युद्ध जिवांचे: जैविक व रासायनिक युद्धांचा संसर्गजन्‍य इतिहास - गिरीश कुबेर | Yuddha Jivanche:

शत्रूच्‍या सैनिकांना ठार मारण्‍यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे!  अदृश्‍य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुद्धा त्‍यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं.
 
युद्ध जिवांचे
जैविक व रासायनिक युद्धांचा संसर्गजन्‍य इतिहास
गिरीश कुबेर 

 
राजहंस प्रकाशन
पुस्‍तक परिचय (मराठी)
 #Yuddha Jivanche: Jaivik & Raasayanik #Chemical and #Biological Weapons  #World War First (WW1) #Second World War (WW2)

शत्रूच्‍या सैनिकांना ठार मारण्‍यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे!  अदृश्‍य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुद्धा त्‍यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. 
आता तर हे तंत्रज्ञान ही फक्‍त काही देशांचीच मक्‍तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्‍याही आवाक्‍यात ते तंत्रज्ञान आलंय.
आपल्‍यासारख्‍या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्‍हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही.
त्‍या महाभयानक संघर्षाची खडान्-खडा बित्‍तंबातमी आपल्‍यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्‍तक..
रंजक तेवढाच संहारक असा हा जैवरसायनांचा युद्धेतिहास....  


असंख्‍य मुक्‍या प्राण्‍यांचं तसेच माणसांचं जीव घेणारे जैविक हल्‍ल्‍याचं तंत्र, जंतुयुद्ध, जैवरासायनिक युद्ध, रासायनिक मारेक-यांची काहणी... 
 
जंतूअस्‍त्रांचा, रसायनास्‍त्रांचा, जैविकास्‍त्रांचा, विकृत आणि अमानुष इतिहास असाच आहे, नकळत, शांतपणे मृत्‍यूने आळा घालून असंख्‍य निरपराध लोकांचा-प्राण्‍यांचा-जंगलांचा जीव घेणारा इतिहास व वर्तमानही आणि भविष्‍य तर अतिजहाल, महासंहारक असाच असणार...  
 
आपण पृथ्‍वीच्‍या ज्‍या थरात राहातो त्‍या जीवावरणात आपल्‍या आवतीभोवती असंख्‍य असे सूक्ष्‍मजीव-जीवाणू-विषाणू असून निसर्गाचा समतोल असल्‍यामुळे आपल्‍याला काही समजून येत नाही. 
 
परंतू मानवाच्‍या विकृत महत्‍वाकांक्षासाठी त्‍यांचा वापर करून निसर्गामध्‍ये असमतोलता आणून अनैसर्गिकपणे आपली उद्दिष्‍ट्ये साध्‍य करण्‍यासाठी निर्जीव सरसायने व अदृश्‍य सूक्ष्‍मजीवांचा वापर कसा करत आहे यांचा इतिहास जाणून घ्‍यायला आजच्‍या कोरोना काळात जिज्ञासूनी आवश्‍य वाचावी अशी पुस्‍तक.

युद्ध जिवांचे
जैविक व रासायनिक युद्धांचा संसर्गजन्‍य इतिहास
लेखक – गिरीश कुबेर
पुस्‍तक परिचय (मराठी)


 
आपण पृथ्‍वीच्‍या ज्‍या थरात राहातो त्‍या जीवावरणात आपल्‍या आवतीभोवती असंख्‍य असे सूक्ष्‍मजीव-जीवाणू-विषाणू असून निसर्गाचा समतोल असल्‍यामुळे आपल्‍याला काही समजून येत नाही.
 
मानवाने प्राचीन काळापासूनच या नैसर्गिक जीवजंतू आणि निर्जिव रसायनांचा वापर आपल्‍या स्‍वार्थासाठी अनैसर्गिकपणे युद्धकलेच्‍या स्‍वरूपची पद्धत अवलंबलेली होती. 
 
विकासाच्‍या नावाखाली की पर्यावरणाचा विनाश करून नव-नविन शोध-आविष्‍कारांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास-विस्‍तार जस-जसा होत गेला तस-तसे निसर्गातील गुढ़ रहस्‍ये उलगडायला लागली तसा नवनविन सूक्ष्‍म-जीवजंतूंचा शोध लागत गेला.
जसे की प्‍लेग चे विविध प्रकारः
  • ब्‍युबोनिक प्‍लेग (७५-टक्‍के रूग्‍ण वाचायचे नाहीत)
  • न्‍युमोनिक प्‍लेग (९० ते ९५-टक्‍के रूग्‍ण यातून वाचत नाहीत)
  • काळा प्‍लेग (१००-टक्‍के मरणाची हमी देणारा)
  • आणि २०२० साली अवतरलेला ‘’कोरोना’’ संसर्गजन्‍य, साथीच्‍या आजारांचा इतिहास तसेच,
  • २०-२१-व्‍या शतकातील पोलिओ, 
  • बर्ड-फ्लू, 
  • स्‍वाइन फ्लू, 
  • सार्स, 
  • मर्स, 
  • देवी, 
  • साथीचे आजार, 
  • अँथ्रॅक्‍स, 
  • या व्‍यतिरिक्‍त निसर्गामध्‍ये अदृश्‍य असलेली/लपलेली आपल्‍याला अजूनही माहित नसलेली अदृश्‍य जीवाणू-विषाणूंची संख्‍या अनेक पटींनी जास्‍त आहे.

जगप्रसिद्ध ट्रोजन युद्धातही ज्‍यांना आता आपण बायोलॉजिकल वेपन्‍स म्‍हणतो, अशा जीवशास्‍त्रीय अस्‍त्रांचा वापर झाला होता.  ग्रीक पुराणकालातील योद्धे विषारी प्राण्‍यांच्‍या शरिरांना कुजवून, मानवी रक्‍त, शेण इ. मिसळून कित्‍येक दिवस रांजणात मुरवत ठेवले जायचे, त्‍या रांजणांत कित्‍येक दिवस भाले, बाणं ठेवून युद्धात वापरायचे.  
 
बाणांत विष कसं भिनवायचे, युद्धात रोगट प्राण्‍यांच्‍या, माणसांच्‍या देहांची फेकाफेक, विहिरी, नदी, तलावांत विष कालवणे, प्राण्‍यांकडून माणसांमध्‍ये आजार पसरविणे, रोगवाहक डासांची निर्मिती, कबूतरांच्‍या पंखांवर विष शिंपडून ती विषवाहक होऊ शकतात. 
 
त्‍यांचाही उपयोग आजार पसरविण्‍यासाठी करता येऊ शकतो इथपासून....ते आधुनिक वायूहल्‍ले करून विषारी वायू पसरविणे, रात्री गावाबाहेरूनच रंगहिन-गंधहिन अदृश्‍य विषारी वायूच्‍या धुळकांड्या फेकून-फोडून अख्‍खी गावच्‍या-गावं एका रात्रीतून बेचिराख करायची.  मुक्‍या पक्षी-प्राणी-माणसांना (आणि झाडे-झुडपे शेतातील उभी पिकं यांनाही) झोपेतच मृत्‍यूने गाठलेले असायचे. 
 
प्रत्‍येक सजीव मृत्‍यूच्‍या दाढेत निपचित पडलेलं असायचं, नुसता मृतदेहांचा सडा.... 
 
द्वितीय विश्‍व युद्धोतर जगात आजाराची साथ आखून, मोजून मापून, कोणाच्‍या फायद्यासाठी पसरवली जात होती की काय? इतकी वर्षं प्‍लेग, हगवण, काळपुळी .. अशा अनेक साथींत गरीब देशांतील लाखो लोकं किडामुंगीसारखी मरतायत.  त्‍या साथीच्‍या मागेही असेच औषध कंपन्‍यांचे काळे-धागे-दोरे, राजकारण, कटकारस्‍थानं होती की काय? 
 
वॅक्सिन (Vaccine) चा रंजक इतिहास ते विश्‍वयुद्धासाठी जहाल जैवरासायनिक अस्‍त्रांच्‍या प्रयोगासाठी कसे ब्रिटननं राखून ठेवलेलं एक अख्‍खं बेट... इथपर्यंत...
 
हिटलरची एक चुक त्‍याला कशी महाग पडली आणि त्‍याची गुप्‍तता धोरणे कशी उजवी ठरली हे एका गोष्‍टीवरून दिसून येते. 
 
दुस-या महायुद्धानंतर विजयी बड्या राष्‍ट्रांना अतिधक्‍कादायक बाब म्‍हणजे त्‍यांची पोकळ हेरयंत्रणा, दोस्‍त राष्‍ट्रांपैकी एकालाही तब्‍बल ०८-वर्षे हिटलरने नेमकी कोणती रसायनास्‍त्रं तयार केली आहेत याचा जराही पत्‍ता लागलेला नव्‍हता. हिटलरनी काय करून ठेवलंय, युद्धानंतर जेंव्‍हा या देशांच्‍या धुरीणांच्‍या लक्षात आलं तेंव्‍हा युद्ध संपलेलं होतं आणि ते जिंकलेले होते, तरी त्‍यांना घाम फुटला....  
 
हिटलरची ‘’ब्‍लॅक-बुक’’ नाझी अधिका-यांनी जाळून टाकल्‍या, एक गुढ़-गुप्‍त हिटलरसोबतच दफन झाले असे अनेकांना वाटले परंतू अमेरिका-इंग्‍लंड यांनी जंगजंग पछाडल्‍यावर -शोध घेतल्‍यावर जर्मनीकडे जहाल असे रसायनास्‍त्र आहे, पण ते नक्‍की काय आहे हे कळायला अजून दोन वर्षे लागली. 
 
एका युद्ध कैद्यानं सांगितलं, 
‘’हिटलरच्‍या रसायनास्‍त्र तज्ञांनी असं एक अस्‍त्र बनवलंय की जे रंगहीन, गंधहीन असून महासंहारक, जहाल, अत्‍यंत धोकादायक आहे.  त्‍याचे दुष्‍परिणाम दिसायला लागतात, तोच या अस्‍त्राचं अस्तित्‍व जाणवण्‍याचा क्षण आणि तोच माणूस मरणपंथाला लागायचा क्षण...’’
 
जर ही अस्‍त्रं हिटलरने वापरली असती किंवा दोस्‍त राष्‍ट्रांच्‍या हाती लागली असती तर रंगहीन, गंधहीन अशा रसायनास्‍त्रांमुळे अख्‍खे जग मृत्‍यूच्‍या दाढेत गेले असते. 
 
आज जी राष्‍ट्रं स्‍वतःला स्‍वयंघोषित महासत्‍ता म्‍हणून मिरवतात त्‍यांच्‍या इतिहासात डोकावल्‍यावर कळेल गुप्‍तहेर संघटनांना हाताशी घेऊन त्‍यांचे हातही ह्या जैविक अस्‍त्रांच्‍या निर्मितीत होते.

 
अमेरिका, रशिया, जर्मनी, चीन यांच्‍या ऐवजी कसे हिरोशिमा-नागासाखी सारखी महासंहारक अस्‍त्रांच्‍या कित्‍येक पटींनी महासंहारक जैवरासायनिक अस्‍त्रं जपान तयार करत होता व तिसरे महायुद्ध झालेच असते तर त्‍याचे परिणाम जगाला कसे बेचिराख केले असते याचे विचारच मन सुन्‍न करून सोडतात... 
 
जसे हिटलरने जर्मनीत कॉन्‍सट्रेशन कॅम्‍प बनवून छळछावण्‍यांत रूपांतरीत केले होते जर्मनीच असे करत नव्‍हता तर युद्धात शत्रूस तोडीसतोड म्‍हणून इंग्‍लंड, रशिया, अमेरिका तसेच जपाननेही विशिष्‍ट रसायने, सूक्ष्‍म-जीवजंतूंचा, मानवी शरिरावर काय व कसा परिणाम होतो यासाठी रशिया-जर्मनी-अमेरिकेच्‍या नंतर जपानच वरचढ राहिला हे त्‍यांचे गुप्‍त प्रयोग, प्रयोगशाळा पाहिले असता कळून चुकते.  तसेच, 
 
कसं अमेरिकेनं काही प्रकरणात सरकारी, खाजगी रूग्‍णालयांतले गंभीर आजाराचे रूग्‍ण त्‍यांना न सांगता प्रयोगांसाठी निवडले. कैद्यांवर वेगवेगळे प्रयोग केले आणि हे सगळेच प्रयोग माणसांशीच निगडित होते, असे नाही. 
 
अमेरिकेचं लक्ष झाडांवरही होतं.  त्‍यांची वाढ कशी रोखता येईल, शेतांतली उभी पिकं कशी करपवून टाकता येतील, यासाठीही प्रयोग सुरू होते.   
 
प्रसिद्ध अमेरिका-व्हिएतनाम युद्धात तर असंख्‍य झाडं-झुडपं आणि शेतातील उभी पिकं यांना विषारी-विखारी, तीव्र रसायनास्‍त्रं फवारून स्‍वाहा करण्‍यात आलं होतं.  एकेकाळचं हिरवंगार बेट, विषारी, घातक रसायनास्‍त्रांमुळे उजाड, भकास बनलं होतं.  तब्‍बल ३२-लाख एकर जंगल-जमीन नापीक तरी झाली अथवा रसायनांमुळे बाधित झाली.
🌽 यासोबतच शेतजमीनीचं नुकसान झालं, ते वेगळंच.
०२-लाख ४७-हजार एकर एवढ्या शेतीवरील उभं पीक आडवं झालंच, पण शिवाय रसायनांमुळे बराच काळ या जमिनीवर पुढे काहीही पिकू शकलं नाही. 👉🧪💣 (म्‍हणजे व्हिएतनाममधील  एकूण जमिनीपैकी एक सप्‍तमांश (०१/०७) जमीन या अस्‍त्रांमुळे कामातून गेली.) 
 
पेस्‍टीसाइड्स कीटकांना संपतात तर हर्बिसाइड्स झाडाझुडपांना...अमेरिकेत ही नवी वृक्षनाशकं जन्‍माला घतली गेली. 
 
सलग ०९-वर्षं अमेरिकेनं व्हिएतनामची भूमी रसायनांनी चिंब करून टाकली होती. या युद्धात अमेरिकेनं व्हिएतनामवर एक-कोटी ९०-लाख गॅलन्‍स रसायनास्‍त्रांचा मारा केला होता.  युद्ध संपल्‍यावरदेखिल अगदी कालपरवापर्यंत त्‍यांचा प्रभाव जाणवत होता.  रसायनांचा दुष्‍परिणाम जमिनीत रूजलेल्‍या झाडांवर झाला, तो झालाच, पण त्‍या आधारे जगणा-या प्राणी-पक्ष्‍यांवर- इतकंच काय पण माणसांवरही झाला. 
 
फफ्फुसांचे, श्र्वसनमार्गाचे, रक्‍ताचे, सर्व प्रकारचे कर्करोग, त्‍वचारोग, अंधत्‍व आणि वंध्‍यत्‍व, गर्भविकृती असे अनेक गंभीर आजार-विकार त्‍यामुळे उद्भवले ते वेगळेच.  
 
महिलांवर या रसायनांचा परिणाम झाल्‍याने जन्‍माला आलेली पाच लाख बालकं आपला एखादा अवयव अथवा एखादी संवेदना हरवूनच जन्‍माला येत होती.  एक पिढीच्‍या पिढी हे असं शापित आयुष्‍य घेऊन जन्‍माला आली.  स्‍वतः अमेरिकेच्‍या लाखो युद्धसैनिकांवर या रसायनास्‍त्रांचा युद्धज्‍वर, अपंगत्‍व, पोटाचा, श्‍वसनाचा त्‍वचेचाही कर्करोग यासारखे दुष्‍परिणाम झाले. 
 
जंतूअस्‍त्रांचा, रसायनास्‍त्रांचा, जैविकास्‍त्रांचा, विकृत आणि अमानुष इतिहास असाच आहे, नकळत, शांतपणे मृत्‍यूने आळा घालून असंख्‍य निरपराध लोकांचा-प्राण्‍यांचा-जंगलांचा जीव घेणारा इतिहास व वर्तमानही आणि भविष्‍य तर अतिजहाल, महासंहारक असाच असणार... 
 
आपण पृथ्‍वीच्‍या ज्‍या थरात राहातो त्‍या जीवावरणात आपल्‍या आवतीभोवती असंख्‍य असे सूक्ष्‍मजीव-जीवाणू-विषाणू असून निसर्गाचा समतोल असल्‍यामुळे आपल्‍याला काही समजून येत नाही.
 
परंतू मानवाच्‍या विकृत महत्‍वाकांक्षासाठी त्‍यांचा वापर करून  निसर्गामध्‍ये असमतोलता आणून अनैसर्गिकपणे आपली उद्दिष्‍ट्ये साध्‍य करण्‍यासाठी निर्जीव सरसायने व अदृश्‍य सूक्ष्‍मजीवांचा वापर कसा करत आहे यांचा इतिहास जाणून घ्‍यायला आजच्‍या कोरोना काळात जिज्ञासूनी आवश्‍य वाचावी अशी पुस्‍तक.

युद्ध जिवांचे

जैविक व रासायनिक युद्धांचा संसर्गजन्‍य इतिहास
लेखक – गिरीश कुबेर
पुस्‍तक परिचय (मराठी)

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive