कार्ल मार्क्स - राहुल सांकृत्यायन
कार्ल
मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवा मुहंमद पैगंबर
यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्या मानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि
आशा-आकांक्षांवर या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं!
कार्ल मार्क्स
राहुल सांकृत्यायन
मराठी अनुवाद
डॉ. मीना शेटे-संभू
कार्ल मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवा महंमद पैगंबर यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्या मानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि आशा-आकांक्षांवर या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं!
अजूनही संपूर्ण कम्युनिझमचा पाडाव केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्र करीत असली, तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठे करावाच लागतो. त्याच्या बाजूने तरी किंवा त्याच्याविरुद्ध तरी! कोणीतरी म्हटल्याचं आठवतंय, 'एक तर तुम्ही त्याच्या बाजूने तरी असाल किंवा त्याच्या विरुद्ध; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे अशक्य आहे!'
- अच्युत गोडबोले
मार्क्सने विचाराऐवजी ‘पदार्थ’ महत्त्वाचा मानला. पदार्थ हेच मार्क्सने अंतिम सत्य मानले. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ त्याने आधी भूमी पाहिल्यावरच माणसाच्या मनात बी पेरण्याचा विचार आला असा दृष्टांत दिला.
कार्ल मार्क्स हे एक जर्मन अर्थशास्त्री, वैज्ञानिक, वकील, लेखक होते. त्यांनी कम्यूनिझम अथवा समाजवाद या विचारधारेला जन्म दिला. मानवतावादी दृष्टीकोनातून समाजवाद व साम्यवाद यासारख्या नव्याच सिद्धांतांचे प्रतिपादन केले आणि एका नव्या शासन व्यवस्थेची पायाभरणी केली. ज्याला आज आपण कम्यूनिस्ट शासन प्रणाली या नावाने ओळखतो. आणि साम्यवादाच्या आधुनिक अवधारणेचा विकास केला.
कार्ल मार्क्स यांच्या 'दास कॅपीटल' ह्या पुस्तकामुळे आधुनिक जगात अत्यंत जास्त प्रभाव टाकला, ज्यामुळे जगातील अनेक देशांना त्यांच्या या विचारधारेमुळे प्रभावीत केले. आणि समाजात राहत असलेल्या गरिबांच्या पुनरूथ्थानासाठी कित्येक देशांनी समाजवाद स्विकार केला आणि समाजवादी देश बनले, ज्यामध्ये रशिया आणि चीन हे देश प्रमुख होते.
कार्ल मार्क्स यांचा जन्म 05 मे, 1818 साली जर्मनी येथे एका यहुदी-ज्यू कुटूंबात झाला होता, परंतू 1824 वर्षी त्यांच्या परिवाराने ईसाई-ख्रिस्ती धर्म स्विकार केला.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी बॉन विश्वविद्यालयात प्रवेश केला. पुढे त्यांनी साहित्य आणि इतिहास-दर्शनशास्त्राचा अभ्यास बर्लिन विश्वविद्यालयातून केला. याच दरम्यान ते हेगल यांच्या विचारांमुळे प्रेरित आणि प्रभावित झाले. 1841 साली त्यांनी त्यांची डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जेनी मोन यांच्याशी 1843 साली विवाह केला आणि पॅरिस येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी एका मासिकासाठी हेगलच्या दर्शनशास्त्रावर आधारित लेख लिहायला सुरुवात केली. त्यांच्या सुधारणावादी व पुरागामी विचारांमुळे फ्रान्सच्या शासनाने त्यांना देशातून बाहेर काढून टाकले.
मग ते पॅरिसवरून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आले आणि तिथेच त्यांनी मजूरांची संघटना प्रस्थापित केली जे नंतर कम्यूनिस्ट लिग या नावाने वर आले. 1848 साली त्यांनी दैनिकांमध्ये लिहायला सुरूवात करून लोकांमध्ये समाजवादी विचारधारा पेरायला लागले. जर्मनीमध्ये समाजवादी क्रांतीचा संदेश द्यायला प्रारंभ अशा प्रकारे केला.
1849 साली अशा क्रांतीच्या संदेशामुळे त्यांना जर्मनीमधून निष्कासीत करण्यात आले. यानंतर ते लंडन येथे आले आणि आयुष्यभर तिथेच मुक्काम केला. लंडनमध्येही त्यांनी कम्यूनिस्ट लिेगच्या स्थापनेचा प्रयास केला, परंतू त्यामध्ये फूट पडल्याने ती बंद करावी लागली. 1864 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय मजूर संघाच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका निभावली होती. परंतू, आंदोलन आणि फ्रेंच-जर्मन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय मजूर संघ तुटला, भंग पावला.
1867 या वर्षी कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या दास कॅपीटल या पुस्तकाला चार खंडांमध्ये प्रकाशित केले. आजच्या रशियाच्या राजधानी म्हणजेच मॉस्कोमधून प्रकाशित केले गेले. त्यांनी अजूनही एक पुस्तक लिहिली ज्याचे नांव आहे 'द कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो', या पुस्तकाला वाचूनच संपूर्ण विश्वभर समाजवादाचा विस्तार झाला.
चीन मध्ये माओ-त्से-तुंग, भारतात नेहरू, तर रशियामध्ये लेनिन अशा जगभरातील नेत्यांनी कार्ल मार्क्स यांच्या समाजवादी विचारधारेला घेऊन शासन चालविले. 14 मार्च 1883 साली कार्ल मार्क्स यांच्या वादळी आयुष्याचा अंत झाला. त्यांचे संपुर्ण आयुष्य नेहमीच भयानक आर्थिक आणि राजनितीक संकटांमध्येच होते.
सामान्य शब्दांत बोलायचे झाल्यास, कार्ल मार्क्स यांनी जो समाजवादाचा सिद्धांत दिला होता, तो समाजात चालत असलेला, समाजातील श्रीमंत, धनवान आणि दरिद्री, गरिब यांच्यातील खोलवर वाढत जाणारी दरीला थांबविण्यासाठी होता. जे श्रीमंत आहेत ते अधिकाधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि जो गरिब आहे तो अधिकाधिक गरिबच का होत चाललेला आहे हे थांबविण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
त्यांच्यामते समाजामध्ये उत्पन्नाचा समान वितरण व्हायला पाहिजे, आणि श्रीमंत आणि धनधांडग्यांवर शासनाचे नियंत्रण असायला पाहिजे, ज्यामुळे ते गरिबांवर अत्याचार करू शकनार नाहीत. त्यांनी गरिब मजूर, शेतकरी आणि समाजात मागास राहिलेल्या लोकांसाठी समाजवाद विचारधारेला जन्म दिला होता.
कित्येक अर्थशास्त्री असे म्हणतात की, कार्ल मार्क्स यांची समाजवादी विचारधारा समाजाच्या विकासाच्या आड येणारी सर्वात मोठी अडचण होती. कारण जगातील इतर विकसित देश जसे इंग्लंड आणि अमेरिकासारखे देश समाजवादी विचारधारेविरूद्ध पूंजीवादी विचारधारेच्या अर्थव्यवस्थेला आत्मसात करतात.
परंतू, रशिया आणि चीन याला अपवाद आहेत. चीन आज अमेरिकेपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीए. आपला भारत देखिल 1991 पर्यंत एक समाजवादी विचारधारेचा देश राहिलेला आहे परंतू, भारतात समाजवादी सिद्धांतांना चीन सारखे लागू करण्यात अपयशी ठरला. आणि 1991 साल येता येता भारत कर्जबाजारी झाला होता.
आणि यानंतर भारताने आपल्या अर्थव्यवस्थेला मुक्त केले ज्यामुळे आज आपण असे म्हणू शकतो की, 30 टक्के समाजवादी, 70 टक्के पूूंजीवादी यांच्या मिश्रणाने आज मिश्र अर्थव्यवस्था चालवत आहोत.
समाप्त
इतर संबंधित दुवेः
टिप्पण्या