डॉ.कलाम यांचे बालपण-चाइल्‍डहूड ऑफ कलाम - सृजनपाल सिंग

पुढील पिढीला दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व मिसाईलमॅन डॉ.कलाम यांना प्रेरणा कोणी दिली? मार्गदर्शन कोणी केलं? त्‍यांचे आदर्श कोण होते? कलामांचे बालपण आणि बालपणीचे कलाम यांबद्दल... रामेश्‍वरम् येथील लहान कलाम ते यांच्‍या भारताचे राष्‍ट्रपती होण्‍यापर्यंतचा प्रवास

डॉ.कलाम यांच्‍या लहानपण-बालपणाच्‍या कथावर आधारित
चाइल्‍डहूड ऑफ कलाम 

सृजनपाल सिंग  

पुस्‍तक परिचय मराठी

डॉ.कलाम यांचे बालपण 
 
पुस्‍तकाविषयी दोन शब्‍दः 
  • रामेश्‍वरम् येथील लहान कलाम ते यांच्‍या भारताचे राष्‍ट्रपती होण्‍यापर्यंतचा प्रवास,
  • अशा कोणत्‍या गोष्‍टी होत्‍या ज्‍यांमुळे छोट्या कलामांना अग्‍नीला पंख लावावेसे वाटले
  • कोणत्‍या गोष्‍टींनी त्‍यांना प्रेरित केलं असेल
  • त्‍यांचे बालपणाचे प्राथमिक शिक्षण, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण, नैतिक शिक्षण, जीवन कसे होते, 
  • त्‍यांचा पारिवारीक-कौटुंबिक-सामाजिक वातावरण जिथे ते लहानाचे मोठे झाले ते कसे होते, 
  • लहानशा कलामावर त्‍यांच्‍या शेजारी, मित्र-परिवार, धार्मिक-नैतिक शिक्षण याचा प्रभाव ज्‍यामुळे ते घडले या सर्व गोष्‍टींचा उल्‍लेख पुस्‍तकात आहे.

 📗📘📙📖📕🔖📑

भारताला घडविण्‍यात आणि जगात ख-या अर्थाने व सन्‍मानाने, आत्‍मनिर्भर बनविणा-या काही मोजक्‍या व्‍यक्‍तींच्‍या यादीतील हे एक नाव, स्‍वातंत्र्योत्‍तर भारतातील प्रत्‍येक पिढीला प्रेरीत करणारे त्‍यांचे जीवनकार्य आहे. म्‍हणूनच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी भारतातील प्रत्येक नागरिकाच्‍या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे.

भारताला स्‍वतःच्‍या पायावर उभे टाकण्‍यासाठी आजच्‍या पिढीला अर्थातच आपल्‍याला छोट्याश्‍या काचेच्‍या चौकोनात तंत्रज्ञान सामावून देण्‍यास हातभार लावणा-या काही मोजक्‍या लोकांनी ज्‍यांनी आपले आयुष्‍य वेचले, अशा महत्‍वाकांक्षी व्‍यक्‍तींपैकी एक व्‍यक्‍तीमत्‍व, शिक्षक-शास्‍त्रज्ञ, मिसाईलमॅन, आणि भारताचे लोकप्रिय राष्‍ट्रपती, राहिलेले डॉ.कलाम यांच्‍या बालपणाबद्दलचे उल्‍लेख त्‍यांनी आपल्‍या जीवनचरित्राला थोडक्‍यात विंग्‍ज ऑफ फायर म्‍हणजेच अग्निपंख या पुस्‍तकात सांगितलेलं आहे.

आपल्‍याला यशस्‍वी व्‍यक्‍तींचे यशच दिसते त्‍यासाठी त्‍यांनी काय कष्‍ट वेचले, किती श्रम उपसले, मेहनत केली, खाच-खळगे पार केले, किती हालअपेष्‍टा सहन केल्‍या, यशासाठी काय किंमत मोजली, वेळप्रसंगी आप्‍तनातेवाईकांपेक्षाही आपल्‍या ध्‍येयाला महत्‍व दिले हे किती जणांना माहित असते त्‍यांना स्‍वतःला आणि फक्‍त आणि फक्‍त त्‍याच व्‍यक्‍तीला माहित असतात, परंतू आपण त्‍यांना नजरअंदाज करतो किंवा यशाची किंमत मोजावी लागते असे म्‍हणून पर्याय शोधतो.

त्‍यांचे हेच मोलाचे आणि महत्‍वाचे कार्य पुढील पिढीला दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे असते. म्‍हणूनच इतिहासात अशा व्‍यक्‍तींचा उल्‍लेख आवर्जून केलेला असतो, सुवर्णाक्षरात लिहिला जातो हा सन्‍मान त्‍यांनी कमावलेला असतो. अशा व्‍यक्‍तींचा आपण सन्‍मान करतो, त्‍यांच्‍या कष्‍टाला, त्‍यांनी केलेल्‍या त्‍यागाचा आदर करतो.

ज्‍या ध्‍येयासाठी, तत्‍वांसाठी, मूल्‍यांसाठी, आदर्शासाठी, आपल्‍या आजच्‍या उज्‍वल भविष्‍यासाठी त्‍यांनी हे कार्य सुरू केले होते, त्‍याग केले होते ते महत्‍कार्य आपण पुढे चालू ठेवणे यासाठी नक्‍कीच त्‍यांचे जीवनकार्य आपल्‍याला दिशा देईल, मार्गदर्शन करेल, प्रेरणा देईल, हेच त्‍यांच्‍या महत्‍कार्याला, कलाम यांना योग्‍य सलाम ठरेल.

यासाठी त्‍यांच्‍याबद्दल अधिकाअधिक जाणून घेण्‍यासाठी जिज्ञासू विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्वस्‍तरांच्‍या व्‍यक्‍तींना जाणून घ्‍यावे असे त्‍यांचे आयुष्‍य नक्‍कीच आहे. त्‍यांच्‍या बालपणाबद्दल सृजनपालसिंग यांनी चाइल्‍डहूड ऑफ कलाम ही पुस्‍तक लिहिलेली आहे, डॉ.कलामांसोबत त्‍यांनी स्‍वतः काम केलेलं आहे, स्‍वतः लेखकांसाठी डॉ.कालाम हे त्‍यांचे रोल मॉडेल अर्थातच आदर्श व्‍यक्‍ती होते त्‍यांनी पुस्‍तकरूपात कलामांचे बालपण शोधण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

सृजनपालसिंग यांनी आपले जीवन कलाम यांच्‍या पदचिन्‍हांवर जगण्‍याचे ठरविले आहे, त्‍यासाठी त्‍यांनी भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी (https://kalamcentre.com) कलाम सेंटर नावाचे संकेतस्‍थळ सुरू केले आहे.  कलाम लायब्ररी-ग्रंथालय ज्‍याद्वारे भारतातील 15 राज्‍यांतील 460 मोफत ग्रंथालय एकमेकांना जोडलेले आहेत, याद्वारे विद्यार्थ्‍यांना ज्ञानाचे भंडार खूले केले आहेत. जी एक सर्वांत मोठी जागतिक मोफत ग्रंथालय चळवळ आहे.

डॉ.कलाम यांच्‍या स्‍वप्‍नांना व त्‍यांच्‍या विचारांतील भारत घडविण्‍याच्‍या दूरदृष्‍टीने प्रेरित व समर्पित कलाम सेंटर अंतर्गत त्‍यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमं राबविली आहेतः

लहानपण, बालपण आपल्‍या पुढील भविष्‍यकालीन जीवनाचा पाया बनविण्‍याचा काळ असतो. इंग्रजीत एक म्‍हण आहे, Roots creates the Fruits, जशी मूळं तशी फळं, त्‍याचप्रमाणे डॉ.कलामांच्‍या बालपणात त्‍यांची मूळं बनण्‍याचा काळ ज्‍यामुळे ते आयुष्‍यभर नैतिकता व मूल्‍यांना एकनिष्‍ठ राहू शकले. 

Roots creates the Fruits, जशी मूळं तशी फळं

कुंभार ओल्‍या मातीच्‍या गोळ्याला प्राथमिक अवस्‍थेत जो आकार देतो, जी वळणं देतो, जो रंग देतो, ज्‍या ठेचा देतो, जो दाब देतो ज्‍यामुळे आपण एक परिपूर्ण मातीचे मडके आकारास आलेले पाहतो. अशीच अवस्‍था म्‍हणजेच कलामांचे बालपण या पुस्‍तकात आपल्‍याला भेटेल.

रामेश्‍वरम् येथील लहान कलाम ते यांच्‍या भारताचे राष्‍ट्रपती होण्‍यापर्यंतचा प्रवास, अशा कोणत्‍या गोष्‍टी होत्‍या ज्‍यांमुळे छोट्या कलामांना अग्‍नीला पंख लावावेसे वाटले, कोणत्‍या गोष्‍टींनी त्‍यांना प्रेरित केलं असेल, त्‍यांचे बालपणाचे प्राथमिक शिक्षण, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण, नैतिक शिक्षण, जीवन कसे होते, त्‍यांचा पारिवारीक-कौटुंबिक-सामाजिक वातावरण जिथे ते लहानाचे मोठे झाले ते कसे होते, लहानशा कलामावर त्‍यांच्‍या शेजारी, मित्र-परिवार, धार्मिक-नैतिक शिक्षण याचा प्रभाव ज्‍यामुळे ते घडले या सर्व गोष्‍टींचा उल्‍लेख पुस्‍तकात आहे.  अवश्‍य वाचा.

 📗📘📙📖📕🔖📑

इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive