सौंदर्याचं देणं | Survival of the Prettiest by Nancy Etcoff | 📚 Booksummary Marathi


सौंदर्य माजाने ठरविलेले परिमान आहे की यामागे खरोखरच शास्त्रीय विज्ञान आहे? बाह्य सौंदर्य म्हणजे केवळ मृगजळ आहे काय? सुंदरतेकडे आपण का ओढले जातो? आकर्षक व्यक्तींकडे अशा कोणत्या गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षीले जातो? आपण जर स्वतःला सौंदर्यापासून वंचित ठेवलं तर काय होईल? खरे सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते का?
ला तर मग पाहूया..सौंदर्याचं विज्ञान 

 

SURVIVAL OF THE PRETTIEST
Science of Beauty

 

 सौंदर्याचे देणं - सुंदरतेचे विज्ञान

सायन्स ऑफ ब्युटी


 
सौंदर्याचं देणं | Survival of the Prettiest by Nancy Etcoff  | 📚 Booksummary Marathi 

 

सिनेस्टार, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, दिया मिर्झा, माधुरी दीक्षित, रवीना टंडन, केट-विन्स्लेट, जेम्स बॉण्ड मधील हिरो किंवा त्यातील ललना ईव्हा, माजी आरबीआय गव्हर्नर असलेले असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांचं देखणं रूप, मोजून-मापून बनविल्यासारखे अवयव, आखिव-रेखीव शरिरयष्टी, उठावदार केशरचना, रुबाबदार व्यक्तीमत्व असलेली छबी नक्कीच तुमच्या डोक्यात आताही येत असेल आपला मेंदू नक्कीच अशा गोष्टींना लक्षात ठेवत असतो.   

व्यक्तीमत्वाला साजेसा चेहरा, आवाज, रंग, केशरचना त्यात भर घालणारे आणि एकमेकांस पूरक असे एक ना अनेक अंग विशेषणं, गुण त्यांच्या सौंदर्याला खुविण्यास-फुलविण्यास हातभारच लावत असतात असे दिसते. त्यामुळे त्यांचे सौंदर्य भारदस्त, लक्षवेधक आणि आकर्षक बनतं.

 

जगामध्ये केवळ 2 टक्केच लोकांना निसर्गदत्त सौंदर्याचं असं वरदान लाभलेलं आहे. ज्यांच्याकडे केवळ पाहतच राहावे असे वाटत असते, सौंदर्यामुळे मंत्रमुग्ध होवून नजरच हटत नसते. आपण स्वत:हून त्यांच्याकडे आकर्षित होत असतो.  हिच तर जादू असते सुंदर गोष्टींची.

 

 ही पुस्तक का वाचावी


आपण आजही कितीही सुशिक्षित पुरोगामी, समानता आणि जैविकदृष्ट्या पुढारलेले जरी असलो तरी आजही आपण नैसर्गिक सौंदर्याकडे आकर्षिले जात असतो, सुंदर गोष्टींना पाहण्याचा, सुंदर गोष्टींना करण्याचा आग्रह, आसक्तपणा आजही मूलभूतरित्या आपल्यामध्ये रुलेला आहे .

अभ्यासात असे आढळून आले आहे की लहान बाळंसुद्धा सुंदर लोकांकडे आकर्षिले जातात, सुंदर चेहरापट्टी असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देतात आणि लग्नाचा जर विचार केला तर विवाहामध्ये सामाजिक बंधनामध्ये अडकताना जैविकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींना 40% टक्के महत्त्व दिलं जातं तर सौंदर्याला 60% महत्त्व आजही दिल्या जात असते.  तर असे का होते?

 

  • सौंदर्य माजाने ठरविलेले परिमान आहे की यामागे खरोखरच शास्त्रीय विज्ञान आहे?
  • बाह्य सौंदर्य म्हणजे केवळ मृगजळ आहे काय?
  • सुंदरतेकडे आपण का ओढले जातो?
  • आकर्षक व्यक्तींकडे अशा कोणत्या गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षीले जातो?
  • आपण जर स्वतःला सौंदर्यापासून वंचित ठेवलं तर काय होईल?
  • सौंदर्य प्रसाधने यांची विक्रमी विक्री का होत असते?
  • खरे सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते का?
  • ला तर मग पाहूया सौंदर्याचं विज्ञान Survival of the prettiest -Science of Beauty

 

 जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष राहिलेले फ्रँकलिन रुजवेल्ट यांच्या पत्नी इलेनो यांना असे विचारण्यात आले की त्यांना जीवनात काही दुःख, पश्चाताप आहे का? तेव्हा त्यांचे उत्तर असे होते,

 “मी जर सुंदर असते तर चांगले झाले असते.”

 यशस्वी, सिद्ध असलेल्या, जीवनात बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या, आदरणीय, जगातील सर्वात एका यशस्वी, आदरणीय आणि जीवनात सर्व काही मिळवलेल्या प्रशासकीय महिलेकडून आलेले हे वाक्य विशेषता इतिहासात सर्वोच्च-सर्वश्रेष्ठ पद भूषवलेल्या सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षाच्या पत्नीच्या तोंडून आलेले हे वाक्य होते.

 

दुःखद, दुर्दैवी परंतु सत्य आहे की, आजही लोकांना सुंदरतेचे खुळ आहे. का? कारण आपण जैविक-दृष्ट्या खोलवर या सुंदरतेच्या द्वंद्वात फसलेलो आहोत. की काय सुंदरता आहे आणि ती मिळविण्याच्या तीव्र इच्छेने त्या द्वंद्वात जैविक दृष्ट्याच आपला ओढा-कल असतो. सुंदरतेचे आकर्षण प्रकर्षाने जाणवते, सुंदरतेकडे आपण आपसूकच ढले जात असतो. (प्रवृत्त होतो.)

 

तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की लोकं-जग याच्यापलीकडे निघालेले आहे. आज 21 व्या शतकात लोकं या जैविक द्वंद्वापलीकडे विचार करत असतील परंतु इथेच तर खरी गोम आहे. जरी आपण आज सर्व गोष्टींनी समृद्ध, सोयी-सुविधेने युक्त अशा जगात वावरत असलो आणि अशा गोंधळातून मुक्त होत आहोत असे वाटत असले तरी आपल्याला सुंदरतेचे आकर्षण आहे, सुंदरतेचे वावडे आहे. सौंदर्याचा प्रभाव आहेच.

 

लहानापासूनच आपण त्या गोष्टीला डोळेझाक करीत असलो तरी त्याची तीव्रता अधिकच होत आलेली आहे. कोणीतरी म्हटलेलं आहे की सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते, दृष्टी तशी सृष्टी, ब्युटी लाइज इन द होल्डर, बट हु इज द होल्डिंग, परंतु कोण पाहत आहे बघत कोण आहे. निरीक्षण-अभ्यासांती असे आढळलेलं आहे की लहान बाळ-मुलंसुद्धा आकर्षक सुंदर लोकांना प्रथम पसंती देत असतात.

(सविस्तर सारांश इथून वाचा)

 

या पुस्तकाचे सारांश आपण दोन भागांमध्ये विभागले आहेत चला मग सुरु करूया पहिल्या भागामध्ये  पुस्तकाचं नाव आहे Survival of the Prettiest चार्ल्स डार्विन यांनी सांगितले होते Survival of the Fittest -सर्व्हाइवल ऑफ द फिटेस्ट त्यावर आधारितच या पुस्तकाचं नाव ठेवण्यात आलेला आहे सर्व्हाइवल ऑफ द प्रीटीएस-द सायन्स ऑफ ब्युटी सौंदर्याचे विज्ञान लेखिका आहेत फॅन्सी एटकोफ.

 


#सौंदर्य म्हणजेच सुंदरता ओळखण्याची कुवत आपल्यामध्ये मूलभूतरित्या आहे  

We recognize beauty instinctively

जर तुम्हाला कोणी विचारलं की सौंदर्याची व्याख्या काय तर तुम्ही सांगाल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर बे-वॉच या टीव्ही मालिकेचे निर्माता असलेले एरोंस स्पेलिंग यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांचे उत्तर असे होते, त्यांनी म्हटले

I can’t define it but I know when it walks into the room..!”
मी सांगू शकत नाही परंतु जेव्हा ती माझ्या खोलीत येते तेव्हा मला ते कळते.!”

 

कारण आपल्या जन्मजात गुणवैशिष्ट्यामुळेच बहुदा असे होत असेल. सुंदरतेला ओळखणे हे सामर्थ्य कदाचित आपल्यामध्ये जन्मानेच असल्यामुळे असे होत असेल. मानसशास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात Judith Langlis या युक्तिवादाचा समर्थन करतात शेकडो लोकांच्या चेहऱ्याचे स्लाइड्स- फोटो एकत्रित करून अभ्यासत भाग घेतलेल्या लोकांना त्यातील त्या फोटोतील आकर्षकपणाला गुण देण्यात सांगितले. आकर्षक कोण आहे हे विचारण्यात आले.

 

 

मग त्या फोटोंना लहान मुलांना लहान बाळांना दाखविले ज्यांचे वय तीन ते सहा महिन्यांचे होते आणि लहान बाळंसुद्धा त्याच फोटोंना पाहत होती, चेहऱ्यांना पाहत होती लक्षणीयरीत्या अधिकांश वेळा त्याच चेहऱ्यांना स्वेच्छेने पाहत होती जी प्रौढ लोकांना आकर्षक सुंदर वाटली होती. लहान बाळ, स्त्री-पुरुष, आफ्रिकन-अमेरिकन मूळ आशियन अमेरिकन अमेरिका अस्तित यासारख्या दिसणाऱ्या फोटो प्रतिमांकडेच आकर्षित होत नव्हती तर त्यांच्या पालकांना दिसण्यावरूनच त्यांच्या सौंदर्याची व्याख्या कल्पना मुलांनी त्यांच्या निश्चित केली होती त्यांनी निश्चित केली होती.  घेतली होती याची दाट शक्यता आहे.

 

र ते शेवटी शोध अभ्यास असे सुचवतात की संशोधन असे सांगते की आपण सुंदरतेला प्राथमिकता देणं आणि शोध घेणे ओळखणे हे जन्मानेच घेऊन आलेले आहोत. सौंदर्याची पारख करणे आणि सौंदर्याला प्राथमिकता देणे हे गुण आपल्यामध्येच जन्मजातच आलेले आहेत म्हणूनच आपण सौंदर्याकडे आपसूकच आकर्षित होतो नकळत ओढले जात असतो. बऱ्याचदा सौंदर्याच्या काही विशेष गुणांमुळे सुंदर गोष्टींना अधिक मोहक आकर्षक बनवत असतात त्यासोबतच भौतिक प्रभाव देखील बघणाऱ्यावर होत असतो.

 उदाहरणार्थ ऑक्सफोर्ड इंग्लिश शब्दकोश सौंदर्याची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात:

रूप-शोभा आणणे, वाढवणे, मोहकता, भुरळ, रंग-रूप आणि इतर गुणवैशिष्ट्ये ज्यामुळे डोळ्यांना आनंददायक, आल्हाददायक वाटणे, सुचविणे आणि पुढे आपसूकच आनंद आश्चर्याने प्रशंसा करणे.

 

सौंदर्य: रंग, रूप, प्रभाव, सुखद आणि इतर गुणांनी आनंदाश्चर्य, प्रशंसनीय पात्र असलेले, यासोबतच काही प्रासंगिक शब्दही आपण सौंदर्याच्या बाबतीत वापरत असतो.

 

जसे-शारीरिक बहुतेक सहज प्रतिक्रिया जसे–  

 

मस्त, भव्य, दिव्य,क्केदार, जबरदस्त, आकर्षक, आश्चर्यकारक, बॉम्ब गोळा

hat drop, dead gorgeous, breath-taking, Stunner or bombshell

 

शब्दकोशाची व्याख्या जरी शोभिवंत आणि रूपवंत ड्रेसेस फॉर्म अशी असेल तरी सर्वजण एक गोष्ट मान्य करतात की सौंदर्य लक्ष वेधून घेते आणि चित्त एका जागी धरून ठेवते. तर इथे लेखक असे सुचवतात की सौंदर्य आपण जेव्हा पाहतो तेव्हाच आपल्याला सौंदर्य माहीत होते किंवा आपल्याला जाणिव होते.

beauty grabs and holds the attention.

 

#अस्तित्वासाठी सौंदर्य
beauty for survival

मानव खूप सारे पूर्वग्रह घेऊन येतो उदाहरणार्थ आपल्याला गोड पदार्थ खूप आवडतात आपण लगेच खायला येतो कारण ते पदार्थ आपल्याला ऊर्जा-शक्ती देत असतात. आपण लगेच खायला लागतो जे आपल्याला अस्तित्वासाठी खूप महत्त्वाचं, आवश्यक आहे आणि सौंदर्य सोबतही असंच आहेआपल्या प्रजातीला जिवंत ठेवण्यासाठी म्हणजेच मानवाच्या उन्नतीसाठी

 तुम्ही एखाद्या एका महिन्याच्या नवजात बालकाला पाहता तेव्हा तुमची नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते जेव्हा तुम्ही एखाद्या एका महिन्याच्या सुंदर मुलांना बालकांना पाहून आपली नैसर्गिक प्रतिक्रिया देणे ही अंगभूत व निर्णायक आहे त्यांची महत्त्वाच्या आणि केस मोठे डोळे लहान ना आणि गुबगुबीत गाल नाजूक कोमलतेला प्रेरित करतात, सुरक्षेची भावना आपल्यामध्ये जागवतात कारण आपण उत्क्रांत-विकसित झालेले आहोत. ही चिन्ह, लक्षणे ओळखण्यासाठीच पणा आणि असुरक्षितता गुणवैशिष्ट्ये यांना या भावना संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये अस्तित्वात आहेत.

 

अनुवंश शास्त्रज्ञ जेन गुडा यांनी असा शोध लावला की लहान चिंपांजी तोपर्यंत सुरक्षित असतात जोपर्यंत त्यांच्या शेपटीवर सुंदर पांढरी झुकेदार केसांची रचना असते. “पोनीटेल असते तोपर्यंत. त्यांनी असं सुचवलं की ही गुणवैशिष्ट्ये जैविक दृष्ट्या चिंपांजींच्या लहान पिलांना हानी न पोचवण्यासाठी प्रौढ चिंपांजींसाठी ही केस रचना म्हणजे संकेत असतात.

 


परंतु सुंदरता केवळ बाळांची सुरक्षा करत नाही तर प्रौढ व्यक्तींना त्यांच्या जीवनासाठी उच्च गुणवत्ता असलेला जीवनसाथी किंवा जोडीदार शोधण्यास मदतही करत असतात.  परंतु एका प्राणी जगताचेच जर आपण उदाहरण बघितलं तर लक्षात येईल की, मोरांकडे सुंदर विविध रंगी, बहुरंगी डोळ्यांसारखी रचना-आकृती-नक्षी असलेले पंख असतात आणि ज्या नर मोर पक्षाकडे पंखावर जितके अधिक डोळ्यांसारखी रचना असलेले पंख असतात त्यांच्या सोबत संबंध बनविण्यात कमी डोळे असलेल्या मोर पक्षांपेक्षा तुलनेत जास्त यशस्वी होतात.

 

परंतु मादी मोर पक्षी अधिक सुंदर आकर्षक मोरांकडेच का आकर्षित होतात, का प्राथमिकता देतात? संशोधन असं दाखवते, की नर मोर पक्षांकडे जितके विस्तृत शोभिवंत अलंकार असतात त्यांच्या मध्ये दाट शक्यता असते की ते बळकट जणूके दुसऱ्या पिढीसाठी पुढे नेऊ शकतात.

 

मानवाच्या बाजूचा विचार केल्यास आपल्यालाही अभ्यासामध्ये असं वर्तन बघायला मिळतं की, शाळेनंतर मुलींच्या लग्नाचा दरही हेच दर्शवितो की कमी सुंदर मुलींच्या तुलनेत सुंदर मुलींना दहापट अधिक पसंती दिली जाते आणि जास्त उत्पन्न-कमाई व शिक्षण असणाऱ्या पुरुषांसोबत लग्न करण्याचा त्यांचा सुंदर मुलींचा कल अधिक असतो. परंतु असे कोणते गुण असतात ज्यांच्यामुळे आपण सुंदर व्यक्तीकडे ओढल्या जातो. चला शोधूया.

 

#सौंदर्याची उत्क्रांती सुंदरतेची उत्क्रांती
evolution of beauty

तर असं काय आहे ज्यामुळे आपण सौंदर्याकडे आकर्षिले जात असतो? आपली नेमकी काय प्रतिक्रिया असते जेव्हा आपण सौंदर्याकडे आकर्षिली जात असतो? सुंदर गोष्ट, व्यक्ती, बाळ जेव्हा आढळते तेव्हा आपली नेमकी काय प्रतिक्रिया असते? शेवटी काही झाले तरी माणसाकडे मोर पक्षांसारखी रंगीतपंखांचा झुका नाही..! चला तर मग पाहूया सौंदर्याचा शास्त्रोक्त अभ्यास काय दाखवतो ते पाहूया परंतु पुढच्या भागात तोपर्यंत वाचत रहा

👉भाग दोन

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive