अर्थात -अच्युत गोडबोले- मराठी पुस्‍तक परिचय

सर्वसामान्‍य नागरिक असो की, व्‍यापारी, उद्योगपती, विद्यार्थी, पालक, शिक्षक असे मग तो कोणीही असो जो पैसा कमावतो, खर्च करतो, जमा करतो असे जो कोणी असेल ज्‍याचा पैशाशी संबंध येतो त्‍यांनी ही पुस्‍तक वाचायलाच हवी.

अर्थात 

अर्थशास्त्राचा इतिहास , सिद्धांत आणि चरित्र यांची रंजक सफर

अच्युत गोडबोले

मराठी पुस्‍तक परिचय 


अर्थशास्त्र तास खूप रुक्ष विषय आहे आणि शाळा, कॉलेजमध्ये तो अतिशय वाईट पद्धतीने शिकवलं जातो. मात्र अर्थात वाचल्यानंतर अर्थशास्त्रात नक्कीच रुची निर्माण होते. समजण्यास कठीण अश्या अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने उदाहरणासकट मांडल्या आहेत. देशाचे बजेट तसेच दैनंदिन व्यवहारात अर्थशास्त्र किती महत्वाचं किती उपयुक्त आहे हे पुस्तक वाचल्यानंतर समजते.

अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगणारे लेखक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.

अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडतं. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी   आहे. मराठीत अशा पद्धतीचे पुस्तक विरळाच.  

अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी -"अर्थात" पुस्तकाची प्रस्तावना वाचून असा आभास होतो कि , "आयुष्यातील प्रत्येक समस्यांची उत्तरे अर्थशास्त्रात दडली आहेत " . आणि एकाअर्थी ते बरोबर आहे ! सर्वधसाधारण विद्यार्थी जे वाणिज्य शाखेतील नाहीत त्यांना हे पुस्तक वाचून नक्कीच वाटेल कि, एका रोचक विषयाला आपण मुकलो आहोत. 

जाड-जूड मोठी असलेली पुस्‍तक व त्‍यावर अर्थशास्‍त्र विषय, विचार करूनच, बोरींग किंवा रटाळ-कंटाळवाणा वाटणारा हा विषय इतका सोप्पा आणि सरळ करून लेखकाने मांडलाय की पुस्‍तक वाचत राहावे असे वाटते..! 

पुस्‍तकातील भाषा ही ओघवती आणि वाचकाला खिळवून ठेवणारी रंजकता असल्‍याने पुस्‍तकात रमायला वेळ लागत नाही, तुम्‍‍ही एक रूपया कमवा अथवा 1-लाख रूपये कमवा तुमच्‍या कमावलेल्‍या पैशापासून, काय खरेदी करता, किती खर्च करता, केंव्‍हा, आणि का खर्च करता यांचा संबंध अर्थशास्‍त्राशी कसा आहे किंवा लेखकांनी अतिशय सुंदररित्‍या जोडून दाखवलेला  व समजावून सांगितलेला आहे. 

सर्वसामान्‍य नागरिक असो की, व्‍यापारी, उद्योगपती, विद्यार्थी, पालक, शिक्षक असे मग तो कोणीही असो जो पैसा कमावतो, खर्च करतो, जमा करतो असे जो कोणी असेल ज्‍याचा पैशाशी संबंध येतो त्‍यांनी ही पुस्‍तक वाचायलाच हवी. 

जिज्ञासूपणाने, उत्‍सुकतेने पुस्‍तक वाचायला सुरूवात करा, तुम्‍ही नक्‍कीच रोजगार, बेरोजगारी, पगार, महागाई वाढ, मंदी, बॅंकांचे व्‍याजदर, यांचा अर्थ समजून-उमजून कारणं शोधाल व यांची मींमांसा नक्‍कीच कराल, जगात होत असलेल्‍या उलाढालीचा संबंध नक्‍कीच जोडून पाहाल.

 
इतर संबंधितः 
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive