१० पैकी ०८ स्‍टार्टअप-नवउद्योग बंद का होतात? द ई-मिथ रिव्हिजि़टेड- मायकल गर्बर पुस्‍तक सारांश

ही पुस्‍तक वाचल्‍याशिवाय कोणताही व्‍यवसाय सुरू करू नका…!

द ई-मिथ रिव्हिजि़टेड
लेखक- मायकल गर्बर
पुस्‍तक सारांश मराठी
 

 👉पुर्वांशः

मॅकडोनाल्‍डचा बर्गर तुम्‍ही कोणत्‍याही देशात, शहरात जाऊन खा, तुम्‍हाला त्‍याची चव सारखीच मिळेल. याचे खरे कारण आहे त्‍यांचे बर्गर बनविन्‍याच्‍या सिस्‍टम मध्‍ये.  ज्‍यामध्‍ये बर्गर बनविन्‍याच्‍या पद्धत-प्रक्रियेला छोट्या-छोट्या पाय-यांध्‍ये/तुकड्यांमध्‍ये विभाजीत केलेले आहे.  

त्‍यांचे कर्मचारीसुद्धा त्‍या स्‍टेप्‍स योग्‍यरितीने व काटेकोरपणे त्‍या प्रक्रियेला पूर्ण करत असतात ज्‍यामुळे मॅकडोनाल्‍डच्‍या बर्गरची चव सर्वठिकाणी सारखीच येते.

‘’ईझी-टू-फॉलो प्रोसेस’’ म्‍हणजेच करण्‍यासाठी सुट-सुटीत, सोपी व सोयीस्‍कर अशी पद्धत-प्रक्रियेला असल्‍यामुळे जगामध्‍ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कर्मचा-यांकडून बर्गर बनल्‍यावरही त्‍या बर्गरचा स्‍वाद बदलत नाही, सारखीच चव येते.  त्‍यांच्‍या दर्जामध्‍ये व गुणामध्‍ये जरासेसुद्ध फरक होत नाही.

The E-Myth Revisited
By Michael Gerber
 
Book Summary in Marathi

E-Myth- the entrepreneurial myth
the myth that most people who start small businesses are entrepreneurs 

लोकांचे असे मानने असते की, व्‍यवसाय-उद्योग फक्‍त उद्योगी व व्‍यावसायिक व्‍यक्‍तीच सुरू करतात.  परंतू असं नसतं. खरे तर, ज्‍या व्‍यक्‍ती उद्योग-व्‍यवसाय सुरू करत असतात त्‍या व्‍यक्‍ती सुरूवातीला इतरांसाठी काम करत आलेले असतात.

आणि जेंव्‍हा त्‍यांच्‍यावर उद्योगी-व्‍यवसायिक बनन्‍याचा भूत त्‍यांच्‍यावर सवार होतो, हवा  डोक्‍यात शिरते तेंव्‍हा ते आपला स्‍वतःचा व्‍यवसाय-उद्योग सुरू करतात.  आणि अगदी काहीच वर्षांमध्‍ये त्‍यांचा चर्चित व्‍यवसाय-उद्योग बंदही होऊन गेलेलं असतं. परंतू, असे का होते? तर चला मग थोडं अधिक तपशिलवार पाहुया.

राजेश एका हॉटेल/रेस्‍टॉरंटमध्‍ये पिझ्झा बनविनाचे काम करत असतो.  एके दिवशी त्‍याने विचार केला की, इतरांच्‍या कामामध्‍ये एवढी मेहणत करूनही मला खूप कमी मोबदला मिळतो. तेंव्‍हा मी स्‍वतःचाच व्‍यववसाय सुरू केला आणि तिथे मी लोकांना यापेक्षाही चांगल्‍या पद्धतीचे व उत्‍तम दर्जाचे पिझ्झा तेही कमी किमतीत बनवून विकल्‍यास मला खूप फायदा होईल.

असा विचार करून राजेशने सुरू असलेले आपले काम-नोकरी सोडली आणि कर्ज उचलून आपला स्‍वतःचा हॉटेल-रेस्‍टॉरंटचा व्‍यवसाय सुरू केला. सुरूवातीला तेथे काही मोजकेच ग्राहक येत होते. तेंव्‍हा रोजशला असे वाटले की त्‍याला स्‍वतःच्‍या व्‍यवसायाची थोडीशी मार्केटिंग करायला पाहिजे.  त्‍याने त्‍याच्‍या व्‍यवसायाची मार्केटिंग करायला सुरूवात केली.   

आता, मार्केटिंग, चांगल्‍या दर्जाचे-प्रतीचे व कमी किमतीचे पिझ्झा असल्‍यामुळे त्‍याच्‍या हॉटेल-रेस्‍टॉरंटवर ग्राहकांची गर्दी व्‍हायला लागली.  आणि राजेशचा व्‍यवसाय काही प्रमाणात फायद्यात चालायला लागला.

परंतू, जसेही हॉटेल-रेस्‍टॉरंटवर जास्‍त ग्राहक यायला लागले, रेस्‍टॉरंटची साफसफाई, पैशांचा हिशोब, मार्केटिंग अशी सर्वच कामे राजेश एकटा सांभाळू शकत नव्‍हता. कारण त्‍याचा अधिकतर वेळ पिझ्झा व बर्गर बनविन्‍यातच जात होता.  यामुळेच त्‍याने एका व्‍यक्‍तीला नोकरीवर ठेवून घेतले. 

परंतू गोष्‍टी, सोप्‍या होण्‍याऐवजी जास्‍तच किचकट होत गेल्‍या.  कारण त्‍याने ज्‍या व्‍यक्‍तीला कामावर ठेवलेले होते तो खूपच आळशी होता आणि बरोबर कामपण करत नव्‍हता. ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या तक्रारी वाढायला लागल्‍या.  राजेशला वाटले, हे काम माझ्याऐवजी कोणीही कोणीही चांगल्‍यारितीने करू शकत नाही. आणि राजेशने त्‍या व्‍यक्‍तीला कामावरून काढून टाकले.  आणि परत सर्व कामे स्‍वतःच सांभाळू लागला. 

परंतू थोड्याच दिवसांत त्‍याच्‍या लक्षात आले की त्‍याला एखाद्या महागड्या आणि तज्ञ व्‍यक्‍तीला कामावर ठेवायला पाहिजे. आणि पुन्‍हा राजेशने एका महागड्या पण तज्ञ व्‍यक्‍तीला नोकरीवर ठेवून घेतले.  आणि शेवटी तो एक चांगला कर्मचारी निघाला.  

परंतू, त्‍याने काहीच महिन्‍यात अजून एका व्‍यक्‍तीला कामावर ठेवून घेतले त्‍याचा व्‍यवसाय आता पहिल्‍याच्‍या तुलनेत थोडेसे मोठे झालेले होते, यामुळे कर्मचा-यांचा पगार, दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्‍ते, दुकानातील सामान आणि आकर्षणाच्‍या वस्‍तूंवर होणा-या खर्चांमुळे त्‍याचा व्‍यवसाय फायदा सोडून तोट्यात चालला होता.  ज्‍यामुळे शेवटी त्‍याला त्‍याचा रेस्‍टॉरंटचा व्‍यवसाय बंदच करावा लागला.

हे एक अपयश होते. कारण राजेशने फक्‍त त्‍याच्‍या तांत्रिक गोष्‍टींवरच विचार केला की ‘’तो चविष्‍ट पिझ्झा बनवून शकतो’’ त्‍यामुळे त्‍याचा व्‍यवसायही चांगल्‍या पद्धतीने चालवू शकेल.  परंतू असे झाले नाही.  यासाठी मायकल गर्बर असे म्‍हणतात की,

Becoming a Good Businessmen and Technician both are different things
चांगला व्‍यवसाय चालविणे आणि एक तंत्रज्ञानी होणं ह्या दोन्‍ही वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत

दोघांमध्‍ये धरती-आकाशाएवढे फरक असते. जगद्विख्‍यात तंत्रज्ञान कंपनी आयबीएम चे संस्‍थापक थॉमस जे.वॅटसन यांना एका मुलाखतीमध्‍ये विचारले गेले की, त्‍यांचा व्‍यवसाय एवढा यशस्‍वी का आहे? तेंव्‍हा थॉमस वॅटसन यांनी असे उत्‍तर दिले की,

‘’कोणत्‍याही कामाची तांत्रिक माहिती असणे आणि त्‍या कामाला प्रत्‍यक्ष करणे, प्रत्‍यक्ष व्‍यवसाय करणे ह्या दोन भिन्‍न-भिन्‍न बाबी आहेत, वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत.’’ 

अधिकतर लोकं आपला व्‍यवसाय सुरू करतात कारण, त्‍यांना त्‍या व्‍यवसायातील ‘’तांत्रिक’’ गोष्‍टींचे ज्ञान असते.  कित्‍येक लोकांना असे वाटत असते की, त्‍यांना ‘’तांत्रिक कार्य करणे येते’’ तर ते त्‍याच्‍याशी संबंधित व्‍यवसाय/उद्योगही सहजरित्‍या करू शकतील. 

परंतू हे वरिल ओळ वाचण्‍याएवढे सहज, सोपे नसते. लेखक मायकल गर्बर अशा अवस्‍थेला a technician suffering from an entrepreneurial Seizure असे म्‍हणतात.

मायकल गर्बर असे म्‍हणतात की, कोणत्‍याही व्‍यवसाय/उद्योगाला यशस्‍वी बनविण्‍यासाठी त्‍यामध्‍ये तीन व्‍यक्‍तींचं असणं खूपच गरजेचं आहेः 

  • उद्योगी  (Entrepreneur)  
  • व्‍यवस्‍थापक (Manager)
  • तंत्रज्ञ (Technician)

👉उद्योगी तो असतो जो भविष्‍यात जगत असतो. जो नव-नविन कल्‍पना आणून कंपनीला/व्‍यवसाय/उद्योगाला दूरदृष्‍टी-व्हिजन आणून देत असतो.

👉व्‍यवस्‍थापक-मॅनेजर एक प्रॅक्टिकल-व्‍यावहारिक व्‍यक्‍ती असतो जो मागील-भुतकाळातील अनुभवातून व्‍यवसायाला संगठित ठेवत असतो.  तो कर्मचा-यापासून ग्राहकापर्यंत आणि उत्‍पादनापासून ते किरकोळ वितरणापर्यंत सर्वच गोष्‍टींना सांभाळत असतो.

👉एक तंत्रज्ञ तो असतो जो, वर्तमानात राहून व्‍यवसायासाठीचे कार्य करत असतो. म्‍हणजेच एक तंत्रज्ञ व्‍यवसायाच्‍या कल्‍पनांना प्रायोगिकरित्‍या प्रत्‍यक्ष स्‍वरूप व आकार देत असतो.

एक यशस्‍वी व्‍यवसाय चालविण्‍यासाठी या तीनही लोकांची गरज असते. येथे वरिल राजेशच्‍या उदाहरणात ह्या तीनही गुण असणारा व्‍यक्‍ती पाहिजे होता.  परंतू राजेशसारखे कित्‍येक व्‍यक्‍ती अयशस्‍वी होतात.  कारण त्‍यांच्‍यात ७० टक्‍के तंत्रज्ञ, २० टक्‍के व्‍यवस्‍थापक आणि १० टक्‍के व्‍यवसायिक गुण असतात. 

खरेतर, एक उत्‍तम ब्रॅण्‍ड इमेज तयार करण्‍यासाठी तुमच्‍यामध्‍ये तीनही गुण संतुलित असायला पाहिजे.

यासाठीच जर तुम्‍हाला एखादे तांत्रिक काम चांगल्‍यारितीने करता येत असेल तर याचा अर्थ हे मुळीच नाही की तुम्‍ही त्‍याचा व्‍यवसायदेखिल चांगल्‍यारितीने चालवू शकाल.

लेखकाच्‍या मते, कोणत्‍याही मोठ्या व्‍यवसायाचे जीवनचक्र तीन स्‍तरांमध्‍ये विभागले जाऊ शकतेः

१.       नवजात किंवा शिशू अवस्‍था (Infancy Stage) म्‍हणजेच व्‍यवसायाचे लहानपणः यातील चपराश्‍यापासून ते मालकापर्यंतची सर्वच कामे व्‍यवसायमालक स्‍वतः करत असतो. जेंव्‍हा व्‍यवसाय मोठा होत असतो, अधिक ग्राहक यायला लागतात, तेव्‍हा तो सर्वच कामांना तेवढे महत्‍व देऊ शकत नाही जेवढे तो अगोदर देत होता.

जर त्‍याने एखाद्या कामाला अधिक वेळ दिला तर इतर दुस-या कामांना अधिक वेळ लागत असतो ज्‍यामुळे ग्राहकांचे समाधान होत नाही.

उदाहरनार्थः तुम्‍ही एक केशकर्तनालय-कटिंग दुकान चालक-मालक आहात. सुरूवातील जेव्‍हा ग्राहक कमी असतात तेव्‍हा सर्वच गोष्‍टी तुम्‍ही एकटेच सांभाळून घेत असता. परंतू जेव्‍हा ग्राहक वाढू लागले तेव्‍हा तुम्‍ही एका व्‍यक्‍तीचे केस चांगले बनवेपर्यंत इतर ग्राहकांकडे चांगल्‍यारितीने लक्ष देऊ शकत नाही.  किंवा दुकानातील साफसफाईकडे दुर्लक्ष होईल.

जर तुम्‍ही ह्या कामांना जास्‍त महत्‍व देत असाल कामाच्‍या दर्जा व गुणवत्‍तेमध्‍ये फरक पडत असतो. आणि ग्राहकांच्‍या तक्रारीदेखिल वाढत असतात.

आता, जर का या उद्योजकाला किंवा व्‍यावसायिकाला ही गोष्‍ट कळून चुकेल की, मी एकटा ही सर्व कामे करू शकत नाही. मला इतरांची मदत घ्‍यायला पाहिजे. तेव्‍हा त्‍यांचा उद्योग किंवा व्‍यवसाय दुस-या स्‍तरामध्‍ये येऊन पोहोचलेला असतो ज्‍याला लेखक बाल्‍यावस्‍था-Adolescence Stage अॅडोलेसेन्‍स अवस्‍थेत येऊन पोहोचलेलं असतं.  


२.       बाल्‍यावस्‍था (Adolescence Stage)-एडोलेसेन्‍स अवस्‍थाः ह्या अवस्‍थेत व्‍यवसाय मालक सर्व कामं स्‍वतः करू शकत नसतो तेव्‍हा तो इतरांना आपल्‍या कामावर ठेवतो. व्‍यवसायाच्‍या ह्या अवस्‍थेमध्‍ये व्‍यवसाय मालक बरिचशी कामे जी कामे त्‍याच्‍याने होत नसतात अशी, आऊटसोर्स करून टाकत असतो.  जो नेहमीच एक चांगले निर्णय ठरत नाही.

कारण काही ग्राहकांकडून तक्रारी येत असतात की, आता पुर्वीसारखे दर्जेदार गोष्‍टी मिळत नाहीत, गुणवत्‍ता ढासाळलेली आहे इत्‍यादी.. अशा वेळी तो व्‍यवसाय मालक जर असा विचार करेल की, माझ्या व्‍यतिरिक्‍त कोणीही हे काम चांगल्‍यारितीने करू शकत नाही. आणि तो कर्मचा-यांना काढून टाकून स्‍वतः ते काम करायला घेतो. तेव्‍हा त्‍यांचा व्‍यवसाय/उद्योग परत पहिल्‍या नवजात-शिशू अवस्‍थेत जाऊन पोहोचतो.

परंतू जे व्‍यवसाय चांगल्‍या व्‍यवस्‍थापनाद्वारे बाल्‍यावस्‍थेला पार करून पुढे जातात ते पुढील अवस्‍थेत पोहोचतात त्‍याला मॅच्‍युरिटी स्‍टेज किंवा परिपक्‍व अवस्‍था असे म्‍हणतात. जे कोणत्‍याही व्‍यवसायातील उच्‍च स्‍तर समजला जातो.


    ३. परिपक्‍व अवस्‍था (Maturity State):  ह्या अवस्‍थेची चांगली बाब‍ म्‍हणजे येथे व्‍यवसाय मालक नसतानाही व्‍यवसाय चालत असतो. ह्या स्‍तरापर्यंत पोहोचल्‍यानंतर व्‍यवसायाला/उद्योगाला मालकाच्‍या सततच्‍या प्रयत्‍नांची गरज नसते. ज्‍यामुळे तो व्‍यावसायिक आपल्‍या मनाप्रमाणे, हव्‍या तेवढ्या सुट्या घेऊ शकतो. आणि आपल्‍या जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

परंतू तुम्‍हाला तुमच्‍या व्‍यवसायाला ह्या स्‍तरापर्यंत आणण्‍यासाठी तुम्‍हाला दोन नियम पाळणे अत्‍यंत आवश्‍यक आहेः

१.       Create a System dependent Business not a People dependent

मॅकडोनाल्‍डचा बर्गर तुम्‍ही जगात कोणत्‍याही देशात, शहरात जाउन खा, त्‍याची चव, आकार प्रकार सारखाच आढळून येईल. याचे कारण आहे, त्‍यांच्‍या बर्गर बनविण्‍याच्‍या सिस्‍टममध्‍ये...!

ज्‍यामध्‍ये बर्गर बनविन्‍याच्‍या पद्धत-प्रक्रियेला छोट्या-छोट्या पाय-यांध्‍ये/तुकड्यांमध्‍ये विभाजीत केलेले आहे.  

त्‍यांचे कर्मचारीसुद्धा त्‍या स्‍टेप्‍स योग्‍यरितीने व काटेकोरपणे त्‍या प्रक्रियेला पूर्ण करत असतात ज्‍यामुळे मॅकडोनाल्‍डच्‍या बर्गरची चव सर्वठिकाणी सारखीच येते.

‘’ईझी-टू-फॉलो प्रोसेस’’ म्‍हणजेच करण्‍यासाठी सुट-सुटीत, सोपी व सोयीस्‍कर अशी पद्धत-प्रक्रियेला असल्‍यामुळे जगामध्‍ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कर्मचा-यांकडून बर्गर बनल्‍यावरही त्‍या बर्गरचा स्‍वाद बदलत नाही, सारखीच चव येते.  त्‍यांच्‍या दर्जामध्‍ये व गुणामध्‍ये जरासेसुद्ध फरक होत नाही.

जर तुमचे व्‍यवसाय किंवा उद्योग लोकांवर आधारित असेल तर तुम्‍हाला तर हे माहितच आहे की, लोकं किंवा व्‍यक्‍ती आपल्‍या मनाप्रमाणे व सोयीप्रमाणे काम करत असतात. जर ते काम सोडुन निघून जात असतील तर किंवा ते योग्‍यरितीने काम करत नसतील तर तेव्‍हा तुमचा संपूर्ण व्‍यवसाय किंवा उद्योग बिघडून जाईल. खराब होईल.

1.   Your Business Should Be System Dependent Not People Dependent
तुमचे व्‍यवसाय-उद्योग लोकांवर आधारित नाही तर सिस्‍टम डिपेंडंट-व्‍यवस्‍थेवर आधारित असायला पाहिजे.

YOUR BUSINESS SHOULD BE SYSTEM DEPENDENT
NOT PEOPLE DEPENDENT

यासाठीच तुमचे व्‍यवसाय-उद्योग लोकांवर आधारित नाही तर सिस्‍टम डिपेंडंट-व्‍यवस्‍थेवर आधारित असायला पाहिजे.  ज्‍यामध्‍ये सुस्‍पष्‍ट दर्जा आणि प्रक्रियेची सूची असायला पाहिजे.  जसे मॅकडोनाल्‍ड यांच्‍याकडे बर्गर बनविण्‍याचे पायरी-दर-पायरी प्रक्रिया सूचीबद्ध आहे.  

जसे- पदार्थ बनविण्‍याची पद्धत-प्रक्रिया, दुकानाचा देखावा, दुकानाचा डिझाईन इत्‍यादी सारख्‍या कित्‍येक गोष्‍टींचा पुर्वनिर्धारित सूची-यादी आहे.

मॅकडोनाल्‍ड कोणताही कर्मचारी निघून गेला तरी बंद पडणार नाही

, कारण त्‍यांच्‍या रेसिपींना- खाद्पदार्थांना कोणीही महाविद्यालयीन विद्यार्थी सहज शिकू शकतो.  आणि काहीच दिवसांध्‍ये तेथे कामावर रूजदेखिल होऊ शकतो.

मॅकडोनाल्‍ड आणि स्‍टार बग्‍ज या मोठ्या कंपन्‍यांना ही गोष्‍ट अगोदरच माहित होती की कोणत्‍याही व्‍यवसायामध्‍ये सिस्‍टम-व्‍यवस्‍थेचं असणं किती महत्‍वाचं आहे. 

सिटस्‍टमच्‍या आधारावरच आज ह्या मोठ्या कंपन्‍यांपैकी मॅकडोनान्‍डची ३९००० पेक्षाही जास्‍त दालने आहेत तर स्‍टार बग्‍जची ३२००० पेक्षाही जास्‍त दालने जगामध्‍ये असूनही त्‍यांना सहजतेने सांभाळू शकत आहेत.

Step by step process and Predefined Checklist पायरी-दर-पायरी प्रक्रिया आणि पुर्वनिर्धात सूची-यादी असल्‍यामुळे त्‍यांचे कर्मचारी बदलल्‍यानंतरही त्‍यांच्‍या नविन कर्मचा-यांना ते त्‍यांचे काम चुटकीसरशी, सहजतेने समजावून सांगू शकतात. ज्‍यामुळे त्‍यांचा Quality and Standard गुणवत्‍ता आणि दर्जा केंव्‍हाही खालावत नाही.

यासाठीच तुम्‍हालादेखिल व्‍यवसायाच्‍या सुरूवातीपासूनच पिपल डिपेंडंट-लोकांवर आधारित व्‍यवसाय बनविण्‍याऐवजी फ्रेंचायझी मॉडेलसारखे सिस्‍टम डिपेंडंट-व्‍यवस्‍थेवर आधारित व्‍यवसाय बनविण्‍याचा विचार करायला पाहिजे. कारण लोकांचं आपण काहीच सांगू शकत नाही.

२.       Work on your Business not in your Business:  व्‍यवसाय सुरू करण्‍याचा लोकांचा मूळ हेतू असतो, स्‍वतःसाठी एक चांगली जीवनशैली तयार करणे. परंतू ते काही अशाप्रकारे व्‍यवसाय-उद्योग निर्माण करतात की, त्‍यांनी निर्माण केलेला व्‍यवसाय पुर्णपणे त्‍यांच्‍या स्‍वतःवर आधारित बनून राहतो.

work “ON” your business not “in” your business.

ह्या पुस्‍तकाचा सर्वांत महत्‍वाचा तत्‍वज्ञान हेच आहे की, (कोअर प्रिंसिपल Core Principle) you should work “ON” your business not “in” your business.

जसे मार्क झूकरबर्गने लहानवयापासूनच कोडींग सुरू केली होती.  परंतू ते फेसबुक बनविल्‍यानंतर जर कोडिंग करत बसले असते तर, फेसबुक एवढा लोकप्रिय आणि प्रभावी कधीही झाला नसता. यासाठीच त्‍यांनी तांत्रिक कामासाठी इतरांना कामावर ठेवले. आणि स्‍वतः फेसबुकमध्‍ये काम करण्‍याऐवजी फेसबुकवर काम करू लागले. 

व्‍यवसाय-उद्योगाने आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍याचे एकच मार्ग आहे, की तुम्‍ही स्‍वतःला व्‍यवसायामधून बाहेर ठेवा. म्‍हणजेच कामाचा सर्वच तान तुमच्‍यावर राहणार नाही. खरेतर ते तुम्‍ही निर्माण केलेल्‍या पुर्वनिर्धारित सिस्‍टमवर-व्‍यवस्‍थेवर चालला पाहिजे.

सोप्‍या भाषेत सांगायचे झाल्‍यास, व्‍यवसाय असा उभा करा की, निर्णय (Decision) आणि कार्य (Operation) तुमच्‍याऐवजीदेखिल पूर्ण केले जातील आणि तुम्‍हाला प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये लक्ष देण्‍याची (Monitor करायची) गरज राहणार नाही.

The E-Myth Revisited
By Michael Gerber

द ई-मिथ रिव्हिजि़टेड
लेखक- मायकल गर्बर


पुस्‍तक सारांश मराठी

Book Summary in Marathi

#The E-Myth Revisited in Marathi #Michael Gerber #द ई-मिथ रिव्हिजि़टेड #मायकल गर्बर #पुस्‍तक सारांश #मराठी  #Book Summary in Marathi #व्‍यवसाय उद्योग सुरू करणे

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive