पैशांचे मनोविज्ञान- द सायकॉलॉजी ऑफ मनी- मॉर्गन हाऊसेल -पुस्‍तक सारांश- मराठी

लोकांचा पैशांबद्दलचे वर्तन आणि पैशांना हाताळण्‍याच्‍या पद्धती
पैशांना योग्‍यरितीने हाताळण्‍याची कला तुमच्‍या हुशारीने नव्‍हे, तर पैशांना घेऊन तुमचे वर्तन यावर ते ठरत असते.

पैशांचे मनोविज्ञान
लोकांचा पैशांबद्दलचे वर्तन आणि पैशांना हाताळण्‍याच्‍या पद्धती

लेखक- मॉर्गन हाऊसेल

पुस्‍तक सारांश- मराठी 

 लोकं जेवताना, प्रवासात, बैठक चालू असताना निर्णय घेत असतात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्‍या निर्णयात अप्रत्‍यक्षपणे भाग घेत असतात.

पैशाचा योग्‍य वापर हा तुम्‍हाला असलेल्‍या माहितीशी फारसा संबंधित नसतो.  तो तुम्‍ही कसे वागता याच्‍याशी संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्‍यंत अवघड असते. 

 #अर्थात #धनसंपदा #धन की बात

पैशाचा योग्‍य वापर हा तुम्‍हाला असलेल्‍या माहितीशी फारसा संबंधित नसतो.  तो तुम्‍ही कसे वागता याच्‍याशी संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्‍यंत अवघड असते.  विशेषतः हुशार लोकांना पैशाचे नियोजन, त्‍याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्‍टीमध्‍ये गणित आणि आकडेमोड आवश्‍यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते.   

यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निणय घ्‍यायचा हे ठरवले जाते, पण व्‍यवहारात लोक स्‍प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत.   

ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेततात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्‍या निर्णयात अप्रत्‍यक्षपणे भाग घेत असतात.

पैशाचे मानसशास्‍त्र या पुस्‍तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्‍या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्‍टी सांगत आहेत, शिवाय आयुष्‍यातील महत्‍वाच्‍या विषयापैकी एक अशा ‘’पैसा’’ या विषयावर महत्‍वाचे धडे आपल्‍याला देत आहेत.

द सायकॉलॉजी ऑफ मनी
The Psychology of Money

Author – Morgan Housel

Book Summary in Marathi

मनाचं आणि पैशांचं काही देणं-घेणं असतं का? आपल्‍या विचारांचा, आपल्‍या दृष्‍टीकोनाचा प्रभाव आपल्‍या निर्णयांवर, पैशांवर कसा होतो, त्‍याचा योग्‍य मार्गाने स्‍वतःसाठी उपयोग कसा करता येईल? यासाठी मॉर्गन हाऊसेल लिखित पुस्‍तक ‘’द सायकॉलॉजी ऑफ मनी’’, ‘’पैशांचे मनोविज्ञान’’.

वाचकांनो आज आपण पाहणार आहोत गुंतवणूक करण्‍याअगोदर आपले विचार, दृष्‍टीकोन, मनोवृत्‍ती यांचा आणि पैशांचा संबंध, मूलप्रवृत्‍तींचा संबंध कसा आहे हे समजून घेऊन मगच गुंतवणूक क्षेत्रात पाऊल कसा ठेवावा. तोपर्यंत गुंतवणूक करू नये असा लेखकाचा सल्‍ला आहे. चला तर मग पाहुया पैशांबद्दलचे आपले मनोविज्ञान या पुस्‍तकाचे सारांश....

पैशांना योग्‍यरितीने हाताळण्‍याची कला तुमच्‍या हुशारीने नव्‍हे,
तर पैशांना घेऊन तुमचे वर्तन यावर ते ठरत असते.

कधी-कधी एक कुशाग्र बुध्‍दीचा, अतिहुशार व्‍यक्‍तीदेखिल पैशांना गमावून बसतो तर कधी-कधी एक सर्वसाधारण- सामान्‍य व्‍यक्‍तीदेखिल श्रीमंत, धनवान बनू शकतो.

उदा. रोनाल्‍ड रिड जे एका छोट्याश्‍या गावातील होते आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील ते पहिले पदवीधारक होते.  त्‍यांनी जीवनाच्‍या सुरूवातीला आपल्‍या गाड्यांच्‍या गॅरेजमधे काम केले. मग त्‍यांनी साफसफाई करण्‍याचे व इतर कामे केली. त्‍यांचे जीवन सर्वसामान्‍य होते.  परंतू त्‍यांच्‍या मृत्‍यूवेळी त्‍यांच्‍याकडे ०८.०० आठ मिलियन डॉलर एवढी संपत्‍ती होती, जी त्‍यांनी त्‍यांच्‍या जीवनभरात बचतीद्वारे आणि गुंतवणूकीद्वारे ती संपत्‍ती कमावलेली होती.  

आणि त्‍यांच्‍या अगदी उलट व्‍यक्‍तीमत्‍व होतं रिचर्ड फुस्‍कॉन यांचं.  जे की जगद्विख्‍यात हार्वर्ड विश्‍वविद्यालयातून उच्‍चशिक्षित MBA होते. ते अतिश्रीमंत तर होतेच त्‍यासोबतच त्‍याची जीवनशैलीदेखिल उच्‍चभ्रू आणि विलासी अशी होती.  २००८ च्‍या जागतिक आर्थिक मंदीत ते दिवाळखोर झाले, त्‍यांची सर्वच संपत्‍ती निलाम झाली.

रोनाल्‍ड रीड एक सहनशील गुंतवणूकदार होते, तर रिचर्ड फुस्‍कॉन एक लोभी लक्षाधीश होते.  फायनान्‍स किंवा वित्‍त हा विषय भौतिकशास्‍त्र किंवा रसायनशास्‍त्रासारखा ‘’हार्ड सायन्‍स’’ अवघड शास्‍त्र नसतो. तर तो ‘’सॉफ्ट-स्‍कील’’ असतो.

कारण वस्‍तू आणि रसायने विचार करत नाहीत परंतू, लोकं-माणसं विचार करत असतात.  म्‍हणूनच फायनान्‍स-वित्‍त-आर्थिक अशा गोष्‍टी लोकांच्‍या वर्तनावर आधारित असतो. आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा जीवनानुभव वेगवेगळा असतो.

जर तुम्‍ही २००८ या वर्षी भांडवली बाजारात पैसा लावला असता आणि रिसेशनमुळे-मंदीमुळे तुमचं नुकसान झालं असेल तर असे होऊ शकते की जीवनात तुम्‍ही नंतर शेअर बाजारात गुंतवणूकच करणार नाही, याची दाट शक्‍यता आहे.

द्वितीय विश्‍वयुद्धाच्‍या समाप्‍तीनंतर जर्मनी आणि जापानची अर्थव्‍यवस्‍था ढासाळली होती. परंतू, अमेरिकेची अर्थव्‍यवस्‍था मात्र शिखरावर होती, वाढत होती.  त्‍यामुळेच त्‍यावेळी जर्मनी आणि जापानमध्‍ये राहणा-या लोकांचे अनुभव वेगळे असतील आणि अमेरिकेत राहणा-या लोकांचे अनुभव वेगळे असतील.

प्रत्‍येक आर्थिक निर्णय माणसाच्‍या मेंदूमध्‍ये चालणा-या कथेवर-विचारांवर आणि त्‍या क्षणी त्‍याला काय वाटत आहे ह्यावर ठरत असते.

अमेरिकेमध्‍ये गरिबीरेषेखालील लोकं वार्षिक १२-लाख डॉलर एवढी रक्‍कम लॉटरीमध्‍ये खर्च करून टाकतात.  आणि लॉटरी लागण्‍याची शक्‍यता, संभवनीयता लाखात एक अशी असते..

तर ह्याउलट अगदी अत्‍यावश्‍यक, आणिबाणीच्‍या अथवा गरजेच्‍या वेळी हेच ४०% चाळीस टक्‍के गरिब लोकं ४०० डॉलरसुद्धा जमवू शकत नाहीत..

मग साहि‍जकच तुम्‍ही विचार कराल, ते त्‍या लॉटरीमध्‍ये पैसा टाकण्‍याऐवजी त्‍या पैशांना बचत का करत नाहीत? कारण त्‍यांच्‍या हिशोबाने त्‍यांची परिस्थिती फक्‍त लॉटरीच बदलू शकते.  आणि लॉटरीमध्‍ये धोका कमी आहे परंतू बक्षिस अथवा परतावा खूप अधिक आहे.

  • LOTTERY Low Risk High Return or Reward

लोकांच्‍या मनोवृत्‍तीवरील निर्भरतेमुळे आर्थिक निष्‍कर्ष, परिणाम हे आकडेमोडीवर कमी आणि नशीब व जोखीम यांवर अधिक आधारित असतात.

आता येथे नशीबवान होण्‍याचे एक उत्‍कृष्‍ट उदाहरण आहेत बिल गेट्स...!

बिल गेट्स ज्‍या शाळेत जात होते तेथे एकच संगणक त्‍यावेळी होतं.  त्‍याकाळात एखाद्या शाळेत संगणक असण्‍याची संधी अथवा शक्‍यता लाखात एक म्‍हणजेच One in a Million अशी होती. तिथे बिल गेट्स आठव्‍या वर्गापासूनच प्रोग्रॅमिंग करत होते तर त्‍या काळातील कित्‍येक संगणक अभियंत्‍यांकडे संगणक पाहायलासुद्ध मिळत नव्‍हते.

जर तुम्‍हाला एक चांगला गुंतवणूकदार व्‍हायचं असेल, तर तुम्‍हाला दोन गोष्‍टी कराव्‍या लागतील.

  • पहिली गोष्‍टः तुम्‍हाला तुमच्‍या गुंतवणूकीचा कालावधी दीर्घ ठेवायला पाहिजे. Time Horizon of Investment is Long Term
  • दुसरी गोष्‍टः तुम्‍हाला तुमच्‍या काही गुंतवणूकीतून नुकसान सहन करण्‍यासाठी स्‍वतःला मानसिकदृष्‍ट्या तयार करायला पाहिजे. Be mentally prepared and ready to handle losses

चला तर मग पहिल्‍यांदा गुंतवणूकीच्‍या कालावधीबद्दल पाहुया...

वॉरेन बफेट् जे जगातील क्रमांक एकचे गुंतवणूकदार म्‍हणून ज्‍यांची ओळख आहे ते त्‍यांच्‍या संपत्‍तीचे कारण फक्‍त त्‍यांचे हुशार मेंदूच (हुशारी-बुद्धी) नव्‍हे तर वेळ-कालावधीदेखिल आहे.  त्‍यांनी वयाच्‍या दहाव्‍या वर्षापासून गुंतवणूकीची सुरूवात केली होती.

त्‍यांनी दहाव्‍या वर्षापासूनच गुंतवणूकीची सुरूवात केली होती आणि वयाच्‍या तीस वर्षापर्यंत येता-येता त्‍यांच्‍याजवळ एक मिलियन डॉलर एवढी संपत्‍ती होती. वयाच्‍या ८३ वर्षांपर्यंत त्‍यांनी ५८ मिलियन डॉलर एवढी संपत्‍ती कमावली होती. त्‍यांच्‍या ह्याच चढत्‍या वाढीला जर आपण घेतलं, आणि आपण असं गृहित धरलं की त्‍यांनी वयाच्‍या १०व्‍या वर्षापासून नव्‍हे तर वयाच्‍या ३०व्‍या वर्षापासून गुंतवणूकीची सुरूवात केली असती, तर त्‍यांच्‍याजवळ आज अधिकाधिक २० मिलियन डॉलर एवढी रक्‍कमच राहिली असती.

Compounding अथवा चक्रवाढ ज्‍याला जगातील आठवे आश्‍चर्यदेखिल म्‍हटले जाते, ते तुमच्‍या वेळेच्‍या कालावधीवर आधारित असते. ह्यासाठीच आपल्‍या गुंतवणूकीला न छेडता- दीर्घावधीपर्यंत वाढ होण्‍यासाठीचा वेळ द्या.

चांगल्‍या गुंतवणूकीचा दुसरा आयाम म्‍हणजे, आपण केलेल्‍या गुंतवणूकीच्‍या निर्णयांमधून काही निर्णय अयशस्‍वी झाल्‍यास मानसिकदृष्‍ट्या तयार असणे.

आजकाल प्रत्‍येकजण म्‍युच्‍युअल फंड मध्‍ये गुंतवणूक करत असतो. कोणत्‍याही म्‍युच्‍युअल फंडच्‍या पोर्टफोलिओमधील कित्‍येक कंपन्‍या चांगला परतावा देऊ शकत नाहीत, त्‍या अयशस्‍वी होतात परंतू, तरीही त्‍या फंडचा रिटर्ण-परतावा शेवटी चांगलाच असतो.  कारण उर्वरित कंपन्‍या एवढा परतावा देतात की तोट्यातील कंपन्‍यांच्‍या नुकसानीलादेखिल भरून उरत असतात.

डिस्‍ने जी एनिमेशनपट बनविणारी एक खूप मोठी कंपनी आहे. सुरूवातीला ह्या कंपनीने बनवलेल्‍या शॉर्ट फिल्‍म्स लघू-अनिमेशनपट चालत नव्‍हते.  आणि कंपनी कंगाल होण्‍याची वेळ आली होती.  शेवटी डिस्‍ने कंपनीचा एक शॉर्ट फिल्‍म ‘’स्‍नो-व्‍हाईट’’ एवढा गाजला की रात्रीतूनच बघता-बघता डिस्‍ने अॅनिमेशनपट बनविणारी एक मोठी कंपनी बनली.

येथे फायनान्‍स अथवा आर्थिक क्षेत्रात तुमचा एखादा निर्णय बरोबर तर एखादा निर्णय चूक अथवा अयशस्‍वी होऊ शकतो. यासाठी आपल्‍या चुकीच्‍या निर्णयापासून होणा-या तोट्यासाठी, नुकसानीसाठी मानसिकरित्‍या तुम्‍ही नेहमी तयार असायला पाहिजे.

आपल्‍यापैकी कित्‍येक लोकं जीवनाला मनसोक्‍त जगायचं, आनंद घ्‍यायचा असा विचार करत असतात. यामुळेच बचत आणि गुंतवणूकी ऐवजी खर्च आणि आनंदी-विलासी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करत असतात.

लेखक असे म्‍हणतात की, तुमची खरी संपत्‍ती ती नाही जी तुम्‍हाला दिसते, खरं तर ती आहे जी तुम्‍ही आनंद आणि विलासासाठी खर्च (Liability) केलेली नाही जसे महागडी गाडी, बंगला इत्‍यादी. तुमची खरी संपत्‍ती आहे तुमची मालमत्‍ता, जमीन-जायज़ाद, तुमची गुंतवणूकी, तुमची बचत ज्‍या तुम्‍ही कधीही फक्‍त लोकांना दाखवण्‍यासाठी बनवलेली नसते.

जर कोणी एक कोटी रुपयांची फरारी मोटार-कार खरेदी केलेली असेल तर त्‍याला पाहुन त्‍याच्‍या श्रीमंतीची त्‍याच्‍या संपत्‍तीबद्दल अंदाज लावता येत नाही.  परंतू एवढे अवश्‍य सांगता येईल की, त्‍याच्‍या धनसंपत्‍तीतून एक करोड रूपये कमी झालेले आहेत.

धनवान, श्रीमंत होण्‍याचा खरा अर्थ आहे, तुमचा तुमच्‍या वेळेवर नियंत्रण...
आणि असे स्‍वातंत्र्य असणे की ज्‍यामुळे तुम्‍हाला जे काही आणि जेंव्‍हा काही करावेसे वाटते ते तेंव्‍हा करता येईल.

मागील ५० वर्षांत मध्‍यमवर्गाने भौतिकदृष्‍ट्या तर खूप विकास केलेला आहे, परंतू वेळ त्‍यांच्‍याजवळ शिल्‍लक राहिलेला नाही.  सुरुवातीला कामे कार्यालयात, कारखान्‍यात, शेतात होत असत, आणि तेथे फक्‍त ०८ ते १० तासांची शारिरीक उपस्थिती महत्‍वाची होती.  

परंतू आज अधिकतर कामे पांढर-पेशाची” (White Collared) झालेली आहेत. ज्‍यांचे काम आज मोबाईल, लॅपटॉप, आणि आपल्‍या मेंदूमध्‍ये चालत असते.  यामुळेच वेळ आपल्‍या नियंत्रणामध्‍ये राहिला नाही.  आणि ह्यामुळेच सुखी आणि आनंदीपणा कमी झालेला दिसून येत आहे.

कित्‍येक लोकं चैन-विलासी वस्‍तू फक्‍त ह्याचसाठी खरेदी करत असतात की, त्‍यांना असे वाटते की इतर लोकं त्‍यांना पाहून त्‍यांची प्रशंसा व कौतुक करतील.  परंतू खरे पाहता, लोकं त्‍यांना नाही तर त्‍यांच्‍या धन-संपत्‍तीला पाहून प्रशंसा करत असतात. आणि त्‍यांच्‍या धन-संपत्‍तीला पाहून ते स्‍वतःच्‍या जीवनासाठी एक बेंचमार्क- मनोध्‍येय टप्‍पा बनवून घेतात.

जर तुम्‍ही एखाद्या फरारी कारला रस्‍त्‍यावरून जाताना पाहता तेंव्‍हा तुम्‍ही हेच विचार करत असता की,

  • किती सुंदर-मस्‍त गाडी आहे, मी एकेदिवशी अवश्‍य खरेदी करीन... त्‍याऐवजी हे कोणीही विचार करत नाही की 
  •  ती फरारी कार-गाडी चालवणारा व्‍यक्‍ती किती चांगला-मस्‍त आहे...! एकेदिवशी मी त्‍याच्‍यासारखा बनेन... !

तुमची नम्रता, दयाळूपणा आणि सहानुभूती तुम्‍हाला तुमच्‍या धनसंपत्‍तीपेक्षा जास्‍त प्रशंसा मिळवून देईल..!

Humility, Kindness & Empathy
gives more admiration than wealth

मग आता साहजिकच पुढचा प्रश्‍न असा पडतो की, पैशांना खर्च करायचं नाही तर काय करायचं? तर याचं उत्‍तर आहे- बचत.. Savings

आता तुम्‍ही विचार करत असाल की, मी तर पैशांची बचत करतच आहे, परंतू कोणतेही लक्ष्‍य नसताना बचत करण्‍याची सवय अथवा नियोजन अतिषय खतरनाक, धोकादायक आहे. तुम्‍हाला तुमच्‍या नियोजनासाठीही खर्च करायचं आहे आणि काही अनपेक्षित, अघटीत गोष्‍टींसाठी देखिल..

डिजिटलायझेशन आणि ग्‍लोबलायझेशनमुळे नोकरींच्‍या बाजारात स्‍पर्धा खूपच वाढत आहे. यासाठीच नोकरीच्‍या बाजारात टिकून राहण्‍यासाठी तुम्‍हाला भविष्‍यात येणा-या नव-नवीन कौशल्‍यं आत्‍मसात करावे लागतील.  भविष्‍यात आपल्‍या कौशल्‍यांमध्‍ये श्रेणीसुधारणा, बदल करण्‍याची लवचिकताच अत्‍याधिक महत्‍वाची असेल.  जेणेकरून वेळ राहतानाच तुम्‍ही योग्‍य कौशल्‍य शिकाल आणि तुमचं नोकरीच्‍या बाजारात किंमत टिकून राहिल.

आपल्‍या वेळेचा उपयोग करण्‍याची लवचिकता तुमच्‍या जवळ तेंव्‍हाच येईल जेंव्‍हा तुम्‍ही पैशांना योग्‍यरितीने-योग्‍य मार्गाने बचत कराल.

इतिहास आपल्‍याला हेच शिकवते की, जीवन हे अतिशय क्षणभंगुर आहे, काही मूठभर प्रसंग जीवनाला दीर्घावधीपर्यंत, ब-याच काळापर्यंत परिणाम करत असतात.  जसे की, विश्‍वयुद्ध, आर्थिक महामंदी आणि २०२० सालापासून सुरू झालेले कोरोना महामारीसारखे संसर्गजन्‍य-साथीचे आजार इत्‍यादी. 

यासाठीच तुम्‍हाला तुमच्‍या सामान्‍य आर्थिक गुंतवणूक ध्‍येयांबरोबरच काही पैसे विनाध्‍येयाचे विना कोणत्‍या उद्देशाने, जीवनातील अकस्मिक घटनांना, प्रसंगांना सांभाळण्‍यासाठी देखील बचत करायला पाहिजे.  आणि तुमच्‍या नियोजनामध्‍ये चुकीच्‍या खोलीसाठी जागादेखिल ठेवायला पाहिजे. ज्‍याला लेखक Room for Error in Planning असे म्‍हणतात. कारण जीवनात जेंव्‍हा-केंव्‍हा अकस्मित-अस्थिरता येते, तेंव्‍हा तुमच्‍या गुंतवणूकीची किंमत २० ते ४० टक्‍के खाली घसरत असते.

आता अशा प्रसंगांसाठी तयार राहण्‍यासाठी तुम्‍हाला ‘’तुमचां पॉईंट ऑफ फेल्‍युअर’’ शोधावा लागेल. म्‍हणजे, असे गृहित धरा की, आज तुमची नोकरी राहिली नाही, किंवा तुमचा उद्योग-व्‍यवसाय बुडाला, तर अशा कोणत्‍या अत्‍यावश्‍यक गोष्‍टी असतील ज्‍यांचा तुमच्‍यावर सर्वाधिक परिणाम करतील?  ते काहीही असू शकते, जसे की,

तुमचां पॉईंट ऑफ फेल्‍युअरः

  • ते उधार-कर्ज जे तुम्‍ही घेतलेलं आहे (Debt)
  • तुमच्‍याजवळ आपातकालीन फंड तयार नसेल (Emergency Fund) किंवा
  • कुटुंबातील एखाद्या व्‍यक्‍तीचा आरोग्‍याचा अधिकचा खर्च जो तुम्‍ही दुर्लक्ष केला असेल (Health Cost)

अशा अकस्मिक गोष्‍टींना सांभाळून घेण्‍यासाठी पैशांना कमी जोखीम असलेल्‍या बचत माध्‍यमात ठेवायला पाहिजे. ज्‍यामुळे तुम्‍हाला बाजारत तुम्‍ही गुंतवलेल्‍या पैशांना तोट्यात काढून घेण्‍याची वेळ येणार नाही.  जर तुम्‍ही तुमच्‍या गुंतवणूकीला मध्‍यंतरीच छेडाल, तोडाल, अडथळा आणाल तर तुम्‍हाला तुम्‍ही केलेल्‍या गुंतवणूकीवर चक्रवाढीचा फायदा मिळणार नाही.

 लेखक आपल्‍याला गुंतवणूकीची शेवटची क्‍लृप्‍ती अशी देतात की,

  • बबल्‍स-आर्थिक बुडबुड्यांपासून बचाव करणे आणि
  • इतरांना पाहून, दुस-यांच्‍या प्रभावाने इतरत्र गुंतवणूक न करणे कोणत्‍याही आर्थिक संपत्‍तीची किंमत अचानकपणे वाढणे याला फायनान्शियल बबल्‍स असे म्‍हणतात.  
  • त्‍या वाढलेल्‍या किंमतीचा फायदा उचलण्‍याच्‍या नादात सर्वजण त्‍याच आर्थिक साधनांमध्‍ये पैसे गुंतवणूक करत असतात.   
  • तुम्‍हाला अशा आर्थिक बुडबुड्यांमध्‍ये कधीही गुंतवणूक करायला नाही पाहिजे.  यांच्‍यापासून सावधान असायला पाहिजे.
  • आर्थिक जगतामध्‍ये प्रत्‍येक व्‍यक्‍तीची ध्‍येय-उद्दिष्‍ट्ये वेगवेगळी असतात, कोणी ट्रेडिंग साठी पैसा लावत असतो, तर कोणी लघू-अल्‍पावधीसाठी पैसा लावत असतो, तर कोणी दीर्घावधीसाठी पैसा गुंतवणूक करत असतो.  

''पुढील व्‍यक्‍तीची ध्‍येय-उद्दिष्‍ट्ये जाणल्‍याशिवाय जर तुम्‍ही त्‍यांच्‍या गुंतवणूकीसारखे पैसे गुंतवत असाल तर तुम्‍हाला पश्‍चाताप होण्‍याची शक्‍यता आहे.   आर्थिक जगत अतिशय गुंतागुंतीचे आणि किचकट असते ज्‍याचे परिणाम नशीब आणि जोखीम यावर आधारित असते. ''

जर तुम्‍हाला नफा-फायदा झाला तर तुम्‍हाला विनम्र असायला पाहिजे आणि अति-आत्‍मविश्‍वासापासून स्‍वतःचा बचाव करायला पाहिजे. आणि जर नुकसान-तोटा झाला असेल तर आपल्‍या चुक-भूल यांपासून शिकवण घेऊन पुढे त्‍या चुका टाळण्‍याचा प्रयत्‍न करावा.

 

पैशांचे मनोविज्ञान
लेखक- मॉर्गन हाऊसेल
पुस्‍तक सारांश- मराठी

आर्थिक विषयांवरील ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली, आपली प्रतिक्रिया अवश्‍य द्या.   

#द सायकॉलॉजी ऑफ मनी #The Psychology of Money #Morgan Housel #Book Summary in Marathi # पैशांचे मनोविज्ञान # मॉर्गन हाऊसेल #पुस्‍तक सारांश- मराठी #अर्थात, #धनसंपदा #धन की बात

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive