जीवनात ध्येय कसे ठरवावे? वॉरेन बफेट् यांचा विद्यार्थी आणि सर्वांसाठी सल्ला

तुमचे फोकस आणि मेंटल स्टेट तुमची सर्वांत मोठी करन्सी आहे ज्याने याला चमकावलं त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. 

जीवनात ध्येय कसे ठरवावे?
वॉरेन बफेट् यांचा विद्यार्थी आणि सर्वांसाठी सल्ला

 


#Warren Buffet's "2 List" Strategy on #How to Maximize Your Focus
#Warren Buffett's 5-Step Process for Prioritizing
#How to Use the 5/25 Rule to Successfully Win at Life 

#5/25 Rule for Productivity
#Warren Buffett's Famous Advice

ध्येय कसे निश्तिच करावे? ध्येय-उद्देश्य-लक्ष्य कसे निवडावे?

वॉरेन बफेट् आपल्याला आपल्या गोल्स म्हणजेच ध्येयावर काम करण्यासाठी, ध्येय निवडण्याची, ध्येय ठरविण्याची अगदी सोपी परंतु परिणामकारक पद्धत सांगतात. वॉरेन बफेट् विसाव्या शतकातील सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार आहेत.  

आणि दरवर्षी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना आजही होते.  त्यांचा आर्थिक व्यवस्थापन अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक असे आहे हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यत त्यांनी हुशारीने केलेली गुंतवणूक आणि समजूतदारीचा परिणाम आहे कि, ते, दर तासाला जवळपास रुपये ९.७ कोटी रुपये कमावतात...!  

तर, आपण किमान एवढं तर म्हणूच शकतो की, पैसा आणि उत्पादकता (प्रोडक्टिव्हिटी) म्हणजेच कार्यक्षमता यांच्या बाबतीत आपल्याला वॉरेन बफेट् यांना सर्वोत्तम सल्लागार मानू शकतो.

चला तर मग, पाहूया वॉरेन बफेट् आपल्याला काय सांगतात ते..!

ही घटना माइक फ्लिंट यांच्यासोबत घटली, माइक मागील १० वर्षांपासून वॉरेन बफेट् यांचे वैयक्तिक पायलट आहेत आणि यापूर्वी माइक सुपर पॉवर देश अमेरिकेच्या चार अध्यक्षांचे पायलट राहिलेलं आहेत.  तर, ही गोष्ट निश्तिच आहे कि माइक त्यांच्या कामामध्ये सुपर-डुपर एक्स्पर्ट म्हणजेच सर्वोत्तम तज्ज्ञ असतील.

एकदाची गोष्ट आहे, जेंव्हा माइक त्यांच्या आयुष्य आणि कारकीर्द म्हणजेच लाईफ & करिअर बद्दल विचार करत होते. काहीसे द्विधा मनस्थितीत होते, तर वॉरेन बफेट यांनी त्यांना एक छोटीशी गोष्ट करायला सांगितली, जी पुढील प्रमाणे होती:

#स्टेप-१:

बफेट माइक यांना म्हणतात कि, तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही २५ गोल्स आपल्या करिअर मध्ये अचिव्ह करायची इच्छा आहे ते लिहून घ्या.  संपूर्ण प्रामाणिकपणे माइक यांनी त्यांच्या गोल्स ची यादी बनवून घेऊन आले. 


#स्टेप-२:
मग, बफेट म्हणतात, आता जे अत्यंत महत्वाचे गोल आहेत त्यांना सर्कल करून घेऊन या.  माइक अगोदरच सगळंकाही विचार करून, समजूनच ती यादी बनवून घेऊन आले होते.  मग त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यांचे टॉप ०५ गोल्स लिहून घेऊन आले.  

#स्टेप-३:
बफेट म्हणतात, आता तुमच्याजवळ दोन याद्या झाल्या.  एक, टॉप ०५ आणि दुसरी इतर २० गोल्स ची यादी.  बफेट मग माइक
यांना विचारतात,

 "आता मला सांगा कि तुम्ही हे गोल्स कसे अचिव्ह कराल? 


माईक म्हणतात, 

मी आत्तापासूनच आपल्या पाचही गोल्सवर काम करणे सुरू करिन आणि जेव्हाही वेळ मिळेल, मी इतर २० गोल्सवर फोकस करीन.  

बफेट म्हणतात, अगदी चूक..!
 

तुम्ही केवळ आणि केवळ टॉप ०५ गोल्स वरच फोकस करायचं..! ही जी दुसरी यादी आहे ती खरेतर (not to do list)  नॉट-टू-डू-लिस्ट आहे.  हे २० गोल्स ते सर्व डिस्ट्रॅकशन्स आहेत जे तुम्हाला टॉप ०५ गोल्स पासून दूर ने आहेत. मुख्य गोल्स पासून दूर करत आहेत.  हि ती यादी आहे जी तुम्ही करू इच्छिता परंतु खूपच गरजेचे नाहीत.  यासाठीच जेंव्हा तुम्ही ह्या लिस्टबद्दल विचार करत असाल तर सावधान व्हा..! आणि आपले लक्ष परत टॉप ०५ गोल्सवर लावा. केंद्रित करा. 


मित्रांनो, आहे कि नाही एकदम सोपं आणि परिणामकारक..!

स्टिव्ह जॉब्स म्हणतात, 

फोकस चा अर्थ आहे एका आयडिया वर टिकून राहणे आणि १०० नव्या आयडियाला इग्नोर म्हणजेच नजरअंदाज करणे. -स्टिव्ह जॉब्स

मग प्रश्न येतो कि, हि पद्धत काम का करते?

प्रत्येक गोष्ट जी आपण करत असतो, किंवा विचार करतो त्याची एक किंमत असते.  वेळ, ठिकाण, ऊर्जा, पैसा, फोकस काही ना काही तर खर्च होत आहे. आणि फोकस किंवा मेंटल स्टेट तुमची सर्वांत महत्वाची करन्सी आहे.  

यासाठीच, छोट्या छोट्या गोष्टी, निरागस, लहान वाटतात, खरे तर त्या जास्त धोकादायक असतात. कारण, त्या आपलं फोकस शोषून घेतात.  जसं, मोबाईलचं वेळोवेळी वाजणं, कोण काय म्हणाले?, आज काय होईल? उद्या काय होईल..! अशा गोष्टी मनामध्ये/मेंदूमध्ये चालणे..! वारंवार वेबसाईट चेक करणे कि किती व्हीव्ज (views) मिळाले, किती लोकांनी सबस्क्रिब (Subscribe) केलं, किती नवे प्रेक्षक वाढले, किती लोकांनी पाहिलं इत्यादी..!

पुढचा प्रश्न: यापासून सुटका कशी मिळवायची?

एक सवय लावून घ्या. आणि दिवसभरातील सर्वांत आवश्यक कामं ती असतात जी तुम्हाला तुमच्या गोल्सकडे ध्येयाकडे सर्वांत वेगाने द्रुतगतीने घेऊन जात असतात.  जोपर्यंत हि सर्व कामं संपत नाहीत, होत नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीही विचार करायचा नाही. 

तुम्ही कितीही यशस्वी व्यक्तीशी (हाय अचिव्हर्स) बोलून बघा, यांना जगरहाटीची, दुनियादारी याबद्दल जास्त काही देणं-घेणं नसतं, ते फक्त आपल्या गोल्सवर फोकस्ड असतात.  फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करत असतात.  

दिवसातील सर्वांत आवश्यक कामांना सर्वांत अगोदर करून घ्या.  ईट दॅट फ्रॉग, सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा, फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रथम कार्य प्रथम करा.

👉💡महत्वाचं:  तुम्ही या महिन्याच्या टॉप ०३ गोल्सपासून, ध्येयांपासून सुरु करू शकता, आणि परिणाम बघा.  तुमचे फोकस आणि मेंटल स्टेट तुमची सर्वांत मोठी करन्सी आहे ज्याने याला चमकावलं त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive