संन्याशासारखा विचार करा -जय शेट्टी | Think Like A Monk Book Summary In Marathi By Jay Shetty -सारांश

या प्रेरणादायी, सशक्त पुस्तकात, वैदिक परंपरेतील एक संन्यासी या नात्याने जय शेट्टी यांनी त्यांचा काळ रेखाटला आहे. त्यातून आपणआपल्या क्षमता आणि सामर्थ्य यांच्यातील अडथळे कसे दूर करू शकतो हे दाखवलं आहे. 

संन्याशासारखा विचार करा
थिंक लाईक अ मॉंक
जय शेट्टी  

मराठी पुस्तक सारांश


संन्याशासारखा विचार करा -जय शेट्टी
Think Like A Monk Book Summary In Marathi
By Jay Shetty 


एका संन्याश्यासारखा विचार करण्यासाठी तुम्हाला तुमचे घरदार सोडून हिमालयात जायची काहीही गरज नाही,  तुम्ही आधुनिक जगात राहूनही एका संन्याशा सारखे शांत आणि आनंदी आयुष्य जगू शकता.  फक्त तुम्हाला तुमच्या मनाला नव्या कल्पना, विचार आणि मूल्यं यांना बघण्यासाठी तुमच्या मनाला प्रशिक्षित करावे लागेल.  


आता प्रश्न असा येतो कि एका सन्याशासारखं विचार करण्याची गरजच काय आहे? त्यावर लेखक जय शेट्टी असे म्हणतात कि, जर तुम्हाला काही अविष्कार करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एका अविष्काराक जसे एलोन मास्क यांच्याकडून किंवा शास्त्रज्ञांकडून शिकाल.  जर तुम्हाला उद्योग व्यवसाय शिकायचं असेल तर कदाचित तुम्ही जेफ बेझोस, वॉरेन बफेट्, मुकेश अंबानी यांच्याकडून शिकाल, जर तुम्हाला बास्केटबॉल हा खेळ शिकायचं असल्यास तुम्ही मायकल जॉर्डन यांच्याकडून शिकाल, क्रिकेट शिकायचं असल्यास विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्याकडून शिकाल,. 

याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या मनाला शांत आणि स्थिर (Calm & Peace) ठेवायचं शिकायचं असेल तर तुम्हाला एका संन्याशाकडून ते शिकावे लागेल. कारण मॉंक म्हणजेच संन्याशी ह्या कामात तज्ज्ञ असतात. स्थिर, शांत, शिस्त, सुखी-आनंदी आणि स्पष्टता हि सर्व गुणवैशिष्ट्ये एका संन्याश्याची असतात.  आणि ह्याच गुणांना बनविण्यासाठी लेखक आपल्याला संन्याशासारखा विचार करण्यास सांगतात.

 

  • 🙏 Monk Mind Characteristics:
  • Calmness, Happiness, Clarity, Disciplined
  • 🐵 Monkey Mind Characteristics:
  • Unclear, Stimulated, Unhappy or Sad, In-Disciplined, Cluttered
  • एका संन्याश्याची गुणवैशिष्ट्ये:
  • थिर, शांत, शिस्त, सुखी-आनंदी आणि स्पष्टता

 

तर चला मग एका सन्याशासारखे मन कसे विकसित करतात ते पाहूया..!

उम्र भर गालिब, यही भूल करता रहा, धूल चेहरेपर थी, पर, आईना साफ करता रहा..!

इथं आरसा म्हणजेच समाज जिथं आपण राहतो, आणि आपण आपला पूर्ण वेळ फक्त आरसा साफ करण्यांत, स्वच्छ करण्यातच म्हणजेच समाजाला समजण्यात, समजावण्यात आणि बदलन्यातच आपला वेळ निघून जात असतो. स्वतःच्या चेहऱ्यावरून धूळ हटवायची असेल तर त्यासाठी स्वतःलाच जास्त प्रयत्न करावे लागतील.  समाजाला बदलण्यासाठी वेळ खूप कमी आहे.

1.  Find Your True Identity आपली अस्सल ओळख माहित करून घेणे

समजा तुम्ही एका आरशासमोर उभे आहात आणि त्या आरशावर धुळीचे थर चढलेले असेल, तर, तुम्ही स्वतःला स्पष्टपणे पाहू शकणार नाही.  या उदाहरणामध्ये  "आरसा" म्हणजे  तुमची "खरी ओळख" आणि "धूळ" म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला अविश्वास, न्यूनगंड, स्वतःवरील शंका किंवा सेल्फ डाउट (Self Doubt).  

इतरांच्या विचारांच्या प्रभावाची धूळ (Dust of Influence) असल्याने तुम्हाला स्वतःची खरी ओळख होत नाहीये, तुमची अस्सल ओळख तुम्ही पाहू शकत नाही.  लोकांकडे असणारी धनसंपत्ती पाहून त्याच्या प्रभावाने तुम्हीदेखील धनसंपत्तीच्या मागे पाळायला लागता, तर कधी, कुणाचे भारदार शरीरयष्टी व देखणं व्यक्तिमत्व पाहून तुम्ही स्वतःच्या शरीराला आणि शैलीला बदलण्यात गुंतून जात असता.

परंतु तुम्ही स्वतःची "खरी ओळख" तेंव्हाच शोधू शकाल जेंव्हा तुम्हाला तुमची स्वतःची "मूल्यं" समजतील, (Values) माहित असतील. वाचायला, ऐकायला हे खूपच साधं आणि सोपं वाटत असलं तरी आजच्या काळात अधिकांश लोकांना स्वतःची मूल्यं माहित नसतात.   '

तुम्ही ज्यांच्या सोबत उठता, बसता, ज्या लोकांना तुम्ही मानता, ज्यांचे अनुसरण करता अशांचा तुमच्या आयुष्यावर खूप खोल प्रभाव असतो. समजा तुमच्या आवडीचा एखादा ख्यातनाम, प्रसिद्ध व्यक्ती ज्याचे तुम्ही अनुसरण करत असता, असं म्हणत असेल कि, "पैसाच सगळं काही आहे, पैसा म्हणजे यश..!"  तेंव्हा तुम्ही पैश्यामागे पाळायला लागता, आणि जर कोणी म्हटलं कि, "आरोग्य हेच सर्वकाही" आहे, तेंव्हादेखील तुमचं मन पुन्हा बदलत असत, जे की पूर्णतया चुकीचं आहे. मुळात तुम्ही "त्यांची ओळख" आत्मसात करत आहात.  
 

कुणाकडून प्रेरणा घेणे आणि काही शिकणे हा काही गुन्हा नाहीये, परंतु विचार करण्याची गोष्ट हि आहे कि, तुमची आंतरिक मूल्यं काय आहेत, कोणती आहेत?

True Identity = Your Values
किंमत v/s मूल्यं


माहितीयुगात आज तुम्ही जे काही माहिती-सामग्री बघता, ऐकता, वाचता जसे, बातम्या, सिनेमा, इंटरनेट-टीव्हीवरील कार्यक्रम, व्हिडिओ गेम इत्यादी सर्व घटक मिळून तुमच्या मनावर प्रभावाची धूळ चढवत-उडवत असतात, याला लेखक बाह्य गोंगाट, कोलाहल (आवाज) External Noise असे म्हणतात.  हा गोंगाट तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही यासाठी पुनःपुन्हा दबाव आणत असतो.  आणि ह्या बाह्य गोंगाटाला दूर केल्याशिवाय तुम्हाला तुमची खरी ओळख कळणार नाही.  आपल्या सभोवतालचे कोलाहल स्वच्छ केल्याशिवाय आपली खरी ओळख सापडणार नाही.

जेंव्हा तुम्ही त्या आरशावरून धूळ काढून टाकता तेंव्हा तुम्ही स्वतःच्या प्रतिमेला स्पष्टपणे बघू शकाल. लेखक असे सांगतात कि, आरशावर जर धूळ चढलेली असेल तर आपण स्वतःच्या सेल्फ रिफ्लेक्शनला (Self Reflection) पाहू शकत नाही आणि जेंव्हा आपण धूळ साफ करतो तेंव्हा आपण स्वतःच्या आत्मप्रतिमेला पाहू शकतो.  लेखकांच्या मते, तुमची खरी ओळख (ट्रू आयडेंटिटी) धूळ नाही तर तुम्ही स्वतःच आहात. लेखक जय शेट्टी असे म्हणतात की, मूल्यं दोन प्रकारची असतात,

दोन प्रकारची मूल्यं (Two Types of Values)

  • उच्च मूल्यं  (High Values) : Happiness, Fulfillment, Meaningful Life  
  • किमान मूल्यं (Lower Values) : anxiety, depression, suffering

उच्च मूल्यं आपल्याला आनंद, पुर्णता आणि अर्थपूर्ण जीवन देतात तर किमान मूल्यं आपल्याला चिंता, नैराश्य, त्रास देत असतात. 

तुमची मूल्यं तुमच्या फावला वेळ (Time), तुमची कृती म्हणजे तुम्ही काय करता (Media) आणि तुमच्या खर्च करण्याच्या पद्धती (Money) यावरदेखील अवलंबून असतात. यासाठी तुम्हाला तुमची मूल्यं माहित करून घेण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील,

१. Self Audit स्वतःला तपासाने:

तुम्हाला स्वतःला तपासावे लागेल, तुम्हाला स्वतःचे स्वयं निरीक्षण करावे लागेल कि, तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत काय करत असता? हे शोधून काढावे लागेल.  तुम्ही दिवसभरात सामाजिक माध्यमांचा (Social Media) किती वापर करत असता?  आणि तुम्ही तुमच्या पैशांना कशा रीतीने वापरता, खर्च कसे करता इ. कारण तुम्ही तुमचे खर्च पाहूनही ठरवू शकता कि तुम्ही नेमक्या कोणत्या मूल्यांवर जगत आहोत.

२.  Self Isolation एकांतवास:

जिथे कोणी व्यक्तीही नसेल, आणि तुम्हाला विचलित करणारे मोबाईल किंवा लॅपटॉप संगणक, लक्ष विचलित होईल अशी कोणतीही गोष्ट नसेल अशी एक जागा तुम्हाला निवडायची आहे.  आता त्या तुमच्या "वैयक्तिक जागेला" (Personal Space) बाहेरील गोंगाटाला पूर्णपणे टाळून, दुर्लक्षित करून तुम्हाला स्वतःला हे विचारावे लागेल कि, तुम्ही कोणत्या गोष्टीत विश्वास ठेवता? What Do You Believe in? तुमच्या हिशोबाने काय बरोबर आहे आणि काय चूक? हे तुम्हाला स्वतःलाच आत्म-विश्लेषण करावे लागेल.


तुम्हाला हे स्वतःशीच विचारावे लागेल कि ज्या लोकांसोबत तुम्ही अधिकांश वेळ राहता, त्यांच्यासोबत तुमची मूल्यं अगदी योग्य बसतात?   आणि जर तुम्हाला हे समजत नसेल कि इतरांसोबत माझी मूल्यं योग्य बसतात कि नाही? तेंव्हा स्वतःशीच एक प्रश्न विचारा, कि, ह्या व्यक्तीसोबत वेळ खर्ची केल्याने मला जी व्यक्ती व्हायची इच्छा आहे, त्यासाठी मला मदत होत आहे काय? किंवा मला त्या व्यक्तीच्या संगतीचा फायदा होत आहे काय? जी व्यक्ती होण्याच्या मार्गावर मी पुढे जात आहे ते मला निकट नेत आहे काय? ह्या व्यक्तीच्या संगतीमुळे मला जी व्यक्ती व्हायची इच्छा आहे त्याच्या जवळ मी जात आहे कि दूर? 

तुम्हाला अशा लोकांसोबत राहायला पाहिजे जे तुमच्या मूल्यांना समजतील, आणि सुधारणा करण्यासाठी तुमची मदत करतील.

जेंव्हा तुम्ही स्वतःला वेळ आणि स्थिरता देता (Time & Stillness) तेंव्हा तुम्ही आरामाने स्वतःवर लागलेली धूळ स्वच्छ करून आपल्या स्वप्रतिमेला स्पष्ट पाहू शकता, आपल्या आतल्या आवाजाला ऐकू शकता. 

२. Remove Negativity नकारात्मकता हटविणे

तुम्हाला दररोज काही वेगवेगळी नकारात्मक स्वभावाची लोकं भेटत असतील जे नेहमीच साकारात्मकतेऐवजी नकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करत असतात.  नकारात्मक दृष्टिकोनाच्या लोकांना थोडं विस्ताराने बोलायचं झाल्यास ह्या अशा व्यक्ती असतात, जी नेहमीच तक्रारी करत असतात, तर काहीजण स्वतः केलेल्या चुकांसाठी इतरांना दोष देत असतात आणि काहीजण तर नेहमीच फक्त इतरांवर टीका करत असतात.  काही लोकांना मर्यादा माहित असतात तरीही ते दबाव आणत असतात.  काहीजण फक्त नकारात्मक आदेश देत असतात, तर काहीजण असेही असतात जी प्रशंसा करण्याऐवजी नेहमीच तुलना करत असतात.

Negative People: Complain, Criticize, Blame, Give Pressure, Give Orders, Comparison rather Appreciation


आता तुमची खात्री झाली असेल कि यापैकी काही लोकांचा सामना तुम्ही करत असाल. नक्कीच तुम्हाला अशा लोकांचं अनुभव आलेला असेल. आता लक्षात घ्या, दररोज तुम्हाला अनेक नकारात्मक लोकं भेटतील, मग सगळ्यांनाच टाळणे, तोंड देणे, त्यांना सामोरे जाणे शक्य नाही, यासाठीच अशा नकारात्मक लोकांचा सामना करण्यासाठी लेखक आपल्याला तीन पद्धती सांगतात:

नकारात्मक लोकांचा सामना करण्यासाठी तीन पद्धती

#१.  Allocate Time

प्रत्येक व्यक्तीमध्ये सहन करण्याची एक मर्यादा असते. यासारखंच कोणत्याही व्यक्तीला झेलण्याची, त्याला सांभाळायची, मुकाट्याने सोसायची एक मर्यादा असते. काही लोकांना तुम्ही एक दिवस सहन करू शकता, तर कोणाला एक महिनाभर सहन करू शकता, तर काही लोकांना तर तुम्ही एक मिनिट सुद्धा सहन करू शकत नाही.  

यासाठी अगोदरच हे ठरवून घ्या, कि कोणत्या व्यक्तीसोबत किती वेळ घालवायचा जे तुमच्यासाठी योग्य राहील, ज्यामुळे तुमची स्वतःची आतून पेटून उठण्याची तुमची मर्यादा, हद्द पार होणार नाही.  आणि त्या व्यक्तीच्या नाकारात्मकतेपासून स्वतःचा बचाव करू शकाल.

दुसरी पद्धत आहे ७५/२५ चा नियम वापरणे ...

#२. ७५/२५ चा नियम

ह्या नियमानुसार तुम्हाला तुमचा ७५% वेळ अशा लोकांसोबत खर्ची करायचा आहे जी तुमच्या सारखा विचार करतात, जे तुम्हाला प्रेरित करतात आणि प्रयत्न करा कि फक्त २५% वेळ किंवा त्यापेक्षाही कमी वेळ ज्यांना तुम्ही टाळू शकत नाही अशा नकारात्मक लोकांना द्या जेणेकरून तुमच्यामध्ये सकारात्मकता टिकून शाबूत राहील.

आणि तिसरी पद्धत आहे प्रत्येक समस्येला सोडविन्याविषयी...

#३.  Don't get Involved

प्रत्येक समस्येला सोडविन्याचा आणि सर्वच चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करू नका, जोपर्यंत तुमच्यामध्ये त्या विषयाशी संबंधित सर्व माहिती येत नाही किंवा त्यातले तज्ज्ञ तुम्ही होत नाहीत तोपर्यंत अशा गोष्टींमध्ये मध्यस्ती करण्याचे टाळा. 


आता हे तर झालं बाह्य नाकारात्मकतेविषयी, नकारात्मकता आपल्या आतमध्येही असू शकते, त्या नाकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी लेखक आपल्याला एक क्लृप्ती सांगतात, स्पॉट, स्टॉप & स्वॅप पद्धत.

Spot, Stop & Swap Technique

Spot

सर्वजण तुम्हाला सांगत असतात कि आपल्या विचारांना नियंत्रित करा आणि नेहमीच सकारात्मक राहा. परंतु असं नेहमीच शक्य होत नाही.  आयुष्यात चांगले-वाईट विचार येत असतात. पण तुम्ही त्या विचारांना नियंत्रित करण्याऐवजी, त्या विचारांना समजून नव्या विचारांनी बदलायला (Replace) शिका. यामध्ये सर्वात पाहिलं काम तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे स्पॉट (Spot).  याचा अर्थ आहे तुम्हाला तुमच्या नकारात्मक भावनांना शोधावे लागेल.  तुम्हाला नेमकं काय वाटत आहे ते लक्षात घ्यावं लागेल.

Stop

दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, Stop, थोडा वेळ थांबून विचार करा कि, "नेमक्या कोणत्या कारणामुळे तुम्हाला असं वाटत आहे?", आणि त्याच्या मुळाशी जाऊनच तुम्हाला हे समजेल.  यासाठी तुम्हाला स्वतःच्या भावनांना जाणून घ्यावे लागेल जे वर सांगितल्याप्रमाणे एकान्तवासामुळे शक्य होते.

 Swap

आणि तिसरी पायरी आहे स्वॅप, परत तुम्हाला त्या विचारांना कृतज्ञता (Gratitude) किंवा इतर चांगल्या विचारांनी बदलायचे (Replace) आहे. जेणेकरून तुमच्या जुन्या विचारांनी तयार झालेला तुमचा दृष्टिकोन बदलेल. 

(हे एकप्रकारे सवयींसारखेच आहे. जुन्या सवयींना मुळासकट काढून टाकणे शक्य नाही, कारण आपल्या मेंदूमध्ये ते खूपच पक्के, घट्ट, दाट, गुंतागुंतीचे आणि बळकट जाळं करून बसलेली असल्याने आपल्याला त्या सवयी बदलतांना खूपच कठीण जाते त्यासाठी त्या जुन्या सवयींना काढून टाकण्याऐवजी त्याठिकाणी दुसऱ्या सवयींना जोडल्यास-बदलल्यास (Replace) नक्कीच फायदा होतो. Read more about: Habits by Charls Duhigg)


"ब्रायन ऑक्टन" जे एक कॉम्प्युटर प्रोग्रामर आणि इंटरनेट उद्योगी आहेत ते "स्वॅप"चे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत, ज्यांनी ट्विटर कंपनीत नोकरीसाठी अर्ज दिला आणि त्यांना तिथून नकार मिळाला, तेंव्हा ब्रायन यांनी विचार केला की, "जे झालं चांगलं झालं..! एखादी अजूनही चांगली गोष्ट आपल्यासाठी असेल."  त्यांनंतर त्यांनी फेसबुक मध्ये अर्ज केला आणि तिथूनही त्यांना नकारच मिळाला. आणि ब्रायन यांनी परत धन्यवाद मानून, स्वतःला असा दिलासा दिला कि, "बरंच झालं, याहीपेक्षा उत्कृष्ठ आपल्यासाठी वाट बघत असेल." 

असे एक-ना-अनेक नकार ऐकूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांनी प्रत्येक नकाराला एक कृतज्ञता दाखविली. धन्यवाद मानलं. आणि काही काळानंतर आपली खासगी कामं करत असताना त्यांनी एक असे ऍप्प बनवलं जे ब्रायन यांना नाकारले होते त्या फेसबुक कंपनीनेच $19 बिलियन रुपयांत खरेदी केलं ज्याला आपण आज त्या ऍप्पला सर्वजण "व्हाट्सऍप्प" (WhatsApp) या नावाने ओळखतो..!
👉$19 बिलियन म्हणजेच भारतीय रुपयांत ₹1,543,756,897,000.00 (INR) (आजच्या तारखेत)

जर तुम्ही अर्ध्या पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकलं तर ते पाणी प्यायला तुम्हाला खारट लागेल, आणि तेच एक चमचाभर मीठ तुम्ही जर मोठ्या भांड्यात विरघळवून पिलं तर तुम्हाला फारकाही फरक जाणवणार नाही.

👉या उदाहरणात, "मीठ" म्हणजे "नकार" आहे, आणि "पाणी" म्हणजे तुमचा "दृष्टिकोन."  (Perspective)


जर जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन मोठा असेल तर नकार आणि अपयश कसेही का असेना ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. जर तुम्ही फक्त तुमच्या यशाने आनंदी होत असाल आणि तुम्हाला इतरांचा हेवा वाटत असेल, तुम्ही दुसऱ्यांवर जळत असाल तर तुमच्या जीवनातील आनंद मर्यादित असेल. परंतु, जर का तुम्ही इतरांच्याही यशामध्ये आनंदी व्हायचं  शिकून घेतलं तर तुमच्या जीवनातील आनंद अमर्याद होऊन जाईल.

जेव्हाही तुम्ही नकारात्मक विचारांचा सामना करत असता, तेंव्हा सामान्यतः तुम्ही असं म्हणता कि, "मी रागात आहे", "मी उदास आहे", "मी नाराज आहे", इत्यादी. परंतु, मुळात तुम्ही रागात किंवा उदास नसता, खरेतर, फक्त काही क्षणांसाठी तुम्ही त्या भावनेला अनुभवत असता. तुम्हाला फक्त काही वेळच राग किंवा उदास वाटते. तसे जाणवते.  

  • I am angry.
  • I am sad.


यासाठीच त्याऐवजी तुम्हाला असं बोलायला पाहिजे, "मला आता राग वाटत आहे".  "मला उदास वाटत आहे." यामुळे तुम्ही त्या भावनेपासून स्वतःला वेगळे करू शकाल आणि योग्य समाधान शोधू शकाल.

  • I Feel Angry...
  • I Feel Sad...

 ३.  Know your Intention

जेव्हाही तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असते, आणि त्या गोष्टीला मिळविल्यानंतरही तुम्हाला समाधान मिळत नसेल, तर असं समजायचं की तुमचा त्या गोष्टीला मिळविण्याचा हेतू चुकीचा होता. तुमच्या कोणत्याही कामाला करण्याच्या उद्देशाला, हेतूला समजणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही कामं एकतर भीतीमुळं करत असता, किंवा वैयक्तिक इच्छेमुळं, कोणतेही काम तुम्ही एक कर्तव्य समजून करता किंवा त्याच्या प्रेमापोटी करत असता.

उदाहरणार्थ:
कित्येक लोकांना श्रीमंत व्हायचे आहे, परंतु श्रीमंत झाल्यानंतरही काही लोकांना समाधान आणि तो आनंद मिळत नसतो ज्याचा ते शोध घेत असतात. तर यामागील कारण आहे, त्यांचा चुकीचा हेतू (Wrong Intention).  

कोट्याधीश होणं, हा आपला म्हणजेच मानवाचा नैसर्गिक हेतू-उद्देश मुळीच नाही. जर या श्रीमंत होण्याच्या मानसिकतेला तुम्ही थोडं मोठं करून पाहाल, तपशिलाने पाहाल, तर कळेल, की, लोकांना श्रीमंत यासाठी व्हायचं असतं कारण त्यांना महागडी आणि चांगल्या-दर्जेदार गोष्टी खरेदी करायच्या असतात. जर तुम्ही यालाही जर अजून विस्ताराने बघितलं तर कळेल, कि, ते महागडी आणि दर्जेदार, चांगल्या वस्तू व गोष्टी खरेदी करतात जेणेकरून त्यांना दुसऱ्यांकडून  प्रेम आणि आदर मिळवायचं असतं .

तर, जेंव्हा तुम्हाला हे माहित होईल, कळेल की तुमची तीव्र इच्छा (deep desire) प्रेम आणि आदर (Love & Respect) हे आहेत, तर, वरवरच्या इच्छेला पूर्ण करण्याऐवजी त्या अस्सल तीव्र इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.  कोणत्याही कामामागील छुप्या हेतूला स्पष्ट करून तुम्ही तुमच्या जीवनातील ध्येय-उद्देशाला खरोखरच ओळखू शकता, पाहू शकता आणि एक अर्थपूर्ण जीवनचं तुम्हाला खरे समाधान प्राप्त करून देत असते.

👉Your Right Intention can give you True Satisfaction

 

४. Know Your Space & Time

लेखक जय शेट्टी सांगतात, की, Location Has Energy and Time has Memory".  म्हणजेच प्रत्येक जागेची, ठिकाणाची एक ऊर्जा असते. आणि प्रत्येक जागा आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची जाणीव करून देत असते.  यामुळेच आपण बागेऐवजी ग्रंथालयात, वाचनालयात योग्यरितीने वाचू शकतो, अभ्यास करू शकतो. 

यासाठीच लेखक म्हणतात, की, आपल्याला प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट जागा निर्धारित करायला पाहिजे, एक ठिकाण निवडलं पाहिजे. आणि वेळ, वेळ एक प्रकारची स्मृती साठवून ठेवत असतो. म्हणजे, एकाच कामाला तुम्ही त्याच वेळेला, दररोज-नियमितपणे करता तर ते काम तुमच्या मनामध्ये स्मृती सारखं साठवल्या जातं.  आणि त्या कामाला तुम्ही कोणतेही अलार्म न लावता त्याच वेळेवर करायला लागता.

यासाठीच, जर तुम्हाला अधिक कार्यक्षम (productive) व्हायचं असेल, तर, त्याच कामाला, त्याच वेळेला, त्याच ठिकाणी, एकाच जागेवर नियमितपणे, दररोज करा. यामुळे तुम्ही कमीत कमी श्रम-प्रयत्न करून जास्तीत जास्त कार्यक्षम बनू शकता, आणि अधिकाधिक सखोल कामं करू शकाल. 

 ५. Serve Others

लेख असं म्हणतात की,  इतरांची मदत करणे हाच मानवाचा सर्वोच्च हेतू-उद्देश आहे. जे काम तुम्हाला आवडते आणि त्याच गोष्टीची, कामाची जगाला गरजही आहे, तर ते काम करणे तुमचं "धर्म" बनत असते. आणि याच संकल्पनेला "इकिगाई" या पुस्तकात "मिशन" असे म्हंटलेलं आहे.  म्हणजेच दोन्ही संकल्पना एकाच मार्गाकडे जाण्याचा इशारा करत आहेत. म्हणजेच, इतरांची मदत करणे हे तुमचे अंतिम ध्येय (ultimate goal) असायला पाहिजे. 

कारण, एकामेकाच्या दिशेने होणाऱ्या देवाणघेवाणीच्या व्यवहारासारखं नाही, तर, मदत आणि प्रेम हे एका वर्तुळासारखं असतं.  जर तुम्ही कोणाची मदत करत असाल तर त्याचा परतावा तुम्हाला इतर पद्धतीने मिळेल. जेंव्हा तुम्ही एकाच व्यक्तिजवळून प्रेम आणि आदर याची अपेक्षा करत असता, तेंव्हा इथंच खरी समस्या उद्भवते.  यासाठीच जेवढं तुम्ही बिनशर्तींचे (unconditional) प्रेम वाटाल, तेवढंच ते तुमच्याजवळ परत येईल.

जय शेट्टी यांनी लिहिलेल्या थिंक लाईक या मॉंक या पुस्तकाचा बुकशॉर्ट थोडक्यात बघायचं झाल्यास ते पुढील प्रमाणे असेल: 

 
#बुकशॉर्ट #BookShort : Think Like A Monk

 १. Find Your True Identity 

जेंव्हा तुम्ही स्वतःला वेळ आणि स्थिरता देता तेंव्हा तुम्ही तुमच्यावर इतरांच्या प्रभावाची धूळ स्वच्छ करून तुम्ही तुमच्या आतील-अंतर्मनाची अंतरात्म्याची आवाज ऐकू शकता.

२.  Remove Negativity नकारात्मकता हटविणे 

बाह्य नकारात्मकतेला दूर करण्यासाठी time allocation, ७५/२५ चे तत्व आणि डोन्ट get involve या पद्धतीचा उपयोग करा. आणि स्वतःच्या आतमधील नकारात्मकतेला तुम्ही Spot, Stop & Swap Technique ने किंवा कृतज्ञतेच्या सकारात्मक विचारांनी बदलू शकता.

 ३.  Know your Intention 

कोणत्याही कमामागील हेतूला स्पष्ट करून तुम्ही तुमच्या जीवनाच्या ध्येयाला खरोखरच ओळखू शकता. आणि एक अर्थपूर्ण जीवनच तुम्हाला समाधान देत असते.

४. Know Your Space & Time 

जर तुम्हाला अधिक कार्यक्षम, उत्पादक व्हायचं असेल, तर, एकाच कामाला, एकाच ठिकाणी, एकाच वेळेवर करा यामुळे खूपच कमी श्रम व प्रयत्न लावून तुम्ही जास्त कार्यक्षम उत्पादक आणि सखोल कामं करू शकाल.

५. Serve Others  

इतरांची मदत करणे हाच मानवाचा सर्वोच्च हेतू-उद्देश आहे.


 

सारांश समाप्त

Related:

तर वाचकांनो ह्या काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत जय शेट्टी यांची जबरदस्त -अप्रतिम पुस्तक थिंक लाईक अ मॉंक म्हणजेच सन्याशासारखं विचार करा या पुस्तकातून.  जर तुम्हाला याबद्दल अजून जास्त आणि सखोल शिकायचं असेल, तर स्वतःच खरेदी करून हि पुस्तक वाचा आणि आपले जीवन सफल बनवा.


☯ ई-वाचनालयावर येऊन, आपला अमूल्य वेळ देऊन,
धैर्यपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल
आपले मनःपूर्वक धन्यवाद. 

https://www.buymeacoffee.com/evachnalay

वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवत राहा. 

तर वाचक मित्रांनो ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

www.evachnalay.in 

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in
 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember


www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive