तरूणांसाठी ईकिगाई-मराठी Ikigai For Young readers-Marathi-Author: Hector Garcia, Francesc Miralles
तरूणांसाठी ईकिगाई
मराठी पुस्तक परिचय
Ikigai For Young readers-Marathi-
Author: Hector Garcia, Francesc Miralles
Ikigai for Young readers
(Hector Garcia, Fransesc Miralles)
तुमच्या अस्तित्वाचं कारण काय? हे शोधायला आज जगभरातील लोकं आपले अख्खे आयुष्य वेचल्यावरदेखिल त्यांना कळून येत नाही. किंवा जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. म्हणूनच कदाचित लेखकद्वयिंनी ही पुस्तक लिहिली असे वाटते.
किशोरवयीनांसाठी ईकिगाईः
कारण हे वयच असं असतं बालपण-शालेयजीवनातील अल्लडपणा जावून जगाकडे व स्वतःकडे पाहायला आपण ह्या वयात पोहोचलेलो असतो, जिथून आपल्याला आपली स्वतःची जाणीव बळकट व्हायला लागते, स्वतःची ओळख व्हायला लागते, जगात आपले अस्तित्व शोधायला मन कावरे-बावरे व्हायला लागते. काहीही शिकायला-करायला हे वय उत्कृष्ट असते.
DIRECTION IS MORE IMPORTANT THAN THE SPEED
गतीपेक्षा दिशा महत्वाची आहे
सळसळतं रक्त असल्याने काहीतरी करायला शरीरातील उर्जेला उधान ओलं असतं, लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची, प्रचंड कष्ट, मेहनत-श्रम, करण्याची शक्ती याच वयात असते. योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती-ज्ञान देऊन त्यांना योग्य दिशा दिल्यास या वयातील प्रचंड उर्जा विधायक काम करण्यास वापरली जाऊ शकते.
याच वयात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनत असतो, नैतिक-अनैतिक, मूल्यं, धारणा- सवयी, स्वप्न, ध्येय, उद्देश, नियोजन यांचा प्रत्येक किशोरवयीन पाल्यांना शिक्षण-प्रशिक्षण-मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना करण्यासाठी जगात अशक्य असे काहीच राहणार नाही.
ही पुस्तक किशोरांना त्यांच्या आयुष्याच्या वळण देणा-या अवस्थेमध्ये शारिरीक व मानसिक बदल यांना गृहित धरून, किशोर वयातील बदलांना सामोरे जातानाच आयुष्यातील पुढील टप्प्याची तयारी करून घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करते.
परीक्षेत गुण-मार्क कसे वाढवावेत, पहिला नंबर कसा आणावा, अभ्यास कसा करावा, आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय कसे मिळवावे, किंवा खूप पैसा कसा मिळवावा असं काहीही हे पुस्तक शिकवत नसून ही पुस्तक महत्वपूर्ण अशा गोष्टींवर भर देते,
जसे-
- आपण कोणत्या गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहोत,
- आपल्याला नेमकं काय चांगलं जमतं,
- तुम्हाला काय आवडते, काय करावे वाटते,
- लोकांना-जगाला कशाची गरज आहे,
तुम्हाला जे आवडतं, जे जमतं, जे करताना मजा येते त्याची जगाला गरज आहे काय आणि ते तुम्हाला त्याच्यासाठी पैसे देऊ शकतात काय?
आपण जे करत आहोत त्यामध्ये आनंद कसा शोधावा, ते कारण शोधाणे आणि लक्ष विचलीत न होऊ देता, आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित कसे करावे हे सर्व शिकविते.
सर्व विद्यार्थी, युवा यांनी ही पुस्तक वाचलीच पाहिजे, आपल्या पाल्यांना ही पुस्तक त्यांच्या पालकांनी आवर्जून भेट म्हणून वाचायला द्यायला पाहिजे.
तुम्हाला काय आवडते, रूचते, पटते, तुम्ही कशामध्ये उत्कृष्ट-पारंगत आहात, तुम्हाला त्याचा मोबदलाही मिळेल आणि जगाला त्याची गरजही आहे या गोष्टी तुम्हाला तुमचं पॅशन (आवड), ध्येय, पेशा, जगण्याचे कारण पर्यायाने तुमचा ईकिगाई शोधून देईल.
Finding what you love, what you are good at, what you can be paid for and what the world needs will give you passion, mission, profession and vocation, in turn, your ikigai
.
📗📘📙📕🔖🔖📑
इतर संबंधितः
ईकिगाई श्रृंखलेतील पाच पुस्तकांचा संच
Ikigai Set of 5 Marathi books of Hector Garcia & Fransesc (Miralles Ikigai, Ichigo Ichie, Tarunansathi Ikigai, Ikigai Ek Safar, Forest Bathing)
IKIGAI: Reason for being आपल्या दररोज उठण्यामागील कारण-परिचय
ईकिगाईः दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य-सारांश
IKIGAI: The Journey
ईकिगाईः एक सफर (आनंद आणि उद्देश शोधण्याची हुकमी जापानी पद्धत)
- फॉरेस्ट बाथिंगः
- Ichigo Ichie: Living in Now
इचिगो इची: प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत
Ikigai for Young readers
तरूणांसाठी ईकिगाई
Ikigai For Teens: Finding Your Reason For Being किशोरांसाठी ईकिगाई
📗📘📙📕🔖🔖📑
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे.
या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला.
स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.
📗📘📙📕🔖🔖📑



टिप्पण्या