गुगलची नोकरी सोडून बनला समोसेवाला.! दि बोहरी किचन (हाऊ आय क्विट गुगल टू सेल समोसाज -मुनाफ कपाडिया) | (The BOHRI Kitchen Story) How I Quit Google to sell Samosaj by Munaf Kapadia

मुनाफ कपाडिया या तरूणाने गुगलची नोकरी सोडली आणि त्‍याने हॉटेलसदृश्‍य व्‍यवसायात उडी घेतली. त्‍या सुखवस्‍तू आयुष्‍याकडे पाठ फिरवत स्‍वतःचा व्‍यवसाय सुरू केला.  त्‍या प्रवासाचे अनुभवकथन आणि वर्णन हाऊ आय क्विट गुगल टू सेल समोसाज

गुगलची नोकरी सोडून बनला समोसेवाला..!


मुनाफ कपाडिया या तरूणाने गुगलची नोकरी सोडली आणि त्‍याने हॉटेलसदृश्‍य व्‍यवसायात उडी घेतली.  गुगलसारख्‍या ठिकाणी नोकरी हे कोणाचेही स्‍वप्‍न असते.  आयुष्‍य सुरळीत चालणार याची हमी त्‍यात असते.
मात्र, तरीही त्‍या सुखवस्‍तू आयुष्‍याकडे पाठ फिरवत स्‍वतःचा व्‍यवसाय मुनाफ यांनी सुरू केला.  त्‍या प्रवासाचे वर्णन मुनाफ यांनी आपल्‍या हाऊ आय क्विट गुगल टू सेल समोसाजया पुस्‍तकात केले आहे.

हाऊ आय क्विट गुगल टू सेल समोसाज

नवउद्योजकाची धमक आणि धडाडी

लेखक- मुनाफ कपाडिया

प्रकाशक-हार्पर कॉलिन्‍स

पुस्‍तक परिचय मराठी

लेख-साभारः राहुल गोखले संपर्कः ९८२२८२८८१९  (बुकशेल्‍फपुण्‍यनगरी)

गुगल टू किचन

व्‍यवस्‍थापन शाखेची पदवी मुनाफ यांनी २०११ ला मिळवली आणि त्‍यांना च्‍युइंग-गम उत्‍पादन करणा-या रिगले इंडिया येथे लगेचच नोकरी मिळाली.  तीनच महिन्‍यांत त्‍यांना गुगलमधून बोलावणे आले.  त्‍यांच्‍या हैदराबाद येथील कार्यालयासाठी मुनाफ यांची निवड झाली.  तथापि त्‍या साचेबद्ध कामात त्‍यांचा जीव रमत नव्‍हता. 

दि बोहरी किचन (TBK)

सुटीच्‍या दिवशी त्‍यांची आई आणि ते स्‍वतः हे टीव्‍हीवर काय पाहायचे यावरून भांडत होते. 

आपल्‍या आईने टीव्‍हीत गुंतून जाण्‍यापेक्षा आपला वेळ रमवण्‍यासाठी तिला चांगला पर्याय उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने तिच्‍या पाककलेला प्रोत्‍साहन देण्‍याचा विचार मुनाफ यांनी केला आणि त्‍यातून दि बोहरी किचन’ (टीबीके) च्‍या संकल्‍पनेचा जन्‍म झाला. 

दाऊदी बोहरा पद्धतीचे भोजन मुनाफ यांची आई घरात बनवत असे आणि जेवण करू इच्छिणा-यांनी तेथे येऊन जेवायचे असा हा प्रयोग होता.

२० नोव्‍हेंबर २०१४ ला सर्वप्रथम टीबीकेतर्फे भोजन आयोजित करण्‍यात आले.  त्‍यात अनेक पदार्थ होतेच.  पण त्‍याच आकर्षक पदार्थ होता तो म्‍हणजे स्‍मोक्‍ड खिमा मटण समोसा.


स्‍मोक्‍ड खिमा मटण समोसा.

त्‍याच सुमारास मुनाफ यांचे वरिष्‍ठ विकास यांनी त्‍या प्रयोगाकडे व्‍यवसाय म्‍हणून पाहण्‍याचा सल्‍ला दिला.  मुनाफ यांनी नोकरीला रामराम ठोकला.  मुनाफ लिहितातः

भय अपयशाचे नव्‍हते, पश्‍चातापाचे नव्‍हते आणि प्रसंगी नामुष्‍कीचेही नव्‍हते.  भय हे आपला निर्णय आपल्‍या आई-वडिलांना सांगण्‍याचे होते.
- मुनाफ कपाडिया-फाऊंडर, टीबीके आणि लेखक

अर्थात त्‍यांनत त्‍यांच्‍या आई-‍वडिलांनी त्‍यांना पूर्ण पाठिंबा दिला. येणा-या खवैय्यांना फक्‍त बोहरा पद्धतीच्‍या भोजनाचा आस्‍वाद द्यायचा नव्‍हता., तर या समाजाविषयी त्‍यांच्‍या माहितीत भर पडावी, अशीही मुनाफ यांची इच्‍छा होती. 

दाऊदी बोहरा समाज

दाऊदी बोहरा हा समाज शिया मुस्लिमांचा एक उप पंथ कसा आहे, येमेनमध्‍ये याची ११५१ मध्‍ये मुहूर्तमेढ कशी रोवली, नंतर १५६७ मध्‍ये तो समाज भारतात गुजरातमध्‍ये आला, पदार्थात केवळ मांसाहाराकडून शाकाहाराचाही अंतर्भाव कसा होत गेला, थाळ म्‍हणजे काय, इत्‍यादी माहिती मुनाफ येणा-या खवैय्या पाहुण्‍यांना ती देऊ लागले. दि बोहरी किचनसाठी लोगो देखील स्‍वतःच तयार केला.

कुलाब्‍याच्‍या आपल्‍या घरातून टीबीकेला बाहेर न्‍यावे ही कल्‍पना त्‍यांना आली ती एका खाद्य जत्रेत सहभाग घेतल्‍यानंतर.  तेथे काजू चिकन आणि जीरा राईसच्‍या ६५ प्‍लेट, बिर्याणीच्‍या ३० प्‍लेट आणि ४०० समोसे अवघ्‍या दीड तासात खपले. 



Source: Internet- Google Search

दखल

पदार्थांची घरपोच व्‍यवस्‍था करण्‍याची कल्‍पना पुढे आली.  त्‍यासाठी क्‍लाऊड किचन पद्धत अवलंबण्‍याची चाचपणी मुनाफ यांनी तयार केली.  त्‍यात अडचणी अनंत आल्‍या आणि खर्चही अवाढव्‍य.  ग्राहकांकडून मिळणा-या पसंतीच्‍या फुटपट्टीवर त्‍यांना प्रतिकूल अभिप्राय येऊ लागले.

थर्टी अंडर थर्टी
तिशीतील-३०

आपल्‍या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी बजावणा- तिशीतील-३० जणांत फोर्ब्‍स” या आंतरराष्‍ट्रीय सुप्रसिद्ध मासिकाने मुनाफ यांची निवड केली.



त्‍याचा विपरीत परिणाम मुनाफ यांच्‍या प्रकृतीवर होऊ लागला, पण त्‍यांनी कच खाल्‍ली नाही. थर्टी अंडर थर्टी-  म्‍हणजेच आपल्‍या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी बजावणा-या तिशीतील-३० जणांत फोर्ब्‍सने या आंतरराष्‍ट्रीय सुप्रसिद्ध मासिकाने मुनाफ यांची निवड केली.

दूरचित्रवाणीवर जे फूड शो होतात तेथे मुनाफ यांना अनेक संधी उपलब्‍ध झाल्‍या.  पण तरीही व्‍यवसायाच्‍या विस्‍तारासाठी गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार सहज मिळतात असे नाही.  या प्रवासाला मुनाफ यांनी रेझ फन नॉट फंड्स असे म्‍हटले आहे.  

एक कोटी रूपये इतका पैसा मुनाफ गुंतवणूकदारांकडून कष्‍टाने उभा करू शकले.  आणि तोही आपल्‍या प्रसिद्धीसाठी कोणत्‍याही व्‍यावसायिक सेवा न घेता.  या गुंतवणुकीच्‍या आधारावर टीबीकेचा विस्‍तार होत होता.

टीबीके आणि कोरोना

२०१९ ला टीबीकेची उलाढाल दर महिन्‍याला ३४ लाखांपर्यंत पोहोचली होती.  एक ब्रॅंड तयार झाला.  त्‍यांनतर कोरोनाने जग व्‍यापले आणि मुनाफ यांच्‍या व्‍यवसायावर देखील लॉकडाऊन इत्‍यादींचा मोठा विपरित परिणाम झाला.  तरीही टीबीकेच्‍या विस्‍ताराची स्‍वप्‍ने अद्यापि ते बाळगून आहेत.

धमक, धडाडी, नावीन्‍य, उमेद या बळावर केलेल्‍या प्रवासाचे कोणताही आडपडदा न ठेवता मुनाफ यांनी केलेले हे प्रांजळ अनुभवकथन व्‍यवसायात उतरू इच्छिणा-या नवतरूणांना प्रेरणा देईल यात शंका नाही.  

 

पुस्‍तक- हाऊ आय क्विट गुगल टू सेल समोसाज
How I Quit Google to sell Samosaj by Munaf Kapadia

लेखक- मुनाफ कपाडिया

प्रकाशक- हार्पर कॉलिन्‍स

पुस्‍तक परिचय मराठी

ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive