सत्‍ता अधिकार प्राप्‍तीचे 48 नियम- रॉबर्ट ग्रीन 📚#Bookdhotrts #14 | 48 Laws of Power (Marathi) by Robert Green

फक्त कमीच नाही जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा कमीच बोला कारण कमी बोलणारे लोकं इतरांना सहजतेने समजून येत नसतात.

 
सत्‍ता
अधिकार प्राप्‍तीचे 48 नियम

रॉबर्ट ग्रीन


48 Laws of Power
(Marathi)
by Robert Green 

📚 बुकशॉर्ट #14


#नियम क्र.-01 (Law No.01)
आवश्यकतेपेक्षा नेहमी कमी बोला

बाष्‍कळ, वायफळ बडबड, बकवास करणे नेहमी सोपं असतं वायफळ बडबड-बकवास करणं, गप्‍पा-टप्‍पा करणं सोपं असतं, परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवणे, लगाम लगावणे नेहमीच कठीण जाते, अवघड असते.

जर तुम्ही नेहमीच जास्त बोलत असाल तर नक्कीच तुम्ही कुठेतरी मूर्खपणा करणारच आणि त्यामुळेच तुम्ही कधी ना कधी फसू शकता.  यासाठी नेहमीच गरजेपेक्षा कमी बोला. 

एक गोष्ट लक्षात ठेवाः  

फक्त कमीच नाही जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा कमीच बोला कारण कमी बोलणारे लोकं इतरांना सहजतेने समजून येत नसतात.

#नियम क्र.-02 (Law No.02)
कृतीने जिंका वाणीने नाही
Win through your action never through your argument

एकच गोष्ट हजार वेळा पुन्हा पुन्हा सांगून, रिपीट करून काही फरक पडणार नाही. परंतु ॲक्शन घेतल्याने (कृती केल्‍याने) नक्‍कीच काहीतरी फरक पडू शकतो. 

छोट्या मोठ्या आर्ग्युमेंट्स, वाद-विवाद केल्याने, लुटूपुटूचे वक्‍तव्‍य करून स्वतःला वाक्‍पंडित, बलवान समजण्याची चूक कधीच करू नका.  शक्तिशाली लोकं इतरांशी कधीही आर्गुमेंट-वाद-विवाद करत नसतात, वाद घालत नसतात. 

खरंतर ते आपल्या कृतीने जिंकत असतात, दाखवून देत असतात.

 

#नियम क्र.-03 (Law No.03)
गैरहजर राहून आदर मिळवा
use absence to win honor

जितका तुम्ही जास्त दिसाल, तुम्‍हाला जितकं जास्त लोकं ऐकतील तितकं तुम्ही सामान्य ठराल, सामान्य दिसाल. 

नॉर्मल-कॉमनः जग डिमांड आणि सप्लाय वर चालत असतं 

जी कोणती गोष्ट अबंडंट म्हणजे अधिक प्रमाणात, विपुल प्रमाणात आढळते त्याचा लोकं आदर करत नसतात, किंमत करत नसतात. जसे-पाणी.  यासाठीच तुम्हाला जर स्वतःची व्हॅल्यू, किंमत वाढवायची असेल तर कधी-कधी कार्यक्रम, मीटिंग आणि पार्टी मध्ये बैठका आणि समारंभामध्ये अनुपस्थिती दर्शवा किंवा हेतूपूर्वक जाऊ नका. 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive