बहुविध बुद्दिमत्‍तेचे ज्ञात-अज्ञात कर्मवीर-आर.ए.कुंभार-पुस्‍तक परिचय

 कर्मवीरांच्‍या चरित्राच्‍या आधारे त्‍यांची बहुविध बुद्धिमत्‍ता शोधण्‍याची लेखकाची धडपड आश्‍वासक असून मराठीत अशी पुस्‍तके नसल्‍यात जमा आहेत.

 

बहुविध बुद्दिमत्‍तेचे
ज्ञात-अज्ञात कर्मवीर

 आर.ए.कुंभार 

पुस्‍तक परिचय 

 


 dnyat adnyat karmaveer, karmaveer bhaurao patil yanchya bahuvidh buddhimatta
dnyat adnyat multiple intelligence of karmaveer bhaurao patil by Dr.R.A.Kumbhar marathi book review

ज्ञात-अज्ञात कर्मवीर अर्थात कर्मवीरांच्या बहुविध बुद्धिमत्ता
-डॉ आर ए कुंभार

संविधानाच्‍या स्‍वप्‍नरातलं गाव’ या माझ्या कवितासंग्रहास सत्‍यशोधक दीन मित्र मुकुंदराव पाटील साहित्‍य पुरस्‍कार मिळाला.  त्‍यावेळी अहमदनगर जिल्‍ह्यातील तरवडी गावी गेलो होतो.   

कार्यक्रम संपल्‍यावर तेथील माध्‍यमिक हायस्‍कूलच्‍या आवारात मुकुंदराव यांची पुस्‍तके विक्रीला उपलब्‍ध होती, तिथे एक अतिशय चांगले पुस्‍तक मिळाले.  ते पुस्‍तक नुसते वाचले नाही, अनुभवले, छत्रपती शिवाजी कॉनलेजच्‍या माझ्या मराठी विषयाच्‍या विद्यार्थ्‍यांना मनोमन त्‍याची माहिती दिली.

पुस्‍तकाचे नाव आहे ’ज्ञात-अज्ञात कर्मवीर’ अर्थात कर्मवीरांच्‍या बहुविध बुद्धिमत्‍ता’’.

लेखक कर्मवीरी यांच्‍या “कमवा आणि शिका” (earn and learn) योजनेतून शिक्षण घेतलेले आणि रयत शिक्षण संस्‍थेत शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयात प्राचार्य म्‍हणून काम केलेले, आर.ए.कूंभार सर.  आजपर्यंत अनेकांनी लिहिलेली कर्मवीरांची चरित्रे वाचली, पण हे पुस्‍तक नव्‍या पद्धतीने कर्मवीर यांचा शोध घेणारे आहे.

अमेरिकन मानसशास्‍त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्‍तेचा सिद्धांत सांगून कुंभार यांनी या ग्रंथात कर्मवरी भाऊराव पाटील यांच्‍रूात या बुद्धिमत्‍ता कशा दिसतात हे सांगण्‍यासाठी हे पुस्‍तक लेखकाने लिहिले आहे.

कर्मवीरांच्‍या चरित्राच्‍या आधारे त्‍यांची बहुविध बुद्धिमत्‍ता शोधण्‍याची लेखकाची धडपड आश्‍वासक असून मराठीत अशी पुस्‍तके नसल्‍यात जमा आहेत.  रूढ चरित्र लेखनात कार्याचा तपशील यालाच महत्‍व असते पण या पद्धतीने शोध घेण्‍यातून कर्मवीरांच्‍या बुद्धिमत्‍तेचे आणि त्‍यांच्‍यातील मूल्‍यविचार यांचा शोध घेता येतो हे त्‍यांनी या पुस्‍तकातून सिद्ध केले आहे. 

कर्मवीरांच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचा नव्‍याने शोध ही प्रेरणा या ग्रंथाच्‍या मुळाशी आहे.  हे पुस्‍तक वाचताना वाचकांना घाई करून उपयोग नाही.

बहुविध बुद्धिमत्‍तेचा सिद्धांत प्रथम समजून घेणे आणि त्‍या आधारे कर्मवीरांच्‍या आयुष्‍यातील घटनांच्‍या आधारे लेखकाने काय शोध घेतला आहे हे इथे महत्‍वाचे आहे.  सिद्धांत, तत्‍व विवेचन आणि दिलेले पुरावे यामुळे हा ग्रंथ विश्‍वासार्ह आहे.

लेख साभारः डॉ.सुभाष वाघमारे (दै.लोकमत,मंथन,पुस्‍तक परिचय) 

 

पुस्‍तकः ज्ञात अज्ञात कर्मवरी 

लेखकः आर.ए.कुंभार

प्रकाशकः विजया प्रकाशन, कराड 

 

📗📘📙📖📕📑 


 


  📗📘📙📖📕📑 
 
 
 

आजवर कर्मवीर भाऊराव पाटील यांचेवर अनेक चरित्रे लिहिली गेलीत कोणी समाजशास्त्रीय पद्धतीने लेखन केले. कोणी शिक्षणशास्त्र दृष्टीकोन घेऊन त्यांचे चरित्र लिहिले, तर कोणी जन्म आणि मृत्यू यातील सलग घटना घेऊन माहिती संकलित करून चरित्रे लिहिली.

कर्मवीर यांचे विद्यार्थी ,अनुयायी ,रयत मध्ये कर्मवीरांच्या सहवासात घडलेले ,तसेच त्यांच्या शिक्षण संस्थेत काम करणारे प्राचार्य यांनी देखील लेखन केले आहे ...मात्र कर्मवीर यांच्या व्यक्तिमत्वाचा मानसशास्त्रीय पद्धतीने शोध मा. आर .ए .कुंभार सरांनी केला आहे. 

९ मे २०२१ रोजी हे पुस्तक कराड येथून विजया वितरण कडून प्रकाशित झाले आहे. अमेरिकेचे मानस शास्त्र ज्ञ हॉवर्ड गार्डनर यांनी माणसाकडे एकच बुद्धिमता नसते तर आठ प्रकारच्या बुद्धिमता असतात असे सांगून बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत १९८३ ला मांडला. 

यावर अभ्यास करून मा. आर. ए. कुंभार यांनी कर्मवीरांच्यातील आठ बुद्धिमत्तेपैकी कोणत्या बुद्धिमत्ता प्रभावी आहेत हा शोध घेतला आहे.  त्यांचे हे नवे पुस्तक नवा शोध असून प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे. 

आपल्यात कोणत्या आठ बुद्धिमत्ता असतात हे समजून घ्यायलाच हवे, यासाठीच आमच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांनी एकत्र येऊन विद्यार्थी प्राध्यापक, जिज्ञासू वाचक यांचेसाठी त्यांची मुलाखत घेतली. गुरुवार दिनांक 27 जानेवारी २०२२ रोजी ही मुलाखत घेण्यात आली आहे.

 

  📗📘📙📖📕📑

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive