मानवी स्वभावाच्या चार प्रवृत्ती | 🙈🙉🐵🙊 Four Tendencies of Human Nature Marathi #Booksummary #Marathi

"व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती" अशी म्हण मराठी भाषेत आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्ती हा विशेष unique असतो आणि त्याचे स्वतः चे असे एक वैशिष्ट्य-गुण असते त्यामुळे त्याला स्वतः ची स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व असते. व्यक्तीच्या सवयी बदलता येतात, व्यक्तीचा स्वभाव बदलता येत नाही.


फोर टेंडेन्सीस ऑफ ह्यूमन नेचर
मानवी प्रवृत्ती चे चार स्वभाव

लेखिका
ग्रेचेन रुबिन



🙋 🙆 🙅 🙅


4 Tendencies of Human Nature
By
Gretchen Rubin

#fourtendenciesbook #Booksummary #पुस्तक सारांश #पुस्तकांश #marathi मराठी

📚 बुक समरी मराठी



अपेक्षांचे ओझे

व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती


मित्रांनो लेखिका या पुस्तकात असे म्हणतात की, मानवी प्रवृत्तीचे चार स्वभाव असतात, या चार स्वभावांपैकी माझा एक स्वभाव असेल, तुमचा देखील एक स्वभाव असेल, तुंमच्या मित्र मैत्रिणी चा देखील एक स्वभाव आहे असा प्रत्येकाचा विशिष्ट असा स्वभाव असतो.

#1. पाहिलं आहे upholders
#2. दुसरं आहे obligers
#3. तिसरं आहे, questioners आणि
#4. चौथं आहे, rebels

ह्या चारही स्वभावांना समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर outer आणि inners expectations बाह्य आणि अंतर्गत अपेक्षा यांना समजून घेणं खूप गरजेचे आहे, कारण हे सर्व स्वभाव मुळात बनतातच आपल्या या अपेक्षांवर की आपण आपल्या बाह्य आणि अंतर्गत अपेक्षांना कसं पूर्ण करतो यांवरच हे स्वभाव बनतात.

#बाह्य अपेक्षा
(Outer expectations)

Outer expectation आशा काही गोष्टी असतात ज्यांना लोकं आपल्या कडून अपेक्षा ठेवून असतात.  लोकांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात.

जसं, 
  • तुम्ही प्रामाणिक पणे काम करावे अशी तुमचा बॉस तुमच्याकडे अपेक्षा ठेवून असतो, 
  • तुमचे मित्र मैत्रिणी यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या सोबत बाहेर फिरायला यावे, 
  • तुमच्या आई ची अशी अपेक्षा असते की तुम्ही कामावरून येता येताना बाजार घेऊन यावा.

यासर्व outer expectations म्हणजेच "बाह्य अपेक्षा" असतात ज्या लोकांना तुमच्याकडून अपेक्षित असतात.

आता पाहुयात inner expectations म्हणजेच अंतर्गत अपेक्षा ज्या आपण स्वतःसाठी करत असतो. यासाठी आपल्या वर कोणताही कोणाचाही दबाव नसतो, आदेश नसतो no ऑर्डर नो pressure.  ह्या अपेक्षा मग काहीही अथवा कोणत्याही असू शकतात.

जसे,
  • दररोज व्यायाम करणे
  • स्वस्थ आहार घेणे
  • पुस्तकं वाचणं
  • नवे कौशल्य शिकणं
  • दररोज लवकर उठून ध्यान धारणा करणं

ह्या असतात तुमच्या अंतर्गत अपेक्षा ज्या तुम्ही स्वतःशीच ठेवलेल्या असतात यासाठी कोणताही व कोणाचाही बाह्य दबाव नसतो, ही कामं करणं न करणे यासाठी तुमच्याकडून कोणाचीही अपेक्षा नसते, असं करण्यासाठी तुम्हाला वाटलं तर करा तुम्हाला वाटलं तर करू नका ही पूर्णपणे तुमची इच्छा मर्जी असते.

आता पाहूया पहिली प्रवृत्ती first टेंडेन्सी

#1. Upholders आधारधारक आधारस्तंभ

अपहोल्डर्स त्या व्यक्ती असतात ज्या outer बाह्य आणि अंतर्गत inner अपेक्षा म्हणजे अंतर्बाह्य दोन्हीं अपेक्षांना पूर्ण करत असतात.

उदाहरणार्थ:

ह्या प्रकारच्या व्यक्ती स्वतःच्या अपेक्षा तर पूर्ण करतातच जसे स्वतः ची एक विशिष्ट दिनचर्या बनवणं आणि त्यानुसार वागणं, किंवा एखादी lifestyle जीवन शैली निवडणं आणि त्यानुसार चालणं आणि त्याचं पालन करणे.
किंवा
याचं बॉस म्हणेल हे काम करून टाका तर ते त्यांची कामं करुन देतील..!

त्यांच्या मित्रांनी म्हटलं चला बाहेर फिरून येऊ तर ह्या प्रकारच्या व्यक्ती कोणताही विचार न करता त्यांच्या सोबत जातील..!

त्यांची आई म्हणेल की बाजार घेऊन या तर ते मुकाट्याने घेऊन येतील.

Upholders सोबत डील करणं एकदम सोपं सहज असतं, जर तुमच्या मित्रमैत्रिणी मधे किंवा तुमचा एखादा कर्मचारी upholder असेल तर ते तुम्ही जे म्हणाल ते करतील परंतु तुम्हाला त्यांना स्पष्टपणे असे सांगावे लागेल, स्पष्ट निर्देश द्यावे लागते.


Pros:}
You शूड give clear अँड precise instructions

करण अशा प्रकारच्या व्यक्ती कोणताही प्रश्न विचारत नसतात, त्या कामाचं त्या गोष्टींचा सकारात्मक किंवा नकारात्मक बाजू पाहत नसतात. एकदा का तुम्ही एखाद्या upholder ला काम दिलं आणि त्यांना कामं समजावून सांगितले क्लिअर instructions दिले ते त्या कामाला करायला सुरुवात करतील मग ते असा विचार देखिल करणार नाही की,

  • या कामामुळे माझा तोटा तर होणार नाही?
  • याचा परिणाम काय होईल?
  • परिणाम कसा येईल?
  • काम बरोबर होणार की नाही?

असे प्रश्न ते विचारणार नाहीत त्यांना तर केवळ तुम्ही दिलेल्या कामाला जसे सांगितले होते तसे करण्यात, जे निर्देश दिले होते त्या नुसार काम होत आहे की नाही याचीच चिंता असते, त्यांना फक्त त्या दिलेल्या instructions वर निर्देशांवर चालणं पसंत असते.

यासाठी च यांना सुस्पष्ट माहिती, नियम, आदेश-दिशा-निर्देश द्यावे लागतात.
यामुळेच या स्वभावाच्या लोकांचे काही सकारात्मक व नकारात्मक बाजू गोष्टी असतात,
आधी सकारात्मक बाजू पाहू,

Pros: सकारात्मक बाजू
  • Upholders tendencis चे व्यक्ती खूपच विश्वासू असतात,
  • सहजतेने तुम्ही यांच्यावर विश्वास करु शकता
  • यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास करू शकता, 
  • यांना माहित असते की पुढील व्यक्ती त्यांच्यावर अपेक्षा ठेऊन आहेत आणि 
  • हेदेखील माहित असते की त्यांच्या अपेक्षा वर खरं उतरायचं आहे.

इतरांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासोबतच ते स्वतःच्या अपेक्षांवर सुद्धा खरे उत्तरत असतात.

म्हणजेच वेळेवर कामं पण करत असतात आणि चांगली झोपसुद्धा घेत असतात
स्वतः साठी वेळ काढुन घेतात आणि ही लोकं self motivated म्हणजेच स्वप्रेरीत आत्मप्रेरीत असतात. यांना motivation साठी व्हिडिओ पाहावे लागत नाही.

आता पाहू यांच्या नकारात्मक बाजू काय काय असतात

Cons: Upholders नकारात्मक बाजू

जर Upholders यांना स्पष्ट नियम,निर्देश, माहिती दिली नाही तर ते गोंधळतात, फसतात कारण ते स्वतः चं डोकं चालवत, लावत नसतात, ते दुसऱ्यांच्या मजबुरीला समजत नाहीत,
जर पुढील व्यक्ती यांच्या अपेक्षा पूर्ण करत नसतील तर ते नाराज होत असतात.

यांना एका रूटीन म्हणजेच नित्यनियमाने, कामं करणं पसंत असतात. आणि अत्यंत खंबीरपणे आणि गंभीरतेने, ते या routine ने चिकटून असतात, कामं करतात. आणि जेंव्हा केव्हा त्या दिनक्रमात दिनचर्येत नित्यनियमात routine मधे बदल करण्याची गरज असते तेंव्हा यांना खूपच त्रास होत असतो. 

इथे तुम्हाला नक्कीच तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीची आठवण झाली असेल जो असं वागत असेल पण त्याला हे माहीत नव्हते तो Upholders प्रवृत्ती चा आहे त्यांच्याशी शेर अवश्य करा.


#2. दुसरं आहे प्रश्न विचारणारे प्रश्नकर्ता questioners

नावावरूनच समजून येतं की ह्या प्रकारच्या व्यक्ती खूप प्रश्न विचारणारे असतात, प्रश्न विचारणारे questioners स्वतःच्या अंतर्गत अपेक्षा inner expectations तर पुर्ण करतातच म्हणजेच स्वतः साठि एखादे routine सेट करतात आणि ते पूर्ण करतात परंतु outer expectations बाह्य अपेक्षा यांच्या साठी ते खूप प्रश्न उपस्थित करतात.

जसे, समजा या प्रकारच्या व्यक्तीला त्यांच्या आईने बाजार घेऊन येण्यास सांगितले तर ते म्हणतील ते म्हणतील,

🙋‍♂️बाजार का आणायचं आहे?

यांच्या बॉसने यांना एखादा काम करण्यास सांगितले तर ते म्हणतील,

🤷 का करायचं आहे हे काम?
💁 कँपनील कोणता फायदा होईल?

या प्रकारच्या लोकांना त्यांचे मित्र कुठे चालण्यास सांगितले तर तिथेदेखील ते प्रश्नांची सरबत्ती जोडतील, खूप सारे प्रश्न विचारतील.

जसे का? कुठे? केंव्हा? किती? कोणतं?

जर तुम्ही एखाद्या अशा प्रश्नकर्त्या व्यक्तीसोबत सामना करत असाल तर, किंवा त्यांपासून बचाव करण्यासाठी, तुम्हाला त्यांचे काही प्रश्न कमी करायचे असतील तर,तुम्हाला त्यांच्याकडून जे काम करवून घ्यायचं असेल त्या कामाचे महत्त्व, तुम्हाला त्यांची कारणंसुद्धा त्यांना समजावून सांगा. 

जसे या स्वभावाच्या व्यक्तीला तुम्ही बाजार आणायला सांगितले तर सोबतच त्यांना हेही सांगा की, आज पाहूणे येत आहेत, त्यांच्यासाठी खास मसालेभात बनवायचे आहे जे तुम्हाला ही पसंत आहे, किंवा

समजा तुमचा एखादा कर्मचारी प्रश्नकर्ता आहे तर त्याला कोणतेही काम देण्या अगोदर त्याला हे समजावून सांगितले पाहिजे की हे काम किती महत्त्वाचे आहे, याचे हेहे परिणाम येतील असे नाही आले तर दुसऱ्या पध्दतीने प्रयत्न करा, हे काम किती गरजेचे आहे, काय काय फायदा होईल, काय नुकसान होईल इत्यादी, आणि

जर तुमचा एखादा मित्र मैत्रिण असे questioner tendency प्रश्नकर्ता प्रवृत्ती चे असतील आणि तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जायचे असेल तर त्यांना तुम्हाला हेदेखील सांगावे लागले की, 

  • ती जागा कोणती आहे,
  • किती छान आहे,
  • तिथे गेल्यावर काय होईल,
  • तिथं काय मिळेल इत्यादी
  • काहीच नाही तर त्यांना फक्त इतकं सांगा की त्यांना जी गोष्ट आवडते ती तिथं आहे म्हणून बास झालं तुमचं काम..!

प्रश्नकर्ता प्रवृत्ती च्या लोकांच्या काही सकारात्मक बाजू असतात:

Pros: प्रश्नकर्ता सकारात्मक बाजू

प्रश्नकर्ता प्रवृत्तीचे व्यक्ती time is money ह्या तत्वावर चालणारे असतात म्हणजे यांना वेळेचं महत्त्व कळतं.  वेळेला महत्त्व देतात, म्हणजे तुम्ही त्यांना एखादा काम सांगत असाल तर त्यांना हेही सांगितले पाहिजे की हे काम केल्याने त्यांचा वेळ वाया नाही जाणार, प्रश्नकर्त्या जवळ खूप ज्ञान माहिती असते आणि त्यांना ही माहिती हे ज्ञान त्यांच्या ह्याच प्रश्न विचारण्याच्या प्रवृत्तीमुळंच मिळालेले असते.

असे (प्रश्नकर्ता) व्यक्ती त्यांची कामं खूपच काळजीपूर्वक आणि उत्तमपणे करत असतात.

जसं की ह्या व्यक्ती वेळेची कदर करतात, वेळेला महत्त्व देतात त्यामुळे सर्वांसाठी हे सहजासहजी तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत, यामुळेच समाजात त्यांची किंमत वाढलेली असते, लोकही त्यांची खूप कदर करत असतात, तुम्हाला त्यांच्या वेळेनुसार कामं सांगावे लागतील.

Cons: प्रश्नकर्ता नकारात्मक बाजू

अशा प्रकारच्या व्यक्ती खूप प्रश्न विचारणारे असल्याने ते खूप जास्त प्रमाणात analysis पृथक्करण देखिल करतात ज्यामुळे कित्येकदा त्यांच्या ह्या स्वभावाचे ते शिकार होतात कारण ते खूपच जास्त विचार विनिमय करतात थोडक्यात सांगायचे झाले तर ओव्हर अनालायसिस चा त्यांना paralysis होतो म्हणजेच ते निर्णय घेउ शकत नाहीत, कित्येकदा ते भरकटतात, विचारात अडकून पडतात.

नेहमीच हे स्वतः खूप प्रश्न विचारतात परंतु कोणी यांना प्रश्न विचारला तर हे भडकतात,
यांना कोणी प्रश्न विचारलेलं आवडत नाही, कोणीही प्रश्न करू नये अशी त्यांची ईच्छा असते. यांच्या जबाबदारीला घेऊन कोणी प्रश्न विचारला तर यांना हि त्यांची insult झाली वाटते.

आपल्या मित्रमंडळी ग्रूप मध्ये प्रश्नकर्ता मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत हा लेख नक्कीच शेर करा, वाचन्यास सांगा.


#3. ओब्लिजर्स obligers बंधक प्रवृत्ती

ओब्लिजर्स हे outer expectations म्हणजे बाह्य अपेक्षा यांना पूर्ण करणारे असतात जसे उफोल्डर्स असतात तसे जर कोणी यांना एखादे काम सांगितले तर ते कोणताही प्रश्न न विचारता ते काम करतील ,परंतु ते स्वतःच्या inner expectations अंतर्गत अपेक्षा पूर्ण करत नाहीत.

तुम्ही जर यांना बाजार आणण्यास सांगितले तर ते मुकाट्याने घेऊन येतील पण जेव्हा प्रश्न येतो त्यांचा स्वतःच्या वयक्तिक अपेक्षांचा तर तिथे अपेक्षा भंग होतात, ते स्वतःच्या expectations ना fulfill करू शकत नाहीत.

जेंव्हा गोष्ट होते त्यांच्या वैयक्तिक goals ची, फिटनेस ची, experties ची, एका proper routine ची तर ते त्यावर टिकत नाहीत, तिथे निराशाच हाती येते.
ह्या प्रकारच्या व्यक्ती दुसऱ्यांचे ऑर्डर्स ते मानतील, मित्रांच्या सोबत फिरायला ही जातील, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतील, परंतु स्वतःसाठी काही करण्यासाठी त्यांना समस्या येतात.

आपण असं म्हणू शकतो की obligers बंधक प्रवृत्ती च्या व्यक्तींना स्वतःच्या inner expectations पूर्ण करण्यासाठी कोणाचा तरी हात आणि साथ पाहिजे असतो.

हे कधीही जिममध्ये एकटे जाणार नाहीत, ते नेहमीच एखादा सोबती शोधतील, कोणी पार्टनर मिळाला नाही तर ते जाणारच नाहीत.

हे मॉर्निंग walk ला सुध्दा एकटे जाणार नाहीत, एक दिवस अगोदरच ते झोपण्यापूर्वी मित्राला सांगून ठेवतील की उद्या सकाळी त्यांना मॉर्निंग walk ला जायचं आहे म्हणून.

यात काही मोठी गोष्ट नाही यात काही अनैसर्गिक नाही ही तर केवळ एक प्रवृत्ती आहे.

जर तुम्ही एखाद्या ओब्लिजर्स सोबत डील करत असाल, सामना करत असाल तर, ते खूप सोपं असेल कारण हे देखील upholder प्रमाणे ते कोणताही प्रश्न न विचारता, इतरांचे ऑर्डर मान्य करण्यासाठी, दुसऱ्यांच्या expectations पूर्ण करण्यासाठी नेहमीच तयार असतील, सहजपणे तुमचं म्हणणं ऐकतील आणि follow करतील.

परंतु, जर का तुम्ही स्वतःच एक ओब्लिजर्स आहोत आणि तुम्हाला तुमच्या अंतर्गत अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असतील जसे की, तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत तर तुम्हाला reader club वाचन कट्टा जॉईन केला पाहिजे, तुम्हाला facebook वर कित्येक फेसबूक readers ग्रुप मिळतील.

तुम्ही तुमच्या मित्रांसोबत reading challengeS चे गेम खेळू शकता, तुम्ही एकाच पुस्तकातील काही पुस्तकं पानं वाचून त्यात काय लिहिले आहे हे एकमेकांना विचारू शकता जेणेकरून खरोखरच तुम्हाला हे विश्वास होईल की त्या पुस्तकातील पानं त्यानी वाचले आहेत.

यासारखेच challenge तुम्ही व्यायाम करण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

थोडक्यात सांगायचे झाल्यास असं म्हणता येईल की तुमच्या inner expectations पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता.
आणि तुम्ही जर एक ओब्लिजर्स आहोत तर तुम्हाला ही मदत घ्यायलाच पाहीजे. सांभाळून राहा, स्वतःवर लक्ष द्या, स्वतःची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. थोडं स्वार्थी बना..!

आणि जर तुमच्या मित्रमंडळी किंवा एखादा कर्मचारी यांपैकी कोणी ओब्लिजर्स असेल तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना आहे, ओब्लिजर्स पुढं जाऊन रेबेल्स बनतात जी या पुस्तकातील पुढील प्रवृत्ती टेंडेन्सी आहे. 

ते धोक्याची घंटा वाजवून घेण्यापेक्षा तत्पुर्वी तुम्हांला हे जाणून घेतले पाहिजे की ओब्लिजर्स चा दुसरी लोकं फायदा घेत असतिल तर ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून करून थकून जातात आणि शेवटी म्हणतात, आता बास..! खूप झालं.!! आणि कित्येक वेळा ते त्यांची नोकरी देखील सोडून देतात. 

आपले लग्न, आपली मैत्री कोणतीही पूर्व सूचना न देता तोडून टाकत असतात. संपवून टाकत असतात.
हे माहीत असूनही की मिटिंग मध्ये उशिरा येणं चुकीचं आहे हे माहीत असूनही जाणुन बुजून उशिरा येत असतात. हे मिटिंग सुद्धा टाळायला लागतात.

जर तुमच्या आसपास एखादा ओब्लिजर्स असेल तर त्याचा फायदा घेऊ नका, गैरवापर तर करुच नका, त्याच्यावर हद्दीपेक्षा जास्तीचं ओझं टाकू नका.

ओब्लिजर्स यांची पोसिटीव्ह गोष्टी पाहूया,

ओब्लिजर्स Pros: 

  • या व्यक्ती दुसऱ्यांच्या अपेक्षांवर खरे उतरत असतात,
  • हे प्रत्येक ठिकाणी सकारात्मक वातावरण बनवून ठेवतात
  • कामाच्या ठिकाणी बॉस ला कधीही तक्रारी ची संधी देत नाहीत
  • दुसऱ्यांच्या कामात कधीही अडथळा आणत नाहीत, पाय अडवत नाहीत

ओब्लिजर्स Cons: कॉन्स:, negatives ओब्लिजर्स नकारात्मक बाजू:

  • ते इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगत नसतात, 
  • एका रीसर्च नुसार 3 पैकी 2 ओब्लिजर्स frustration चे शिकार असतात. 
  • आणि डिप्रेशन सारखी खतरनाक मनोविकार सुद्धा ओब्लिजर्स ना जास्त होत असते.
  • हे दुसऱ्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात.
  • हे स्वतःची किंमत value करत नसतात आणि 
  • जो स्वतःची किंमत करत नाही त्यांची कोणीही किंमत करत नसतात. फक्त फायदा उचलायला बघतात.

When someone doesnot value himself
Nobody else value him.

तुमचा एखादा मित्र मैत्रिण जर ओब्लिजर्स असतील तर त्यांना हा लेख जरूर पाठवा त्यांना हे जाणून घेणे आवश्यक व गरजेचे आहे.


#4. बंडखोर प्रवृत्ती रेबेल्स Rebels

Rebels त्यांच्या व दुसऱ्यांच्या अंतर्गत आणि बाह्य इनर outer expectations दोन्हींची फिकीर करत नसतात, ते स्वतःच्या व दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नसतात तर ते तेच करतात जे यांचा मन म्हणेल, ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात, त्यांच्या इच्छेनुसार ते जसं, जिथं, जितकं, जेंव्हा- तसं, तिथं, तितकं आणि तेंव्हा मनात आलं तसं काम करीत असतात.

तुम्ही एखादं काम सांगा ते करणार तर नाहीच, रेबेल्स स्वतःसाठी देखिल काम करीत नसतात.

जर आम्ही जर असं म्हटलं की तुमचा एखादा कर्मचारी रेबेल्स प्रवृत्ती चा आहे तर हे विधान च statement योग्य होणार नाही. कारण एखादा rebel बंडखोर प्रवृत्ती चा व्यक्ती नोकरी करेल हे दुर्मिळच म्हणावे लागेल. आणि जर करतच असेल तर सुरुवातीला त्याच्या मजबुरी ने नोकरी करत असेल.

परंतु ते आपल्या मर्जीने आपल्या पध्दतीने, आपल्या मना प्रमाणे जीवन जगणं आवडतं, कोणाचाही हस्तक्षेप interference नको असतो.

आणि rebels लोकांना कोणाचेही आदेश ऑर्डर मानणं चांगले वाटत नाही. यासाठी च अशा लोकांना हँडल करणं जरा जास्तच जिकरीचे असते, कठीण असते.  आणि जर तुम्हाला त्यांच्याकडून एखादा काम करून घ्यायचं असेल तर ह्या दिलेल्या sequence नुसार जायला हवे, याचा विचार करायला पाहिजे:

  • माहिती information
  • निवड choice
  • परिणाम consequence
सर्वात आधी यांना तुम्हाला खुपसारी माहिती द्यावी लागेल, ह्या प्रकारच्या व्यक्ती जी कोणती माहिती तो विचारतो ती सर्व माहिती त्याला देऊन टाका, जेणेकरून तो एक inform decision निर्णय घेऊ शकेल. आणि त्याच्या या निवडीमुळे choice तो काय परिणाम consequence दिसतील चांगले किंवा वाईट त्या हिशोबाने तो काम करेल.

बंडखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीला जर तुम्ही हस्तक्षेप केला, वेळोवेळी मदत करण्याची किंवा वारंवार remind कराल त्याला आठवण करून दिली तर तो तुमचे काम करणारच नाही..! विसरून जा..!

आणि जर तुम्हाला अशी व्यक्ती प्रेम करत असेल तर तो तुमच्यासाठी हरएक काम करेल, काहीही करेल.

रेबेल्स बंडखोर प्रवृत्ती च्या लोकांना स्वतःच्या ओळखीची identity शी अतिशय प्रेम असतं, ते कधीही लोकांना त्यांचा fake नकली चेहरा दाखवत नाहीत, हे जगासमोर नेहमीच आपला अस्सल खरा चेहरा समोर ठेवतात.

तर असे काम जे रेबेल्स टेंडेन्सी असणाऱ्या लोकांच्या identity आयडेंटिटी शी मिळतं जुळतं असतं असे काम ते आनंदाने करतील.
बंडखोर लोकांच्या काही सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत ते पाहू.

Pros सकारात्मक बाजू:

ह्या व्यक्ती क्रिटिकल म्हणजेच संवेदनशील असतात यामुळे हे कोणाची खोटी तारीफ करत नाहीत, समाजामध्ये आपली ओळख, आपली पत, किंमत कशी वाढवायची हे यांना माहिती असते.

या लोकांना बोलण्यात पटाईत निःपुनता असते, हजर जबाबी सतात, पार्टी मध्ये व समारंभात लोकांचं लक्ष वेधून कसं घ्यायचं, center of focus लोकांच्या नजरेत कसे यायचे , यांना हे बरोब्बर माहीत असते.

अशी अधिकांश लोकं सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असतात, हे खूपच creative असतात, creativity यांच्यात ठासून भरलेली असते आणि इथूनच त्यांच्यामध्ये बंडखोरी चा तोरा येतो.

यांना लोकांशी काहीही देणंघेणं नसतं, सबसे बडा रोग, क्या काहेंगे लोग*@%# हा रोग यांना होत नाही, लोग क्या कहेंगे ही म्हण लागू होत नाही.

बंडखोर प्रुवृत्ती च्या लोकांना लोकं काय म्हणतील याचं काही फरक पडत नाही. याचा अर्थ असा नाही की हे त्यांच्या कामाला वरवर घेतात असं नाही तर या लोकांना त्यांचं काम अतिशय प्रिय असते,आपल्या कामावर ही लोकं खूप प्रेम करतात. आणि आपल्या कामात खूपच जास्त व्यावसायिक proffessional असतात.
बंडखोर लोकांच्या नकारात्मक बाजू बघू.

Cons: नकारात्मक बाजू

यांना कोणाच्याही हाताखाली काम करणं पसंत नसतं, बंडखोर प्रवृत्ती च्या लोकांना इतरांसाठी काम करू वाटत नाही.

हे स्वतःला स्वतःचा बॉस समजतात यामुळे कित्येक जणांसाठी ही चिंतेची बाब बनून जाते,
बंडखोर प्रवृत्तीची लोकं कित्येकदा frustrate हताश होत असतात.

यांना कोणत्याही system नुसार काम करू वाटत नाही परंतू system तर यांच्याप्रमाणे चालू शकत नाही
जॉबमध्ये तर ही लोकं बिलकुल फिट बसत नाहीत कारण यांच्या बॉस ला या प्रवृत्तीच्या लोकांना हाताळणे खूपच कठीण जातं.

एका ओळीत सांगायचे झाल्यास,

🤷My life my Rules my style
-The सिग्मा personality

तुमचा मित्रमंडळीत एखादा बंडखोर प्रवृत्तीचा दोस्त असेल तर त्याच्याशी संबंधित हा लेख शेअर आवश्य करा.

समारोप करतांना परत एक नजर फिरवली तर लक्षात येईल की,
मानवाच्या चार प्रवृत्ती आहेत

#1. अपहोल्डर्स
जे कोणताही प्रश्न न करता नियम निर्देश यावर चालत असतात.

#2. Queationers प्रश्नकर्ता
हे प्रत्येक गोष्टींत प्रश्न उपस्थित करतात जी एक चांगली गोष्ट आहे पण जेव्हा कोणी यांना प्रश्न विचारतो तेंव्हा यांना वाईट वाटते.

#3. तिसरं आहे ओब्लिजर्स
हे दुसऱ्यांसाठी जगतात,स्वतःची काळजी घेत नसतात.

#4. रेबेल्स बंडखोर वृत्ती
यांना नियमावर चालणे आवडत नसते, कोणाचेही आदेश मानणं यांना आवडत नाही.


💡 लक्षात ठेवा:
ह्या सर्व व्यक्तींमधील वाईट गोष्टी नाहीत तर ते खोलवर रुजलेल्या मूळ प्रवृत्ती, हार्ड वायर्ड tendencies आहेत.

या सर्वांंच्या सकारात्मक आणि नकारात्मक आशा दोन्ही बाजू असतात. म्हणून भलेही तुम्ही वरील कोणत्याही प्रवृत्ती चे का असेना, ह्या सर्व वाईट गोष्टी आहेत म्हणून निराश होऊ नका.
 
 
 

#Bookshorts 
📚📙📘📗📕📖

#Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी
#आधुनिक संभाषण कौशल्य
#backtobasics  #Bodylanguage #advance #soft #peopleskills
 
 
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 

| #बुकशॉर्ट्स 📚

| ☯️ ई-वाचनालय

| 🌐 www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive