विश्वासाचे जीवशास्त्र -द बायोलॉजी ऑफ बिलीफ -डॉ. ब्रुस लिप्टन | The Biology of Belief by Bruce H. Lipton

विचारच घडवतात आपलं आयुष्य, आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं, हे सांगणारं विज्ञान आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुमचं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. 

 विश्वासाचे जीवशास्त्र
द बायोलॉजी ऑफ बिलीफ

डॉ. ब्रुस एच. लिप्टन

 

The Biology of Belief
Unleashing the Power of Consciousness, Matter and Miracles
Bruce H. Lipton (Author),
Shubhangi Ranade-Bindu (Translator) 

आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं, हे सांगणारं विज्ञान आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुम्हं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. डॉ. ब्रुस एच. लिप्टन या प्रख्यात पेशीशास्त्रज्ञानं आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडत असतो, याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. 
मेंदूच्या कार्याच्या जैवरासायनिक परिणामांमुळे पेशी प्रभावित होत असतात. विचारांचा पेशींवर कसा परिणाम होतो, हे लिप्टन यांनी अगदी रेण्वीय पातळीवरच्या घडामोडी समजावून देत स्पष्ट केलं आहे. हलकासा विनोदाचा शिडकावा करणाऱ्या साध्या-सोप्या भाषेत मुद्दा समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनातली उदाहरणं देणं ही त्यांच्या लिखाणाची उल्लेखनीय वैशिष्ट्यं. 
एपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आतापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांना आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. 
आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशांमुळे डीएनएचं नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशांमध्ये आपल्या (सकारात्मक किंवा नकारात्मक) विचारांतून तयार होणाऱ्या ऊर्जातरंगांचाही समावेश असतो, असं लिप्टन म्हणतात. 
पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतं.
 
डॉ. ब्रुस एच. लिप्टन
डॉ. ब्रुस एच. लिप्टन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालणारे, नव्या जीवशास्त्राचे प्रणेते अशी त्यांची कीर्ती आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पेशीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून संशोधन केलं. 
 
अनेक टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांतून त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. Website: www.brucelipten.com
 
 

Review

"समर्थ, दिमाखदार आणि सुगम! सरळसोप्या भाषेत लिहिल्यामुळे लख्खपणे समजणाऱ्या या पुस्तकातून, सजीवता आणि सजगता यांच्यातले आतापर्यंत अगम्य असलेले दुवे स्पष्ट झाले आहेत. याची फार गरज होती. हे दुवे समजावून देताना डॉ. लिप्टन आपल्या भूतकाळापासूनच्या जीवशास्त्राबद्दलच्या प्राचीनतम प्रश्नांची उत्तरे देतात आणि गहनतम रहस्ये उलगडतात. ‘द बायोलॉजी ऑफ बिलीफ’ हे पुस्तक नव्या सहस्रकातील विज्ञानाचा आधारस्तंभ ठरेल, याबद्दल मला किंचितही शंका नाही."
-ग्रेग ब्रॅडन The God Code And The Devine Matrixया लोकप्रिय पुस्तकाचे लेखक 

"‘‘द बायोलॉजी ऑफ बिलीफ’’ हे उत्क्रांत होत असलेल्या मानवतेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रेरणादायी पुस्तकामध्ये डॉ. ब्रुस लिप्टन यांनी आपल्या अद्भुत संशोधनातून प्राप्त झालेले ‘मानव-विकास आणि बदलांचे नवे अधिक सुजाण विज्ञान’ मांडले आहे. जनुकीय आणि जैविक मर्यादांमध्येच आयुष्याचा अर्थ शोधण्याची सवय झालेल्या आपल्या बुद्धीसमोर या पुस्तकामुळे खऱ्या आत्मिक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मन आणि शरीर यांच्यातल्या नात्याचा अभ्यास करणार्‍यांनी वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे. "
-डॉ. जॉन एफ. डमार्टिनी Count Your Blessings & The Breakthrough Experience या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक 

"आपल्या भावनांचा आपल्या जनुकांच्या प्रकट होण्यावर कसा परिणाम होतो, हे सहजसोप्या भाषेत सांगणारे आकर्षक पुस्तक शेवटी आलेच! तुम्ही तुमच्या जनुकांच्या मर्यादांचे बळी नाही, तर तुमच्या इच्छानुरूप शांत, आनंदी आणि प्रेममय आयुष्य जगण्यासाठीची अमर्याद क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे जाणून घेऊन त्याबद्दल कृतज्ञ होण्यासाठी तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचा."
-जोसेफ मर्कोला, डी.ओ. www. mercola.com या नैसर्गिक आरोग्याशी संबंधित प्रसिद्ध संकेतस्थळाचे संस्थापक 

"अनुवंशशास्त्राच्या आतापर्यंत रूढ असलेल्या वर्चस्वाचं गुपित उलगडणारे, स्वत:ला आनुवंशिकतेचा बळी मानण्याच्या मानसिकतेला स्पष्ट धुडकावून लावणारे हे पुस्तक अत्यंत निर्भीड आणि नवी दृष्टी देणारे आहे. डॉ. लिप्टन यांच्या या प्रतिपादनासाठी त्यांनी क्वांटम जीवशास्त्रातील ठोस पुरावेही यात दिले आहेत. आपल्या मानसिक धारणाच आपलं आयुष्य घडवत असतात, ही माहिती डॉ. लिप्टन वाचकांना केवळ सांगतात असे नव्हे, तर अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे पटवूनही देतात. हे आपल्याला विचार करायला लावणारे, प्रेरणादायी पुस्तक आहे."
-ली पुलोस, Ph.D. A.B.P.P.,युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया Miracles & Other Realities & Beyond Hypnosis चे लेखक 

"ज्या कोणाला आरोग्य, मानवजातीचे कल्याण आणि मानवजातीचे भविष्य याची चाड आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. या पुस्तकात मांडलेल्या दृष्टिकोनामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. ब्रुस लिप्टन यांनी केलेले संशोधन आणि त्याचा सारांश म्हणजे केवळ अद्भुत प्रज्ञेचा आविष्कार आहे."
-जेरार्ड डब्ल्यू. D.C. अध्यक्ष, Life Chiropractic College West
 
Source: Amazon 
 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive