असे सात गुण ज्यांना लोकं खूप आदर करतात | 7-Qualities that are highly Respected | 📚 Bookshorts #३७

असे सात गुण ज्यांची लोकं खूप आदर करत असतात

Seven qualities that people highly respect

📚 Bookshorts #३७


अशा सात गोष्टी ज्या लोकामध्ये खूपच आदरार्थी असतात त्या आपण पाहणार आहोत:

 

#१. कळवळा असणाऱ्या व्यक्ती:
Humbleness personality

अशा व्यक्ती ज्यांनी आपल्या जीवनात खूप काही मिळवलेलं आहे तरीही ते आपल्या इगोला-अहंकाराला डोक्यात चढू देत नाहीत कारण ते जाणून असतात की सरते शेवटी ते सुद्धा इतर लोकांसारखे एक माणूसच आहेत अशा व्यक्ती खूपच आदरणीय असतात.

 

#२. सबबी/कारण/टाळणे: Excuses

अधिकांश व्यक्ती आपल्या चुका मान्य करत नाहीत आणि सबबी/कारण पुढे करत असतात आणि जेव्हा एखादा असा माणूस येतो जो कोणताही कारण न देता स्वतःच्या चुका स्वीकार करतो तुम्ही अशा व्यक्तींची रिस्पेक्ट करता.

 

#३. दयाळूपणा: Kindness

अशी लोकं जे इतर लोकांसोबत दयाळूपणाने आणि नम्रपणे वागतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता समोरील व्यक्तीचा सन्मान करतात दयाळूपणाने आणि आदराने वागतात अशा लोकांची रिस्पेक्ट केली जाते.

 

#४. उत्तम ऐकणारे: Good Listener

अधिकांश लोकं त्यांना काहीतरी बोलण्यासाठीच बोलत असतात पुढच्या व्यक्तीचं बोलणं लक्षपूर्वक न ऐकताच ते बडबड बोलत असतात, आपलंच म्हणणं रेटत असतात, पुढे-पुढे करत असतात त्यांना लोकं टाळत असतात, एक उत्तम श्रोता, असा व्यक्ती जो तुमचं बोलणं काहीही बोलण्याची घाई न करता संयमाने, मन लावून ऐकत असेल, तेव्हा तुम्ही त्यांचा आदर करत असता.

 

#६.  बोलणं कमी कृती जास्त करा: Speak Less Act more

“जो गरजते हैं वो बरसते नही” किंवा “बात कम काम ज्यादा” अशा म्हणी तुम्ही नक्कीच ऐकून असाल, तुम्हाला तुमच्या ध्येय-गोल्स आणि महत्वाकांक्षा-अंबिशन्सबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या कृतीवर लक्ष द्यायला पाहिजे.

कारण अशा व्यक्तींची कोणीही आदर करत नाही जो वारंवार आपल्या गोल्स-ध्येयांना अनाउन्स करत राहतो, बोलतच राहतो, परंतु त्यावर काहीच ॲक्शन-कृती करत नाही असा ॲक्शन घ्यायला मात्र टाळाटाळ करणारा व्यक्ती असतो.  थोडक्यात सांगायचं असेल तर जसं आम्ही नेहमी म्हणतो आरंभ-शूर असतो, बोल घेवडेपणा असतो परंतु कृती शून्य व्यक्ती असतो.

 

As Brian Tracy always says: if you want to change your life,
Take Action, Take Action and Take Action Now...!


जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर,
कृती करा
, कृती करा आणि कृती करा आजच.


#हेही वाचा: सर्वात कठीण काम सर्वात आधीकरा- ब्रायन ट्रेसी

 

#६. विश्वासू व्यक्ती: Trust worthy person

तुम्हाला असा व्यक्ती बनायचं आहे जे नेहमी दिलेलं शब्द पळत असतो, कातीबाद्धता (commitment) कमिटमेंट्स पूर्ण करत असतो, ज्या व्यक्तीवर लोक अवलंबून राहू शकतील, विश्वास करू शकतील (depend & rely) कारण अशा व्यक्तीचा कोणीही आदर करत नाही जो विश्वास करण्यास पात्र नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो विश्वास, आदर, सन्मान आणि नेतृत्व ह्या अशा काही गोष्टी आहेत जे प्राप्त कराव्या लागतात, मेहनतीने, श्रमावर, ज्ञानावर, प्रामाणिकपणा याद्वारे मिळवावे लागतात.

 

#७. मदतगार:  Helpful

असा व्यक्ती जो दुसऱ्या लोकांना त्यांच्या खराब काळात किंवा त्यांच्या वाईट वेळेत त्यांची मदत करतो विशेषत: त्या लोकांची मदत ज्यांच्या मोबदल्यात परताव्यात म्हणून त्यांना काहीही मिळत नाही अशा व्यक्तींची तुम्ही रिस्पेक्ट करता.

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निष्फळ मदत करणारा व्यक्ती नेहमीच आदरणीय ठरतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive