द डायरी ऑफ अ यंग गर्ल -मराठी -अॅन फ्रॅंक -चरित्र | The Diary of a Young Girl -Anne Frank
द्वितीय विश्वयुद्धावेळी ज्यू-धर्मीयांवर होत असलेल्या हिटलरच्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अॅन आणि तिचे
कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या दरम्यानच्या काळात तिने लिहिलेली डायरी-दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली.
द डायरी ऑफ अ यंग गर्ल
अॅन फ्रॅंक
अॅन फ्रॅंक
मराठी -चरित्र
पुस्तक परिचय मराठी
![]() |
द डायरी ऑफ अ यंग गर्ल -मराठी -अॅन फ्रॅंक -चरित्र |
Anne Frank
The Diary of a Young Girl
German diarist
The Diary of a Young Girl
German diarist
आनेलीस मारी फ्रांक असे त्या जर्मन, ज्यू वंशीय किशोरवयीन मुलीचे पूर्ण नांव. ही ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक 14-15 वर्षांची ज्यूधर्मीय किशोरवयीन मुलगी होती. तिच्या अवतीभवती जेकाही घडतंय ते सगळं ती तिच्या शब्दात लिहित असे.
द्वितीय विश्वयुद्धावेळी ज्यू-धर्मीयांवर होत असलेल्या हिटलरच्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अॅन आणि तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या दरम्यानच्या काळात तिने लिहिलेली डायरी-दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली. याच दैनंदिनी-रोजनिशीच्या पुस्तकावर आधारित अनेक नाटके तसेच चित्रपट बनविण्यात आले आहेत.
तिच्या सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलँड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल नोंदवले आहेत. तिच्या २० जून, १९४२ सालच्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
ॲनला चित्रपट बघायला खूप आवडायचे, पण ८ जानेवारी, १९४१ पासून ज्यू लोकांना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला गेला होता. दोन वर्षांच्या कालावधील 13-14 वर्षाच्या मुलीने लिहिलेल्या अशा काही नोंदी त्या डायरीमधून जगाला कळाल्या ज्या कदाचित कळाल्या नसत्या.
अॅमस्टरडॅमला तिच्या वडिलांना अॅनची दैनंदिनी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९४७ मध्ये ती दैनंदिनी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. मूळ डच भाषेत लिहिलेल्या त्या दैनंदिनीचे १९५२ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले व नंतर अनेक भाषांमधून भाषांतर केले गेले. मराठीमध्ये मंगला निगुडकर यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
अॅन, तिचे आई-वडिल व एक बहिण असे चौघेजणांचे कुटूंब होते. ते अधिकवेळ जर्मनीमध्ये राहिले नाही. जर्मनीचा तानाशाह, ऍडॉल्फ हिटलर जेव्हा सत्तेवर येतो व त्याच्या विखारी विचारांमुळे भविष्याची चाहूल लागल्यामुळे अॅनच्या कुटूंबियांनी नेदरलॅड या देशाला जाण्यासाठी निघतात. आणि ऍमस्टरडॅम या शहरात राहायला लागतात.
वडिलांकडून
ॲनला तिच्या तेराव्या वाढदिवशी, १२ जून, १९४२ रोजी, एक वही भेट मिळाली. ही
वही तिनेच तिच्या वडिलांना काही दिवसांआधी एका दुकानाच्या खिडकीत दाखवली
होती. पांढऱ्या-लाल कापडात बांधलेली आणि वरून छोटेसे कुलूप असलेली अशी ती वही होती. ती एक (ऑटोग्राफ) स्वाक्षरी-वही होती, अॅनने ती वही दैनंदिनी किंवा रोजनिशी म्हणून वापरायचे ठरवले आणि लगेच लिखाण चालू केले.
तिच्या या डायरीमध्ये ती स्वतःच्या भाव-भावनांना व्यक्त करत असते, काही कटू-गोड अनुभव, सुख-दुखांचे क्षण लिहित असते. नोंदवत असे. सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या आहेत. सर्व काही ठीक चालले असतानाच हिटलरचे नेदरलॅंडवरही ताबा मिळवले जाते.
दैनंदिन नोंदीसह तिने नेदरलँड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल
नोंदवले आहेत. तिच्या २० जून, १९४२ सालच्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर
लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त
केले आहे. जीव वाचवण्यासाठी ज्यांना इतर देशात जाऊन राहणे शक्य नव्हते अशा ज्यू लोकांनी स्वतःसाठी तळघर, गुप्त घर बनवून घेतलेले होते. नाझींना आपल्याबद्दल काही कळू नये म्हणून ते कित्येत दिवस ते त्या गुप्तखोल्यांमध्ये ते राहत असत.
ऑटो फ्रॅंक म्हणजेच ॲनच्या वडिलांनी देखिल असाच गुप्तपणे लपून राहण्याचा निर्णय घेतला होता. ते जिथे कामाला होते त्या वेअर हाऊसच्या वरच एक गुप्तघर होते त्याचे नाव ह1 "द सिक्रेट ऍनेक्स". या गुप्तघरात जाण्याचा रस्ता एका पुस्तकांच्या कपाटातून जात होता. तिथे ॲन एकटी नव्हती तर त्यांच्या सोबत इतरही एक परिवार राहत असे.
द सिक्रेट ऍनेक्समध्ये ते जवळपास दोन वर्षे राहिले. या दोन वर्षात बरेचसे बदल झालेले होते. नेदरलॅंंडमध्ये सर्वकाही बदलून गेले होते. यासाठी अगोदरॲन तिच्या मित्र-मैत्रीनींचा, आपल्या भाव-भावनांचा उल्लेख करत होती, किंवा आपल्या शरिरात होणा-या बदलांना शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती, तीने आता युद्ध, लढाया, राजनिती यांबद्दल लिहिणे चालू केले होते.
थोडक्यात ॲनच्या लिखानातही बरेच बदल झाले. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला असं वाटेल की जणू काही हे पुस्तक एखाद्या सुशिक्षित, सुजाण, जाणकार, परिपक्व व्यक्तीने, लेखकाने लिहिलेले आहे, खरे तर हे सर्व एका किशोरवयीन, निरागस, अपरिपक्व मुलीचे लिखान आहे..!
जवळपास दोन वर्षांनी या गुप्तघराचा सुगावा हिटलरच्या नाझी गुप्तपोलीसांना लागला, आणि त्यांना पकडण्यात आले. ऑटो फ्रॅंक यांना वेगळे आणि इतरांना तिथून एका लेबर कॅम्पमध्ये नेण्यात आले जिथे इतर ज्यू कैदी ठेवण्यात आले होते. या लेबर कॅम्पमध्ये ते काहीवेळ एकत्रित राहिले, परंतू काही काळाने त्यांना इतर दुस-या कॅम्प मध्ये जाण्यासाठी निवडण्यात आले त्यात त्यांच्या आईची निवड न होऊ शकल्याने त्यांना त्याच लेबरकॅम्प मध्ये ठेवण्यात आले, पुढे इथेच त्यांचा अन्नावाचून, भुकेने, उपासमारीने निधन झाले.
ॲनला आणि तिच्या बहिणीला दुस-या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले तिथे एक टायफस नावाचा साथीच्या तापीचा आजार पसरला होता. यामुळे अगोदार तिच्या बहिणीचा व नंतर ॲनचाही मृत्यू झाला.
नाझींचा ज्यू द्वेश, हिटलरच्या छळछावण्या, जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागल्या अशा या ज्यू लोकांचा झालेला नरसंहार याचा एका निरागस, निरपराध, अपरिपक्व, अल्पशिक्षित, मुलीच्या नजरेने पाहात होती, अनुभवत होती, तिच्याडोळ्यांसमक्ष केले जाणारे ज्यू लोकांचे हाल, त्यांचे होणारे मृत्यू त्यांना तितक्याच धीटपणे, गंभीरपणे सामोरे जात होती. बघत होती, सहन करत होती.
दोन वर्षांच्या कालावधील 13-14
वर्षाच्या मुलीने लिहिलेल्या अशा काही नोंदी त्या डायरीमधून जगाला
कळाल्या ज्या कदाचित कळाल्या नसत्या.
टिप्पण्या