उत्तम वाचक घडविणा-या 7 सवयी -अमृत देशमुख | Booklet Guy's Reading Habits: The 7 Secrets of Effective Readers 📖📙📘📗
Booklet Guy's Reading Habits: The 7 Secrets of Effective Readers
उत्तम वाचक घडविणा-या 7 सवयी
अमृत देशमुख
पुस्तक परिचय
📖वाचन न करण्याची अनेक कारणं
- वाचनाचा कंटाळा येतो,
- जाडजुड पुस्तकं पाहून जाम डोकं दुखायला लागतं,
- पुस्तक वाचताना डुलकी येते, झाेप येते,
- वाचताना मन लागत नाही,
- वाचन करायला खूप वेळ लागतो,
- पुस्तकं महाग आहेत,
- पुस्तकाची भाषा समजत नाही
- कोणती पुस्तक वाचू
- वाचलेलं लक्षात राहत नाही
- मला हळू हळू वाचायची सवय आहे
- खूप पुस्तकं खरेदी केलेली आहेत पण वाचन केली नाहीत
- पुस्तकांना ठेवायला जागा नाहीए...
लोकांना
विशेषतः भारतीय विद्यार्थी व युवकांना जास्तीत जास्त वाचनासाठी प्रवृत्त करणं - 'मेक इंडिया रीड' हे आपलं ध्येय
असल्याचं अमृत देशमुख सांगतात. आतापर्यंत 1500+ पेक्षा जास्त पुस्तकं
वाचल्याचं ते सांगतात. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या 'अग्नीपंख' या पुस्तकाचे सारांश बनवून व्हॉटस्ऍप्प वरून प्रसारित करून सुरू झालेली ही वाचन चळवळ आज जगभरातील जवळपास 17 लाखांपेक्षा जास्त वाचक बुकलेट ऍपशी जोडल्या गेले आहेत यावरूनच वाचन चळवळीचे महत्व अधोरेखित होते, वाचनाचे महत्व व फायदे कळून येतात.
अमृत देशमुख हे व्यवसायाने एक सीए असून, त्यांनी या अगोदर तीन अशस्वी नवोद्योग (Startup) सुरू केले होते, तीन वेळा त्यांना जगप्रसिद्ध टेड टॉक (TED Talk) साठी बोलावण्यात आले होते तिथे त्यांना विविध स्तरातील, क्षेत्रातील लोकांना, विद्यार्थ्यांना, संबोधित करण्याची संधी मिळाली. आपण जे ज्ञान पुस्तकांतून आत्मसात केलेलं आहे त्याचा फायदा समाजाला मिळावा या हेतून ते स्वतःला एक 'सामाजिक उद्योजक' म्हणजेच सोशल आंत्रप्रेन्युअर' (Social Entrepreneur) समजतात.
समाजमाध्यमावर तास-न्-तास रेगांळणारे भारतीय युवक यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास नक्कीच उद्याचे भविष्य भारताचेच असेल यात शंका नाही. इंटरनेट, अंतरजाल हे दुधारी तलवार आहे याचा वापर आपण कशासाठी करताे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. याच समाजमाध्यमाचा सदुपयोग अमृत यांनी पुस्तकांमधील असलेले ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
वाचनाला टाळंटाळ करणारे, वेळ नाही वाचायला म्हणून वेळ मारून नेणारे परंतू समाज माध्यमांवर तासन् तास स्क्रोल करत बसणारे तथाकथील आळशी लोकांना वाचनाकडे परावर्तीत करण्यासाठी त्यांनी चक्क उत्तम वाचक घडविणा-या सात सवयी नावाची पुस्तकच लिहून काढली ज्याबद्दल आपण पाहत आहोत. पुस्तक इंग्रजी आणि मराठी भाषेत त्यांच्या संकेतस्थळावर आणि अमेझॉनवर उपलब्ध आहेत.
या पुस्तकामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे वाचनाकडे वळण्यासाठी व वाचन न करण्याच्या जवळपास सर्वच कारणांची उत्तरे या पुस्तकात तुम्हाला मिळतील. आणि महत्वाचे जर ही पुस्तक घेणं तुम्हाला परवडत नसेल तर अमृत यांनी ही पुस्तक चक्क तुम्हाला मोफत, फ्री, विनापैशाचे द्यायला तयार आहेत.
आणि तुम्ही जर खरेदी केलात तर त्या पुस्तक खरेदी केलेली रक्कम बुकलेट ऍप्प चालवण्यासाठी येणा-या खर्चाला सांभाळण्यासाठी वापरण्यात येईल असेही लेखकांनी म्हटले आहे.
ज्यांना पुस्तक घेऊन वाचणे परवडते अशांनी एक सुजाण वाचक व जागरूक नागरिक म्हणून आणि मिशन मेक इंडिया रिड या वाचन चळवळीचे भागीदार तुम्ही नक्कीच व्हाल अशी अपेक्षा आहे.
How
to become highly effective reader एक उत्कृष्ट वाचक कसे व्हावे हे या
पुस्तकातून वाचन कसं करावं हे खुप चांगल्या पद्धतीनं सांगितलं
#bookday #amrutdeshmukh #bookreading #booklovers #bookletguy #
👉 🛍 🛒 या दुव्यावरून काहीही खरेदी करा याचा लाभ अप्रत्यक्ष रूपाने वाचन चळवळ सुरू ठेवायला होईल.
📖📙📘📗
👉चला थोडक्यात पाहुया उत्तम वाचक घडविणा-या सात सवयी
सवय क्र.1.वाचनाला गंभीरतेने घेऊ नका Don’t Take Reading Too Seriously
मी वाचन करतोय, पुस्तकात लक्ष लागण्यासाठी निवांत वेळ लागतो, शांत जागा, वाचनयोग्य वातावरण पाहिजे ह्या सगळ्या सबबी आहेत. तुम्ही थोडं-थोडं, तुकड्या-तुकड्यात, भागा-भागामध्ये वाचन करू शकता. सलग 5-6 तास वाचन आजच्या शक्य नाही. जसे तुम्ही एखादा टी.व्ही.वरील कार्यक्रम एपिसोडमध्ये, भागामध्ये बघता, तसेच वाचनाचेही आहे. दररोज थोड-थोडं परंतू सातत्याने वाचन करणे हे महत्वाचे आहे.
सवय क्र.2.फावल्या वेळेत वाचन करा Fill In The Time-Pockets
वाया जाणा-या वेळेचा सदूपयोग करा, वेळी-अवेळी, टप्प्या-टप्प्यामध्ये, भागांमध्ये, तुकड्या-तुकड्यांमध्ये, फावल्या वेळेत वाचन करा, वेळ काढून, निवांत बसून वाचन करणे गरजेचे नाही.
तुम्ही चालता-बोलता, उठता-बसता, काही मिनिटांचा कालावधी आपल्याला दररोज मिळतोच मिळतो, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, थोडासा वेळ मिळाला तर त्यात वाचन करा, रेल्वेचे, विमानाचे, बसचे तिकिट काढताना, बॅंकेत थांबल्यावर, रांगेत मिळणारा वेळ, गाडीची दुरूस्ती करताना, सर्व्हिसिंग करताना मिळणारा वेळ कल्पना करा आणि तुम्हाला वेळ दररोज काही मिनिटांचा वेळ मिळेलच
सवय क्र.3 हाताला लागेल ती पुस्तक वाचायला लागा Read Random
सहजच, कोणतेही पुस्तक वाचायला घ्या, नेमकेपणा, आवड-निवड, लेखक, वाचन प्रकार वगैरे यांमध्ये न पडता बस उठा हाताला लागेल ती पुस्तक वाचायला लागा. Nir Eyal, Author of the book In-distractable, calls them “external distractions.”
सवय क्र.4 Get the Big Picture
- वाचन करताना हळूहळू वाचन, शब्दन् शब्द वाचल्यास आपल्याला लिहिलेलं योग्य रित्या समजेल,“We can understand the text properly only if we read slowly, word to word.”
- शब्दार्थ समजणे, शब्दसंग्रह वाढविणे, हे पुस्तक वाचन करण्याचा मूळ उद्देश आहे. “The primary objective of reading books is to improve our vocabulary.”
- एक ना धड भाराभर चिंध्या, ही म्हण इथेही लागू पडते असे आपल्याला वाटते, आपला गैरसमज बनवला गेलाय, अनेक विविध पुस्तकं वाचून, काहीही न शिकण्यापेक्षा, एकाच प्रकारच्या काही पुस्तकांमध्येच निःपुणता मिळवा.
“It’s better to master a few books than to be a jack of many.” - जेवढं सावकाश तुम्ही वाचन कराल तेवढं उत्तमरितीनं तुम्हाला समजून येईल,
“The slower you read, the better you understand.”
असे एक ना अनेक उदाहरणं आपल्यासमोर मांडण्यात येतात. हे सगळं झालेलं आहे एका शब्दामुळे तो शब्द मिस्टर परफेक्ट श्रीमान परिपूर्ण, आणि त्याला एका विकृतीचे नावही आहे 'परफेक्शन सिंड्रोम'.
सवय क्र.5. वाचन करा आणि त्यावर चर्चा करा Read And Discuss
दोन प्रकारचे वाचक असतात असे लेखक म्हणतात, जी पुस्तक ते वाचत आहेत असे व्यक्ती आणि ज्यांनी त्या पुस्तकात काय वाचलं आहे अशा व्यक्ती. फक्त पुस्तक वाचत आहे असं म्हणणारी व्यक्तीला कदाचित त्या पुस्तकातील महत्वाच्या गोष्टी लक्षात येणार नाहीत.
परंतू त्या पुस्तकात नेमकं काय वाचलं आहे ती पुस्तक कशाविषयी आहे, त्या पुस्तक लिहिण्याचा लेखकाचा ध्येय, उद्दिष्ट, हेतू साध्य होत आहे काय हे त्या पुस्तकाचा सार, गाभा, कल्पना, आयडीया, संदेश काय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला इतरांना त्या पुस्तकातील गोष्टींना, माहिती, तथ्ये, आकडेवारी, कल्पना, सांगायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे.
सवय क्र.6. वाचन करा आणि पुढे पुस्तकांचे ज्ञान इतरांना वाटा Read and pass it on
सवय क्र.5 आणि सवय क्र.6 एकमेकांशी संबंधित आहेत. एकदा वाचन झाल्यावर पुस्तकातील ज्ञान आत्मसात केल्यावर ती पुस्तक न राहता पांढ-या कागदारव काळी शाई एवढीच त्याची ओळख राहील.
सवय क्र.7. एक गुपित सवय The Secret Habit!
ही एक अशी सवय आहे जी गुपित ठेवण्यात आलेली आहे. लेखकांनी असे म्हटलेलं आहे की, तुम्हाला जर ही सातवी सवय काय आहे हे माहित करून घ्यायची जिज्ञासा, उत्सुकता असेल तर लेखक आपल्याला आव्हाण करतात एक लायक वाचक बनण्यासाठी, तुम्हाला बुकलेट ऍप डाऊनलोड करून त्यावर तुमचा वाचनांक (Reading IQ) ३० पर्यंत वाढवावा लागेल, तेव्हा तुम्हाला सातवी सवय समजून येईल.
तुम्ही जर दररोज बुकलेट ऍपवर काही मिनिटे वाचन केलात सातत्याने, दररोज, तर तुम्ही तुमचा वाचनांक दररोज वाढताना पाहाल. आणि एकदा का तो वाचनांक 30 पेक्षा वर गेलात, पुढे आलात तर तुम्हाला सातवी आणि शेवटची सवय कळेल.
लेखकांनी अशी भिती व्यक्त केली आहे की आपण जी एवढी मेहनत, श्रम, वेळ घालून तयार करत असलेले पुस्तक सारांश कितीजण प्रत्यक्ष वाचतात, तर तो एक प्रश्नच आहे. तेव्हा त्यांनी ऍप्प डाऊनलोड करण्याला आता एक गुप्त कूटकिल्ली (Secrete Code Key) लावलेली आहे. तुम्ही ऍप्प डाऊनलोड तर कराल परंतू ते चालू होण्यासाठी तुम्हाला ती गुप्तकूटकिल्ली टाकल्याशिव ते चालू होणार नाही.
त्यासाठी गुप्तकूट किल्ली तुम्हाला अशाच व्यक्तीपासून मिळेल ज्यांच्याकडे बुकलेट ऍप्प चालू असेल आणि त्यांच्यातर्फे ते तुम्ही मिळवू शकता. तुम्हालाही ती हवी असल्यास कृपया आम्हाला ई-संदेश करा किंवा टिप्पणीमध्ये सांगा आम्ही तुम्हाला नक्कीच वाचन चळवळीचा भाग बनण्यासाठी आनंदाने मदत करू.
धन्यवाद.
Booklet Guy's
Reading Habits: The 7 Secrets of Effective Readers
1) I doze off after reading 5 pages
2) I don’t remember what I read
3) I don’t get enough time to read
4) I’m a slow reader
5) I have left many books half-read
6) Which books should I read?
7) I have the guilt of not reading regularly
8) How to implement what I read?
The proceeds of the book will go to cover the costs of the Mission - Make India Read.
I read any books plz booklet app application
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्वागत आणि वाचनासाठीच्या या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद. तुम्हाला जर booklet app मध्ये प्रवेश पाहिजे असेल तर कृपया कळवा. अमूल्य टिप्पणीमुळे आमचा उत्साह वाढतो. भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
हटवा