ऑटोमिक हॅबिट्स - जेम्स क्लियर या पुस्‍तकातून शिकायच्‍या दोन गोष्‍टी | 📚 Bookshorts #18

 कोणत्याही नवीन सवयी बनवायचा सर्वात बेस्ट मार्ग म्हणजे तुम्ही नव्या सवयीला जुन्या सवयी सोबत जोडून घ्या.



ऑटोमिक हॅबिट्स
जेम्स क्लियर

📚 Bookshorts #18

 

ऑटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून दोन शिकवणी किंवा दोन धडे जे आपल्याला सांगितलेले आहेत 

 

#1.  एक (1%) टक्‍कादेखील महत्‍वाचा आहे
One Percent is Important 1% 

जर तुम्हाला एखादी नवीन सवय बनवायची आहे तर थेट पहिल्या प्रयत्नातच पर्वत तोडायचा प्रयत्न करू नका, किंवा एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करू नका.

  • जसे, आज तर मी दहा तास अभ्यास करेन.

छोट्या प्रमाणात सुरुवात करा 1% वन पर्सेंट ने म्‍हणजेच अगदी 1% टक्‍क्‍याने त्यामध्ये दररोज सुधारणा आणत जा, आज जितकं केलं आहे त्यामध्ये दररोज एक टक्क्याने वाढ करत जा. 

  • उदाहरणार्थ, 

आज मी दहा मिनिटे अभ्यास करीन आणि उद्या मी त्यामध्ये 1% -एक टक्क्याने वाढ करीन ''वन पर्सेंट इन्क्रिमेंट'' म्हणजेच मी जर वन पर्सेंट इन्क्रिमेंट म्हणजेच एक टक्का सुधारणा जर करत असेल तर, उद्या मी आजपेक्षा 10-मिन‍िटाऐवजी दहा दशांश एक 10.1 मिन‍िटे अभ्यास करेल आणि असं करणं जास्त अवघड कठीणही वाटणार नाही कारण 1% एक टक्का, एक टक्काच तर वाढ करायची आहे, एक टक्काच तर जास्त अभ्‍यास करायचा आहे वन पर्सेंट. 

1% दररोज
37.78 वर्षाकाठी
सुधारणा

जर तुम्ही दररोज एक टक्क्याची वाढ करत असाल तर या नियमाचा वापर करत असाल तर याचा वर्षाकाठी तुमच्या परफॉर्मन्स मध्ये 37.78% टक्के पर्सेंट सुधारणा झालेली असेल.  एक टक्‍का दररोज 37.78 वर्षाकाठी सुधारणा येईल.

याचा अर्थ तुम्ही जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी जर एक टक्का वाचन करत असाल तर वर्षाअंती, एका वर्षानंतर तुम्ही दिवसाचे 6.29 तास अभ्यास करत असाल, वाचन करू शकाल आणि तेही सहजतेने सोप्या पद्धतीने कारण तुम्ही प्रगती हळुवारपणे, सावकाशपणे, ग्रॅज्युअली केलेली असते

 

#२.  सवयी रचणे-जोडणे
Habit Stacking

कोणत्याही नवीन सवयी बनवायचा सर्वात बेस्ट मार्ग म्हणजे तुम्ही नव्या सवयीला जुन्या सवयी सोबत जोडून घ्या

समजा उदाहरणार्थ, 

तुम्हाला दररोज सकाळी चहा किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर या सवयीला तुम्ही बदलून (रिप्‍लेस करून) तुम्हाला शरीरासाठी हेल्‍दी-आरोग्यपूर्ण, फिटनेस ची सवय लावून घ्यायची आहे.   तर, तुम्ही एखादी नवी हेल्‍दी सवय लावून घेऊ शकता असं म्हणून की,

''जोपर्यंत माझी कॉफी बनत आहे तोपर्यंत मी दहा पुशअप्स किंवा दंडबैठका, अंगताणण्याचे व्यायाम, स्ट्रेचिंग करीन.''

असं केल्याने तुम्हाला व्यायामासाठी किंवा पुशअप, स्ट्रेचिंगसाठी वेगळ्याने वेळ काढावा लागणार नाही आणि नवीन हेल्दी सवय तुमच्यामध्ये अंगीकारली जाईल लागेल. आणि तेही त्‍याच वेळेत. 

 

👉 अधिक वाचाः  ऍटॉमिक हॅबिट्स पुस्‍तक सारांश मराठी

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive