पाच प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही मैत्री केल्याने तुमच्या आयुष्यात सुधारणा होईल 📚 Bookshorts #५४


अशा पाच प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही मैत्री करायला पाहिजे
(फाईव्ह टाइप्स ऑफ पीपल यू शुड बीकम फ्रेंड्स विथ)

अशा पाच प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही मैत्री करायला पाहिजे आणि संगती-सोबती केल्यास म्हणजेच फ्रेंडशिप केल्यास, उठबस केल्यास त्यांच्या सहवासामुळे तुमच्या आयुष्यात सुधारणा नक्कीच होईल.


👬👫🕴️
पाच प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्या सोबत तुम्ही मैत्री करायला पाहिजे 

चला तर मग पाहूया त्या पाच व्यक्ती कोण आहेत:

#१.क्रमांक एक 
आरशा सारखा किंवा पाण्यासारखा मित्र
(Mirror Friend मिरर फ्रेंड)

एक असा मित्र जो तुम्हाला नेहमीच आरशासारखी वस्तुस्थिती सद्य व सत्य परिस्थिती, वास्तव दाखवेल मग भलेही ते सत्य कितीही कटू आणि त्रासदायक (ब्रूटल अँड हार्श) का असेना.

असा मित्र जो तुम्हाला गोड गोड बोलून तुम्हाला शुगर कोटेड गोष्टी बोलत असेल, साखरेचे पाणी चढवत असेल, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असेल अशा गोडबोले मित्रापेक्षा कडू कारल्या सारखा खरं बोलून तुमची मदत करेल.

ज्या गोष्टी तुम्हाला ऐकू वाटत नाहीत परंतु तुमच्या सुधारणेसाठी त्या ऐकणे खूप गरजेचं असते असा मित्र व्यक्ती नक्कीच सोबत असावा.

💡कटू सत्य सांगणारा औषधासारखा कटू परंतु महत्त्वाचा गरजेचा गुणाचा मित्र.


#२.क्रमांक दोन 
विचार करू घालणारा मित्र
(Mind Opener Friend माइंड ओपनर)

डोक्याचे दरवाजे खाड करून उघडणारा एक मित्र एक असा मित्र जो तुमचे मन खुले करण्यास तुमची मदत करेल तुम्हाला नेहमीच नवीन कल्पना, संस्कृती, पद्धती न्यू-आयडिया💡 (कल्चर्स, ऍक्टिव्हिटीज, फिलॉसऑफिस) ची ओळख करून देत असतो,  जेणेकरून तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन म्हणजेच "सुखकोशातून" (मधुकोशातून) बाहेर पडू शकाल आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून जगू शकाल अशा मित्राशी अशा लोकांशी व्यक्तीशी तुम्ही मैत्री केली पाहिजे.

💡 लक्षात ठेवा:
🤔 A Book is like a Friend but a good friend is like a Library. 

#krishna #Sarathi 

#३. क्रमांक तीन 
मैत्रीपूर्ण स्पर्धक मित्र
(Friendly Competitor फ्रेंडली कंपिटिटर)
एक असा मित्र जो तुमच्या सोबत स्पर्धा, कॉम्पिटिशन करू शकेल म्हणजेच हसत खेळत खेळाडू वातावरणात खेळाडू वृत्तीने स्पर्धा करेल.

👉कोण जिंकेल पाहूया 
👉कोण मार्क जास्त घेईल पाहूया 
👉कोण जास्त कमाई करेल पाहूया 

परंतु हे सर्व मैत्रीपूर्ण वातावरणात, स्पर्धेमध्ये परंतु मैत्रीपूर्ण एक असा मित्र जो तुमच्या सोबत फ्रेंडली कॉम्पिटिशन करू शकेल.

यावर खूप संशोधन, अभ्यास करण्यात आलेला आहे की जेव्हा माणसासमोर एखादी स्पर्धा किंवा अडचण (rival) येते तेव्हा तो त्याच्या त्या गुणांना वर आणतो, त्या छुप्या गोष्टींना वर आणतो, त्या सुप्त गोष्टींना वर आणतो, (🔓 unlock hidden potential) ज्याबद्दल त्याने कधीही कल्पना देखील केली नव्हती की,

😮अरे या गोष्टी माझ्यामध्ये होत्या, 
🤔मी हे केलं, 
💁मी हे करू शकतो.


#४.क्रमांक चार 
अनुभवी वयस्कर मित्र
(Senior Friend as Experience सीनियर फ्रेंड एज एक्सपिरीयन्स)

आता मित्र म्हटल्यावर नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये हे आलं असेल की मित्र म्हणजे सवंगडी म्हणजे आपल्या वयाचा मित्र परंतु असं नसतं.

आपल्याला सोबत घेऊन जाणारा, आपल्याला एखादी गोष्ट शिकवणारा, समजावून सांगणारा, ज्याच्याकडून आपण काही शिकलो असा.वयाने लहान असो वा मोठा  तो मित्र नेहमीच आपल्यासाठी चांगला आहे.

एक असा मित्र जो तुमच्यापेक्षा वयाने काही वर्षाने मोठा आहे अनुभवाने मोठा असेल किंवा तुमच्यापेक्षा त्या क्षेत्रात पुढे आहे, वरिष्ठ आहे ज्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तो वरिष्ठ आहे तुमच्या वयानेही, अनुभवानेही अशा मित्रापासून तुम्हाला खूप काही शिकायला मिळत असते आणि तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाहून, अनुभवाने स्वतःला वेळीच थांबू शकता त्यांच्या चुकांची पुनरावृत्ती, रिपीटेशन टाळू शकता ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल तुमची प्रगती आणखीन वेगाने होईल.


#५.क्रमांक पाच 
मदतगार मित्र 
(Helpful Friend हेल्पफुल फ्रेंड)

एक असा मित्र ज्याने तुम्हाला भूतकाळात खूप मदत केली असेल जेव्हा तुम्हाला अत्यंत गरज होती आणि तुम्ही अशा व्यक्तीवर ट्रस्ट अँड रिलाय करू शकता, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकता, अवलंबून राहू शकता असा मित्र.

जीवनात तुम्ही एकटे खूप काही करू शकता परंतु तुम्हाला जर अशा विश्वासू, ट्रस्ट वर्दी व्यक्ती भेटला तर आयुष्यात नक्कीच गोष्टी सहज सोप्या होत असतात.
 
💡 लक्षात ठेवा:

👬 मित्र वनव्या मधे असा गारव्यासारखा..!
 
💁A friend in need is a friend indeed.


आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
| #बुकशॉर्ट्स 📚

| ☯️ ई-वाचनालय

| 🌐 www.evachnalay.in 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive