परेटो सिद्धांत किंवा 80/20 चा नियम -मराठी | 80/20 Principle or Pareto Principle (80/20 Rule) -Marathi

अर्ध्‍यावेळेत आणि कमी मेहनतीत जास्‍तीत जास्‍त परिणाम मिळतील, 80/20 नियम असे सांगतो की, तुमचे आलेले 80 टक्‍के परिणाम हे तुम्‍ही केलेल्‍या 20 टक्‍के कृतीने येत असतात. 

80/20 चा नियम
किंवा परेटो सिद्धांत

मराठी अनुवाद

पुस्‍तक सारांश मराठी

80/20 Principle or Pareto Principle -Marathi
By the Author Richard Koch 

HOW TO WORK LESS BUT ACHIEVE MORE
In Personal, Professional, Financial Business, Studies or Anything and Anywhere, Any Corner of Life THE 80-20 PRINCIPLE

The 80/20 Principle
The Secret of Achieving More with Less
Special Edition : 20th Anniversary

📗📘📙📖


विल्‍फ्रेडो परेटो हे एक अर्थशास्‍त्री होते,  १८९७ मध्‍ये इंग्‍लंडच्‍या संपत्‍ती वितरण व उत्‍पन्‍न यांवर ते अभ्‍यास करत होते.  याचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना एक गोष्‍ट लक्षात आली की, इंग्‍लंडची बहुतांश जमीन व पैसा-संपत्‍ती ही खूपच थोड्या लोकांकडे आहे.  खरेतर 80 टक्‍के जमीन-संपत्‍तीची मालकी ही केवळ 20 टक्‍के लोकांकडेच होती. 

ही अचंबित करणारी गोष्‍ट त्‍यांना समजताच त्‍यांनी याविषयी अधिक खोलवर शोधाभ्‍यास करण्‍याचा निश्‍चय केला आणि त्‍यांना असे आढळून आले की, ऐंशी/वीस चे तत्‍व जगामध्‍ये इतर खंड व देशांमध्‍येच नाही तर वेळ-काळ यांमध्‍येही हे 80/20 चे नियम खरोखरंच होतं. अपवाद होता फक्‍त पैशांचा. 

पैसा सोडून इतर गोष्‍टींना हे तत्‍व लागू होत होतं, जसे की, त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या बागेमध्‍ये 80 टक्‍के मटार किंवा वाटाणे हे केवळ 20 टक्‍केच वाटाण्‍याच्‍या शेंगापासून निघत होते. उत्‍पादित होत होते.  आणि तेव्‍हाच हा 80/20 चा सिद्धांत बनला होता ज्‍याला विल्‍फ्रेडो परेटो यांच्‍या नांवाने म्‍हणजेच 'परेटो प्रिंसिपल' किंवा 'परेटोचा सिद्धांत' या नावानेसुद्धा ओळखले जाते.   

व्‍यवसाय, नाते-संबंध, शिक्षण-अभ्‍यास, श्रम-मेहणत, आरोग्‍य अशा विविध क्षेत्रांमध्‍ये हा नियम शास्‍त्रीयदृष्‍ट्यासुद्धा जवळपास सगळीकडे लागू पडतो. 

80/20 नियम असे सांगतो की, तुमचे आलेले 80 टक्‍के परिणाम हे तुम्‍ही केलेल्‍या 20 टक्‍के कृतीने येत असतात.  हे आपल्‍या सामान्‍य विचारांच्‍या अगदी उलट आहे, म्‍हणजेच आपल्‍याला असे वाटते की आपण जेवढे काम करू तेवढे परिणाम येतील (more actions = more results) परंतू, खरंतर हे आहे की, आपल्‍याला आपल्‍या खूपच कमी कृतींमुळे, कामामुळे खूप जास्‍त परिणाम दिसून येतात. 

80% Results from 20% Actions

हे तत्‍व, नियम जेव्‍हा लोकांना कळू लागला तेव्‍हा कित्‍येकजणांनी त्‍या नियमाला इतरत्र लागू करून पडताळून पाहू लागले.  ब-याचशा गोष्‍टींवर शोधअभ्‍यास केला आणि त्‍यांना असे कळाले की जवळपास सर्वच गोष्‍टींमध्‍ये हा नियम लागू होत होता.  जवळपास प्रत्‍येक क्षेत्रामध्‍ये हा नियम काम करत असल्‍याचे त्‍यांना आढळून आले.

 

उदाहरणार्थ जसे की, 

  • 80 टक्‍के गुन्‍हे हे केवळ 20 टक्‍के गुन्‍हेगारांकडूनच होत असतात
  • 80 टक्‍के रस्‍त्‍यावरचे अपघात हे केवळ 20 टक्‍के चालकांकडून होत असतात
  • 80 टक्‍के घटस्‍फोटाचे प्रकरणं 20 टक्‍के विवाहित लोकांमुळे होत असतात
  • 80 टक्‍के ट्राफिक, रहदारी 20 टक्‍के रस्‍त्‍यांवरच होत असतो
  • 80 टक्‍के वेळा आपण आपल्‍याकडील 20 टक्‍के कपडेच घालत असतो 

आणि अशीच असंख्‍य न संपणारी उदाहरणं आपल्‍याला पाहायला मिळतील, तरी अजून काही उदाहरणं जाणून घ्‍या... 

  • जगातील 80 टक्‍के मद्य केवळ 20 टक्‍केच लाकंच पित असतात 
  • 80 टक्‍के अन्‍न व खनिजे आपल्‍याला 20 टक्‍के जमीनीतून येत असते 
  • 80 टक्‍के पाऊस 20 टक्‍के  ढगांमधूनच पडत असतो 
  • 80 टक्‍के लोकांचे आकर्षण 20 टक्‍के नट-नटी, सिनेकलाकार व अभिनेते असतात
  • 80 टक्‍के शोध हे केवळ 20 टक्‍के शा‍स्‍त्रज्ञच लावत असतात आणि आता शेवटचं 
  • 80 टक्‍के विकली जाणारी पुस्‍तकं ही केवळ 20 टक्‍के लेकखकांची असतात 

नेमका आकडा पुढे-मागे होऊ शकतो पंरतू हे तत्‍व हेच सांगतं की, कमी गोष्‍टीच जास्‍त उत्‍पदान देत असतात (less gives more). 

 


80/20 चा हा नियम आपल्‍याला कामंच करू नका असं शिकवत नाही, किंवा असंच काही तरी सांगत नाही, खरं तर हा नियम आपल्‍याला अशी कामं बंद करण्‍यास सांगतो किंवा अशी कामं ज्‍यांच्‍यामुळे आपल्‍याला कमी परिणाम मिळत आहेत अशा कामांवर कमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे.  आणि अशी कामं जास्‍त करायला पाहिजे जी आपल्‍याला जास्‍त परिणाम मिळवून देतील. 

 

व्‍यवसाय व उद्योगासंबंधित क्षेत्रात 80/20 चा नियम

व्‍यवसाय व उद्योगासंबंधित क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्‍यास हा नियम पुर्वी उद्योग-धंदा क्षेत्रासंबंधित गोष्‍टींवर वापरला जात असे. कालांतराने मग हे 80/20 चे तत्‍व इतर गोष्‍टींनाही लागू करण्‍यात येऊ लागले, वापरले जाऊ लागले. 

नवउद्योजक, नव-व्‍यावसायिक अधिकतर अशा चूका करतात की, त्‍यांचा पैसा, शक्‍ती आणि वेळ अशा गोष्‍टींवर खर्च करतात नवउद्योगाच्‍या सुरूवातीला ज्‍यांच्‍यावर एवढं खर्च करायची गरजच नसते.   

उदाहरणार्थ, 

कंपनीचा, उद्योगाचे नाव काय असायला पाहिजे? कंपनीचा लोगो कसा असायला पाहिजे? संकेतस्‍थळ कसे दिसायला पाहिजे? इत्‍यादी सुरूवातीला तरी अनावश्‍यक गोष्‍टींवर वेळ, शक्‍ती व पैसा खर्च करणे टाळले पाहिजे. 

ह्या गोष्‍टीही आवश्‍यक आहेत परंतू फक्‍त ह्याच गोष्‍टींना पाहून लोकं तुमचे उत्‍पादन अथवा सेवा विकत घेणार नाहीत. आणि तुम्‍हाला परिणामदेखिल मिळणार नाहीत. 

खरेतर व्‍यवसाय, उद्योगाच्‍या सुरूवातीलाच तुमचे ध्‍येय असायला पाहिजे की, तुमच्‍या उत्‍पादनाला किंवा सेवेला चांगल्‍याहून उत्‍तम व उत्‍तमहून अति-उत्‍तम, अप्रतिम कसे बनवायला पाहिजे या गोष्‍टींवर अधिक लक्ष असायला पाहिजे. जेणेकरून यामुळे लोकांना तुम्‍ही देत असलेल्‍या उत्‍पादन व सेवेमुळे त्‍यांना त्‍यांचे आयुष्‍य सहज, अधिक चांगले बनवू शकतील, उत्‍तम आयुष्‍य जगू शकतील.

आणि हे केल्‍यानंतर तुम्‍हाला विपणन-मार्केटिंग आणि जाहिरात-प्रमोशन आणि इतर तत्‍सम गोष्‍टी गरजेनुसार करायला पाहिजे आणि तेही फक्‍त अशा 20 टक्‍केच व्‍यासपीठ व गोष्‍टींवर लक्ष ठेवून ज्‍यामुळे तुम्‍हाला अधिकाधिक परिणाम व प्रतिसाद मिळू शकेल. 

या पुस्‍तकातून अधिक काही गोष्‍टी ज्‍यांना आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्‍या पुढीलप्रमाणे आपण शिकू शकतो

तुमचा 80 टक्‍के नफा-फायदा तुम्‍हाला तुमचे 20 टक्‍के ग्राहक मिळवून देतात यासोबतच 20 टक्‍के ग्राहक 80 टक्‍के तक्रारी करणारे असतील, तर तुम्‍हाला ह्या 20 टक्‍के लोकांवर जास्‍त लक्ष द्यायला पाहिजे. 

सरतेशेवटी, आपल्‍याला अशा 20 टक्‍के कामावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जे आपल्‍याला 80 टक्‍के नफा, परिणाम मिळवून देतात. 

👉Focus on 20% which gives you 80% Results 


सामाजिक जीवनात आणि आनंदासाठी 80/20 चा नियम

ब-याचजणांना असे वाटत असते की जेवढे अधिक मित्र असतील तेवढे अधिक संपर्क व तेवढे आपल्‍यासाठी चांगले असते. आणि यासाठीच काहीजण सगळ्यांसोबत मैत्री करत असतात. सगळ्यांसोबत वेळ घालवायला पाहतात.  ब-याचवेळा अशा व्‍यक्‍तींसोबतसुद्धा ज्‍यांच्‍या सहवासामुळे, संगतीमुळे, सोबतीमुळे आपल्‍याला तेवढं काही शिकायला मिळत नाही, आनंद, मजा येत नाही तरीही. 

असं केल्‍याने कालांतराने त्‍यांना कळून चुकतं की असं केल्‍यानं ते स्‍वतःचा खूप वेळ वाया घालवत आहेत.  आणि यामुळेच ते त्‍यांची स्‍वतःची इतर महत्‍वाची कामं करू शकत नाहीत जे त्‍यांना करायला पाहिजे हे त्‍यांना कळून चुकते. 

खरं तर आपला मेंदू अशापद्धतीने 'प्रोग्राम' केला गेला आहे की, आपल्‍याला वाटत असते जास्‍त म्‍हणजेच चांगले (more = better) जे की चुकीचे आहे.  परेटोच्‍या या 80/20 च्‍या नियमानुसार आपल्‍या आयुष्‍यातील 80 टक्‍के आनंद, मजा, सामाजिक परिपुर्णता ही केवळ आपल्‍या 20 टक्‍केच मित्रांमुळे येत असते. 

म्‍हणूनच, खूपसारे सर्वसाधारण मित्र बनविण्‍याऐवजी, त्‍यांच्‍यासोबत वेळ घालवण्‍याऐवजी, तुम्‍हाला फक्‍त त्‍या 20 टक्‍केच मित्रांसोबत किंवा लोकांसोबत वेळ व्‍यतित करायला पाहिजे ज्‍यांच्‍यामुळे तुम्‍हाला खरोखरच चांगलं अनुभव देत असतात. आणि ज्‍यांच्‍यासोबत वेळ घालवल्‍यानंतर तुम्‍हालाही आनंद होईल, मजा येईल. 

यामुळे होईल काय, तर, तुमचा मोलाचा आणि महत्‍वाचा वेळ वाचेल ज्‍याचा सदुपयोग तुम्‍ही इतर गोष्‍टी जसे शरिराच्‍या आरोग्‍यासाठी व्‍यायाम करणे, मन-मेंदूच्‍या आरोग्‍यासाठी वाचन करणे, नव-नवे कौशल्‍य शिकणे, आत्‍मसात करणे, स्‍वतःचा विकास,  वाढ होईल अशा परिणामकारक, उत्‍पादकता वाढविणा-या गोष्‍टींवर वेळ देऊ शकता.

 

अभ्‍यास व शिक्षणासाठी 80/20 चा नियम 

आजही काही विद्यार्थी असतात जे ऐन परिक्षेच्‍या तोंडावर पुस्‍तक काढून रात्री अभ्‍यास करत बसतात. तर त्‍यांच्‍या अगदी उलट असेही काही विद्यार्थी असतात जे दिवसातून चार ते सहा तास अभ्‍यास करत असतात. परंतू, जेव्‍हा निकाल लागतो तेव्‍हा दोघांच्‍याही गुणांमध्‍ये फारकाही फरक नसतो.  

तर पहिल्‍या विद्यार्थ्‍याचे गुण जास्‍त किंवा दुस-याच्‍या जवळपासच असण्‍याचे कारण पहिला विद्यार्थी काही खूप हुशार, बुद्धिमान नव्‍हता तर तो नकळतपणे, अजाणतेपणी परेटोच्‍या या 80/20 तत्‍वाचा वापर करत होता. 

पहिल्‍या विद्यार्थ्‍याने अशा दोन गोष्‍टी केल्‍या ज्‍यांच्‍यामुळे कमी तास अभ्‍यास करूनही त्‍याला असे चांगले परिणाम मिळाले त्‍यापैकी पहिली गोष्‍टी अशी की, तो 80/20 चा नियम नकळत वापरत होता, जसे की, नेमकं काय-काय अभ्‍यास करायचं आहे?  

दुसरा विद्यार्थी परिक्षेआधी सर्वकाही वाचायचं प्रयत्‍न करत असे. ज्‍यामुळे व्‍हायचं काय तर, त्‍याला सर्वकाही वाचन केल्‍यामुळे त्‍याला एकाही प्रश्‍नाचे उत्‍तर चांगल्‍यारितीने देता येत नव्‍हते आणि परिक्षेत उत्‍तरही योग्‍यरितीने लिहू शकत नव्‍हता.  तर या उलट, पहिला विद्यार्थी मागच्‍या वर्षीचे प्रश्‍नपत्रिका, सरावसंच प्रश्‍न, व परिक्षेत येऊ शकतील अशा महत्‍वाच्‍या प्रश्‍नांना शिक्षकांना विचारून घेत असे आणि मग त्‍याच प्रश्‍नांना चांगल्‍यारितीने पाठ करून, अभ्‍यास करूनच इतर प्रश्‍नांना लक्ष देत होता. 

दुसरी गोष्‍ट तो अशी करायचा ज्‍यामध्‍ये 80/20 नियमाचा वापर करत असे अभ्‍यासासाठी तो म्‍हणजे, अभ्‍यासाची वेळ. 

दुसरा विद्यार्थी जो दिवस-रात्र अभ्‍यास करण्‍याचा प्रयत्‍न करत असे, परंतू, एकावेळी माणूस एकाच कामावर जास्‍तवेळ लक्ष देता येत नसल्‍यामुळे अभ्‍यास करतेवेळी त्‍याचे लक्ष विचलित होत होते.   ज्‍यामुळे कित्‍येक तास अभ्‍यास केल्‍यावरही त्‍याचे अभ्‍यास चांगले होत नसे. 

तर या उलट पहिल्‍या विद्यार्थ्‍याला हे माहित होते की तो फक्‍त सकाळी 9 ते सांयंकाळी 6 वाजे दरम्‍यानच चांगले अभ्‍यास करू शकतो.  त्‍याव्‍यतिरिक्‍त इतर वेळा त्‍याला अभ्‍यास करणे जमत नाही.  त्‍यामुळे तो याच वेळेत लक्षकेंद्रित करून अभ्‍यास करत असे.  लक्ष विचलित करणा-या मोबाईल फोन, सामाजिक माध्‍यमं जसे फेसबुक, व्‍हाट्सऍप, इन्‍स्‍टाग्राम इत्‍यादी गोष्‍टींना दुर्लक्षित करून, अनावश्‍यक गोष्‍टींना बाजूला सारून अभ्‍यास करत होता. 

ज्‍यावेळी त्‍याला असे वाटत असे की आता कंटाळा येत आहे, आता माझे लक्षकेंद्रित होत नाहीए, तेव्‍हा तो, अधुन-मधून तो काहीवेळ विश्रांतीदेखिल घेत होता आणि अशाच इतर गोष्‍टी करत होता जसे, गच्‍चीत किंवा घराबाहेर काही वेळ चालण्‍यामुळे, तोंडावर थंड पाणी मारणे, अशा गोष्‍टी ज्‍यामुळे त्‍याला ताजेतवाने वाटत असे, ज्‍यामुळे त्‍याला अधिक कंटाळा व थकवा येणार नाही अशा गोष्‍टी करत तो अभ्‍यास करत असे. 

असे केल्‍यानेच त्‍याचा निकाल दुस-या विद्यार्थ्‍यापेक्षा चांगला लागला होता. 

 

आता 80/20 च्‍या नियमाला थोडक्‍यात निष्‍कर्ष सांगायचे झाल्‍यास, 

तुम्‍हाला तुम्‍ही करत असलेल्‍या अशा कोणत्‍याही कामात ते 20 टक्‍के गोष्‍टी शोधायचा प्रयत्‍न कराचं आहे आणि त्‍यावर, त्‍या 20% कामावर लक्ष केंद्रित करून चांगल्‍या रितीने करायला शिका.  असे केल्‍याने तुम्‍हाला अर्ध्‍यावेळेत आणि कमी मेहनतीत जास्‍तीत जास्‍त परिणाम मिळतील. आणि उर्वरित अर्धावेळ तुम्‍हाला मोफत मिळेल ज्‍याचा उपयोग तुम्‍ही इतर गोष्‍टी शिकण्‍यात, करण्‍यात वापरू शकता. आणि आनंदित राहू शकता. 

 

📗📘📙📖
-सारांश समाप्‍त- 

 

धैर्यपुर्वक परेटोचे तत्‍व किंवा 80/20 चा नियम
या पुस्‍तकाचे सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले खूप-खूप धन्‍यवाद. 

पुस्‍तकाचे सारांश देखिल परेटोच्‍या याच 80/20 च्‍या नियमावर आधारित आहे असे वाटते का? कारण संपूर्ण पुस्‍तकाचे सार, गाभा इथे सांगण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे, तरी संपूर्ण पुस्‍तक वाचल्‍यास अधिक उदाहरणं, तपशिलासकट, सविस्‍तर माहिती मिळेल.  यासाठी कृपया पुस्‍तक खरेदी करा व वाचा.  आपल्‍या ज्ञानात नक्‍कीच भर पडेल अशी आशा आहे. 

  

इतर संबंधितः 




 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive