ते १२७ तास- बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस- मराठी- एरॉन रालस्‍टोन

अरुंद घळीत एरॉन अडकतो.  पाठोपाठ हातावर महाकाय दगड येऊन आदळतो. विचित्र परिस्थितीत वेदना सहन करण्‍याशिवाय आणि सुटकेसाठी कुणी तरी येईल, याची वाट बघण्‍या शिवाय पर्याय नसतो.  हे पर्यायही संपल्‍यावर अडकलेला हात तो कापायला घेतो.... थरार‍क दिवसांची आठवण सांगते... ‘’बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस’’’ हे पुस्‍तक.

ते १२७ तास

बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस 

लेखक- एरॉन रालस्‍टोन 

सत्‍यकथा-आत्‍मकथा-आत्‍मचरित्र

Te 127 Tas (Marathi, RESHMA KULKARNI-PATHARE)

मराठी अनुवाद- रेशमा कुलकर्णी-पठारे

पुस्‍तक परिचय-सारांश-समीक्षा

लेख साभार-समीक्षक-पुण्‍यनगरी-रसयात्री-संपर्क: ८८३०२९७१३७

ते १२७ तास
Te 127 Tas

(Marathi Translation of
“Between a Rock and a Hard Place”)

By Aeron Ralston

Autobiography in Marathi

ते १२७ तास

अरुंद घळीत एरॉन अडकतो.  पाठोपाठ हातावर महाकाय दगड येऊन आदळतो. विचित्र परिस्थितीत वेदना सहन करण्‍याशिवाय आणि सुटकेसाठी कुणी तरी येईल, याची वाट बघण्‍या शिवाय पर्याय नसतो.  हे पर्यायही संपल्‍यावर अडकलेला हात तो कापायला घेतो.... थरार‍क दिवसांची आठवण सांगते... ‘’बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस’’’ हे पुस्‍तक.

अमेरिकेतील कॅनियन या अत्‍यंत दुर्गम पर्वतरांगा, खोल द-या, अरूंद कपारी, निर्मनुष्‍य असलेल्‍या भागात अनेकजण रोमांचकारी अनुभव घेण्‍यासाठी जातात.  व्‍यवसायाने  इंजिनियर असलेला २७ वर्षाचा एरॉन रालस्‍टोन एका विकेंडला याठिकाणी जातो आणि त्‍याचं आयुष्‍य अमूलाग्र बदलतं.  

एरॉनने आपल्‍या आयुष्‍यात घडलेल्‍या एका अविस्‍मरणीय प्रसंगावर आत्‍मचरित्र लिहिलं.  या आत्‍मचरित्राने जगभरात अनेकांना प्रेरणा आणि जीवनाकडे बघण्‍याचा सकारात्‍मक दृष्टिकोन दिला.  

हे आत्‍मचरित्र अमेरिकेसह जगभरात सर्वाधिक वाचनीय झाले. या आत्‍मचरित्रावर आलेला वन ट्वेन्‍टी सेवन अवर्स (127 Hours) हा चित्रपटही प्रचंड गाजला. 

 


एके शनिवारी एरॉन रालस्‍टोन कॅनिअयनला जातो. अचानक एका अरूंद दरीत तो घसरून पडतो.  स्‍वतःला सावरण्‍यासाठी तो एका मोठ्या दगडाला पकडण्‍याचा प्रयत्‍न करतो, दुर्दैवाने तो दगडही त्‍याच्‍याबरोबर घरंगळतो आणि एका अरूंद कपारीत तो अडकतो.

त्‍या निमुळत्‍या दरीत त्‍याचा उजवा हात मोठ्या दगडाखाली अडकतो.  नाना प्रयत्‍न करूनही त्‍याला स्‍वतःची सुटका करता येत नाही.  मदतीसाठी खूप ओरडतो, परंतु निर्मनुष्‍य ठिकाणी त्‍याच्‍या हाका ऐकायला कुणीही नसतं.

दुर्गम आणि निर्मनुष्‍य प्रदेशात सुटकेसाठी कुणीही येणार नाही, हे कळून चुकल्‍यामुळे तो हताश होतो. कपारीत अडकून २४ तास उलटतात, पण त्‍याला त्‍यातून मार्ग काढता येत नाही. 

परिस्थितीशी झगडता झगडता एरॉन थकून जातो.  परंतु तेथून बाहेर पडण्‍यासाठी संघर्ष करण्‍याची जिद्द मन नि मेंदू काही सोडत नाही.  दुर्दैवं असं की वीकएंडला बाहेर जातोय याबद्दल आपल्‍या मित्रांना आणि घरच्‍यांनाही त्‍याने काही एक सांगितले नसल्‍याने कुणी त्‍याला शोधायलाही येत नाही.  

मदत मिळण्‍याचे सर्व मार्ग स्‍वतःहून बंद करणा-या एरॉनला आपल्‍या बेफिकिरीचा पश्‍चाताप होतो.  तो होऊनही आता काही उपयोग नसतो.  अवघड जागी अडकलेल्‍या एरॉनच्‍या डोळ्यासमोर, कुटुंब आई-वडिल आणि अनेक जुन्‍या आठवणी तरळतात.  अन्‍न-पाण्‍या वाचून कासावीस होणा-या एरॉनला भास होऊ लागतात. 

स्‍वतःचा मृत्‍यू त्‍याला समोर दिसू लागतो. शरीराने आणि मनाने खचलेला एरॉन सर्व हिंम्‍मत एकवटून चाकूने दगड कोरून हात सोडवण्‍याचा प्रयत्‍न करतो.  चाकू बोथट होतो, पण दगड मात्र हलतही नाही. 

दोन दिवूपासून अडकलेला, थकलेल्‍या एरॉनला स्‍वतःचे मूत्र पिऊन तहान भागवावी लागते.  तीन दिवस उलटतात तरीही त्‍याला मदत मिळत नाही.  या बिकट परिस्थितीतून जिवंत बाहेर पडू की नाही याची त्‍याला शाश्‍वतीच उरलेली नसते.  

 

हताश एरॉन चाकूने दगडावर स्‍वतःची जन्‍म आणि मृत्‍यूची तारीख कोरतो, शेवटचा संदेश म्‍हणून स्‍वतःच्‍या कॅमेरात तो कुटुंबियांसाठी बोलणे रेकॉर्ड करून मृत्‍यूला सामोरे जाण्‍याची तयार करतो.

अचानक सहाव्‍या दिवशी कुठल्‍याशा अंतःप्रेरणेने एरॉन झपाटतो.  अंगात हिंमत येते.  जीव वाचवण्‍यासाठी तो अडकलेला उजवा हात कापायचं ठरवतो.  अनेक दिवसांपासून अन्‍नपाण्‍याशिवाय अशक्‍त एरॉन दगड पोखरताना बोथट झालेल्‍या चाकूने स्‍वतःचाच हात कोपरापासून कापू लागतो.

स्‍वतःचाच अवयव कापताना वेदना किती तीव्र असतात याची त्‍याला जाणिव होते.  जिवंत राहण्‍याची तीव्र इच्‍छा त्‍या वेदनांवर मात करायला त्‍याला प्रेरित करते.  वेदना सहन करत सहाव्‍या दिवशी एरॉन स्‍वतःचा हात कापून त्‍या अरूंद दरीतून मुक्‍त होतो.

प्रत्‍येक सजीवाची जगण्‍याची उत्‍कट आणि नैसर्गिक प्रवृत्‍ती असते.  बिकट प्रसंगात आपण काय निर्णय घेतो यावर आपली निर्णय क्षमता ठरते.

आज जगभरात एरॉन रालस्‍टोन मेकॅनिकल इंजिनिअर, लेखक आणि प्रेरणादायी वक्‍ता म्‍हणून ओळखला जातो.  “Between a Rock and a Hard Place” या आपल्‍या आत्‍मचरित्रात त्‍याने आपले अनुभव मांडले आहेत.  एरॉन म्‍हणतो की, त्‍याने अगोदरच त्‍याचा हात कापला असता तर कदाचित अति-रक्‍तस्‍त्रावामुळे मृत्‍यूही ओढवला असता.   

सहाव्‍या दिवशीही त्‍याने हात कापला नसता तरीही मृत्‍यू अटळ होताच.  एरॉनच्‍या साहसाची दखल घेऊन त्‍याच्‍या जीवन-मृत्‍यूच्‍या संघर्षावर एक चित्रपटही झळकला आहे.


 

मृत्‍यूशी संघर्ष करूनही एरॉनने आपला छंद सोडला नाही, हात गेला पण आत्‍मविश्‍वास गमावला नाही.  एरॉनने पुढे कृत्रिम हाताच्‍या साहाय्याने गिर्यारोहन चालूच ठेवले.  हात गमावल्‍याच्‍या दुःखावर त्‍याने स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वाने मात केली.  एरॉनने कधीही स्‍वतःच्‍या अपंगत्‍वाचे त्‍याने भांडवल केले नाही.   

स्‍वतःच्‍या अपंगत्‍वाच्‍या दुःखात खचण्‍यापेक्षा जीवनाकडे बघण्‍याचा सकारात्‍मक दृष्टिकोन त्‍याने जगाला दिला.  आजही सर्वत्र एरॉनची व्‍याख्‍यानं ऐकली जातात.  जग बदलवण्‍यापेक्षा स्‍वतः बदललं की जगही बदलतं.  

प्रयत्‍न करणा-याला परमेश्‍वरही साथ दे, फक्‍त आत्‍मविश्‍वास आणि हिंमत हवी. 

दुर्दैवाने अवयव गमावणा-याला निसर्ग दिव्‍यांग करतो आणि धडधाकट असूनही दुर्बल मनोवृत्‍तीच्‍या माणसांना पांगळं करतो.  आपण काय व्‍हावं हे स्‍वतः ठरवायचं….!

लेख साभार-समीक्षक-पुण्‍यनगरी-रसयात्री-संपर्क: ८८३०२९७१३७

 

“Between a Rock and a Hard Place”

By Aeron Ralston

Autobiography in Marathi

Book Review in Marathi

ते १२७ तास

बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस

लेखक- एरॉन रालस्‍टोन

सत्‍यकथा-आत्‍मकथा-आत्‍मचरित्र

मराठी अनुवाद

पुस्‍तक समीक्षा

 

#आत्‍मचरित्र #इंग्रजी विभाग-अनुवाद #बिटविन अ रॉक एण्‍ड अ हार्ड प्‍लेस- #एरॉन रालस्‍टोन आत्‍मचरित्र #मराठी #सत्‍यकथा-आत्‍मकथा #Between a Rock and a Hard Place #Aeron Ralston #Autobiography in Marathi #Between a Rock and a Hard Place #Book Review in Marathi

 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive