30 DAYS चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ - विचार बदला आयुष्य बदलेल- Marc Reklau

नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.

 30 DAYS
विचार बदला आयुष्य बदलेल

 Marc Reklau

  

30 DAYS विचार बदला आयुष्य बदलेल
30 Days Change Your Habits, Change Your Life by Marc Reklau
in Marathi  

 

काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही.  

  • याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का?    

  • आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? 

  • आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार? 

आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला '३० डेज - चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ' या साधे सोपे उपाय सागणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते. 

'३० डेज - चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ' यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची! 

या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल: आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!  

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive