घर हरवलेली माणसं- व.पु.काळे-मराठी पुस्‍तक परिचय

कोणी घर देता का घर... लेखकांनी माणसाचे त-हेवाईक स्‍वभाव त्‍यांचे सु-परिणाम व दुष्‍परिणाम यांना प्रत्‍यक्ष आयुष्‍यात येणा-या अनुभवांसोबत उत्‍कृष्‍टरित्‍या शब्‍दबद्ध केले आहे.

 

घर हरवलेली माणसं

व.पु.काळे

मराठी पुस्‍तक परिचय


 

प्राचीन ‘मानवा’ची भटकंती जशी थांबली नाही तशी आधुनिक ‘माणसा’ची भटकंती मनानेतरी अजूनही संपलेली दिसत नाही. असे वपुंच्‍या घर नसलेली माणसं या कथांमध्‍ये वाटते.  

 

🏘
घर हरवलेली माणसं

तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्‍या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्‍या ...

मुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्‍या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे.

आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण, तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे, मनाचे, भावनांचे, संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ.

पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर, हे अस्वस्थ करणारे जखम करणारे.


पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा असेलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. 

घर हरवलेली माणसं हा कथासंग्रह अतिशय मोघम व मार्मिक आहे. ह्यातील कुचंबणा ही कथा आणि प्रस्तावना अप्रतिम आहे. व.पुं. you the great. व.पुं. ची प्रत्येक कलाकृती अफाट आहे. 

📗📘📙

🏡

मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घातली.

कोडी सोडवायचा प्रयत्‍न केला. त्‍यांच्‍या कथा झाल्‍या.  कोडी तशीच राहिली.

पाटी कोरी करकरीत राहिली.

शब्‍द निसटले.  चरे राहिले.

असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे, भीती पण आहे.

लेखकांनी माणसाचे त-हेवाईक स्‍वभाव त्‍यांचे सु-परिणाम व दुष्‍परिणाम यांना प्रत्‍यक्ष आयुष्‍यात येणा-या अनुभवांसोबत उत्‍कृष्‍टरित्‍या शब्‍दबद्ध केले आहे.

डोळ्यांना दिसणा-या एवढ्या मोठ्या विशाल जगात आणि त्‍याहीपेक्षा न दिसणा-या विशाल अशा मानवी मनात माणसाचे स्‍वतःचे घर पर्यायाने अस्तित्‍वासाठी ठिकाण तयार करण्‍यात, बांधण्‍यात व चालविण्‍यात स्थिरावला असूनही आजही माणूस भटकणारा मणुष्‍य प्राणीच राहिलेला आहे.

प्राचीन ‘मानवा’ची भटकंती जशी थांबली नाही तशी आधुनिक ‘माणसा’ची भटकंती मनानेतरी अजूनही संपलेली दिसत नाही. असे वपुंच्‍या घर नसलेली माणसं या कथांमध्‍ये वाटते.   

चार भिंतीत सूर पकडण्‍याची घरं धडपड करतात. खरं तर चार भिंतींची मर्यादा घरांना आवडत नाही.  पण एवढंसं काळीज घेऊन वावरणारा माणूस भिंती दिसल्‍याशिवाय स्थिर होत नाही.

मग घरांना भिंतीमधून साकार व्‍हावं लागतं.  पण त्‍या भिंती पक्‍क्‍्या नसतात.  माणसानं जितकं विशाल व्‍हायचं ठरवलेलं असतं, तेवढ्या त्‍या भिंती लांब व्‍हायला तयार असतात.

पण घरांचा पराभव होतो. 

दगडविटांपेक्षा जास्‍त पक्‍क्‍या बांधणीच्‍या भिंतीमध्‍ये उभ्‍या करून माणसं वावरत आहेत, हे घ्‍ज्ञरांनाही समजतं.

घरांचा सपशेल पराभव होतो. 

घरांबारोबर स्‍वरांचाही.! 

 

घर नसलेली माणसं-पुस्‍तकातून...

माझ्या मेव्‍हण्‍यांनी, दुस-या महायुद्धात (WW2), कामगारांच्‍या माना मुरगळून पाण्‍यासारखा पैसा कमावला.  माझी बहीण काळी, पण विलक्षण देखणी! त्‍या काळात तिचा ‘इलस्‍ट्रेटेड विकली’ च्‍या मुखपृष्‍ठावर फोटो छापून आलेला.

पण तिच्‍या सासूनं, ‘ही काळी चंद्रकळा तुला आता शोभत नाही’ असं मुलाच्‍या मनात भरवलेलं.  ह्या माणसानं माझ्या बहिणीला वेडं ठरवलं. माझ्या वडिलांनी विनवण्‍या केल्‍या.  ‘इंदूच्‍या नकळत तिला लांबून पाहतो’ म्‍हटलं.

त्‍या माणसानं ते ऐकलं नाही.

 

🏠 घर हरवलेली माणसं

व.पु.काळे

मराठी पुस्‍तक परिचय 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive