द मिलेनियर फास्ट लेन -एम. जे. डिमार्को (मराठी) पुस्तक परिचय | The Millionaire Fastlane by MJ Demarco | Book Review In Marathi
ज्यांना आयुष्यभर मध्यमवर्गीय राहून, उतार वयात श्रीमंत व्हायचं नाही, त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. हा एक असा जलदगती मार्ग आहे जो अन्य कोणत्याही मार्गापेक्षा अमाप संपत्तीकडे सहज घेऊन जातो
संपत्तीची गुरुकिल्ली मिळवा आणि आयुष्यभर श्रीमंतीत जगा
द मिलेनियर फास्ट लेन
एम. जे. डिमार्को
मराठी पुस्तक परिचय
![]() |
#the millionaire fastlane marathi #Bookshort |
About Book
आर्थिक सामान्यत्वाच्या दास्यातून मुक्त व्हा आणि स्वत:ला संपत्ती मिळवण्याच्या राजमार्गावर घेऊन चला... आजच! गणितीय माध्यमातून आखलेल्या आडमार्गाने, लक्षाधीश होण्याचा एक जलदगतीमार्ग आहे. या मार्गावरून गेल्यास तुम्ही मृत्यूनंतर श्रीमंत होण्यापेक्षा आत्ताच श्रीमंतीत आयुष्य व्यतीत करू शकता.
ज्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि अतिशय बेभरवशी अशा शेअर बाजार, नोकऱ्या आणि गृहनिर्माण बाजारांवर अविचाराने विश्वास ठेवल्यासच संपत्ती निर्माण होऊ शकते असं सांगून, मुख्य प्रवाहातले आर्थिक गुरू तुमची दिशाभूल करतात. तुमची स्वप्नभंग करणारी, आत्मशोषक, 'हळूहळू श्रीमंत व्हा' अशी ठाम समजूत तुमच्यात रुजवतात.
ज्यामुळे तुमचं सगळं तारुण्य आर्थिक नियोजन करण्यात विरून जातं आणि आयुष्याच्या संध्याकाळी केवळ शेअर्सवर मिळणाऱ्या लाभांशातली पांगळी संपत्ती तुमच्या हाती उरते. संपत्ती मिळवण्यासाठी हा मंदगती मार्ग'च जर तुम्ही अनुसरायचं ठरवलं असेल, तर तुमच्या आर्थिक भविष्याचं तारू एखाद्या जहाजासारखं भरकटेल आणि केवळ 'आशा व प्रार्थना' करणंच हाती उरेल.
ज्यांना आयुष्यभर मध्यमवर्गीय राहून, उतार वयात श्रीमंत व्हायचं नाही, त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. हा एक असा जलदगती मार्ग आहे जो अन्य कोणत्याही मार्गापेक्षा अमाप संपत्तीकडे सहज घेऊन जातो.
है जबरदस्त पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टींची शिकवण देते:
- पांगळी संपत्ती, आयुष्यभर परक्याची केलेली चाकरी, मोडीत निघालेले निवृत्तीनंतरचं नियोजन, बेभरवशी इंडेक्स्ड फंड्स, मूर्खपणे केलेली काटकसर आणि इतर आर्थिक गुरूंनी दिलेलं ज्ञान यांद्वारे तुम्ही कधीच श्रीमंत का बनू शकत नाही?
- 'श्रीमंत व्हा' या विषयावरची बहुसंख्य पुस्तकं केवळ लेखकालाच लक्षाधीश का बनवतात? तुम्ही पूर्णपणे निष्कांचन असतानादेखील आतापासूनच श्रीमंत असल्याची जाणीव कशी बाळगावी?
- श्रीमंत होण्याचे ५ आदेश : लक्षाधीश होण्यासाठी मिळकत कशी कमवावी?
- गरिबीचं प्रमुख कारण - इथून सुरुवात करा आणि तुम्ही सगळी परिस्थिती बदलवू शकता.
- तुमची निव्वळ मालमत्ता ४०० टक्के किंवा त्याहूनही अधिक इतक्या अफाट प्रमाणात कशी निर्माण करू शकता?
- आणि दारिद्र्यनिर्मूलन करणारे, संपत्ती कशी वाढवावी हे सांगणारे २५०हून अधिक, यशस्वी मार्ग!
Author
एम. जे. डिमार्को हे अर्धनिवृत्त उद्योजक आहेत. ते स्व-कर्तृत्वावर करोडपती बनले आहेत. त्याचबरोबर ते गंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत.
सध्या ते व्हायपेरियन पब्लिशिंग कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी व्यवसाय, अर्थकारण तसंच उद्योजकता व्यापार या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. जगभरातून ६०,००० उद्योजक असलेल्या, 'द फास्टलेन फोरम' या समूहाचे डिमार्को हे प्रशासक आहेत.
#Fastlane #Millionairefastlane #Marathibookreaders #Mjdemarko
%20by%20MJ%20DeMarco.jpg)
टिप्पण्या