आपलं पोट आपल्या हातात -पचनसंस्थेचे आजार ओळख उपाय आणि उपचार- डॉ. नितीन जोशी

या पुस्तकाचे प्रयोजन केवळ ‘रुग्णांची काळजी घेणे’ एवढेच नसून, सामान्यांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरुकता निर्माण करणे  हेही आहे. या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे.  

 
आपलं पोट आपल्या हातात 
पचनसंस्थेचे आजार ओळख उपाय आणि उपचार
 डॉ. नितीन जोशी
पुस्‍तक परिचय मराठी  
 

 Aapla Pot Aplya Hatat 
 Marathi Edition 
 
  • या पुस्तकाचे प्रयोजन केवळ ‘रुग्णांची काळजी घेणे’ एवढेच नसून,सामान्यांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरुकता निर्माण करणे  हेही आहे.
  • या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे. 
  • पोटाच्या सुरक्षेचा कोश
 

पद्मश्री डॉ. अमित मायदेव म्हणतात की, ‘पोटाची आंतरिक रचना ऑर्केस्ट्रासारखी आहे. आतील सर्व अवयवांचा नाद उत्तम ऐकू आला तर तुमचे आरोग्य योग्य, अन्यथा बद्द आवाज आला तर रोगट…’ याबद्दलची जाणीव नीट करून घ्यायची तर डॉ. नितीन जोशी यांचे ‘आपलं पोट आपल्या हातात’ हे पुस्तक कोणत्याही माणसाने वाचायला हवे.

 -Apal Pot Aplya Hatat (आपलं पोट आपल्या हातात)

 
माणसे जिभेचे छंद लक्षात घेतात पण पोटाची गरज लक्षात घेत नाहीत. चवीनं मानसिकता चाळवली जाते पण चव घातही करू शकते हे पोट बिघडल्याशिवाय कळत नाही.  शिवाय फक्त ‘अन्नपदार्थसेवन’ इतकाच विषय हा पोटांशी संलग्न नसतो, तर माणसांच्या भावभावना, मनोव्यापार आणि चीडचीड यांचा केवढा थेट संबंध पोटाशी असतो आणि त्याची मीमांसा डॉ. नितीन जोशी यांनी या पुस्तकात केली आहे. 
 
खूप सोपे, सहज भाषाशैलीतले हे पुस्तक कोणत्याही माणसाला ‘पोटभर’ समाधान देईल हे खरे! पचनसंस्थेची रचना आणि पंचनसंस्थेचे कार्य या पहिल्या ज्ञानमूलक पण सोप्या शैलीमधून साकारलेल्या प्रकरणांतच हे पुस्तक पकड घेते. 
 
पुस्तकातील सर्व महत्त्वाची माहिती ‘निबंध’ लिहावा तशी न देता छोटे-छोटे लेख आणि त्या सर्व लेखांना पूरक छायाचित्रे, पूरक तक्ते देऊन संपूर्ण पोटाचे मशिन डॉक्टरांनी समजून सांगितले; जे केवळ अप्रतिम अशा श्रेणीचे आहे.
 
‘पाणी’ ज्याला आपण जीवन म्हटले त्या पाण्याबद्दल आम जनता किती जागरूक असते? पोटाच्या आजारांमध्ये पाण्याचा हस्तक्षेप व्यवस्थित तपासला पाहिजे. आत ढकललेले अन्न आणि आत घेतलेले पाणी याबद्दलची निष्काळजी आजारांशी सख्य वाढविते. हे सगळे किती सुगम पद्धतीने डॉ. जोशी यांनी सांगितले आहे. आपले पोट आपल्या हातांत ‘निरामय’ ठेवावयाचे असेल तर डॉक्टरांचे हे पुस्तक आपल्या घरांत हवेच हवे. 
 
या पुस्तकाची काही ठळक वैशिष्ट्ये अशी की, बोजड किंवा शास्त्रीय परिभाषेतून हे पुस्तक लिहिले नाही. शिवाय, डॉक्टरांच्या रोजच्या वैद्यकीय अनुभवांतून तसेच प्रात्यक्षिकांतून हे पुस्तक सिद्ध झाल्यामुळे अंदाजांवर अथवा कल्पना लढवून भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सांगणारे हे पुस्तक नाही. उलट रोज-दररोज आपण आपल्या अन्नपाण्याबद्दल सावध आणि हुशार राहावे; आणि ‘पोट छान तर दुनिया छान’ असा नवा कानमंत्र देणारे हे पुस्तक आहे. 
 
आधी पोटोबा मग… किंवा सारे काही पोटसाठी, किंवा पोट आहे म्हणूनच किंवा पोटावर मारू नका… अशा कितीतरी म्हणी समाजात माणसांच्या कानांवर पडत असतात. याचा अर्थ ‘पोट’ ही आपली कॅबिनेट अशी संस्था आहे. एकप्रकारे तो कारखाना आहे. परंतु या कारखान्यातील ‘खाना’ हे क्रियापद आणि त्यासंबंधीची ज्ञानवाचक सावधानता सर्वहारा पाळली जात नाही. 
 
‘भूक राखून खाणे’ हे फारच महत्त्वाचे मानले गेले आहे. आयुर्वेदात तर त्यावर केवढे काम झाले आहे! शिवाय, सेवनकार्याबद्दल, ‘एकपट खाणे, दुप्पट पिणे (पाण्याबद्दल बरं का) आणि तिप्पट चालणे’ ही अशी खाणे-पिणे-चालणेसंबंधीची सायकल सांभाळली तर नक्कीच आपले पोट आपल्या हातांमध्ये सुरक्षित राहील यात शंका नाही.


डॉ. नितीन जोशी यांच्या ग्रंथातली आहार आणि आहाराचे नियम किंवा आहार आणि व्यायामांचा जमाखर्च तसेच अॅसिडिटी झाल्यावर, अपचन झाले तर, बद्धकोष्ठतेची तकलीफ असेल तर अथवा आतड्यांचा अल्सर, मूळव्याध, कावीळ, लठ्ठपणा, जठराचा लकवा, चिडचिडेपणा (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम), अॅनिमिया अशा विविध परममहात्त्वाच्या पचनसंस्थानिगडित विषयांवर चित्रांमधून, तालिकांमधून आणि संक्षिप्त विश्लेषणातून पुस्तकात दिलेली माहिती सर्वोत्तम अशा पद्धतीची ठरावी.  
 
वर दर्शविलेल्या कोणत्याही ‘दुखण्याच्या’ काळात ‘काय करावे आणि काय करू नये’ यांचे जे नियम पुस्तकात कोष्टकांसह दाखविले ते तर कोणत्याही व्यक्तीला सहजरीत्या कळतात.  मनांचा, शरीरांचा, अन्नांचा सरळ परंतु सहज पण अभ्यासपूर्ण विचार देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरात असावे अशा गुणांचे आहे. सांप्रतकाळात या जगरहाटीत ताण वाढत आहेत. 
 
दगदग आणि धावपळ जणू अनिवार्य झालीय. घरांत छान भाजलेले-शिजवलेले खाणे कमी झाले आणि ‘बाहेरच्या’ खाण्यांवरच शरीराचे पोषण करायची सवय जडल्यामुळे आपल्या पोटाचा उकंडा कधी होतो हे कळतच नाही. शिवाय ऋतुचक्रबदलांप्रमाणे व्याधींची बेरीज-वजाबाकी आयुष्यभर पिच्छा पुरवते ते वेगळेच. अशा धकाधकीच्या परिस्थितीत पोटोबाबद्दल मस्त हितोपदेश करणारे हे पुस्तक आहे.

 
 
आपलं पोट आपल्या हातात

डॉ. नितीन जोशी

अभंग प्रकाशन, नांदेड

पृष्ठं : ९६

किंमत : २०० रु.  
 
 📑🔖📕📖📗📘📙
 
आपली पचनसंस्‍थाः
 


इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive