संवेदनशीलतेची घुसळण करणारे ‘मुलचं मुलं’ -संजय हळदीकर -पुस्‍तक परिचय

मुलंच मुलं या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून संजय हळदीकर यांनी सामान्‍य मुलांचया विश्‍वाला अक्षर मंचावर आणण्‍याचे कार्य केले आहे.

संवेदनशीलतेची घुसळण करणारे मुलंच मुलं

मुलंच मुलं

संजय हळदीकर

 पुस्‍तक परिचय

 


मुलच मुलं हे संजय हहदीकर यांनी लिहिलेले पुस्‍तक नुकतेच प्रकाशित झाले.  कोल्‍हापुरातील भाग्‍यश्री प्रकाशन यांनी हे पुस्‍तक प्रकाशित केले आहे. संजय हळदीकर हे कोल्‍हापुरातील एक प्रयोगशील नाटकवेडे व्‍यक्‍तीमत्‍त्‍व आहेत.  आम्‍ही असू लाडके या प्रसिद्ध चित्रपटाचे कलादिग्‍दर्शन त्‍यांनी केले आहे. 

त्‍यांनी निरीक्षण केलेल्‍या, अनुभवलेल्‍या मुलांचे संवेदनशील अनुभव छोट्या छोट्या कथांमध्‍ये मांडण्‍याचा प्रयत्‍न त्‍यांनी या पुस्‍तकात केला आहे. पुस्‍तक आणि यातील कथा अत्‍यंत आटोपशीर आहेत.  मुद्रण आकारही मोठा असल्‍याने वाचकाला पुस्‍तक गतीने वाचता येते.

मुलंच मुलं च्‍या अंतरंगामध्‍ये तीन भाग केले आहेत.  नऊ  कथांचा पहिल्‍या भागात  समावेश आहे.  या नऊ कथा आपणांस अंतर्मुख करायला लावणा-या आहेत.  समाजात साधारणतः मुलांबद्दल गैरसमज अधिक आहेत.

मुलांचे विश्‍व छोटे, अज्ञानाचे असे वसर्वांना वाटते. परंतु असं नसतं, मुलांचे विश्‍व हे खूप व्‍यापक आहे.  या विश्‍वात स्‍वप्‍नं असतात, जिद्द असते, भय असतं, गोंधळ, न्‍यूनगंड असतो.  हे सारे विश्‍व समजून घेण्‍याची जिज्ञासा आणि उत्‍सुकता मुलांमध्‍ये असते.  मग ही मुले सामान्‍य, प्रज्ञावंत असोत वा दित्‍यांग, गतिमंद असोत वा मतिमंद!  खूप काही प्रश्‍न मुलांमध्‍ये असतात. 

हे प्रश्‍न समजावेत, सुटावेत यासाठी मागच्‍या पिढीने खरंतर डोळसपणे प्रयत्‍न करायला हवेत.  अत्‍यंत साध्‍या, सोप्‍या सरळ शब्‍दात मुलं एखाद वाक्‍य बोलतात आणि विद्वान माणसं अचंबित होतात, हे आपण अनुभवत आहेात. 

वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांमधून मुलं जेव्‍हा आपणं सादरीकरएा करतात, आपल्‍या प्रज्ञेचे अविष्‍करण करतात, तेव्‍हा या मुलांची ऊर्जा प्रत्‍ययास येते.  साने गुरुजी नेहमी म्‍हणायचे,

मुलांमध्‍ये अपार शक्‍ती असते.  तिच्‍या विकसनात प्रेरणा देणे हे आपले काम आहे.

मुलंच मुलं या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून संजय हळदीकर यांनी सामान्‍य मुलांचया विश्‍वाला अक्षर मंचावर आणण्‍याचे कार्य केले आहे.

या छोटेखानी पुस्‍तकातील कथांची भाषाशैली ओघवती व प्रवाही आहे.  निवेदन शैली सुबोध असल्‍याने रोचकता वाढली आहे.  विजय टिपुगडे यांचं अर्थवाही मुखपृष्‍ठ आणि युवराज जाधव यांची पूरक रेखाटणे पुस्‍तकाची उंची वाढवतात.  अभिराम भडकमकर यांचे ब्‍लर्ब लेखन पुस्‍तकाचा सार सांगते.

 

लेख साभारः विश्‍वास सुतार, दै.लोकमत, पुस्‍तक परिचय 

 

पुस्‍तकाचे नांवः मुलंच मुलं

लेखकः संजय हळदीकर

प्रकाशकः भाग्‍यश्री प्रकाशन, कोल्‍हापूर

पृष्‍ठेः 78  मूल्‍यः 150 रूपये

 

 ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या, मुलंच मुलं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न मुलंच मुलं पुस्‍तक प्रकाशन सोहळाः



 #साभारः युट्यूब चॅनेल बी

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive