात.    आपण मनुष्‍य आपल्‍या रोजच्‍या जीवनात या न्‍यूरॉन्‍सचा एक छोटासा अंशच वापरत असतो.  तुमच्‍याजवळ मेंदूची अफाट शक्‍ती आहे ज्‍याचा तुम्‍ही वापरच करत नाही.  परंतु यशस्‍वी लोकं याचा योग्‍य वापर करतात आणि तुम्‍हीही करू शकता.  

यासाठी तुम्‍ही फक्‍त आळस सोडून द्यायचं, सामान्‍यपणा/मध्‍यमपणा आणि कटुता सोडून द्या.  अजूनही वेळ आहे, तुम्‍ही जीवनात हवा तो बदल आणू शकता.  तुमच्‍या  डोक्‍यात कशाप्रकारचे विचार येतात? ब-याचदा तुमच्‍या मनात काय सुरू असतं? यासगळ्यागोष्‍टी लक्षात घ्‍या.! कारण तुमचे विचारच तुमचं भविष्‍य बदलू शकतात.  तुम्‍ही त्‍याच गोष्‍टींना आकर्षित करता ज्‍यांच्‍याबद्दल तुम्‍ही विचार करत असता. 

जसंकी, जर तुम्‍ही नेहमी यश आणिपैशाच्‍याबाबतीत विचार कराल तर तुम्‍हाला अशाच संधी मिळतील जे तुम्‍हाला पैसे कमावण्‍यसाची संधी देतील.  या उलट जर कोणी अपघात किंवा आजारपणाबद्दल विचार करत असेल किंवा नेहमी काळजीत असेल तर तेच त्‍याच्‍या जीवनाचा भाग बनेल.  

म्‍हणून नेहमी सकारात्‍मक विचार करा, आपल्‍या विचारांवर नियंत्रण ठेवा  व नकारात्‍मक विचार कायमचे सोडून द्या.  सराव आणि पुनरावृत्‍ती म्‍हणजेच प्रॅक्टिस आणि रिपीटिशन मुळे तुमचं मन फक्‍त्‍ सकारात्‍मक गोष्‍टींचा विचार करेल.   यामुळे तुम्‍ही आधीपासून बरेच आनंदी आणि यशस्‍वी अनुभव कराल.  

या पुस्‍तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी यांनी आपल्‍या या पुस्‍तकादद्ववारे आपली यशाची कथा  आपल्‍यासोबत शेअर केली आहे. 

त्‍यांचं कुटुंबदेखिल खूप गरीब होतं.  त्‍यांच्‍या वडिलांजवळ स्थि‍र नोरी नव्‍हती, त्‍यामुळे बा्रयन यांना ते स्‍वतः 10 वर्षांचे असल्‍यापसाूनच कामं करावी लागली.  त्‍यांनी त्‍यांच्‍याा शेजा-'यांकडे खूप प्रकारच्‍या छोट्या-मोठ्या नोक-या केल्‍या.  त्‍यांनी शेजा-यांच्‍या अंगणातील गवत काढले, सुकलेली पाने उचलली आणि वृत्‍तपत्र वाटण्‍याचं कामही केलं.  त्‍यांनी आपल्‍या दोन वेळच्‍या जेवणाचा आणि कपड्यांचा खर्च देखील सवतः उचलला.  

नंतर जेव्‍हा ते कुमारवयाचे हाते तेव्‍हा त्‍यांनी एका हॉटेलमध्‍ये भांडी घासण्‍याचं काम पकडलं.  तिथे भांडी घासताना, स्‍वच्‍छ करताना ते स्‍वतःला खूप नशीबवान समजत होते.   ब्रायन ला पैशांच महत्‍व खूप लहान वयसातच लक्षात आलं होतं, म्‍हणूनच त्‍यांनी शालेय शिक्षण सोडून पैसे कमावण्‍याचा निर्णय घेतला.  त्‍यांनी खूपसा-या कारखान्‍यात आणि बांधकामाची कामे केली.   त्‍यांनी मोठ-मोठ्या शेतातदेखील कामं केली. 

20 वर्षाच्‍या वयात ते एक सेल्‍समन म्‍हणजेच विक्रेता बनले.  बा्रयन घरोघरी आणि कार्यालयामयध्‍े जाऊन वेगवेगळे उत्‍पादन विकत होते.  त्‍यावेळी त्‍यांची अवस्‍था अशी होती की, दोन वेळच्‍या जेवणासाठी देखील ते विक्री होत असलेल्‍या मालावर अवलंबून होते. 

एका रात्री, जेव्‍हा आपल्‍या बोर्डिंग रूमध्‍ये आराम करत होते तेव्‍हा त्‍यांनी विचार केला, ''असं का होतं की काही विक्रेता खूप जास्‍त विक्री करतात आणि काही विक्रेता काहीही विकू शकत नाहीत?' ' दुस-या दिवशी पासून ब्रायन यांनी एक अशी सवय सुरू केली ज्‍यामुळे त्‍यांचे आयुष्‍यच बदलून गेलं. 

ती सवय होती, ''यशस्‍वी लोकांच्‍या सवयी शिकणे आणि त्‍यांचा  आपल्‍याजीवनात अवलंब करणे.'' 'एक दिवस त्‍यांनी हिंमत करून आपल्‍या कंपनीच्‍या एका विक्रेत्‍या प्रतिनिधीचा नंबर घेतला आणि त्‍यांना संपर्क केला.  ''तुम्‍ही कोणती युक्‍ती-क्‍लृप्‍ती वापरता ज्‍याने लोकं नेहमी तुमच्‍याकडून काही ना काही खरेदी करतात?''  ब्रायन यांनी त्‍या प्रतिनिधीला विचारलं.  तर त्‍या प्रतिनिधीने त्‍यांना आपलं एक गुपित सांगितलं, जे ब्रायनने आपल्‍या ग्राहकांवरही वापरून बघितलं. 

आणि मग त्‍यांचे ग्राहकसुद्धा त्‍यांचे सगळे उत्‍पादन घ्‍यायला लागले.  ब्रायन यांनी विक्रीशी संबंधित पुस्‍तकं वाचायला सुरूवात केली.  याशिवाय ब्रायन विक्रय शिबिरांमध्‍येही जात होते आणि विक्री संबंधित ध्‍वनीमुद्रि‍त वर्गसुद्धा ऐकत होते.  ते जे काही शिकले होते, त्‍यांनी त्‍याला लगेच आपल्‍या आयुष्‍यात उपयोग करायला लागले.  

या नवीन सवयीमुळे ब्रायन यांनी विक्री वाढली, त्‍यांना बढतीदेखिल मिळाली.  आता ते विक्रय व्‍यवस्‍थापक बनले होते.  ब्रायन जे काही शिकले होते, ते त्‍यांनी आपल्‍या गटातील सदस्‍यांसोबतही त्‍या गोष्‍टी शेअर केल्‍या आणि त्‍या लोकांनादेखिल स्‍वतःमध्‍ये सुधारणा करण्‍यात मदत केली. 


यशाची अतिमहत्‍वाची योजना -मास्‍टर प्रोग्राम ऑफ सक्‍सेस (The master program of success) 

यशस्‍वी लोकं उठता-बसता त्‍यांनाजे हवं आहे त्‍याच्‍याबदद्वदल विचार करतात.  आणि यमुळेच ते नेहमी  असे निर्णय घेतात जे त्‍यांना त्‍यांच्‍या ध्‍येयापर्यंत घेऊन जातील.  तेच दुसरीकडे अशस्‍वी लोकं याच्‍या अगदी विरूद्ध विचार करतात. 

त्‍यांना नेहमी असेच वाटतं की त्‍यांना जे हवंय ते त्‍यांना मिळू शकत नाही.  थोडक्‍यात सांगायचं तर, अयशस्‍वी लोकं फक्‍त क्रारी करत राहतात आणि दुस-याला दोष देत राहतात.  तर तुम्‍ही काय बनाल? निवड तुमची आहे.  इथे आपण एक उदाहरण पाहू आणि यावरून तुम्‍हाला समजेल की, आपले विचार किती शक्‍तीशाली असू शकतात. 

समजा तुम्‍ही दरवर्षी 50,000 डॉलर पैसे कमावण्‍याचे ध्‍येय ठरवता. तुम्‍ही प्रत्‍येक वेळी हाच विचार करता की ही रक्‍कम तुम्‍ही कशी कमवाल? तुम्‍ही त्‍यासाठी मग स्‍वतःला आणखी जास्‍त प्रोडक्‍टीव्‍ह म्‍हणजेच कार्यक्षम बनवू इच्छिता.  मग भलेही तुमच्‍या कार्यालयामध्‍ये काहीही होवू द्या किंवा अर्थव्‍यवस्‍था कशीही चालू राहिली तरी तुम्‍ही ते पैसे 50 हजार डॉलर कसेही कमवाल. 

आता  जर तुम्‍ही 1,00,000 डॉलरचे ध्‍येय ठेवलात तर कसं होईल? तुम्‍हाला कोणत्‍याही प्रकारे हा पैसा कमवावा असं वाटेल.  आणि‍  समजा जर तुमची नोकरी गेली तरीही तुम्‍ही नवीन नोकरी शोधाल किंवा कोणताही उद्योग-व्‍यवसाय कराल.  कारण तुम्‍हाला कोणत्‍याही परिस्थितीत, कोणत्‍याही प्रकारे 1,00,000 डॉलर कमवायचे आहेत. 

मग कल्‍पना करा की, तुमचे आयुष्‍य किती उत्‍साही होऊ शकते.  तुमच्‍या मोठ्या स्‍वप्‍नांबद्दल विचार करा आणि त्‍यालाच तुमचे ध्‍येय बनवा.  फक्‍त्‍ इतका विचार करा की तुम्‍ही तुमचे ध्‍येय कसे गाठाल, तुमच्‍या यशाचा हाच अतिमहत्‍वाचा मास्‍टर प्रोग्राम आहे.

यशाची सर्वात महत्‍वाची सवय आहे सेल्‍फ-डिसीप्‍लीन म्‍हणजेच स्‍वयंशिस्‍त.  ही सवय तुमच्‍याकडून ते करून घेते जे तुम्‍ही करायला हवं.  जसं की, शरीराचे स्‍नायू बळकट करण्‍यासाठी सराव व व्‍यायाम केल्‍याने स्‍नायू मजबूत बनतात  तसंच सरावाने सेल्‍फ डिसीजन म्‍हणजेच स्‍वयंनिर्णय घेण्‍याची सवयदेखील मजबूत बनते.  आणि तुमच्‍यामध्‍ये जितकी जास्‍त स्‍वयंनिर्णय घेण्‍याची क्षमता असेल तितककच तुमचं आयुष्‍य चांगलं होईल. 

 

लक्षाधिश बनले अशा लोकांची सवय (The habit of peoples who become millionaire) 

तुम्‍ही तुमच्‍या कारकीर्दीमध्‍ये खूप पैसा कमावण्‍यासाठी जे करू शकता ते करा आणि जर तुम्‍ही चांगल्‍या सवयी आत्‍मसात करत असाल तर एक दिवस तुम्‍ही लक्षाधिश नक्‍कीच होऊ शकता. जी लेाकं सकारात्‍मक मानसिकता (Mindset) ठेवतात त्‍यांनायशस्‍वी होण्‍याचे अनेक संधी मिळतात.

1990 मध्‍ये फक्‍त 5000 च्‍या जवळपास अमेरिकन लोकं मिलेनियर्स होती. पण 2000 साल उजाडला तेव्‍हा 50,00,000 (पन्‍नास लाख) अमेरिकन मिलेनियर्स झाले होते.  सर्वात महत्‍वाची गोष्‍ट तर ही होती की हे सगळेच्‍या सगळे स्‍वतःच्‍या हिंमतीवर श्रीमंत झाले होते.  यातल कोणीही जन्‍मतः श्रीमंत नव्‍हते. 

ही लोकं वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीहून आलेले होते.  काहीजण चांगले सुशिक्षित होते तर काहीजण खूप गरीब होते.  त्‍यांच्‍यावळ थोडं शिक्षण.  यातील काहीजण असेही होते जे दत्‍तक घेतलेले होते.  या लोकांमध्‍ये अनेक स्‍थलांतरित लोकं होती, जे मोकळ्या आकाशाखाली, मोकळ्या हातानी कामं शोधण्‍यासाठी अमेरिकेत आले होते. 

कोणत्‍याही मदतीशिवाय आणि विशेष कौशल्‍याशिवाय (Special Skills) या लोकांनी खूप मेहनत घेतली, त्‍यांना नीट इंग्रजी भाषाही बोलता येत नव्‍हती. तरीही त्‍यांनी त्‍यांच्‍या जीवनात खूप सुधारणा केल्‍या आणिखूप गोष्‍टी साध्‍य केल्‍या, प्रयत्‍न करून मिळविल्‍या.  कारण त्‍यांनी चांगल्‍या सवयीं अंगिकारल्‍या होत्‍या व त्‍यांचा दैनंदिन जीवनात सराव करत होते, आचरणात आणत होते.  अंमलबजावणी करत होते.

एकवेळी नाही झालं तर पुन्‍हा पुन्‍हा आणि यामुळेच शेवटी त्‍यांनी यशस्‍वी होवून दाखवलं. 

एक अशीच चांगली सवय जी तुम्‍ही सुरू करू शकता, ती म्‍हणजे बचत (saving).  जर तुम्‍ही प्रत्‍येक महिन्‍याला पगाराच्‍या 20% बचत करत असाल तर तुम्‍हाला बाकीच्‍या 80% पगारातून जगण्‍याची सवय होईल.  तुम्‍हाला यात थोडंही अवघड वाटणार नाही.  असं समजा की जर तुमचा पगार प्रत्‍येक महिन्‍याला 20,000 आहे तर त्‍यातील 20%  बचत करा.  या पैशाला हातही लावू नका.  बाकीच्‍या 16,000 मधून खर्च चालवा, भागवा.  एक बचत खाते बॅंकेत उघडा किंवा घरातच मुलांची पिगी बॅंक असते त्‍याप्रमाणे स्‍वतःसाठी बचतीच्‍या डब्‍ब्‍यात दरमहिन्‍याचे 20% रक्‍कम या पिगी बॅंक, डब्‍ब्‍यात टाकत राहा. 

जेव्‍हा तुम्‍ही बचत करता तेव्‍हा त्‍या पैशाबद्दल पुर्णपणे विसरा.  त्‍या पैशांना तुमच्‍या बजेटमध्‍ये, घरच्‍या अर्थसंकल्‍पामध्‍ये धरूच नका.  काहीही झालं तरी या पैशाला खर्च करू नका. 

काही महिन्‍यानंतर तुम्‍ही 16,000 रूपयांच्‍या पगारीत जगणं शिकाल. इथे फक्‍त स्‍वयंशिस्‍तीची गरज आहे.  अवघड आहे परंतू शक्‍य आहे. तुम्‍हाला वाटलं तर तुम्‍ही जास्‍त बचत करण्‍याचा प्रयत्‍न करू शकता.  स्‍वतःला आव्‍हान करा की तुम्‍ही 4,000 रूपये महिन्‍याला बचत कराल. आणि नंतर बचतीची रक्‍कम हळूहळू वाढवा.  मग दोन वर्षांनी जर तुम्‍ही तुमचं बॅंक खातं किंवा घरातील पिगी बॅंक पाहाल तर त्‍यात 96,000 रूपयांची बचत असेल.  आणि मग असंच तुम्‍ही ही हळूहळू आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र (financially independent) बनू शकता.   

 📗📘📙📕📖📑

 

आता पुढे भाग-2 मध्‍ये पाहूया, मिलियन डॉलर हॅबिट्स पुस्‍तकातील लक्षाधिकांशी सवय, 

तुम्‍हाला अधिकचे पैसे कमावून देतील आणि वेगाने बढती-प्रगती मिळवून देतील अशा सवयी (The habits that get you paid more & promote faster)


👉सारांश भाग-2

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive