तुमचा जोखिम निर्देशांक, जोखिम क्षमता ओळखा | Know your RISK CAPACITY | RISK-O-METER

"इश्क है तो रिस्क है” हा डायलॉग मागील कोरोना काळापासून खूप प्रसिद्ध झालेला आहे. स्वतःची जोखीम क्षमता न बघताच थेट गुंतवणूक करणे अति-जोखीमेचे असते.  ते एक प्रकारे सट्टा, जुवाच ठरतो.

जोखिम क्षमता ओळखा
RISK-O-METER

  

तुमचा जोखिम निर्देशांक काय सांगतो त्याप्रमाणे आर्थिक निर्णय घेतल्यास गुंतवणूक बुडणार नाही.!

#RISKOMETER: 

जसे प्रत्येकाची भूक, चव, आवड, खाण्याची पद्धत  वेगवेगळी असते, तशीच आपली धोका पत्करण्याची/पचवण्याची क्षमता/भूक देखल वेगवेगळी असते.  गुंतवणुकीसाठी आर्थिक प्रश्नावली सोडवा आणि आपली रिस्क घेण्याची क्षमता तपासा इथून आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

 

“#इश्क है तो रिस्क है” हा डायलॉग मागील कोरोना काळापासून खूप प्रसिद्ध झालेला आहे. कारणही तसेच होते, शेअर मार्केटमध्ये झालेला 1992 काळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता याच्या जीवनावर आलेली वेब सिरीज चांगलीच गाजली.

जगात सर्वांत जास्त साक्षर-युवा असलेल्या भारतात नुकतेच स्वस्त-सोयीस्कर स्मार्टफोन आणि मुकेश अंबानीच्या व्यावसायिक कृपेमुळे मोफत जिओ-3G-4G वेगवान इंटरनेट आलेले होते, त्यावर अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी व्यवसाय सुरु केले त्यात डिजिटल अप्प, सोबतीला काहीही, कधीही, कुठेही खरेदी-विक्री करणे शक्य झाले त्या ई-कॉमर्स कंपन्या, करोडो लोकांच्या हातात मोबाईल आणि मोफतचे फोर-जी जिओ इंटरनेट, इंटरनेट मुळे माहितीचा प्रचंड विस्फोट झाला, दररोज माहिती आंतरजालावर  वाढतच असताना फोर-जी जिओमुळे इंटरनेट वेगवान-झाले,

सोबतीला शासनाच्या आधाराने तंत्रज्ञानाच्या मदतीने आधार-जन-धन खाती सुरु झाल्यामुळे बँका लोकांच्या बोटावर आल्या, शेअर मार्केट साठी मध्यस्त अप्प्स आल्या.

लोकांकडे कोरोनासारखी अनिश्चित LOKDOWN परिस्थिती, भरपूर वेळ, मोफत माहिती, अल्प दारात मनोरंजन, स्वस्त साधने तयार असल्याने याचा पुरेपूर आणि मनसोक्त वापर, उपयोग केला त्यात ““#इश्क है तो रिस्क है” सारखी वेब सिरीज पाहून लोकांच्या मनात लालसा जागी झाली, परिणामी youtube, WHATSAPP  चे मोडके-तोडके ज्ञान, सोबतीला शेअर मार्केट अप्स, पेटीएम, फोनेपे, आणि ACCOUNT वर असलेला पैसा लोकांना शांत-स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून लोकांनी थेट घरबसल्या अनियोजित खर्च आणि गुंतवणूक करायला सुरुवात केली. कोरोनोत्तर काळात बाजारात हालचाल वाढली, पैशाचा ओघ कधी नव्हे इतका प्रचंड वाढला. बँकांची कामेही FINANCE, PAYMENTS टेकअप्स मुळे प्रचंड वाढली.

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेल्या कंपन्या
Foodtech, Fintech, Edtech, Medtechi
पारंपारिक उद्योग-व्यवसाय यांचे आधुनिक लघुरूप: स्टार्टअप

 

२०२०-२०२४ वाढला तसा ओसरला, लोकांचा आणीबाणीसाठीचा, आपत्कालीन साठवलेला, बचतीचा पैसा खुल्या बाजारात लावला गेला. काही “२१ दिन मे पैसा डबल” करून करोडपती झाले तर काही सपाटून तोंडघशी पडले, काही तरले, काही वारले. आधुनिक जगासाठी नव्या पिढीचे क्रीपटो नावाचे आभासी चलनही झलक दाखवून गेले. त्यातही बरेच लोकं बुडाले.

लोकांनी त्यावरून गुंतवणूक, बँक, लोन, शेअर मार्केट, याविषयी ध्येयरहित अनियोजित, अनियंत्रित, जोखीम घेणे सुरु केले.  परंतु स्वतःची जोखीम क्षमता न बघताच थेट गुंतवणूक करणे अति जोखीमेचे असते.  ते एक प्रकारे सट्टा, जुवाच ठरतो.

इतके सर्व सांगण्याचे कारण लोकांकडे पैसा होता तो मेहनतीचा, महत्वाचा, गरजेचा आणि बचतीचा लोकांनी तो महत्वाच्या, गरजेच्या गोष्टीसाठी न वापरता शेअर मार्केट मध्ये लावला आणि बुडवला.  आता २०२४-२५ ची अशी अवस्था झालेली आहे कि भारतातील लोकांकडे बचत आतापर्यंच्या नीचांकीवर आहे असे आरबीआय (RBI) #भारतीय रिजर्व बँकेने म्हटले आहे.

कोरोनाकाळात अनिश्चित परिस्थिती होती म्हणा संपूर्ण जगात उद्या आपण राहू न राहू, जगू किंवा नाही याची काहीही शाश्वती नसल्याने लोकं अशी वागली असतील. 

 

परंतु आणखीन वेळ गेलेली नाही, योग्य नियोजन करून, आपली ध्येय-उद्दिष्टे स्पष्ट ठेवून, जोखीम क्षमता जाणून घेऊन गुंतवणुकीसाठी आपले उत्पन्न, आपले वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अपेक्षित परतावा, अशा एक ना अनेक गोष्टी आपल्या गुंतवणुकीवर परिणाम करत असतात.

त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलोय आपला आर्थिक जोखीम क्षमता समजून घेण्यासाठी प्रश्नावली.  यालाच रिस्क RISK APPETITE म्हणजेच जोखीम घेण्याची भूक, RISK CAPACITY रिस्क कॅप्यसिती, रिस्क CAPABILITY

RISK-O-METER
RISK APPETITE
RISK CAPACITY
RISK CAPABILITY


👇तुमचा जोखिम निर्देशांक, जोखिम क्षमता ओळखा 👇

👉तुमच्‍या स्‍वतःविषयी आर्थिक माहिती

1. पैसा म्‍हणजे तुमच्‍यासाठी 

  • अ. यश आणि काहीतरी मिळवले याची खूण 
  • ब.  रोजच्‍या खर्चाकरिता एक आवश्‍यक गोष्‍ट 

2.  तुमचे वय 

  • अ. 30 वर्षापेक्षा कमी 
  • ब.  31 ते 45 वर्षे 
  • क.  45 ते 60 वर्षे 
  • ड.  61 पेक्षा जास्‍त 

3.  तुमचे चालू उत्‍पन्‍न (आर्थिक गुंतवणूकीवरचे सोडून) 

  • अ.  तुमच्‍या मासिक खर्चापेक्षा जास्‍त 
  • ब.  साधारण मासिक खर्चाएवढे 
  • क.  मासिक खर्चापेक्षा कमी (गुंतवणूकीवरच्‍या उत्‍पन्‍नाची जोड द्यावी लागते) 
  • ड.  पूर्णपणे गुंतवणूकीच्‍या उत्‍पन्‍नावर अवलंबून 

4. तुमचे उत्‍पन्‍न असे आहे. 

  • अ.  पूर्ण स्‍थीर 
  • ब. स्थिर 
  • क. बरेचसे स्थिर 
  • ड.  काहीसे अस्थिर 

5.  तुमच्‍यावर कितीजण अवलंबून आहेत? 

  • अ.  कोणी नाही 
  • ब.  1-2 व्‍यक्‍ती 
  • क.  3 ते 5 व्‍यक्‍ती 
  • ड.  5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती 

 

👉तुमचा गुंतवणूकी विषयीचा दृष्टिकोनः

6.  तुम्‍ही स्‍वतःला शेअर बाजारात किती अनुभवी समजता?

  • अ.  चांगला अनुभव आणि जोखमीची पूर्ण कल्‍पना आहे 
  • ब.  थोडीशी माहिती आहे 
  • क.  काहीच माहिती नाही 

7.  तुम्‍ही दीर्घ कालावधीकरिता म्‍हणून केलेली गुंतवणूक किती वर्षे ठेवता ?

  • अ.  10 वर्षापेक्षा जास्‍त 
  • ब.  6 ते 10 वर्षे 
  • क.  5 वर्षापेक्षा कमी 

8.  गुंतवणूकीतून अपेक्षित  उत्‍पन्‍नाचा वार्षिक दर किती आहे?

  • अ.  18% पेक्षा जास्‍त 
  • ब. 13 ते 18% टक्‍के 
  • क. 12 ते 15% टक्‍के
  • ड.   8 % 

9.  पुढीलपैकी कुठली योजना तुम्‍ही निवडाल? 

  • अ.  उच्‍च परतावा आणि प्रचंड चढउतार (+५०% -25%)
  • ब.  मध्‍यम परतावा आणि थोडे चढउतार (+15% -10%) 
  • क.  कमी परतावा आणि मुद्दलाची पूर्ण सुरक्षा (+8% आणि -0%)  

१०.  तुम्ही गुंतवलेल्या रकमेत २५% घट झाली आहे तर तुम्ही:

  • अ. नवीन युनिट्स विकत घ्याल
  • ब. सर्व युनिट्स तशीच ठेवाल
  • क. काही युनिट्स विकून टाकाल
  • ड. सर्व युनिट्स विकून टाकाल

11. “माझ्या गुंतवणुकीवर तोटा झालेला मला पसंत नसतो.” हे विधान मला,

  • अ. पूर्णपणे मान्य
  • ब. बरेचसे मान्य
  • क. बरेचसे अमान्य
  • ड. पूर्णपणे अमान्य आहे

 

वरील प्रश्नाची उत्तरे देऊन तुमच्या उत्तरांना गुण पुढील प्रमाणे द्या:

अ: १             ब: २             क: ३           ड: 4             इ: ५

 

सर्व उत्तरांच्या गुणांची बेरीज करा आणि तुमचे एकूण गुण किती आले यावर तुमची जोखीम निर्देशांक पातळी तुम्हाला समजून येईल.

    तुमचे एकूण गुण              जोखीम निर्देशांक पातळी

  • २२ पेक्षा कमी गुण      :      उच्च High
  • २२ ते ३२ गुण            :       मध्यम Medium
  • ३२ पेक्षा जास्त गुण    :       कमी Low

 

Low Risk – Low Profit

Moderate Risk – Medium Profit/ Average Profit

High Risk- High Profit 

#RISKOMETER: जसे प्रत्येकाची भूक, चव, आवड, खाण्याची पद्धत  वेगवेगळी असते, तशीच आपली धोका पत्करण्याची/पचवण्याची क्षमता/भूक देखल वेगवेगळी असते.  गुंतवणुकीसाठी आर्थिक प्रश्नावली सोडवा आणि आपली रिस्क घेण्याची क्षमता तपासा इथून आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

इथून 👉 #RISKOMETER:

📕📗📙📘📚

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive