हुंकार - व.पु.काळे मराठी पुस्‍तक परिचय

‘हुंकार’ हा कथासंग्रह म्‍हणजे तारूण्‍यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखकच ! तारुण्‍य- आयुष्‍यातील सळसळत्‍या उत्‍साहाचा काळ. प्रेमाच्‍या निरनिराळ्या छटा, त्‍यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्‍या प्रेमातील वेदना, कारुण्‍य, संसारातले वास्‍तव, तडजोड, सच्‍चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्‍था वपुंनी या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून वितारल्‍या आहेत.

 

 हुंकार

व.पु.काळे

मराठी पुस्‍तक परिचय 

 

 

‘हुंकार’ हा कथासंग्रह म्‍हणजे तारूण्‍यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखकच !

तारुण्‍य- आयुष्‍यातील सळसळत्‍या उत्‍साहाचा काळ.

प्रेम करण्‍याचा, प्रेमात हरवण्‍याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्‍याचा.  स्‍वतःची झालेली फट्फजिती कबूल करण्‍याचा, दुस-याची गंमत मजेत दुरून बघण्‍याचा, पण कधीकधी भलतीलच ठेच लागते, अगदी जिव्‍हारी लागते.

विसरू म्‍हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्‍वीकारताही येत नाही वास्‍तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते.  संसारात पडल्‍यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्‍यातून बाहेर येतच नाहीत.

मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात.  तर व्‍यवहारात भलत्‍याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात.

प्रेमाच्‍या निरनिराळ्या छटा, त्‍यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्‍या प्रेमातील वेदना, कारुण्‍य, संसारातले वास्‍तव, तडजोड, सच्‍चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्‍था वपुंनी या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून वितारल्‍या आहेत.

कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणा-या, कधी डोळ्यांच्‍या कडा ओल्‍या करणा-या, तर कधी सरळ सत्‍याला भिडणा-या अशा या कथा आहेत.

हुंकार

व.पु.काळे

मराठी पुस्‍तक परिचय

Hunkar by V.P.Kale  Marathi

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive