Eat That Frog Author Brian Tracy Book Summary in Marathi-Part-2 | इट दॅट फ्रॉग-लेखक ब्रायन ट्रेसी मराठी अनुवाद पुस्‍तक सारांश भाग-२

इट दॅट फ्रॉग
EAT THAT FROG
सर्वांत कठीण काम
सर्वांत आधी 
लेखक  
ब्रायन ट्रेसी  
मराठी अनुवाद
 
पुस्‍तक सारांश 
भाग-२


 

भाग-१ वाचन करण्‍यासाठी इथे क्लिक करा    

 

Eat That Frog (Marathi) - Sarvat Kathin Kaam Sarvat Aadhi Kara | Book Summary
(
सर्वांत कठीण काम
सर्वांत आधी करा- मराठी पुस्‍तक सारांश)

भाग-२

 

👉भाग-१ वाचन करण्‍यासाठी                                    👉 मराठी अनुवाद पुस्‍तक खरेदसाठी

 

🙏  ई-वाचनालयामध्‍ये आपले सर्वांचे पुन्‍हा एकदा स्‍वागत आहे मित्रांनो...!

 

👉महत्‍वाची टिपः

वाचकांना विनंती आहे पुस्‍तकातील गाभा समजून घेण्‍यासाठी अगोदर ह्या पुस्‍तकाचे मराठी सारांश-भाग- प्रथम वाचन करावे जर आपण या पुस्‍तकाचे मराठी अनुवाद सारांश-भाग- वाचन केले नसेल तर भाग- -येथून वाचन करा.  
- ई-वाचनालय | www.evachnalay.in
 


इंग्रजी आवृत्‍ती खरेदीसाठी
इट दॅट फ्रॉग 
EAT THAT FROG

 प्रोक्रॅस्टिनेशन अथवा दिरंगाई, टाळाटाळ, चालढकलपणा ह्या सवयींद्वारे  येणा-या अडचणी व त्‍या अडचणींवर मात कसे करावे याबद्दलचे २१ मार्ग-उपाय....

 

भाग-१ वाचन करण्‍यासाठी इथे क्लिक करा



मराठी आवृत्‍ती खरेदीसाठी

 सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा

वाचकांनो ब्रायन ट्रेसी लिखित-इट दॅट फ्रॉग ह्या पुस्‍तकाचे मराठी अनुवाद-सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा ह्या पुस्‍तकाच्‍या सारांश भाग-१ मध्‍ये आपण पाहिले होते एखाद्या कामाला पुर्ण करण्‍यासाठी म्‍हणजेच प्रोक्रॅस्टिनेशन अथवा दिरंगाई, टाळाटाळ, चालढकलपणा ह्या सवयींद्वारे  येणा-या अडचणी व त्‍या अडचणींवर मात कसे करावे याबद्दलचे उपाय बघितले. आता त्‍यापुढील उपाय पाहुया...

 

 

☯ कौशल्‍यांना कसे सुधारावे (Upgrade your Skills)

जर तुम्‍हाला यश मिळविण्‍याची इच्‍छा असेल तर तुम्‍ही ''नेहमीच शिकत असायला पाहिजे'', शिकणे कधीही सोडायला नाही पाहिजे.  कारण तुम्‍ही जर वेळेबरोबर उत्‍तम नाही झालात तर साहजिकच आहे तुमची वाढ होत नाहीये.  तुमच्‍यामध्‍ये जे कोणते ''कमकुवत गुण'' असतील त्‍यांना दूर करा आणि स्‍वतःला उत्‍तम पेक्षा उत्‍कृष्‍ट करण्‍याकडे लक्ष द्या.   आणि शिकणे तर तुम्‍हाला कधीही सोडायचीच नाही.  नेहमीच काहीतरी नवीन शिकत राहा. 

जे काम तुम्‍हाला करायला आवडते, ज्‍या कामात तुम्‍ही चांगले आहात त्‍या कामाला आज पासुनच सुरू करून टाका, ह्यापेक्षा अधिक चांगले प्रेरणास्‍त्रोत कोणतेही नाही.  जर तुम्‍ही योग्‍य प्रयत्‍न, श्रम आणि वेळ लावलात तर जगात प्रत्‍येक गोष्‍ट शिकण्‍यासारखी आहे. 

 

तर पुढे दिलेल्‍या 3-Key Steps त्रिसूत्राचा उपयोग करून तुम्‍ही तुमच्‍या क्षेत्रातील मास्‍टर  बनू शकता. 

 

👉आपल्‍या क्षेत्रात प्रविण होण्‍याकरिता त्रिसूत्रंः 

  • किमान ६०-मिनिटे दररोज वाचन करणे 

  • आपल्‍या क्षेत्रासंबंधीत कार्यक्रम शिबिरांना उपस्थिती 

  • वेळ असेल तेंव्‍हा ऑडियो कार्यक्रम-पॉडकास्‍ट ऐकणे

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

पहिले सूत्र आहे की- तुमचे जो कोणते क्षेत्र असेल त्‍याबद्दल किमान ६०-मिनिटे दररोज वाचन करा.  त्‍यानंतर त्‍या क्षेत्रासंबंधित जेवढेकाही कोर्सेस-अभ्‍यासक्रम, कार्यक्रम-शिबिरे उपलब्‍ध असतील त्‍या सर्व कार्यक्रमांना -शिबिरांना उपस्थित राहा, जेणेकरून तुम्‍ही त्‍या क्षेत्रात अधिकाधिक उत्‍कृष्‍ट व्‍हाल. 

आणि शेवटी आपल्‍या गाडीमध्‍ये प्रवास करताना, स्‍वयंपाक करताना, व्‍यायाम करताना शैक्षणिक ऑडियो कार्यक्रम अथवा पॉडकास्‍ट-रेडीओ-आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐका, जसे की तुम्‍ही शहरात गाडीने प्रवास करत असताना ट्राफिक जॅम मध्‍ये फसलेले असाल तेंव्‍हादेखिल तुम्‍ही काहीनाकाही शिकत असाल.  जसे आजकाल डिजीटल स्‍वरूपात पुस्‍तकं आलेली आहेत, निवांतपणे गाणी ऐकल्‍यासारखे आणि गाणी ऐकण्‍याऐवजी ऑडियो पुस्‍तकं (Audio Books) उपलब्‍ध आहे.  म्‍हणजेच पुस्‍तकं वाचू शकत नाही तर ऐकूसुद्धा शकतो. 

 


☯ आपल्‍या विशेष प्रतिभेचा लाभ घेणे (Leverage your Special Talent)

 

''आपल्‍या एकमेवाद्व‍ितीय मूल्‍यांना ओळखा
मग त्‍यांना पुष्‍ट करा''

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

एखाद्या विक्रेता अथवा शेतकरी यांच्‍यासारखेच प्रत्‍येकाला आपल्‍यातील विशेष गुण अथवा प्रतिभेबद्दल माहित असते आणि तो त्‍या विशेष क्षमता-गुण-प्रतिभेला शिक्षण-प्रशिक्षण आणि ज्ञानाद्वारे संस्‍कारीत  करत असतो.  त्‍या प्रतिभेला अथवा गुणाला तासून अधिक प्रखर बनवत असतो.  त्‍यांमध्‍ये निःपुणता आणतो.

आपल्‍या एकमेवाद्व‍ितीय मूल्‍यांना ओळखा मग त्‍यांना पुष्‍ट करा.   ज्‍या गोष्‍टीसाठी तुम्‍हाचे सर्वाधिक कौतुक केले जाते, सुरूवात तेथूनच करा.  जे करताना तुम्‍हाला मजेशीर वाटेल, आनंद देईल अशी गोष्‍टच करा आणि सर्वांत महत्‍वाची गोष्‍ट ज्‍या कामाचा तुमच्‍या जीवनावर अत्‍यंत सकारात्‍मक प्रभाव पडत असतो त्‍यापासूनच प्रारंभ करा आणि पुढे चालायला लागा.

आता पुढे आपण सारांशामध्‍ये पुढे जाऊया आणि पाहूया आयडेंटीफाय यूअर की कन्‍स्‍ट्रेन्‍ट्स विषयी 


☯ आपल्‍या मर्यादांना ओळखणे (Identify your Key Constraints)

  ''८०% मर्यादा ह्या आंतरिक असतात
२०% मर्यादा बाह्य असतात''

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

प्रत्‍येकाचा एखादा गुण अथवा एखादी क्षमता असते जी मर्यादीत असते आणि तीच मर्यादा त्‍याला त्‍याच्‍या यशापर्यंत पाहोचण्‍यापासून थांबवत असते.  जसेकी एखादा सिंह आपल्‍या भक्ष्‍याच्‍या मागे लागल्‍यासारखे.  यासाठी प्रथम आपल्‍या 'लिमिटिंग फॅक्‍टर' म्‍हणजेच आपल्‍या मर्यादेला ओळखून त्‍याला दूर करा. 

जसे एखादे सिंह संपूर्णपणे आपल्‍या भक्ष्‍यावर नजर रोखून असतो तसेच तुम्‍हीसुद्धा आपल्‍या मर्यादेपासून सुटका करून घेण्‍यासाठी आपल्‍या संपूर्ण मानसिक क्षमतेला कामावर लावून टाका. तर तुमच्या ८० टक्‍के मर्यादा ह्या आंतरिक असतात जसेकी, गुणवत्‍ता आणि सामर्थ्‍य-क्षमता इत्‍यादी आणि २० टक्‍के मर्यादा बाह्य स्‍वरूपाच्‍या असतात जसे की, स्‍पर्धक. 

यासाठी लक्षपूर्वकपणे आपल्‍या योग्‍य अशा (Right choking point) गुदमरवणा-या बिंदूला ओळखून घ्‍या. नाहीतर असे होईल की तुम्‍ही एखाद्या चूकीच्‍या गोष्‍टीला आपला 'लिमिटींग फॅक्‍टर' समजून त्‍याला सुधारण्‍यासाठी श्रम, पैसा व वेळ वाया घालवात बसाल. 

आता पुढे जाऊया आणि बघुया स्‍वतःवर दाब कसा बनवावा?...! जे की अत्‍यंत गरजेचे आहे.

 

स्‍वतःवर दाब कसा बनवावा (Put the Pressure on Yourself)

एखाद्या प्रेरणेची वाट बघत बसणे जी कधीही मिळणारी नाही, अगदी तसेच आहे जसे एखाद्या बस ची वाट पाहत बसणे जी कधी येणारच नाही.  तुम्‍हाला पुढारी बनायचे असेल तर स्‍वतःवर दबाव आणायला शिकावेच लागेल.  तुमची ''सेल्‍फ एस्‍टीम'' म्‍हणजेच तुमचा ''आत्‍मविश्‍वास'' हेच तुमची इभ्रत अथवा प्रतिष्‍ठा आहे. 

उशीरापर्यंत काम करण्‍याची सवय बनवून घ्‍या.  स्‍वतःला स्‍वतःची वाढ-विकास करण्‍याची संधी द्या.  अशी कल्‍पना करा की तुम्‍ही उद्याच हे शहर-गाव सोडून जात आहात, तर असे कोणते काम असेल जे तुम्‍हाला शहर-गाव सोडून जाण्‍याअगोदर संपवायचे आहे.  आणि बास्‍स् त्‍या कामाला पूर्ण करायला लागा.

यानंतर पाहुया आपल्‍या वैयक्तिक सामर्थ्‍याला कसे वाढवावे त्‍याबद्दल... 

 

वैयक्तिक सामर्थ्‍याला कसे वाढवावे? (Maximize Your Personal Power) 

जसे एखाद्या यंत्राला कार्य करण्‍यासाठी इंधनाची आवश्‍यकता असते तसेच आपल्‍याला अन्‍न, पाणी आणि आराम गरजेचे आहे.   काम संपण्‍यासोबतच आपली कार्यक्षमतादेखिल (उत्‍पादकता) संपायला लागते.  उशिरापर्यंत अधिक तास काम करण्‍याचा अ‍र्थ आहे तुम्‍ही अधिक वेळेत थोडेसेच काम पूर्ण करू शकणार.  

  1. संपूर्ण दिवसाच्‍या पुर्णपणे कार्यक्षम अशा वेळेची निवड करून घ्‍या आणि जर तुम्‍ही काही परिणामकारक अथवा प्रोडक्‍टि‍व्‍ह करत नसाल तर पूर्ण रात्र जा गून काढणे अत्‍यंत बेकार आहे.

  2. प्रोडक्टिव्‍ह जिवनशैलीसाठी रात्री लवकर झोपायला जा आणि नियमित सुट्टी घेत जा. 

  3. आरोग्‍यदायी आहार ठेवा तसेच आपल्‍या दैनंदिन नित्‍यक्रमात शारिरीक तंदुरूस्‍तीसाठी सुद्धा आपल्‍या वेळापत्रकात जागा राखून ठेवा.

वरिल गोष्‍टी वाटायला तर सहज व सोप्‍या वाटतील परंतू ह्याच गोष्‍टी आहेत ज्‍या तुमच्‍या आणि तुमच्‍या गोल अर्थातच ध्‍येय यांच्‍या दरम्‍यान आहेत.  ह्याच गोष्‍टी अथवा आपल्‍या सवयी तुमच्‍या ध्‍येयापर्यंत तुम्‍हाला जाण्‍यापासून रोखत असतात.  आणि ह्याच गोष्‍टी आहेत ज्‍या तुम्‍हाला तुमचे ध्‍येय गाठायला मदत करतील म्‍हणून यांचा समावेश आपल्‍या नियोजनात ठेवणे अत्‍यंत गरजेचे व आवश्‍यकच आहे.

इंग्रजी मध्‍ये एक म्हण आहे, ''साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी'' अर्थात ''निरोगी व तंदुरूस्‍त शरिरातच तंदुरूस्‍त मन असतो''.  

 ''साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी''

पर्सनल पॉवर वाढव‍िल्‍यानंतर वाचक मित्रांनो आता वळूया पुढील मुद्याकडे जो आहे स्‍वतःला प्रेरित ठेवण्‍यासाठी आपल्‍याला काय करावे लागेल त्‍याविषयीचा..... 


कृती करण्‍यासाठी स्‍वतःला प्रेरित कसे करावे? (Motivate Yourself into Action) 

स्‍वतःबद्दलचा विचार सकारात्‍मक ठेवा.  सकारात्‍मक दृष्‍टीकोण ठेवा, सकारात्‍मक बोला आणि जे काही तुमच्‍याबरोबर होत असेल त्‍याविषयी सकारात्‍मक अर्थ काढायला शिका.  नेहमीच ऑप्‍टीमिस्‍ट म्‍हणजेच आशावादी बना.  कोणत्‍याही ''बाह्य परिस्थितीला'' (External Circumstance) आपले ''अंतर्गत मूड''वर  (Internal Mood) परिणाम करू देऊ नका  म्‍हणजेच आपल्‍या मनाचा कल नेहमी स्थिर, तठस्‍थ, सकारात्‍मक व आशावादी ठेवा. 

  • मला चांगले वाटत आहे (I'm feeling good)

  • मी हे करीनच (I can do it..!) 

असे वाक्‍य म्‍हणत राहण्‍याची सवय लावा आणि त्‍याची पुनरावृत्‍ती करत राहा जोपर्यंत तुम्‍हाला त्‍या गोष्‍टीची खात्री होणार नाही.  आशावादी बनने शिकले जाऊ शकते जे तुमच्‍या जिवनाच्‍या प्रत्‍येक पैलूंवर प्रभाव टाकेल.  यासाठी तुम्‍हाला प्रत्‍येक परिस्थितीमध्‍ये काहीतरी चांगले पाहावे लागेल, प्रत्‍येक अपयशामधून तुम्‍हाला एखादा धडा घ्‍यावा लागेल, त्‍यामधून काहीतरी शिकावे लागेल.  आणि प्रत्‍येक समस्‍येचे समाधान शोधा. 

 

''आशावादी व्‍यक्‍ती नेहमीच आपल्‍या ध्‍येयाविषयी विचार करत असतात
आणि त्‍याबद्दल बोलत असतात''

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

आशावादी व्‍यक्‍ती नेहमीच आपल्‍या ध्‍येयाविषयी विचार करत असतात आणि त्‍याबद्दल बोलत असतात.  त्‍यांच्‍या डोक्‍यामध्‍ये एकच गोष्‍ट चालत असते की, पुढची पायरी कोणती असेल आणि त्‍यांना आपले ध्‍येय गाठण्‍यासाठी, यश संपादन करण्‍यासाठी काय करायला पाहिजे

आता पुढे पाहणार आहोत Get out of the Technological Sinks बद्दल

 

तंत्रज्ञानाच्‍या जंजाळात बुडण्‍यापासून बचाव (Get out of the Technological Sinks)

आज अत्‍यंत वेगाने वाढणारे व बदलणारे तंत्रज्ञान त्‍याचा वापर करायच्‍या सवयींचा फास आपल्‍याला आज बुडवतो की काय असे झाले आहे किंबहुना बुडालोच आहोत असे म्‍हणणे योग्‍य होईल कदाचित. 

होय मित्रांनो तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे असते जे तुमचा मित्रही आहे आणि शत्रूदेखिल आहे.  

जगातील जेवढेकाही महान व मोठे व्‍यवसाय आहेत ते सर्व आपल्‍या दिवसभराच्‍या वेळेतून काही वेळ तथाकथित ‘’सामाजिक माध्‍यमां’’पासून (Social Media) अंतर ठेवण्‍यामध्‍ये व्‍यतित करत असतात.  परंतू त्‍यांच्‍या उलट असे काही लोकं असतात जे प्रत्‍येक वेळी खरं तर नेहमीच ‘’इंटरनेट’’वर डोळे वटारून बसलेले असतात. 

 

''तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे असते जो तुमचा
मित्रही आहे आणि शत्रूदेखिल आहे''

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

तर तुमच्‍या जीवनाला नियंत्रित करणे तुमच्‍या स्‍वतःच्‍या हातात आहे तुमच्‍या हातात असलेल्‍या तथाकथित ‘’स्‍मार्टफोन’’ च्‍या नियंत्रणात नाही.

स्‍वतःला इंटरनेटच्‍या आभासी जगामध्‍ये बुडू देऊ नका,  जीवनात शिकणेसुद्धा आवश्‍यक आहे.  आणि सर्वांत प्रथम आणि महत्‍वाचे तुम्‍ही आजच्‍या क्षणाचा आनंद घ्‍यायला शिका.  आभासी जगात वावरण्‍यापेक्षा वर्तमानात जगायला शिका करेंट मोमेंटला एन्‍जॉय करायला शिका.  इरत सर्वगोष्‍टी त्‍यानंतर.

विनामहत्‍वाचे काम इतरांना करायला द्या.  दररोज काही वेळ स्‍वतःसाठी काढणे हेसुद्धा अतिषय गरजेचे आहे. जेणेकरून तुम्‍ही केलेल्‍या कामाचे मूल्‍य वाढविली जाऊ शकेल.

  • TIME FOR MYSELF: to increase the Performed Tasks Value
  • स्‍वतःला तंत्रज्ञानाचे गुलाम बनू देऊ नका.  

जर कोणी तुमच्‍यासोबत आत्‍ता बोलू इच्छित असेल तर याचा अर्थ हे नाही की, त्‍याला तुम्‍ही तुमचा वेळ वाया घालू द्याल. 

 

जनसंपर्कामध्‍ये प्राविण्‍य मिळवा. त्‍याचे गुलाम बनू नका
Master the Means of Communication, not the Slave

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

तंत्रज्ञान आपल्‍या जिवनाला उत्‍तम आणि सहज बनविण्‍यासाठी आहे.  आपल्‍याला २४ तास व्‍यस्‍त आणि अस्‍वस्‍थ बनविण्‍यासाठी तर मुळीच नाही.  एक गोष्‍ट आपल्‍या डोक्‍यात नेहमीच राहू द्या की, जर गरजेचे आहे तर कोणीतरी तुम्‍हाला कळवेलच. आणि असे नसेल तर त्‍यामागे आपला वेळ वाया घालवू नका.

 

पुढे चलूया आणि पाहुया स्‍लाईस एन्‍ड डाईस द टास्‍क ह्याबद्दल…..

 

एक लहान पाऊल पर्वत चढण्‍यासाठी  (Slice and Dice the Task)

तुमचे एखादे मोठे काम आहे आणि तुम्‍हाला हे माहित नाही की त्‍याची सुरूवात कुठून करावी. तुकडे करणे त्‍यासाठी एक उपाय आहे.

ज्‍याप्रमाणे आपण एखादे फळ अथवा सफरचंद खाण्‍यासाठी त्‍याला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्‍ये कापतो, अगदी तसेच आपल्‍या कोणत्‍याही कामाला लहान-लहान तुकड्यांमध्‍ये विभाजीत करा.  आणि मग एक-एक करून प्रत्‍येक विभाजीत केलेल्‍या कामाच्‍या तुकड्यावर आपले पुर्ण प्रयास लावा, जसेही तुम्‍ही जेवढ्या लवकर प्रत्‍येक कामाच्‍या तुकड्याला पूर्ण करू लागता, तुम्‍ही तेवढ्याच जलद आपल्‍या कामाला समाप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न कराल. 

मोठे काम पूर्ण करण्‍याची अजून एक पद्धत आहे त्‍या पद्धतीला ''स्विस चिझ मेथड'' असे म्‍हणतात.  स्वित्‍झरलॅंडमध्‍ये दुधापासून चिझ हा दुग्‍धजन्‍य पदार्थ बनविण्‍याची पद्धत जगभरात प्रसिद्ध आहे.   त्‍यामध्‍ये चिझच्‍या मोठ्या तुकड्यावर पंच मारून लहान-लहान छिद्र करून ठेवले जाते, अगदी तसेच तुम्‍हीसुद्धा तुमच्‍या कामाला एक जोरदार पंच मारा..! आणि तुम्‍हाला असे कळेल की त्‍या कामाला हाताळण्‍यासाठी अथवा पुर्ण करण्‍यासाठी तुम्‍हाला काय केलं पाहिजे? कारण असे केल्‍याने तुमच्‍या शरिरात एन्‍डॉर्फिन नावाचे रसायन मुक्‍त होते. 

लहान-लहान तुकड्यांमधील कामाला पुर्ण केल्‍यामुळे तुम्‍हाला एक काम पुर्ण केल्‍याचे समाधान आणि आनंद एन्‍डॉर्फिन हे रासायन शरिरात स्‍त्रवून प्राप्‍त होत असते.  ज्‍यामुळे मग कोणतेही काम पुर्ण करणे तुम्‍हाला आनंदाचे वाटायला लागते.  एका प्रकारे हाय...ची भावना देऊ शकतो आणि तुम्‍ही ह्याला असेच पुढे चालू ठेवू शकता आणि जीवनात खूप पुढे जाऊ शकता.  यशस्‍वी होऊ शकता. 

 यानंतर पाहणार आहोत वेळेचा मोठा तुकडा निर्माण करणे याबद्दल...



वेळेचे मोठा तुकडे निर्माण करणे  (Create Large Chunks of Time)

कोणताही प्राणी जसे कुत्री कशाप्रकारे आपले जेवण जलद गतीने कसे संपवतात?  

कारण ती कुत्री अन्‍नाचा एक-एक मोठा तुकडा तोडतात आणि मग त्‍या मोठ्या तुकड्याला चावून खायला आणि गिळायला वेळ घेत असतात. 

आपपल्‍या वेळेचा उत्‍तम उपयोग करण्‍यासाठी सर्वांत आधी कार्यक्षमतेने आपल्‍या संपूर्ण दिवसाचा आराखडा अथवा वेळापत्रक बनवून घ्‍या आणि दिवसाच्‍या वेळेचा एक विशिष्‍ट भाग पुर्णपणे कामाच्‍या त्‍या मोठ्या तुकड्याला पुर्ण करण्‍यावर लक्ष केंद्रित करा.  

  • जेंव्‍हा तुम्‍ही सकाळी कामावर जाल तेंव्‍हाच तुम्‍ही दिवसभराची तयारी करून घ्‍या. 
  • दररोजच्‍या वेळेच्‍या तुलनेत तुम्‍ही थोडं लवकर उठा.
  • आपल्‍या जीवनशैलीला एका यशस्‍वी व्‍यक्‍तीसारखे ठेवा.

परंतू हे लक्षात असू द्या की तुम्‍हाला चालत राहायचे आहे, एक मिनिटसुद्धा वाया घालवायचा नाहीये. घरातील इतर कर्तव्‍यांना पार पाडा जसे एखादा यशस्‍वी व्‍यक्‍तीचेच जीवन तुम्‍ही जगत आहात. 


इथून पुढे पाहुया तातडीच्‍या गोष्‍टींमध्‍ये तारतम्‍य कसे बाळगावे याविषयी ....


तातडीच्‍या गोष्‍टींमध्‍ये तारतम्‍य (Develop a Sense of Urgency)

आपल्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये आपल्‍याला सर्वच कामे महत्‍वाची वाटतात परंतू त्‍यांपैकी तातडीची कामे व महत्‍वाची कामे यांमध्‍ये फरक कळायला पाहिजे.  कोणते काम महत्‍वाचे व तात्‍काळ कराचे काेणते?

एखादा यशस्‍वी खेळाडू रात्रं-दिवस मेहनत करतो, असं जसं की त्‍याला एखाद्या स्‍पर्धेत जायचे आहे. तो एक दिवसदेखिल आराम करत नाही.  तर येथे तुम्‍हालादेखिल एक प्रो-ऍथेलिट म्‍हणजेच एका व्‍यावसायिक खेळाडूसारखे स्‍वतःला मानावे लागेल.  आणि स्‍वतःमध्‍ये ती संवेदना तयार करा.  तुमच्‍या मेंदूला अधिकाधिक ''स्‍टेट ऑफ फ्लो'' म्‍हणजेच प्रवाही अवस्‍थेमध्‍ये जाण्‍यासाठी प्रशिक्षित करा. 

यासाठी सर्वांत उत्‍कृष्‍ट पद्धत ही आहे की, तुम्‍ही एक ''सेन्‍स ऑफ अर्जेन्‍सी'' - ''तातडीची संवेदना'' विकसित करा.  म्‍हणजेच एकाप्रकारे स्‍वतःसाठी काल्‍पनिक अंतिम मुदतींना ठरवून घ्‍या. (Set Imaginary deadlines).

एकदाका तुम्‍ही कामाला सुरूवात केली त्‍यानंतर तुम्‍ही स्‍वतःच पुढे जाऊ लागता.  आणि अशाच पद्धतीने सारखीच गोष्‍ट करत गेल्‍याने तुम्‍हाला कमी श्रम-मेहनत जाणवेल.  कोणत्‍याही प्रकारच्‍या विचलितपणापासून आपला बचाव करा.  स्‍वतःला वेळो-वेळी आठवण करून देत जात की तुम्‍हाला काम करायचे आहे. 


येथे आपण येऊन पाहोचलो आहोत पुढच्‍या मुद्द्यावर जो आहे Single Handle Every Task बद्दल


प्रत्‍येक कार्याला एकदाच हाताळणे (Single Handle Every Task)

दिवस उजाडताच आपण आपल्‍या कामांना सुरूवात करत असतो त्‍यांपैकी काही कामे आपोआपच सवयींद्वारे होत असतात त्‍यांवर आपले लक्षदेखिल नसते, तर काही कामे आपण जाणीवपुर्वक करत असतो.  परंतू आपसुकच होणारी कामे तर होतच राहतात.

परंतू आपल्‍याला जी महत्‍वाची व तातडीची कामे यांना करताना फरक करावा लागतो तेंव्‍हा सवय नसल्‍यामुळे एक काम करत असताना तेही अपुर्ण असताना दुसरे काम हाताळत असतो.  आणि तेंव्‍हाच आपला गोंधळ उडतो व आपली कामे अर्धवटच राहून जातात. असे का होते? येथे आपल्‍याला पुन्‍हा त्‍या सिंहाचे उदाहरण घ्‍यावे लागेल, की एखादा सिंह तोपर्यंत आराम करत नाी जोपर्यंत तो आपले शिकार करत नाही. 

आपल्‍या कामांना सुरू करणे व मध्‍येच त्‍यांना सोडून देणे आणि परंत त्‍यांना सुरू करणे..! असे करणे फक्‍त तुमचा वेळ वाया घालविणेच आहे, अजून काही नाही.  एकदाका तुम्‍ही तुमच्‍या कामावर लागालात तेंव्‍हा थांबू नका जोपर्यंत ते काम १००% पुर्ण होणार नाही तोपर्यंत.  स्‍वतःला शिस्‍त लावा जेणेकरून काम पूर्ण होईपर्यंत न थांबता तुम्‍ही काम करत राहाल. 

तर इथे बाेलेलण्‍याचा अर्थ असा आहे की, मुद्दा हा आहे की, गोंधळचा निष्‍कर्ष (Conclusion of Confusion) हा आहे की ह्या पुस्‍तकातील गाभा समजावून सांगतो की, आपली कार्यक्षमता, सामर्थ्‍य, Productivity वाढविण्‍यासाठी आपण पुस्‍तकातील ब-याच गोष्‍टी बघितल्‍या आणि शिकलोत.  जसे-

 

  • प्रत्‍येक दिवसाचे नियोजन करा 
  • ८०/२० चा सिद्धांत प्रत्‍येक गोष्‍टीत वापरा 
  • परिणामांना लक्षात ठेवा 
  • प्रत्‍येक कामात एबीसीडीई पद्धतीचा वापर करा आणि 
  • प्रत्‍येक कामाला तातडीने करा तसेच 
  • स्‍वतःला प्रेरित करा जेणेकरून स्‍वतःपासून काम करवून घेऊ शकाल
  • एकावेळी एकच काम करा

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

ह्यासोबतच ईट दॅट फ्रॉग ह्या पुस्‍तकाचे सारांश समाप्‍त होत आहे.  आशा आहे तुम्‍हाला या सारांश मधून काही शिकायला मिळालं असेल.  पुस्‍तकातील कमीतकमी वेळेत अधिकाधिक काम करण्‍यासाठीचे २१-प्रभावी मार्ग सविस्‍तर समजून घेण्‍यासाठी खालील दिलेल्‍या दुव्‍यावरून (Link) पुस्‍तक खरेदी करा.  आणि आपले सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा

 

👉भाग-१ वाचन करण्‍यासाठी इथे क्लिक करा 

👉 मुखपृष्‍ठ (Home)

 

👉पुस्‍तक खरेदी करून सविस्‍तर वाचन करा 

 

इंग्रजी आवृत्‍ती         मराठी आवृत्‍ती 




☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवत राहा.

धैर्यपूर्वक पुस्‍तक सारांश वाचन केल्‍याबद्दल
आपले मनःपुर्वक 
🙏 धन्‍यवाद
.

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in



👉ई-वाचनालय (www.evachnalay.in) संकेतस्‍थवरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तके वाचन कराः

 जसे- 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive