सुखाच्‍या शोधात-ख्रिस गार्डनर- द पर्स्यूट ऑफ हॅप्‍पीनेस मराठी The Pursuit of Happyness Marathi Chris Gardner मराठी अनुवाद पुस्‍तक समीक्षा-सारांश-परिचय

"प्रयत्‍नांवर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्‍न करणा-यांना यश मिळतेच.  परमेश्‍वर, आशीर्वाद आणि प्रयत्‍न यश देतात.  सुखाच्‍या मागे धावण्‍यापेक्षा कष्‍टाची कास धरली तर सुख आणि समृद्धी तुमच्‍यासाठी तुमच्‍या मागे येईल याचीच गोष्‍ट सांगते ख्रिस गार्डनर यांचे The Pursuit of Happyness हे पुस्‍तक"

सुखाच्‍या शोधात

लेखक- ख्रिस गार्डनर

मुळ इंग्रजी पुस्‍तक द पर्स्यूट ऑफ हॅप्‍पीनेस चे मराठी अनुवाद 

पुस्‍तक समीक्षा-सारांश-परिचय 

The Pursuit of HAPPYNESS
Author- Chris Gardner
Autobiography

 द पर्स्यूट ऑफ हॅप्‍पीनेस मराठी | The Pursuit of Happyness Marathi
ख्रिस गार्डनर
आत्‍मचरित्र-आत्‍मकथा-
Biography-Autobiography

 

"प्रयत्‍नांवर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्‍न करणा-यांना यश मिळतेच.  परमेश्‍वर, आशीर्वाद आणि प्रयत्‍न यश देतात.   

ख्रिस गार्डनर-The Pursuit of Happyness
"सुखाच्‍या मागे धावण्‍यापेक्षा कष्‍टाची कास धरली तर सुख आणि समृद्धी तुमच्‍यासाठी तुमच्‍या मागे येईल."
याचीच गोष्‍ट सांगते ख्रिस गार्डनर यांचे The Pursuit of Happyness हे पुस्‍तक"याचीच गोष्‍ट सांगते ख्रिस गार्डनर यांचे The Pursuit of Happyness हे पुस्‍तक"

🙏लेख- साभार: निमेश आहेर (पुण्‍यनगरी-रसयात्री) संपर्क: ८८३०२९७१३७

ई-वाचनालय | www.evachnalay.in 

१९८० च्‍या दशकात पोटापाण्‍यासाठी धडपडणारे ख्रिस गार्डनर यांनी The Pursuit of Happyness हे आत्‍मचरित्र लिहिले.  पुस्‍तकाची पाने म्‍हणजे ते जगलेले क्षण.  आत्‍मचरित्र अमेरिकेचत प्रसिद्ध होताच अल्‍पावधीत प्रचंड गाजले. 

जगातील अनेक भाषांमध्‍ये त्‍याचे भाषांतर झाले.  क्रिस गार्डनर आज अमेरिकेतील एक प्रसिद्ध उद्योगपती, प्रेरणादायी वक्‍ता, सुप्रसिद्ध लेखक, सिया आणि विद्यार्थ्‍यांसाठी आर्थिक मदत करणारे दानशूर म्‍हणून ओळखले जातात.    

आयुष्‍यात सुखाचे काही क्षण मिळवण्‍यासाठी त्‍यांना प्रचंड संघर्ष करावा लागता, परंतु आत्‍मविश्‍वास आणि प्रयत्‍न त्‍यांनी कधीही सोडले नाहीत.

ख्रिस, त्‍यांची पत्‍नी लिंडा आणि पाच वर्षांचा मुलगा क्रिस्‍टोफर आर्थिक अडचणींमुळे एका लहानशा घरात राहात.  अनेक ठिकाणी काम करून ख्रिस यशस्‍वी होत नाही.  आर्थिक अडचणींमुळे पत्‍नी त्‍यांना सोडून जाते.  एकट्या ख्रिस यांच्‍यावर मुलाची जबाबदारी येते.  कोणत्‍याही सबबीशिवाय ते ही जबाबदारी स्‍वीकारतात.

"एकदा ख्रिस यांच्‍या समोर लाल रंगाची फेरारी गाडी उभी राहते.  गाडीतून उतरणा-या व्‍यक्‍तीला ते विचारतात, तुम्‍ही काय काम करता आणि कसं’? गाडीचा मालक त्‍याला सांगतो की, तो एक शेअर ब्रोकर आहे आणि एका शेअर कंपनीत काम करतो."

आर्थिक अडचणीत असणारा ख्रिस यांनादेखील उज्‍ज्‍वल भविष्‍याच्‍या आशेने शेअर ब्रोकर होण्‍याचे स्‍वप्‍नं पडू लागते.  पण, पत्‍नीला त्‍यांचा निर्णय अव्‍यवहार्य वाटतो.  ख्रिस यांना मात्र आपल्‍या स्‍वप्‍नांवर विश्‍वास असतो.  ख्रिस यांचे बालपण अत्‍यंत कष्‍टप्रद होते.  सावत्र वडील दारूच्‍या नशेत आईला मारत.   

नेहमीची मारहाण आणि सततच्‍या त्रासामुळे त्‍यांच्‍या आईने एकदा वडिलांना जीवे मारण्‍यसाचा प्रयत्‍न केला होता.   परिणामतः ख्रिस यांच्‍या आईला तुरुंगात जावे लागले.  आई-वडिलांशिवाय वाढलेले ख्रिस त्‍याच्‍या मुलाला त्‍याने सोसलेल्‍या दुःखात बघू शकत नसतात.  आईच्‍या वाट्याला आलेलं दुःख इतर स्त्रि‍यांच्‍या वाट्याला येऊ नये म्‍हणून ख्रिस नेहमी प्रयत्‍नशी राहातात.  त्‍यांनी स्त्रि‍यांच्‍या मदतीसाठी काम करणा-या संस्‍थांना निधी दान केला.   

पण, त्‍या अगोदर अनेक अपयशानंतर शेअर ब्रोकिंग कंपनीत अर्ज केल्‍यावर त्‍यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले, तिथे पार्किंगचे पैसे न भरल्‍यामुळे एक रात्र त्‍यांना तुरुंगात काढावी लागली.  अंगावरच्‍या कपड्यांनीशी अटक झालेले ख्रिस दुस-या दिवशी पोलीस ठाण्‍यातून थेट इंटरव्‍यूहसाठी पोहोचले.  शैक्षणिक गुणवत्‍तेपेक्षा हजरजबाबीपणामुळे त्‍यांना संधी मिळाली.  पण, सहा महिने प्रशिक्षणाच्‍या अटीवर...

प्रशिक्षण यशस्‍वी पूर्ण झाल्‍यास नोकरी मिळणार असते.  डोक्‍यावर कर्जाचा डोंगर आणि आर्थिक अडचण यामुळे ख्रिस यांना भाड्याचे घर सोडण्‍याची वेळ येते.  मुलाला आई नाही.  हातात नोकरी नाही, दोघांचे पोट भरण्‍यासाठी पुरेसे पैसेही नाही आणि आता राहायला घरही नाही. 

दिवसभर ख्रिस मलाला पाळणा घरात ठेवत असे.  एसकदा मुलगा रडवेला होऊन वडिलांना विचारतो की, ‘माझ्यामुळे तुम्‍हाला आई सोडून गेली का’? ख्रिस त्‍या भाबड्या मुलाशी कशीबशी सयमजूत काढतात.  दिवसभर ऑफिसमध्‍ये इंटर्नशिप करायची आणि रात्री मुलाला घेऊन बेघरांसाठीच्‍या निवा-च्‍या ठिकाणी निजण्‍यापरती जागा मिळण्‍यासाठी रांगेत उभं राहायचं, हा त्‍यांचा नित्‍यक्रम बनतो.

अनेकदा मुलाला घेऊन सार्वजनिक शौचालयांत झोपावे लागते.  जवळचे तटपुंजे सामान उशाला घेऊन उपाशीतपापाशी अशा अनेक रात्री ख्रिस तिथे काढतात.

आज विविध आंतरराष्‍ट्रीय विद्यापीठांत त्‍यांना विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी बोलावले जाते. त्‍यांच्‍या आत्‍मचरित्रावर आधारित चित्रपटही बनवला गेला.  त्‍यालाही अनेक आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाले.  चित्रपटातील मुख्‍चय अभिनेता विल स्मिथला अभिनयासाठी ऑस्‍कर नामांकनही मिळाले.   


हा चित्रपट स्‍वतः ख्रिस गार्डनर लिखित 'द पर्स्‍यूट ऑफ हॅप्‍पीनेस' या मूळ पुस्‍तकावर आधारित आहे.  मूळ शिर्षकातील शब्‍द“happyness” चे स्‍पेलिंग हेतूपुर्वक तसे (i) ऐवजी (y)ठेवण्‍यात आले, जे तुम्‍हाला स्‍वतःला-“you.” दर्शविते.

The film is inspired by the book The Pursuit of Happyness, written by Gardner himself. In the original title, the word “happyness” is intentionally misspelled with a “y” instead of an “i” in order to represent “you.”

ई-वाचनालय | www.evachnalay.in  

प्रयत्‍नांवर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्‍न करणा-यांना यश मिळतेच.  परमेश्‍वर, आशीर्वाद आणि पय्रत्‍न यश देतात.  सुखाच्‍यामागे धावण्‍यापेक्षा कष्‍टांची कास धरली, तर सुख आणि समृद्धी तुमच्‍यासाठी तुमच्‍या मागे येईल.

जीवनात कितीही कठिण वेळ आली तरी स्‍वतःवरचा विश्‍वास, आपली जिद्द आणि चिकाटीने, प्रामाणिक प्रयत्‍नासोबत, मेहणत-श्रमाची पराकाष्‍ठा करत राहिल्‍यास यश नक्‍कीच मिळतो.  ख्रिस गार्डनर यांच्‍या जीवनातील समस्‍या, अडथळे, अपयशांना पाहिल्‍यास कोणीही जीवनातील कठिण परिस्थितींसमोर गुडघे टेकले असते.  

परिस्थितीचे भांडवल न करता परिस्थितीवर मात करत, त्‍यांनी त्‍यांच्‍या जीवनात प्रचंड यश, पैसा व प्रसिद्धी कमावली.  त्‍यांचे आत्‍मचरित्र इतरांना प्रेरणा देऊन परिस्थितींसमोर हतबल झालेल्‍यांना पुःन्‍हा एकदा उठून उभे ठाकण्‍याचे मानसिक बळ नक्‍कीच देते.  अवश्‍य वाचावी अशी पुस्‍तक. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in 


ई-वाचनालय | www.evachnalay.in   
 
 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive